हे शाश्वत ज्ञान नव्हे !

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
18 Oct 2013 - 4:49 pm
गाभा: 

आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:

'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.

पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.

नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.

आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल?

पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?

म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.

कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.

यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.

वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.

नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.

जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.

अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

धन्या's picture

21 Oct 2013 - 11:39 pm | धन्या

ते यनावाला ते हेच का?

ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.

मिपावर जवळपास साडे-तीन वर्ष काढूनही तुम्हालाही हा प्रश्न पडावा ना. असोच.

उद्दाम's picture

22 Oct 2013 - 9:29 am | उद्दाम

काय झाले? यादी मिळाली का?

--- ( ८४ लक्ष) योनीवाला उर्फ उद्दाम

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 10:47 am | ग्रेटथिन्कर

इथे यादी मिळेल.
www.yumtimes.swarg/moksha_yadi/PDF

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 10:53 am | मुक्त विहारि

नेहमीप्रमाणे,

तुम्ही तुमच्या पुर्वजांचा फोटो पाठवला.

असो, स्वतःची ओळख स्वतःच करून दिल्या बद्दल धन्यवाद.

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 11:34 am | ग्रेटथिन्कर

आभारी आहे.

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 12:01 pm | अनिरुद्ध प

भुताच्या तोन्डी रामनाम? हा चमत्कार कसा झाला?

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 12:22 pm | ग्रेटथिन्कर

जे जे भेटे भूत , ते ते मानीजे भगवंत-ज्ञानदेव.

उद्दाम's picture

22 Oct 2013 - 12:03 pm | उद्दाम

मुक्त विहारी आण्णा, ग्रेट्याचे उत्तर अगदीच चुकीचे नाही, जवळपास बरोबरच आहे. पुल नी तुज आहे तुजपाशी या नाटकात स्थितप्रज्ञ माणसाला गाढवाची उपमा दिलेली आहे. कारण मिठाई आणि उकीरड्यावरचा कागद ते एकाच भावनेने चघळते.

स्थितपरज्ञ होणे ही मोक्षाची सुरुवात असावी कदाचित.

त्यामुळे मोक्षाला गेलेल्या आत्म्याची अवस्थाही यापेक्षा फार वेगळी नसावी.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:16 pm | मुक्त विहारि

?

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 12:33 pm | अनिरुद्ध प

हो कोणात जर सकारात्मक बदल झाला तर आपण आनंद मानुयात कसे.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 12:44 pm | मुक्त विहारि

हा माणसांत होतो असे ऐकून आहे...

एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं ते माहिती नाही. - किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही.

दुसर्‍याच्या उपदेशाने, मग ते किती का सकारात्मक विचार असेनात माणूस सुधारत नाही. कारण माणसाच्या विचारांची झापडं अगदी घट्ट असतात. यदाकदाचित तो माणूस दाणकन कुठे आपटला, ती विचारांची झापडं फाटली तर त्याला वास्तव दिसतं आणि तो माणूस भानावर येतो. अन्यथा नाही. कारण ती विचारांची झापडं ही त्याची स्वतःच निर्माण केलेली खोटी प्रतिमा असते. ही स्वतःबद्दलची खोटी प्रतिमा त्याचं आतील तुटलेपण जगासमोर उघडं पडण्यापासून वाचवत असते.

*हे सारं कुणा एका व्यक्तीला उद्देशून नाही.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:07 pm | मुक्त विहारि

"किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने तो बिघडला नाही."

थोडी भर,

"लाथा खावून पण गहन विचार करणे सोडले नाही आणि ट्रोल नांव पडले तरी प्रतिसाद देणे थांबवले नाही,"

असो,

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 2:10 pm | ग्रेटथिन्कर

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक
निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

ग्रेटथिन्कर's picture

22 Oct 2013 - 2:11 pm | ग्रेटथिन्कर

मी माणुस नाही ,मी गाढव आहे. स्थितप्रज्ञ गाढव!. मिपावर एक
निराकार गाढव देखिल आहे. कधी कधी तर मला माणूस झाल्याची दुस्वप्न पडतात.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 2:15 pm | मुक्त विहारि

+०.०००००००००००००००००००००००००००००००००००००२

अजुन नगू घ्या....

थोडा थोडा फरक पडत आहे...

पण थोडे पथ्य पण पाळा.....

हे औषध घेतांना टंकनश्रम टाळावे लागतात...

मदनबाण's picture

22 Oct 2013 - 11:34 am | मदनबाण

नारायण ! नारायण ! ;)
काय मंडळी झाली का आध्यात्मात पीएचडी ? ;)

परत एकदा,
नारायण ! नारायण ! ;)

हा धागा अध्यात्म आणि विज्ञान यावरची चर्चा आहे की कोंबडयांची झुंज हेच कळेनासे झालंय.

