हे शाश्वत ज्ञान नव्हे !

धन्या's picture
धन्या in काथ्याकूट
18 Oct 2013 - 4:49 pm
गाभा: 

आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:

'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.

पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.

नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.

आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल?

पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?

म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.

कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.

यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.

वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.

नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.

जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.

अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 5:00 pm | प्यारे१

पत्र विनोदी आहे.
बाकी पत्रातले विचार हे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने देखील पोषक नाहीत. उगाच्च आव आणला आहे असं व्यक्तीशः वाटतं.
व्यवहारामध्ये व्यवहार पाळावाच. तो तसा पाळावा लागतोच.
कुठल्याही संन्याशाला सुद्धा नित्यकर्मे करावीच लागतात.

लेखामध्ये व्यक्त केलेल्या विचारांशी बहुतांशी सहमत आहे.
धन्यवाद.

अनिरुद्ध प's picture

18 Oct 2013 - 5:24 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 7:38 pm | प्यारे१

थोडा खुलासा : पत्रातले शब्द कितीही चुकीचे वाटत असले जसा धन्याशेठनं अर्थ काढला आहे तरी ते शब्द तसे नाहीत. फक्त ते 'अस्थानी' आहेत. म्हणून पत्र विनोदी म्हटलेलं आहे.
मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक.
ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल. ५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे.

विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील.

नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे.
अस्थानी उल्लेखांमुळे नि पत्रलेखकाच्या इन्टरप्रिटेशन मुळे विषय विनोदी वाटत आहे एवढंच.

मानवी जीवन जगत असताना वरचे सगळे लोक निव्वळ नोबेल मिळालं म्हणून श्रेष्ठ असं नाही. ते श्रेष्ठ आहेत म्हणून नोबेल मिळालं आहे, आत्यंतिक त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण असतात हे लोक.

सहमत.

ह्यातलं १०-२० % सामान्य लोकांनी जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.

हे कळलं नाही. समजावून सांगू शकाल का?

५००० वर्षांपूर्वी लिहीलेल्या गीतेमध्ये (नायकाचा रोल लक्षात घेतला नि आपल्याला त्या जागी बसवताना आनुषंगिक बदल केले तर) आजही त्याच प्रकारे तत्त्वज्ञान लागू पडतं हे लक्षात घेण्याची गरज आहे.

माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.

विज्ञान नि तंत्रज्ञान ह्यामध्ये धन्याशेठनी गल्लत केलेली आहे. विज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरुनच पुढचा भाग होतो म्हणून विज्ञान मूलतः बदलत नाही तसंच तत्त्वज्ञानातला वरचा कथाभाग काढला तरी तत्त्वज्ञान शाश्वत राहील.

गल्लत नाही. तुमच्या दुसर्‍या वाक्याशी मी सहमत आहे. एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे. माझा विरोध आहे तो पत्रलेखकाच्या "जेव्हढं गीतेत लिहिलंय तेव्हढंच ज्ञान, बाकी सगळं अज्ञान" या आततायी मताला.

नोबेल पुरस्कार मिळाल्याने अथवा संशोधनाने सुद्धा मिळ्णारा आनंद कितीही मोठा असला तरी निश्चितच मोक्षप्राप्तीपेक्षा थिटा आहे.

तुम्ही मोक्ष आहे असं मानता, आम्ही मानत नाही. तरीही वूई अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री :)

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 8:00 pm | बॅटमॅन

माझ्या मते हे उलट असायला हवं. पाच हजार वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे त्या अनुषंगाने आपल्यात बदल न करता आजच्या काळानुरुप पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखनातील काल विसंगत गोष्टी टाकून दयायला हव्यात.

सहमत.

एकदा पोटाची चिंता मिटली की माणसाला तत्वज्ञानाची ओढ लागते. किंबहूना माणसाची ती गरज आहे.

म्यास्लोचा नीड हायरार्कीचा पिर्‍यामिड पाहिला तरी हे कळून येतं.

बहुतेक रामदास म्हणतात (चूभूद्याघ्या): "जया खायाला अन्न मिळेना तया करंट्याला परमार्थ कैचा?"

'ह्यातलं सामान्य लोकांनी १०-२० % जरी स्वीकारुन मार्ग अवलंबला तरी अध्यात्मप्रांतात सुद्धा प्रचंड प्रगती होईल.'
हे असं हवंय. माय मिस्टेक. वाक्यरचना चुकली होती.

बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे.
मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं.
त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही.

तरीही अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री आहेच्च.

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 8:12 pm | प्यारे१

@ धन्या,
बदलांबाबत!
हरिपाठ नुसता म्हणायचा नाही रे. पाठ असून काय उपयोग मग?
'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की.

बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं. ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.

बाकी मोक्ष म्हणजे बाहेरुन आणायची अथवा मेल्यानंतर कुठे पोचायची गोष्ट असा कुणाचाही समज असला तर तो निखालस चुकीचा आहे.
मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं. संपलं.
त्या अनुषंगानं मार्ग पत्करुन वाटचाल करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र नि हे ध्येय गाठणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. ह्यात खणखणीत वास्तववाद आहे. अजिबात फसवणूक नाही.

तुम्ही मोक्ष या शब्दाची वेगळीच व्याख्या सांगत आहात.

चौर्‍यांऐंशी लक्ष योनींच्या जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका ही मोक्षाची पारंपारीक व्याख्या आहे. दहापैकी किमान सात धर्म मानणार्‍या (हिंदू) व्यक्ती मोक्षाची हीच व्याख्या सांगतील. जर तुम्ही म्हणताय ती व्याख्या योग्य असेल तर समाज अंधारात आहे. तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय.

'मंथुनि नवनीता तैसे घे अनंता , वाया व्यर्थ कथा सांडि मार्गु' चा अर्थ नक्की काय असतो सांगितलास तर आवश्यक बदल घडणं अपेक्षितच आहे असं ह्याच भगवद्गीतेच्या 'ऑथॉरिटी' ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की.

इथेही मी सहमत आहे. माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला.

बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची नेमकी कुठं गरज आहे ते सांगावं.

पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
परंतू मला इथे गीता हा ग्रंथ अपेक्षित नाही. आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे.

ह्या उप्पर डिसकार्ड नुसतं न करता त्या ला त्याच तोडीचा पर्याय देखील द्या. ते जास्त महत्त्वाचं.

पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं. त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते.

हे असं जगणं अवघड असलं तरी अशक्य नाही. मी अनिल अवचटांचं जे काही लेखन वाचलं आहे त्यावरुन मला वाटतं अनिल अवचट असंच आयुष्य जगले आहेत, जगत आहेत.

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 10:00 pm | अर्धवटराव

>>तुम्ही मोक्ष या शब्दाची...तो भलत्याच गोष्टीला मोक्ष समजतोय.
-- मुळात व्याख्येनुसार या सगळ्या गोष्टी अजमावतो म्हटलं तर पहिली पायरीच चुकते. व्याख्येला देखील सापेक्षता असते त्यामुळे सापेक्षतारहित कैवल्य त्यात मावणार कसं?

>> माझा विरोध आहे तो "गीतेत सांगितलं आहे तेच ज्ञान, बाकी सारं अज्ञान" या आततायी मताला.
-- एखाद्या प्रमेयाच्या अर्थाचा अनर्थ कसा होतो बघा. आपापल्या जिज्ञासेने, विचार शक्तीने शक्य होईल तेव्हढं ज्ञानभंडार मंथायला घ्यायचं व त्याच ज्ञानातुन, ज्याप्रमाणे ताकातनं लोणी वर येतं त्याचप्रमाणे आत्मज्ञान उमलेल, असा हा दृष्टांत आहे. आपण याचा अर्थ असा घेतला कि शेणात एक सोन्याचा तुकडा पडलाय तो उचलायचा व बाकी शेण फेकुन द्यायचं. ते चुक आहे.