या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.

सोत्रि's picture

22 Oct 2013 - 1:33 pm | सोत्रि

या सोत्रींना काम नव्हतं. उगाचंच पातऴ चिखलात दगड मारला.

हायला, ह्ये म्हंजे माझ्यावर अन्याय आहे. आता ह्याची दाद कोणाकडे मागा़यची?
संमंकडे गेलो असतो पण तेही कंपुबाजांना मदत करतात असा 'विद्युत' वेगाने साक्षात्कार करुन दिला गेल्याने तोही मार्ग बंद.
च्यामारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली ही तर
:(

- (अन्यायग्रस्त) सोकाजी

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 1:49 pm | मुक्त विहारि

दंडवत...

मृत्युन्जय's picture

22 Oct 2013 - 4:04 pm | मृत्युन्जय

पातऴ चिखलात

धन्या तुला पिवळ्या चिखलात म्हणायचे आहे का?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:11 pm | मुक्त विहारि

असे स्पष्ट पणे कधी बोलतात का?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:11 pm | मुक्त विहारि

असे स्पष्ट पणे कधी बोलतात का?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 4:11 pm | मुक्त विहारि

असे स्पष्ट पणे कधी बोलतात का?

पैसा's picture

22 Oct 2013 - 4:57 pm | पैसा

बाकी कोणाचं म्हैत नै. पण इथली विचारप्रवर्तक चर्चा वाचून माझे डोळे दिपले. डोळे खाडकन उघडले, डोळे मिटले. आणि सदेह मोक्षप्राप्ती झाली. आता कोणाला मोक्ष मिळालेल्यांची यादी किंवा मुक्ती म्हणजे काय याचा अर्थ हवा असेल तर इच्छुकांनी मला व्यनि करावा. त्या आयडीला मोक्ष देण्यात येईल.

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 5:05 pm | बॅटमॅन

चला, मोक्ष मिळालेल्या मिपाकरांच्या यादीत तुमचे नाव टाकतो. धाला शुण्य शंबर, तुमचा पयला णंबर!!

शेवटचा प्रतिसाद माझाच असायला हवा या अट्टाहासापोटी हा धागा दोनशेची मजल गाठणार यात शंकाच नाही. ;)

मी-सौरभ's picture

22 Oct 2013 - 7:30 pm | मी-सौरभ

बाकी हा धागा माझ्या सारख्या मोक्ष वगैरे सोडून ईतर क्षुल्लक गोष्टीत गुंतून राहणार्‍यासाठी नाहि.

चीअर्स टू यू!!
टाईम फोर अ लार्ज ऑण द रॉक्स ;)

आनंदी गोपाळ's picture

22 Oct 2013 - 8:45 pm | आनंदी गोपाळ

पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर.

यनावाला ही यांची जालीय आयडि. यांच्या लेखनाशी परिचय असल्यावर हे शंभर टक्के उपहासच आहे, हे तुमच्या चटकन लक्षात यायला हवे होते. उपक्रमावर यनावालांचे भरपूर लेख होते.

ते पत्र स्वतंत्रपणे वाचलं तर उपहास नक्कीच वाटत नाही.

ज्यांना यनावाला यांची वैचारीक भुमिका माहिती आहे, त्यांची लेखनशैली माहिती आहे त्यांनाच हा उपहास आहे हे कळू शकलं असतं.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2013 - 3:57 pm | प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त असते.हे दाभोलकरांनी वारंवार सांगितले आहे. अंनिस च्या उत्साही कार्यकर्त्यांकडून ते दर वेळी होतेच असे नाही हा भाग वेगळा. यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.

यनावालांच्या पत्रा ठासून उपहास भरला आहे हे फक्त जाणकाराला कळते. पण तो उपहासाचा उत्तम नमुना आहे हे मात्र निर्विवाद.

माझा या मताला आक्षेप आहे. त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही.

रच्याकने काका तुम्हाला भेटायचं आहे. कधी जमू शकेल?

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2013 - 6:05 pm | प्रकाश घाटपांडे

त्या पत्राला "यनावाला" यांच्या जालीय लेखनाचा संदर्भ लावला नाही तर पत्राचा मसुदा उपहासाचा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही.

हे बरोबर आहे. माझी बायको देखील हे पत्र वाचल्यावर चक्रावली. तिने अगोदरचे यनावालांचे सगुण निर्गुण मधील लेख वाचलेले असुन सुद्धा! मला जाणकार म्हणजे यनावालांच्या लेखनाला जाणणारा अशा अर्थाने म्हणा्यच होत.

बाकी कवा बी! भेटू तुपल्याला सुटी आसन तव्हा!

म्हैस's picture

23 Oct 2013 - 4:52 pm | म्हैस

@धन्या -

अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.