>>पत्रलेखकाचं म्हणणं: म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
-- पत्रलेखकाने नेमकं कशावरुन हा अर्थ काढला हे मला तरी कळलं नाहि, पण साध्याला गवसणी घालायला अनेकानेक मार्गांची थोरवी गाणारी गीता, आणि आजन्म कर्मयोग आचरणारा श्रीकृष्ण असलं काहि बोलेल असं वाटत नाहि.

>>आपल्या धर्मग्रंथांमधून लिहिलेलं सारं जे आज कालविसंगत आहे. आणि सुदैवाने कासवाच्या गतीने हे होतही आहे.
-- ज्याला हिंदु धर्माचे धर्मग्रंथ म्हटल्या जातं ते याच रितीने तयार झाले आहेत. आणि हि थोरवी ग्रंथांची नाहि तर माणसाच्या सतत चिंतनशील विचारशक्तीची आहे.

>>पर्याय आहे. परंतू तो स्विकारण्यासाठी समाजाला परंपरांची, ग्रंथप्रामाण्यांची बंधने तोडावी लागतील.
-- माणसाचं स्वार्थभान इतकं जबरदस्त आहे कि ते त्याने कधिच, कुठल्याच धर्मग्रंथांची बंधनं स्विकारली नाहित. मग तो व्हॅटीकन सिटीचा पॉप असो, वा मक्का-मदीनेचा सर्वोच्च मौलवी असो वा शंकराचार्य. धर्मग्रंथप्रामाण्यवाद माणसाला बांधुच शकत नाहि.

>> आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्विकारायची, जे आपल्याला बदलता येईल ते बदलायचं, जे बदलता येणार नाही ते आहे तसं स्विकारायचं.
-- कळत, नकळत आजवर माणुस याच पद्धतीने जगला, पुढेही तसाच जगेल.

>>त्यासाठी देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही. माणूस म्हणून जगताना यातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नसते.
-- या सर्व कुबड्या माणसाने स्वेच्छेने स्विकारल्या... केवळ आपली सोय म्हणुन. त्या कुबड्या स्वतः येऊन माणसाला चिकटल्या नाहित. आणि जोवर माणसाला कुठल्याही प्रकारची गरज भासत असेल तोवर कुबड्यांना तोटा नाहि. एक जाऊन दुसरी येईल, तिचं काम संपलं कि तिसरी...

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 10:14 pm | प्यारे१

>>>देव, धर्म, पाप-पुण्य, नशिब, प्रारब्ध वगैरे गोष्टींचा अजिबात आधार घ्यायचा नाही.
Know the system, use the system, get the results and leave the system.... !
आमच्यासारख्या सामान्यांना कुबड्या म्हणण्यापेक्षा पांगुळगाडे लागतात ब्वा!
पण ह्या पांगुळगाड्यांच्या जोरावर पावलं टाकायला शिकतो नंतर पायात ताकद आली की ते दुसर्‍यांसाठी सोडतो असं झालं तर मग त्याचा उपयोग झाला असं होतं. दुर्दैवानं आपलं महत्त्व वाढवण्याच्या नादात लोक पांगुळगाडेच सजवत बसतात नि तुलना करीत राहतात.

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 10:19 pm | अर्धवटराव

तुम्ही शाळा-विद्यालय-महाविद्यालय असा प्रवास करत मग स्वतंत्र अभ्यास करण्याची क्षमता बाणवायचं म्हणताय. मी शैक्षणीक कामात वेळ घालवायचा बहाणा करत आळशीपणाचे उद्योग करणार्‍यांच्या संदर्भात टंकलय.

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 10:23 pm | प्यारे१

हो मला धन्यालाच प्रतिसाद द्यायचा होता....

सस्नेह's picture

22 Oct 2013 - 12:58 pm | सस्नेह

स्वामी विवेकानंदांनी राजयोगात म्हटलय की भौतिक ज्ञान हे मोक्षज्ञानाची पहिली पायरी आहे. भौतिक ज्ञानाची सीमा संपते तिथे पारलौकिक ज्ञान सुरू होते. इथे कुबड्यांचा प्रश्न येतोच कुठे ?

विजुभाऊ's picture

19 Oct 2013 - 11:08 am | विजुभाऊ

मोक्ष म्हणजे 'मी आणि माझं' ह्याबद्दल ची आसक्ती संपणं नि स्वतःबद्दलची खरी ओळख पटणं
असे असेल तर तिसर्‍या पेगला मोक्षाप्रत अवस्था सहज प्राप्त होते.

चौकटराजा's picture

19 Oct 2013 - 12:13 pm | चौकटराजा

पण तिसर्‍या पेगला देखील मी माझ्या खर्चानं प्यायलोय की दुसर्‍याच्या याचे भान रहातच असेल ना ?

बाळ सप्रे's picture

18 Oct 2013 - 5:10 pm | बाळ सप्रे

ते मिपावरील यनावाला नसावेत ..

आनन्दा's picture

19 Oct 2013 - 10:02 am | आनन्दा

म. टा. मध्ये या नावाने येणारी पत्रे यनावालांच्या भाषेला अनुसरूनच असतात. मला असे वाटते की यनावालांना याही पत्रातून काहीतरी वेगळेच सांगायचे असावे. पूर्ण पत्र वाचावे लागेल.

प्रसाद गोडबोले's picture

18 Oct 2013 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

पत्रलेखकाची कीव आली ...

जर पत्र य ना वालावलकर यांनी लिहीलं असेल तर ते निश्चितपणे उपहासात्मक असावे असं वाटतं. कारण फायलीन वादळ येऊन गेल्यावर लोकसत्ता मधे त्यांचं वैज्ञानिकाचं अभिनंदन करणारं आणि ज्योतिषांची खिल्ली उडवणारं पत्र प्रसिध्द झालं होतं. ते पत्र खरंतर उपहासात्मक लिखाणाचं उत्तम उदाहरण होतं. मला वाटतं काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे निश्चित..

धन्या's picture

18 Oct 2013 - 6:01 pm | धन्या

पत्रलेखकाचे नाव य. ना. वालावलकर असे आहे. लेखाचा टोन उपहासात्मक नक्कीच नाही.

कदाचित नामसाध्यर्म्य असेल. तरीही संपादक मंडळास लेखातील मिपा आयडी "यनावाला" यांचा उल्लेख काढून टाकावयाची विनंती केली आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Oct 2013 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll

+१०००
य ना वालावलकर यांचे पत्र अत्यंत उपहासगर्भ आहे हे यनावालांचे लेख ज्यांनी वाचले आहेत ते ही गोष्ट सहज ओळखतील. तरीही यनावाला हे अस्थानि तुलना करण्यात सु(कु)प्रसिद्ध आहेत हे जाता जाता नमूद करून ठेवलेले बरे.

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 6:08 pm | बॅटमॅन

हे शाश्वत ज्ञान नव्हेच. पत्रलेखकास भेटून त्यांजवर एक दृढ लगुडप्रहार केल्यास ते तथाकथित शाश्वत ज्ञान कितपत उपयोगी पडेल हे विचारावयाची इच्छा होतेय.

ग्रेटथिन्कर's picture

18 Oct 2013 - 6:11 pm | ग्रेटथिन्कर

वेदोक्त प्रकरणात जीर्ण भुक्कड तत्वज्ञान असलेल्या ग्रंथांवरुन वितंडवाद घालणार्याचा हा अनुयायी असावा.
तिकडे पाश्चिमात्य देशात शोध लागले की "हे आमच्या वेदात लिहूनच ठेवलेले आहे " हे कॉपीराईट वाक्य ऐकायला मिळते.
अध्यात्मवाद नावाचा कोणताच वाद अस्तित्वात नाही ,भोळसट लोकांना फसवण्यासाठी काढलेले हे व्यवसाय आहेत.

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 8:04 pm | मुक्त विहारि

(स्मॉल पेगर)

आनन्दा's picture

19 Oct 2013 - 10:05 am | आनन्दा

त्यांचे चिंतन त्यांना मुक्तपणे करू द्या की. उगाच कशाला बिब्बा घालताय?

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 7:03 pm | अर्धवटराव

>>जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
-- =)) याला म्हणतात अस्सल विनोद... पु.लंच्या आत्म्याला आज शांती लाभली असणार.

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.

मोक्ष मिळालेल्यांची यादी कशी काढणार? त्याना मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवायचे?
धर्मासाठी कार्य केले हाच एकमेव निकश लावायचा तर
बुद्धाने हिंदू तत्वज्ञानाची अक्षरशः पिसे काढली.
विवेकानंदानी हिंदू धर्मामधील फालतू कर्मकांडावर कोरडे ओढलेत.
हे सर्व मोक्षाला लायक ठरत नाहीत.
मोहम्मद अट्टा / कसाब /बियन्त सिंग / भिंद्रावाले हे सर्व मोक्षाप्रत पार झाले असतील.
जादूगार सत्यसाईबाबा ना मोक्ष प्राप्त झाला असेल. आसाराम बापु मोक्षाच्या वाटेवर असतील.
अवांतरः मोक्षाला गेलेल्या लोकांची यादी बनवण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी लोक हवे आहेत. इच्छुकानी अर्ज करावेत.

उपास's picture

18 Oct 2013 - 7:14 pm | उपास

हाईट्ट आहे हे पत्र म्हणजे, अशी आळशी पण चतुर लोकं बघितली की प्रश्न पडतो कुठे चाल्लोय आपण. गीता, मोक्ष ह्यांचा असा चुकीचा अर्थ काढून आत्ममग्न राहाणार्‍याला काय जागं करायचं.. कीव करावी अशांची आणि त्यांना त्यांच्या मोक्षाच्या मार्गावर सोडून जावं, हेच खरं!

आणि हो, मोक्ष मिळालेल्यांची लिस्ट बघायला आवडेलच :)

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 7:22 pm | बॅटमॅन

आणि त्या लिष्टेत किमान या जन्मातून तरी लौकर सुटलेले म्हणून एकाचे नाव घालायला लै आवडेल. अशा लोकांनी जगूनही कुणाला फायदा नसतो म्हणा तसा.

तुम्ही हे वाक्य गमतीत लिहिले आहे याची जाणिव आहे.

तरीही हा विचार मला जग हे फक्त काळया आणि पांढर्‍या रंगात पाहण्यासारखा वाटतो. तुम्ही म्हणताय तशा व्यक्तींना भानावर आणण्याचा जरुर प्रयत्न करावा. त्यांची भानावर यायची ईच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या आयुष्याच्या भरवशावर सोडून दयावे.

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 7:42 pm | बॅटमॅन

बायनरी थिंकिंग होतेच त्यामागे, मी नाकारत नाहीच्चे ;)
बाकी सहमत आहे, फक्त तो त्रागा केल्या जातो काहीवेळेस त्याचे हे फॉक्कन झालेले निस्सारण समजावे. :)

आनन्दा's picture

19 Oct 2013 - 10:07 am | आनन्दा

ब्वॉक्क्क्क्क्क्क

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 8:02 pm | मुक्त विहारि

तुमचे विचार लवकर पचतील आणि समजतील असे नसतात.

ह्याचे अजून एक छान उदाहरण म्हणजे हा लेख..

वाचतो, मनन करतो, चिंतन करतो आणि जर काही शंका असतील तर विचारतो...

(मुद्दाम गहन विचार करून टंकण्यापेक्षा किंचीत विचार करून लिहीत आहे....)

मालोजीराव's picture

18 Oct 2013 - 8:03 pm | मालोजीराव

पत्र डोक्यावरून गेल्याचं पत्र मटा ला पाठवीत आहे

पत्र डोक्यावरून गेल्याचं की पत्र लिहिणारा डोक्यावर पडल्याचं पत्र पाठवणार आहात ;)

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 8:09 pm | मुक्त विहारि

हाताला घड्याळ बांधले असेल तर आणि तरच मटा वाले लक्ष देतात....

प्रचेतस's picture

18 Oct 2013 - 8:09 pm | प्रचेतस

ते यनावालांचे पत्र आहे.
१००% उपहासात्मक, किंबहुना (सध्या उपक्रम बंद असल्याने) आलेल्या प्रचंड उद्वेगाने लिहिलेले असावे. =))

बाकी हा धाग्यामुळे यनावाला कदाचित इकडे प्रकट होतील असे वाटतेय.

=))

(यनावाला इथे आले तर कितीरंगी सामना होईल आणि त्यात कीबोर्डने कित्ती कित्ती जिल्ब्या पाडायचा चानस मिळेल या कल्पनेने हाताची बोटे शिवशिवू लागलेला) बॅटमॅन.

धन्या's picture

18 Oct 2013 - 8:45 pm | धन्या

ते यनावालांचे पत्र आहे.

हे यनावालांचे पत्र असेल तर हे पत्र उपहासात्मक लेखनाचे एक उत्तम उदाहरण असेल. :)

प्रचेतस's picture

18 Oct 2013 - 8:52 pm | प्रचेतस

अगदी :)

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2013 - 8:49 pm | प्रकाश घाटपांडे

फारच मनातल लिहिल ब्वॉ! वल्ली
या निमित्ताने यनावालांचे लेखन मिपाकरांनी जरुर वाचावे

चौकटराजा's picture

18 Oct 2013 - 8:17 pm | चौकटराजा

मी इथे चौकट राजा हे नाव घेण्याचे कारण मी सिनेमातल्या चौकट राजा सारखाच मंद आहे आहे मला मनोमन वाटले, धन्याकाका ब्याट्याकाका ,प्यारे मामा, यांच्या पुढे आपण काय आहोत ? काही नाही ! चौकट राजा या नावाचे सार्थक झाले
मला मोक्ष मिळाला. जप , ध्यान, माळा, गुरू, अनुग्रह, कृपा, आशीर्वाद , प्रसादाचा नारळ ,गुरु बंधू, गुरू भगिनी, पूर्वजन्मीचे सुकृत , सप्ताह,कशाचाही माझ्या आयुष्यात पत्ता नाही. हो, तरीही मोक्ष मिळाला. हे बहु काका मंडळीच्या मुळे . धन्यवाद !

माझा मोक्ष या संकल्पनेवर विश्वास नसतानाही ज्यांच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळाला त्यांच्या यादीत माझे नाव टाकून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी श्री. चौकटराजा यांचा जाहीर निशेध करतो.

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 9:27 pm | अर्धवटराव

काँग्रॅच्युलेशन्स :)

बॅटमॅन's picture

18 Oct 2013 - 9:39 pm | बॅटमॅन

अस्मादिकाञ्चे वय वाढवून स्वतःचे काकापण मला बहाल केल्याबद्दल काकाञ्चा निषेध!!!!

धन्यानं निषेध केला, बॅट्यानं पण केला... मी तरी का मागे?
आक्ख्या मिसळपावचा 'का का' असताना माझा मामा केल्याबद्दल चौकटराजाचा हार्दिक.. आपलं जाहिर निषेध ;)

चौकटराजा's picture

19 Oct 2013 - 9:17 am | चौकटराजा

मी खरे तो बोल्लो . हा निषेध सोहळा पूर्व नियोजित आहे.
मी मिपाकरच होतो आहे व राहीन .
मला संपादक वगैरे कुठल्याही पदाचा मोह नाही.
हे सपस्टीकरण आहे माफीनामा नाही.

आनन्दा's picture

19 Oct 2013 - 10:09 am | आनन्दा

तुम्हाला पण नवीन पिढीने अडगळीत टाकलेले दिसतय..

कवितानागेश's picture

18 Oct 2013 - 9:13 pm | कवितानागेश

शाश्वत म्हणजे काय?
ज्ञान म्हणजे काय?

शाश्वत म्हणजे काय? ======> लग्न झाल्या वर बायको नवर्‍याच्या गळ्यात जे काही बांधते (कुणी "जू" म्हणतात तर कुणी "वेसण") ते शाश्वत. (हे अद्रुश्य असते, हे सांगणे न लगे)

ज्ञान म्हणजे काय? ======> लग्न झाल्या नंतर बायको जे काही सांगते ते ज्ञान..