अश्या गोष्टी सांगता आल्या असत्या तर त्याला 'आत्मज्ञान' म्हणायची गरजच काय होती?
स्वतच स्वताला स्वताबद्दल झालेलं ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणतात . त्यालाच मुक्ती,
मोक्ष , आत्मसाक्षात्कार , ईश्वर साक्षात्कार असा म्हणतात . आत्मज्ञान हे कोणीही कोणालाही सांगू, देवू शकत नाही ते आपल आपल्यालाच मिळवाव लागत . ते मिळवण्याचा फक्त मार्ग दाखवता येतो.

दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर)

वरील वाक्य तुम्हांला नहि. टवाळ खोरांसाठी अहे.

ही जाहीर करायची परवानगी कोण देतं म्हणे?

ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?

बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही कळायच्या. त्यासाठी आत्मज्ञान किंवा साक्षात्कार वगैरे व्हावा लागतो.

जे जे आपणांसी ठावे । ते ते दुसऱ्यांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन ।।

हे समर्थांचे वचन फक्त दासबोधाचे पारायण करताना वाचायचे असते. आचरणात आणायलाच हवे असे काही नाही.

टिंगलखोर धन्या अशी सही करायला विसरलात का हो धन्याशेठ?

दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याची टिंगल , टवाळी करणार्यांपुढे ते जाहीर करायला मुळीच परवानगी नहि. ( (उदा: मि. पा . वर)

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

असं ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या पसायदानात म्हणतात. आता टींगळ टवाळी करणार्‍यांना जर हे सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं नाही तर त्यांच्या वाईट विचारांचा नाश होऊन त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होणार कसे?

म्हैस's picture

23 Oct 2013 - 5:21 pm | म्हैस

हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!

गीतेतल्या श्लोकाला बरोबर , चूक ठरवणारे आम्ही कोण? गीता हि काय एखादी कविता आहे का? आणि ती सांगणारा एखादा सामान्य मनुष्य आहे का?

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 5:38 pm | ग्रेटथिन्कर

गीता बाली आणि कविता कृष्णमुर्ती वेगवेगल्या गायिका आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2013 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

त्या आध्यात्मिक आहेत का? ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2013 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते पूर्ण पोचलेले आहेत त्यामुळे त्यांना काssssssही फरक पडत नाही... हो की नाही थिंकरकाका ('क'च लिहिला आहे, 'ल' नाही आणि एकच आहे जोडाक्षर नाही) ! :)

गीता हि काय एखादी कविता आहे का?

तांत्रिकदृष्ट्या उत्तर हो असंच आहे. गीता ही महाभारत या महाकाव्याचा भीष्मपर्वातील भाग आहे. त्यामुळे गीता या भागाला महाकाव्याच्या छोटया भागाला काव्य किंवा कविता नक्कीच म्हणता येईल.

दासबोधा वर गायिकांचं कव्हर!

धन्या's picture

23 Oct 2013 - 6:42 pm | धन्या

माझ्याकडे मनाच्या श्लोकांच्या दोन सीडीज आहेत. एका सीडीतील श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायले आहेत तर दुसर्‍या सीडीतील श्लोक सुरेश वाडकर यांनी. कव्हर्सवर त्या त्या गायकांची चित्रे आहेत.

इरसाल's picture

23 Oct 2013 - 9:21 pm | इरसाल

माझी खात्री होत चाललीय की द्वैतात घेतलेले अतिसामान्य ज्ञानाने आम्ही मंदबुद्धी आहोत.जरा कुठल्या सरितेकिनारी किंवा वृक्षातळी पथारी पसरावयास हवी होती.
भेंडी काय चाल्लय अनं काय नाही हेच कळेनासे झालयं! (हे चारमिनार अ‍ॅस्बेसटॉसच्या पत्र्याच्या जाहिराती सारखे वाचावे....कसला विचार करतोस रामय्या......)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2013 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा

@भेंडी काय चाल्लय अनं काय नाही हेच कळेनासे झालयं! >>> +1

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 2:26 am | प्यारे१

काय ठरलं?
उपहास, विरोधाभास का टाईमपास? ;)

१९९. अब द्विशतक के लिये केवल एक रन की आवश्यकता.
-प्यारेमदनलाल

तर हा घ्या द्विशतकी प्रतिसाद.

....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च निर्विवाद प्रतिसाद और वाचक आंदोलीत!!!!

२००.

अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ इशारा किया है...
(सेफ गेम खेलने वाला अंपायर है)
नतीजा साफ है, २३. १६ को अर्धवटराव का प्रतिसाद आया है और मोदक का प्रतिसाद २३.२३ को.
जाहीर है २०० वाँ रन लेने में पहले कामयाब हुए है अर्धवटराव.
मोदक जी से गुजारिश है के वो बिना मायुस हुए ऐसे ही प्रतिसाद देते रहे!
दॅट्स ऑल फॉर द नाईट फॉर इन्डियन्स अ‍ॅन्ड डे फॉर अमेरिकन्स. :)
हॅव अ ग्रेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल.... ;)

मोदक's picture

24 Oct 2013 - 3:11 am | मोदक

मी म्हणतो आहे ना माझा प्रतिसाद २०० वा आहे.. मग..?? तू कितीपण लॉजीकल मुद्दे काढ. माझाच्च प्रतिसाद २०० वा ठरेल.

ओके..?

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 3:22 am | प्यारे१

अरे हो! बॅट तुझी नसली तरी बळकावलेली आहेस नाही का!
मग काय तू म्हणशील तीच दिशा. (कोण रे तो परसाकडची म्हणतोय?)

एखादा खेळ आवडत नाही म्हणून बॅटमॅन सारख्या गुणी बाळाची आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या कोकण विभागाची निंदानालस्ती करणे चूक आहे.

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 3:28 am | प्यारे१

जल्ला इषय काय होता?

एक बॅट शब्द वाचून आक्ख्या बॅटमॅनला गुणी बाळ म्हणणं नि परसदार वाचून .... (इथे मी शांत बसलोय बरं का पैसातै, स्पावड्ञा, नि तमाम कोकणवासीयांनो) चूक आहे. ;)

मोदक's picture

24 Oct 2013 - 3:35 am | मोदक

जल्ला इषय काय होता?

परंपरा प्यारे.. परंपरा.

(येथे टुक्कार कखुकग मधल्या अतीटुक्कार* ह्रितीक रोशन च्या आवाजाचा फील आणावा)

*हे ही मत प्यारेचेच!! ;-)

काय चाल्लंय प्यारेकाका आँ? अल्जीरियन अच्रत काडीसम्राट कुतले!!

पैसा's picture

24 Oct 2013 - 12:41 pm | पैसा

वाईवरून सातारा गाठलंत का?

प्यारे१'s picture

24 Oct 2013 - 3:19 pm | प्यारे१

तसंच ठरलंय ना? ;)

बाकी आम्हा वाईकरांसाठी वाईवरुनच सातारा.
इट्स जस्ट पर्स्पेक्टिह यु सी!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2013 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

बाइज और एक्सट्रा रनो की वजह से ,धागे ने २०० की रन संख्या पूरी कर ली है। ;-)

इरसाल's picture

24 Oct 2013 - 9:47 am | इरसाल

इठं ईशांन शरमा कोन हे ?

हा धागा मला संपूर्ण कळला आहे - माझे घोर अज्ञान

------गाढवांच्या यादीत स्थान मिळवू इच्छिणारा एक.

ज्ञान वाटल्याने वाढते असा म्हणतात त्याचं काय करावं मग ? टिंगल टवाळ्या करणारे अनेक भेटतील तेवा ज्ञानाचं प्रदर्शन न करून त्याचं काय लोणचं घालणार का ?

स्पष्टपणे सांगूनही तुमच्या डोक्यात अजून शिरलेलं दिसत नाहीये ज्ञानाचं प्रदर्शन न केल्याने ज्ञानी माणसाला काहीच फरक पडत नहि. त्यात नुकसान टवाळ खोरंचाच आहे . मी हे हि म्हणलाय कि ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवता येतो. तुम्हाला स्वताला काही करायला नको. फुकटात हवंय का सगळं .
उदाहरण द्यायचं झालं तर : भर उन्हाळ्यात एखादा माणूस दमून येतो. त्याला तहान लागली अहे. घसा कोरडा पडला अहे. अश्यावेळी थंडगार पाणी प्यायल्यावर जी तृप्ती मिळते ती तुम्ही त्याला शब्दांमध्ये कितीही सांगितली तरी, जो पर्यंत तो स्वत पाणी पिवून तहान भागवत नाही तो पर्यंत त्याला समजणार आहे का?
ज्ञानाचं असंच आहे .
अजूनही शंका असतील तर आता एकच उपाय आहे . स्वतः ज्ञान मिळवायचं आणि चेक करायचं माझं म्हणण बरोबर आहे कि चुक.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Oct 2013 - 9:32 am | प्रकाश घाटपांडे

दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) वाचकांच्या पत्रात प्रा. य.ना.वालावलकर यांचे फलज्योतिष ही अंधश्रद्धाच असे मत व्यक्त करणारे पत्र आले आहे. प्रा. य.ना.वालावालकर हे कठोर बुद्धीवादी म्हणुन ओळखले जातात ते यामुळेच.
त्याचा दुवा http://epaper.esakal.com/sakal/24Oct2013/Normal/PuneCity/page6.htm

संजय क्षीरसागर's picture

25 Oct 2013 - 6:35 pm | संजय क्षीरसागर

इथे मात्र ते उत्तर देऊ शकले नाहीत