(शेजार्‍याला चांगली नौकरी मिळाली. माझ्या भावाने त्याच्या बायकोसाठी बांगड्या आणल्या (मग त्या ५ रु.वाल्या काचेच्या का असेनांत) इ,)

विद्युत् बालक's picture

18 Oct 2013 - 10:38 pm | विद्युत् बालक

क्षुद्र पत्र आहे!

नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!

पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!

पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!

इथे थोडासा प्रकाश टाकला आहे.

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित

खरा मोक्षं म्हणजे मी पणा , अहं भाव सोडणे . ते कोणी मोजावे ?
आणि नोबेल चा आणि अध्यात्माचा काय संबंध ?

अग्निकोल्हा's picture

19 Oct 2013 - 1:11 am | अग्निकोल्हा

अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.

असे कुठे म्हटलेले आहे याचा रेफरन्स हवा होता... तसेच, जर अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान आहे तर बाकि सगळे खोटे ज्ञान अथवा भ्रम ठरते तर मग या भ्रमाला संपुर्ण "अज्ञान" कसे म्हणावे ? हवे तर असमग्र ज्ञान म्हणता येइल, कारण अज्ञान म्हणजे मुळात ज्ञानाचे अस्तित्वच नसणे होय. अन ते कदापि शक्य नाही, कारण ज्ञानाचे अस्तित्व नसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसणे होय.

राजेश घासकडवी's picture

19 Oct 2013 - 1:53 am | राजेश घासकडवी

उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

मला धन्या यांचा लेखही सुरूवातीला त्याच धाटणीतला वाटला होता. पण प्रतिसादांवरून त्यांना यनावालांचा उपहास कळला नाही की काय अशी शंका वाटायला लागली आहे.

अजून पुरते हुच्चभ्रू विचारवंत नाहीत झालेले धन्या शेठ!
वेळ द्या त्याना. ;)

धन्या's picture

19 Oct 2013 - 3:07 pm | धन्या

अस्मादिकांस हुच्चभ्रू होण्याचे काही एक प्रयोजन नाही. विचारांचा दांभिकपणा आम्ही कधीच करत नाही.

मात्र हा टोकाचा उपहास असल्यामुळे तो अस्मादिकांस कळला नाही ही वस्तूस्थिती आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2013 - 8:51 am | प्रकाश घाटपांडे

उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

अगदी हेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2013 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे

बदल हीच एकुलती एक शाश्वत गोष्ट या जगात आहे :)

(Change is the only thing constant in this world.)

विटेकर's picture

19 Oct 2013 - 10:46 am | विटेकर

हे खरेच की आत्म ज्ञानांशिवाय बाकी सारे अशाश्वतच, अगदी नोबेल विजेते ज्ञान असले तरिही ! ऐहिक ज्ञान फक्त भौतिक साधनांसाठीच उपयोगी आहे, चिरंतन सुखासाठी नाही , याच्याशी लै वेळा सहमत.
हा ग्रंथप्रामाण्याचा विषय नसून आत्मप्रचितीचा आहे. साखरेची गोडी सांगून कळत नाही ती खावी लागते...
बाकी चालू द्या ...
समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण
||श्रीराम ||
जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ| तंव सर्व कांहीं निर्फळ |ज्ञानरहित तळमळ| जाणार नाहीं ||१||
ज्ञान म्हणतां वाटे भ्रम| काये रे बा असेल वर्म |म्हणौनि हा अनुक्रम| सांगिजेल आतां ||२||
भूत भविष्य वर्तमान| ठाऊकें आहे परिछिन्न |यासीहि म्हणिजेत ज्ञान| परी तें ज्ञान नव्हे ||३||
बहुत केलें विद्यापठण| संगीतशास्त्र रागज्ञान |वैदिक शास्त्र वेदाधेन| हेंहि ज्ञान नव्हे ||४||
नाना वेवसायाचें ज्ञान| नाना दिक्षेचें ज्ञान |नाना परीक्षेचें ज्ञान| हें ज्ञान नव्हे ||५||
नाना वनितांची परीक्षा| नाना मनुष्यांची परीक्षा |नाना नरांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||६||
नाना अश्वांची परीक्षा| नाना गजांची परीक्षा |नाना स्वापदांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||७||
नाना पशूंची परीक्षा| नाना पक्षांची परीक्षा |नाना भूतांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||८||
नाना यानांची परीक्षा| नाना वस्त्रांची परीक्षा |नाना शस्त्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||९||
नाना धातूंची परीक्षा| नाना नाण्यांची परीक्षा |नाना रत्नांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१०||
नाना पाषाण परीक्षा| नाना काष्ठांची परीक्षा |नाना वाद्यांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||११||
नाना भूमींची परीक्षा| नाना जळांची परीक्षा |नाना सतेज परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१२||
नाना रसांची परीक्षा| नाना बीजांची परीक्षा |नाना अंकुर परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१३||
नाना पुष्पांची परीक्षा| नाना फळांची परीक्षा |नाना वल्लींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१४||
नाना दुःखांची परीक्षा| नाना रोगांची परीक्षा |नाना चिन्हांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१५||
नाना मंत्रांची परीक्षा| नाना यंत्रांची परीक्षा |नाना मूर्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१६||
नाना क्षत्रांची परीक्षा| नाना गृहांची परीक्षा |नाना पात्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१७||
नाना होणार परीक्षा| नाना समयांची परीक्षा |नाना तर्कांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१८||
नाना अनुमान परीक्षा| नाना नेमस्त परीक्षा |नाना प्रकार परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१९||
नाना विद्येची परीक्षा| नाना कळेची परीक्षा |नाना चातुर्य परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२०||
नाना शब्दांची परीक्षा| नाना अर्थांची परीक्षा |नाना भाषांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२१||
नाना स्वरांची परीक्षा| नाना वर्णांची परीक्षा |नाना लेक्षनपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२२||
नाना मतांची परीक्षा| नाना ज्ञानांची परीक्षा |नाना वृत्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२३||
नाना रूपांची परीक्षा| नाना रसनेची परीक्षा |नाना सुगंधपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२४||
नाना सृष्टींची परीक्षा| नाना विस्तारपरीक्षा |नाना पदार्थपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२५||
नेमकेचि बोलणें| तत्काळचि प्रतिवचन देणें |सीघ्रचि कवित्व करणें| हें ज्ञान नव्हे ||२६||
नेत्रपालवी नादकळा| करपालवी भेदकळा |स्वरपालवी संकेतकळा| हें ज्ञान नव्हे ||२७||
काव्यकुशळ संगीतकळा| गीत प्रबंद नृत्यकळा |सभाच्यातुर्य शब्दकळा| हें ज्ञान नव्हे ||२८||
वाग्विलास मोहनकळा| रम्य रसाळ गायनकळा |हास्य विनोद कामकळा| हें ज्ञान नव्हे ||२९||
नाना लाघवें चित्रकळा| नाना वाद्यें संगीतकळा |नाना प्रकारें विचित्र कळा| हें ज्ञान नव्हे ||३०||
आदिकरूनि चौसष्टि कळा| याहि वेगळ्या नाना कळा|चौदा विद्या सिद्धि सकळा| हें ज्ञान नव्हे ||३१||
असो सकळ कळाप्रवीण| विद्यामात्र परिपूर्ण |तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- | म्हणोंचि नये ||३२||
हें ज्ञान होयेसें भासे| परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें |जेथें प्रकृतीचें पिसें| समूळ वाव ||३३||
जाणावें दुस-याचें जीवीचें| हे ज्ञान वाटे साचें |परंतु हें आत्मज्ञानाचें| लक्षण नव्हे ||३४||
माहानुभाव माहाभला| मानसपूजा करितां चुकला |कोणी येकें पाचारिला| ऐसें नव्हे म्हणोनी ||३५||
ऐसी जाणे अंतरस्थिती| तयासि परम ज्ञाता म्हणती |परंतु जेणें मोक्षप्राप्ती| तें हें ज्ञान नव्हे ||३६||
बहुत प्रकारींची ज्ञानें| सांगों जातां असाधारणें |सायोज्यप्राप्ती होये जेणें| तें ज्ञान वेगळें ||३७||
तरी तें कैसें आहे ज्ञान| समाधानाचें लक्षण |ऐसें हें विशद करून| मज निरोपावें ||३८||
ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें| तें पुढिले समासीं निरोपिलें |श्रोतां अवधान दिधलें| पाहिजे पुढें ||३९||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पंचवा ||५||५. ५

ग्रेटथिन्कर's picture

19 Oct 2013 - 11:11 am | ग्रेटथिन्कर

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे
मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।
वेदविरहित तें अप्रमाण ।
अप्रिये भगवंता ॥ १०॥
ब्राह्मणीं योग याग व्रतें
दानें । ब्राह्मणीं सकळ
तीर्थाटणें । कर्ममार्ग
ब्राह्मणाविणें । होणार
नाहीं ॥ ११॥ ब्राह्मण वेद
मूर्तिमंत । ब्राह्मण
तोचि भगवंत । पूर्ण
होती मनोरथ ।
विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥
ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- ।
होऊन, जडे भगवंतीं ।
ब्राह्मणतीर्थे उत्तम गती ।
पावती प्राणी ॥ १३॥
लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण ।
आन यातिसि पुसे कोण ।
परी भगवंतासि भाव प्रमाण
। येरा चाड नाहीं ॥ १४॥


असो ब्राह्मणा सुरवर
वंदिती । तेथें मानव बापुडें
किती । जरी ब्राह्मण
मूढमती । तरी तो जगद्वंद्य
॥ १५॥

याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..

प्रसाद गोडबोले's picture

19 Oct 2013 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले

शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।।६।।

>>> याला काय म्हणायचे :D

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 12:23 pm | मुक्त विहारि

इ स ३०००

"हे असे लिहिणारे वेगळे आणि ते तसे लिहीणारे वेगळे"

असा पण शोध लागेल.

त्यावेळी सावरकरांना पोहता येत न्हवते.राजांना लिहीता येत न्हवते म्हणून त्यांनी त्यावेळी ज्यांना लिहीता-वाचता येत होते, त्यांनाच कामावर ठेवले.त्या लोकांना संगनमत केले आणि परमदयाळू औरंगजेब आणि राजे ह्यांच्यात बेबनाव घडवून आणला.इ.इ.

मुद्दाम केलेले गहन विचार = नविन शोध आणि नविन समाज

हाताला घड्याळ कशाला?
प्रार्थनेची वेळ लक्षात ठेवायला.....

याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..

तुमच्या या प्रश्नाचे उत्तर दयायला कोणी धजावणार नाही. जे प्रश्न उत्तर दयायला अडचणीचे वाटतात त्यांची उत्तरे देणे टाळले जाते.

ज्ञानदेव, एकनाथ, समर्थ, तुकाराम ही सारी तुमच्या-आमच्यासारखी माणसेच होती. काही बाबतीत ते सर्वसामान्यांच्या चार पावले पुढे होते. पण म्हणून काही ते सर्वज्ञ नव्हते. त्यांच्या अशा स्वतःच्या धारणा होत्या ज्या आता कालविसंगत असल्या तरी ज्या काळात हे थोर पुरुष होऊन गेले त्या काळचा तो "धर्म" होता. त्यामुळे त्या वेळच्या रुढी परंपरांचा या सार्‍या संतांवर पगडा असणे साहजिक होते. त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही.

उदा. आज स्त्री पुरुष समानतेचे युग आहे. पण एकनाथ भागवतात काय म्हणतात स्त्रीबद्दल?

नको स्त्रियांशी बोलणे | नको स्त्रियांसि भेटणे | स्त्री देखतांचि पळणे | उठाउठी ||

किंवा ही तुकारामांची ओळ पाहा:

स्त्रियांचा तो संग नको नारायणा | काष्ठ या पाषाणा मृत्तिकेच्या ||

यात एकनाथ किंवा तुकारामांना व्यक्तीशः दोष देण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रातील सार्‍याच व्यक्तींची अशीच धारणा होती.

इथे ज्ञानदेवांची हरीपाठातील ओळ लिहाविशी वाटते,

मंथूनी नवनीता तैसे घे अनंता | वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू ||

तुकाराम, एकनाथ किंवा ज्ञानदेवांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते त्यांच्या काळानुरुप असेल. त्यातलं सारंच्या सारं तसंच्या तसं आचरणात आणता येणार नाही. त्यासाठी आपली अक्कल वापरुन त्यांचं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे ठरवावं लागेल.

धन्याशेठ वर लिहीलेला प्रतिसाद पटलेला आहे. उत्तर द्यायला धजावण्या न धजावण्यापेक्षा त्या उत्तर देण्याचा उपयोग कुणाला कसा किती होतोय ह्याचा विचार व्हायला पाहिजे.
तत्कालिन सामाजिक परिस्थिती काय होती समर्थांच्या काळात? जातींच्या उतरंडी आजदेखील जशाच्या तशा आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खुद्द शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करुन घ्यावा लागला. अशा परिस्थितीमध्ये जुन्या रुढी फेकून नव्या रुजवण्यासाठी ट्रान्झिशन/ ओव्हरलॅप लागतो तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे.

एकनाथांनी श्राद्धावेळी १००० महार जोडपी जेवायला घातली, गंगेचं पाणी गाढवाला प्यायला दिलं, रामदासांच्या शिष्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्रीपुरुषांचा समावेश होता, तुकाराम महाराजांनी घरी चालून आलेली स्त्री नि संपत्ती नाकारली ह्या सगळ्या गोष्टींचा विसर सोयिस्कर पडतो. चांगलंय.

समर्थांचंच वचन आहे येर महार चांभार त्यांचे राखावे अंतर
(राखावे म्हणजे जपावे आणि अंतर म्हणजे त्यांचे मन नाहीतर इथे पण कीप सेफ डिस्टन्स म्हणाल)
आजही गावामध्ये त्या त्या समाजाच्या वस्त्या त्या त्या नावाने उल्लेखिल्या जातात. ४०० वर्षांपूर्वी संतमंडळी बाहेरुन तसं म्हणत असली तरी त्यांची मनःस्थिती काय होती ह्याचा विचार करावा. ह्याच दासबोधात म्हटल्याप्रमाणे 'समूळ ग्रंथ पाहिल्यावीण उगाच ठेवी जो दूषण.... तो एक मूर्ख' असंही म्हटलेलं आहे. आपण असंच करत नाही आहोत का?

बाकी ज्यांना फक्त फोलकटांमध्येच रस आहे त्यांनी तीच चिवडत बसावीत.

मृत्युन्जय's picture

19 Oct 2013 - 10:54 am | मृत्युन्जय

हे पत्र लिहुन पत्र लेखकाने स्वत:चे हसे करुन घेतले आहे बाकी काही नाही. जर हे गंभीरपणे लिहिलेले असेल तर हा तद्दल मुर्खपणा आहे.

आणि जर हे उपहासात्म लिहिले असेल तर मुर्खपणाचा कळस आहे.

१. उपहासात्मक लिहिताना किमान तुम्ही तसे लिहित आहात हे वाचकांना समजणे अपेक्षित आहे.
२. उपहास करण्यामागे एक विवक्षित भूमिका असणे अपेक्षित आहे. वर्तमानपत्रात उगा काही आगापिछा नसताना आणि काही प्रयोजन नसताना असले लेख लिहिणे हे रिकामटेकडेपणाचे उत्तम लक्षण आहे.
३. लेखाचे प्रयोजन नक्की कळत नाही. आस्तिकांच्या आस्तिकतेवर काही करुन आसूड ओढायचा हा एकमेव उद्देश असेल तर हरकत नाही. एरवी गीतेचे दाखले देउन नोबेल पारितोषिक विजेत्यांचा उपमर्द , उपहास किंवा निंदा करणारा अजुन मला भेटलेला नाही. जो भेटेले तो एक महामुर्खच असेल.
४. गीतेत काय लिहिले आहे याचा विपर्यास करण्यापेक्षा अजुन काही भरीव कामगिरी केल्यास नक्कीच बरे होइल.
५. अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न जरुर करावा परंतु श्रद्धा, अध्यात्म आणि अविचारी अंधश्रद्धा यामधील सीमारेखेचे भान न ठेवता सरसकटीकरण करुन अर्धवट उपहास करायला गेल्यास हे असले पत्ररुपी अपत्य जन्माला येते.

विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कार्याचा आदर नक्कीच आहे. आणि प्रत्येक माणसाने मानवजातीच्या कल्याणासाठी पूरक असे वैज्ञानिक संशोधन आणि अभ्यास नक्कीच करावे. जमत नसेल तर त्या कार्याचे मोल जाणून त्याला सहाय्य करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्या कार्याचा आदर करण्यासाठी जे काय करता येइल ते सर्व करावे. हाच संदेश या उपहासातुन द्यायचा असेल तर तो स्तुत्य आहे पण त्यासाठी हा उपहास आणि गीतेचे अनावश्यक आणि अस्थायी दाखले देण्याची आणि त्याची टर उपडवण्याची काहिच गरज नव्हती. गीतेच्या प्रस्तुत श्लोकांचा पत्रलेखकाने लावलेला अर्थ घेउन मुक्ताफळे उधळणारा महात्मा माझ्या पाहण्यात नाही. तसा तो पत्रलेखकाच्या पाहण्यात असेल तर एवढे सग्ळे लिहिल्याबद्दल मी त्यांची बिनशर्त माफी मागतो.

ज्ञानव's picture

19 Oct 2013 - 11:26 am | ज्ञानव

गेल्या १०५ वर्षात सर्वात जास्त नोबेल्स ज्यू लोकांना मिळाली आहेत.(१५ डझन नोबेल्स १४ मिलीओन ज्यू लोकांपैकी).
अमेरिकन्सना नाही.
बाकी अध्यात्म,शाश्वत नश्वर वगैरे बाबत अस्मादिकांचे अज्ञान शाश्वत आहे.
अमेरिकन्स ठरवणार कोण नोबेल ते.....हेच विनोदी नाही का ?

चौकटराजा's picture

23 Oct 2013 - 9:49 am | चौकटराजा

एकाच फ्यामिलीत सहा नोबेल मिळालेली फ्यामैली कंची ?
मादाम मेरी क्यूरी ची !

ग्रेटथिन्कर's picture

19 Oct 2013 - 12:49 pm | ग्रेटथिन्कर

याला काय म्हणायचे ते सांगतो ,
आधी ते वरचे श्लोक कशासाठी लिहलेत ते सांगा!
||वेद विरहीत ते अप्रमाण || असे समर्थ सांगतात, याचा अर्थ काय! विज्ञान अप्रमाण????....मग प्रमाण काय ..लक्षभोजणावळ्या कि मूढमती विप्र?

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:19 pm | मुक्त विहारि

अरेच्चा!!!

तुम्ही अद्याप ते "चुर्ण" घेतले नाहीत का?

आणि ट्रोल म्हणजे काय? इ. जुने प्रश्न आहेतच...आधी ती उत्तरे दीलीत तर बरे

बाकी तुम्ही स्मायल्यांची साथ सोडलीत ते बरे झाले...

त्याचे काय आहे, स्मायल्यांची गरज तुम्हाला नाही... निदान हे तरी तुम्हाला पटले...

ग्रेटथिन्कर's picture

19 Oct 2013 - 1:25 pm | ग्रेटथिन्कर

एकालाही प्रतिवाद करता येत नाही, फक्त घूमजाव.
बरं, ते समर्थांनी मूढमतीला जगतवंद्य मानावे असे का सांगितले असावे बरे.?

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:38 pm | मुक्त विहारि

जरा खालील कविता वाचलीत तर बरे...

http://www.misalpav.com/node/25870

बाकी नेहमी प्रमाणे

ग्रेटथिन्कर's picture

19 Oct 2013 - 2:04 pm | ग्रेटथिन्कर

बरं ते मूढमतीला जगतवंद्य का मानायचे? आणि वेदाबाहेरचे अप्रमाणित ..असे समर्थ का बरे म्हणाले?

लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', लेखक धन्या आणि प्रतिसाद संख्या ६९ म्हणून उत्सुकतेने धागा उघ्डला तर काय... 'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही! हे बघून सगळा उत्साह मावळला.

- (हताश झालेला) सोकाजी

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 4:35 pm | मुक्त विहारि

आज शनिवार की रात है
मँगोला घर में है
व्होडका तय्यार है
एक एक जाम हो जाय...

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2013 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

@ (हताश झालेला) सोकाजी>>> :-D

मला कंसा'तल्या शब्दांचा अर्थ 'हतोत्साह' असा का ऐकु येत आहे? =))

सोत्रींकडे जा.

त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या....

(तुम्ही औषध घेत नाही हे माहीत आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2013 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या....>>> :-D ह.....त! .... उत्साह घालवलात माझा! ;-)

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2013 - 11:29 pm | धर्मराजमुटके

धाग्याचा टीआरपी वाढविण्यासाठी तुम्ही सुपारी / विडा घेतलेला दिसतोय.

संजय क्षीरसागर's picture

20 Oct 2013 - 12:28 pm | संजय क्षीरसागर

सोत्रि,

एकतर खुद्द यनावालांना शाश्वत ज्ञान म्हणजे काय ते माहिती नाही. ते फक्त लॉजिकप्रविण आहेत. त्यात ते स्वतः गैरहजर.

दुसरी गोष्ट, हे पत्र त्यांनी विज्ञान विरूद्ध अध्यात्म या नेहेमीच्या हिट विषयावर लिहीलंय. मूळात विज्ञान आणि अध्यात्मात वादच नाही. शास्त्रज्ञ शोध लावून मानवतेवर उपकार करत आले आहेत आणि सिद्ध `स्व'चा उलगडा करण्याचा मार्ग सांगतात.

थोडक्यात, शास्त्रज्ञ प्रकट जगाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न करतात आणि सिद्ध त्या नंदनवनात सुखानं कसं जगावं ते सांगतात.

यनावालांनी निर्माण केलेला `शाश्वत ज्ञान विरुद्ध अज्ञान' हा बखेडा

"अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे"

केवळ त्यांचं अध्यात्मिक अज्ञान दर्शवतो.

आता इथे सदस्यांनी शाश्वत ज्ञान आणि मोक्ष याच्या ज्या बहुविध छटा दाखवल्या आहेत त्याबद्दल मी काही लिहीलं तर `स्वतःला शहाणा समजणे, अहंकार, विचार लादणे इतकंच काय तर नार्सिसिझम, मानसोपचारांची गरज' वगैरे नेहेमीचा खेळ सुरु होईल. मला त्या गोष्टींनी फरक पडत नाही पण ज्या विषयावर मी स्वतंत्र लेख लिहू शकतो तिथे गैरहजर सदस्याच्या लेखावर दंगा करणं अनुचित आहे. तस्मात प्रतिसाद दिला नाही.

यनावाला's picture

20 Oct 2013 - 9:40 pm | यनावाला

श्री.धन्या यांनी म.टा.पुणे.तील एक पत्र उद्धृत केले आहे.पण त्यातील श्लोक त्यांनी दिला आहे. तो गीतेत आहे असे पत्रात म्हटले आहे.पण अध्याय आणि श्लोक यांचे क्रमांक, तसेच श्लोकाचे अन्वयार्थ मूळ पत्रात दिलेले नाहीत या त्या पत्रातील त्रुटी आहेत.तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ असे:
......
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनं ।
एतत् ज्ञानमिति प्रोक्तं अज्ञानं यदतोSन्यथा॥
(अ.१३. श्लो.११)
.....
अन्वयार्थ:
अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे),
तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे,
एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे.
यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल ,
तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).

ते पत्र मी इथे जसंच्या तसं इटालिक अक्षरांमध्ये दिलं आहे. फक्त पत्रामध्ये उद्धृत केलेला श्लोक टंकताना मी "तदतो" हा शब्द "त्दतो" असा चुकीचा टंकला.

बॅटमॅन's picture

20 Oct 2013 - 11:23 pm | बॅटमॅन

अगदी बरोबर!!! या गोष्टी गीताकारांच्या मते अज्ञान आहेत.

बर मग???????? गीताकार काही म्हणोत, काय कसं ते आपलं आपल्याला माहितीये, आपला आपण निर्णय घ्यावा , हाकानाका.

अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, हेच ज्ञान होय. जे याहून वेगळे असेल ते अज्ञान (होय).

`अज्ञाना'चा अध्यात्मिक अर्थ असा की `ते तुम्हाला तुमच्या स्वरुपाचा उलगडा करु शकत नाही'

आणि तुम्ही हा अर्थ काढलायं -

यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!

जो संपूर्ण विपर्यस्त आहे.

प्यारे१'s picture

21 Oct 2013 - 1:04 am | प्यारे१

+११११.
अगदी अगदी.

बॅटमॅन's picture

21 Oct 2013 - 11:29 am | बॅटमॅन

पूर्ण सहमत. (चक्क)

ज्ञान : `स्व'चा उलगडा
अज्ञान : `स्व'चं विस्मरण किंवा `स्व'च्या ज्ञानाप्रत नेऊ शकत नाही असं ज्ञान
विज्ञान : (कोणत्याही विषयाचं) विषेश ज्ञान उदा. मेडिकल सायन्स, फिजिक्स, कंप्युटर सायन्स...

विज्ञान मानवतेला उपकारक आहे. अध्यात्मिक अर्थानं त्यानं स्वचा उलगडा होऊ शकत नसला तरी ते व्यर्थ निश्चित नाही (यनावलांनी अज्ञानचा तसा अर्थ काढला आहे आणि पत्र लिहीलं आहे).

थोडक्यात, अध्यात्म विज्ञानविरोधी नाही. ते स्वविस्मरणाचं भान देतं. गीतेतल्या श्लोकाच्या `अज्ञानाचा' तो अर्थ आहे. अध्यात्म नोबेल विनर्सचा उपहास करत नाही. (ते यनावलांचं अज्ञान आहे! :-) )

तस्मात, `विज्ञान विरूद्ध अध्यात्म' असा बखेडा या संकेतस्थळावर पुन्हा होऊ नये.

अनिरुद्ध प's picture

21 Oct 2013 - 12:49 pm | अनिरुद्ध प

+११११ सहमत

बाळ सप्रे's picture

21 Oct 2013 - 2:06 pm | बाळ सप्रे

`स्व'चा उलगडा

याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे??

विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे :-)

एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान?

हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2013 - 3:18 pm | संजय क्षीरसागर

१)

विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे

नाही. विज्ञान ही अध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानाचीच वेगळी शाखा आहे.

विज्ञान प्रकट जगाशी संबंधित आहे तर (अध्यात्मिक) ज्ञान अप्रकट जगाशी. उदा. संगीतशास्त्र `ध्वनी' या शांततेच्या प्रकटरुपाशी संबंधित आहे तर अध्यात्म शांतता या अस्तित्वाच्या अनिर्मित स्थितीशी संबंधित आहे.

२)

याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे? एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान?

विषेश ज्ञान त्याला जगणं सोयीचं करेल पण स्व गवसलेला नसल्यानं तो सर्वस्वी निश्चिंतपणे जगू शकणार नाही. इथे तुम्ही म्हणता तशी `ज्ञान आणि अज्ञान' अशी तफवात नाही.

३)

हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!

गीता हा अध्यात्मावरचा एकमेव ग्रंथ नाही. माझा आक्षेप "विज्ञान श्रेष्ठ आणि अध्यात्म फोल" या यनावालांच्या (रिवर्स) लॉजिकला आहे. आणि मला विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत असं म्हणायचंय.

पेशीविज्ञान शरीराला उपकारक आहे कारण देह आहे तोपर्यंत देहाची काळजी घ्यावीच लागणार आणि अध्यात्म श्रेष्ठ आहे कारण ते तुम्हाला तुमच्या विदेहत्त्वाचा उलगडा घडवतं. याचा अर्थ विदेहत्त्वाचा उलगडा झालेला डॉक्टरकडे जाणार नाही असा नाही. आणि एखाद्याला शरीरशास्त्राच्या संपूर्ण ज्ञानाबद्दल नोबेल मिळालं तरी त्याला स्वतःचं विदेहत्त्व समजेललं असेल असं नाही.

बाळ सप्रे's picture

21 Oct 2013 - 3:44 pm | बाळ सप्रे

यनावालांचं रीव्हर्स लॉजिक बाजूला राहु द्या..

ज्यात "स्व" उलगडत नाही ते अज्ञान याला माझा आक्षेप आहे.. तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादाप्रमाणे..

तुमच्या आत्ताच्या प्रतिवादाप्रमाणे प्रकट जगातील कशालाही ज्ञान कींवा अज्ञान म्हणणे अ‍ॅप्लिकेबलच नाही.. हा दावा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही असे म्हणणे होते.. यालाच मी पळवाट म्हटले आहे....

साधं उदाहरण द्यायचं झाल्यास
रुढार्थानं नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान . आणि नाग विषारी की बिनविषारी हे माहित नसणं म्हणजे त्याविषयीचं अज्ञान ..
तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे..
हा युक्तिवाद नुसता अयोग्यच नव्हे तर हास्यास्पददेखिल आहे..

प्यारे१'s picture

21 Oct 2013 - 5:21 pm | प्यारे१

साहेब थोडंस्सं मी सांगू?

मला एखाद्या गोष्टीबाबत ज्ञान (माहिती, माहिती कशी वापरायची ते) आहे अथवा नाही हे ज्यामुळे-ज्याच्या बेसवर-अधिष्ठानावर- सत्तेवर (जे असल्यानंतरच) कळतं ते ज्ञान. ही अध्यात्मातली व्याख्या आहे. ह्यालाच शुद्ध ज्ञान म्हणतात.

कुणामुळं अथवा कशामुळं तरी झालेलं ते वृत्ती ज्ञान. ज्याबद्दल आपण बोलत आहात.

काहीही अगदी स्वतःचं शरीर पण दिसत नसताना काळ्याकुट्ट अंधारात उभे राहिलात तर कदाचित मी काय म्हणतोय ते समजेल. :)

ही अस्तित्वाची जाणीव म्हणजे ज्ञान. नि ते आत चैतन्य असल्यावर त्याच्या सत्तेवर 'कळतं' कोमातल्या माणसाला समजलं नाही तरी ते 'असतं'. आणखी थोडा विचार केला तर ते कॉमन फॅक्टर म्हणून सगळीकडेच असतं फक्त अभिव्यक्त नसतं. :)
ते ओळखलं तर सगळं ओळखलं असं भगवान म्हणत आहेत.

अनिरुद्ध प's picture

21 Oct 2013 - 5:29 pm | अनिरुद्ध प

+१११११ सहमत

बाळ सप्रे's picture

21 Oct 2013 - 5:32 pm | बाळ सप्रे

ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत जाउन ते शुद्ध की वृत्ती ते महत्वाचं नहिये..

एखाद ज्ञान की अज्ञान असा प्रश्न आहे..
गीतेच्या त्या श्लोकाप्रमाणे ते अज्ञान ठरतय.. जे मला पटत नाहिये..
संक्षी त्याला प्रकट जगातलं असेल तर "नॉट अ‍ॅप्लिकेबल" असं उत्तर देतायत.. जे ज्ञानाच्या/ अज्ञानाच्या रुढ अर्थाने अयोग्य उत्तर आहे..

तुम्हीही शुद्ध ज्ञान / वृत्ती ज्ञान वगैरे पद्धतीने सरळ उत्तर ने देता फाटे फोडताय..

प्रसाद गोडबोले's picture

21 Oct 2013 - 5:39 pm | प्रसाद गोडबोले

_/\_

कारण विषय गीतेतल्या श्लोकाशी संबंधित आहे याचं भान ठेवाल तर उलगडा होईल.

तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे..

नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे.

नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय? ते स्वचा उलगडा झालेल्या किंवा न झालेल्या दोघांनाही उपयोगी आहे. पण अध्यात्मिक दृष्ट्या (म्हणजे गीतेतल्या श्लोकाच्या संदर्भात) ते स्वचा उलगडा होण्यासाठी निरुपयोगी आहे.

नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे.

नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नसलं तरी जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं.

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2013 - 11:28 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही. उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा). तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला.

जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.

तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही.

असं तुम्हाला वाटतं. वस्तूस्थिती वेगळी असू शकते.

उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा)

तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.

तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला.

माझ्या लेखनातल्या चुका कुणी दाखवून दिल्या तर मी त्या मान्य करतो. तुमच्यासारखं "गीरे तो भी टांग उपर" असं म्हणत स्वतःचंच घोडं पुढे दामटत नाही.

जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.

व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 9:56 am | संजय क्षीरसागर

परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.

पुन्हा पुन्हा तोंडघशी पडण्याची तुम्हाला दांडगी हौस दिसते. म्हणजे मुळात म्हैस आणि रेडा इतपत विषय हाताळण्याची क्षमता आणि अध्यात्मावर लिहीण्याचा सोस!

जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.

या वाक्याला तुम्ही अर्थहिन म्हणतायं यातच तुमचं आकलन उघड होतं. कारण `नैनं च्छिंदंती शस्त्राणी' या दुसर्‍या अध्यायातल्या श्लोकाचा तो वास्तविक अर्थ आहे. आणि शून्य अध्यात्मिक आकलनामुळे तुम्हाला तो कळणं अशक्य आहे.

तुमच्या कंपूतल्या मंदबुद्धी मित्रांना (हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत), आता तुमच्यासारखेच निरर्थक प्रतिसाद द्यायची सवय तुम्ही लावली आहे. तस्मात त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत चला आणि म्हैस वगैरे (तुमच्या हातखंडा) विषयावर लिहीत राहा.

तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.

तुमच्या `सच्चिदानंदबाबांसारखा' विनोदी लेख मला लिहीता येत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतंय!

तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जंगलामध्ये काळवीटाने गेंडयाच्या कातडीवर टकरा देण्यासारखं आहे. काळ्वीटाची शिंगं मोडतील पण गेंडयाच्या कातडीवर साधा ओरखडाही उमटणार नाही.

तुमचं चालू दया.

बॅटमॅन's picture

22 Oct 2013 - 12:45 pm | बॅटमॅन

पालथ्या घड्यावर पाणी पाडण्यासारखं. किंवा महिषावर पाऊस पाडण्यासारखं.

मला हे एकदम बेस्ट वाटतं. स्वतःला काहीएक समज नाही आणि मुद्दा मांडता आला नाही की `नार्सिसिझम' वगैरे लेख टाकायचे! दुसर्‍याला `मीच शहाणा' म्हणायचं आणि स्वतःवर बेतलं की चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणायचं! ते सप्रे आणि सोत्रिंचे प्रतिसाद वाचा. आकलन कसं असावं, चर्चा कशी करावी आणि विषय कसा पुढे न्यावा कळेल.

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 10:23 am | बाळ सप्रे

सगळ्या गोष्टी अध्यात्मिक पातळीवर न्यायची गरजच काय??

नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय?

हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' असं सूचित करतय..

नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे

तर हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' नव्हे (म्हणजेच अज्ञान) असं सूचित करतय..

तुम्ही आडवळणं घेउन थेट उत्तर द्यायचं टाळताय..
मी दिलेलं उदाहरण फार स्पष्ट आहे..
नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' की 'अज्ञान' ?? - एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे.. (निखिल वागळे टोनमध्ये :-) )

त्यात पुन्हा शीर्षक नीट वाचा : "शाश्वत ज्ञान" (नुसतं ज्ञान नाही).

"शाश्वत ज्ञान" हा शब्द नाही. ती कायम स्थिती आहे.

तुम्ही ज्ञान आणि अज्ञानाची वेगवेगळी उदाहरणं देऊन ज्या प्रकारे विषयाकडे पाहता आहात तो अध्यात्मिक दृष्टीकोन नव्हे. तुम्हाला कळेल किंवा नाही (कारण तुम्ही आडवळणं, पळवाट अशा शब्दयोजना करतायं) पण `कायम स्थिती' किंवा स्वरुप हे अपरिवर्तनीय आहे. इट इज अ‍ॅबसल्यूट! खरं तर त्या स्थितीचा भाषेशी काहीही संबंध नाही. कारण शब्द केवळ निर्देश आहे.

नाग विषारी आहे हे माहीत असलं काय की नसलं काय तो व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यानं स्थितीला काहीएक फरक पडत नाही. कारण ती व्यक्तिगत ज्ञानावर किंवा अज्ञानावर अवलंबून नाही.

आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मला पळवाट काढणं किंवा आडवळणाची काहीएक गरज नाही. अध्यात्म काय, भाषा काय की विज्ञानाची सार्थकता काय सगळ्या गोष्टींचं यथार्थ आकलन आहे. तस्मात, तशी शब्दयोजना करु नका आणि गैरसमज काढा तर तुम्हाला समजेल.

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 11:56 am | बाळ सप्रे

अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे ..
पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे..
जे गीतेच्या श्लोकाच्या अर्थातून प्रतीत होतय.. तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..

सोत्रि's picture

22 Oct 2013 - 12:14 pm | सोत्रि

संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा.

इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते.

- (कसलेच ज्ञान नसलेला, अज्ञानी) सोकाजी

अनिरुद्ध प's picture

22 Oct 2013 - 12:48 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 1:01 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे ..

धन्यवाद! आता उत्तर देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे..तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..

ते तर मी सुरुवातीला अगदी पहिल्याच प्रतिसादात म्हटलंय. जगायला विज्ञान (किंवा सोप्या शब्दात माहिती) उपयोगी आणि अनिवार्य आहे. डॉक्टरचा शारीरिकस्वास्थ्य बर्करार ठेवायला उपयोग आहे. आणि म्हणून रुढार्थानं ज्याला ज्ञान म्हटलंय (किंवा मी ज्याला विज्ञान अथवा विषेशज्ञान म्हणतो) ते उपयोगी आहे. नोबेल लॉरेटस व्यर्थ काम करत नाहीत. ते मानवतेला उपकारक आहेत.

पण अ‍ॅट द सेम टाइम `शाश्वत ज्ञान' (गीतेतला श्लोक) सार्थ आहे कारण विषेश ज्ञान `स्व' ची उकल करु शकत नाही हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे.

आता शाश्वत ज्ञान हा प्रस्तुत चर्चेचा विषय नसून यनावालांचा "शाश्वत ज्ञानाचा उपहास" हा विषय आहे त्यामुळे चर्चा इथे संपन्न होते. थोडक्यात लेखकाचा उपहास अयोग्य आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत. आय थिंक आय हॅव मेड द पॉइंट.

संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा.

दॅटस द पॉइंट आणि पूर्वग्रह सोडून माझं लेखन वाचलं तर तो कुणाच्याही लक्षात येईल.

इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते.

शाश्वत ज्ञान (किंवा स्थिती) सिंग्युलर आहे ते कुणाच्या विरोधात नाही. उदा. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं ज्ञानी (स्व समजलेला) काय की अज्ञानी ( स्व न समजलेला) काय दोघेही बद्ध आहेत. त्यामुळे शाश्वत ज्ञान ऐहिक ज्ञानाचा फोलपणा दर्शवत नाही. असा फोलपणा ज्यांना यथार्थ अध्यात्मिक आकलन नाही त्यांना वाटतो. म्हणजे एकतर त्यांना ऐहिक ज्ञान व्यर्थ वाटतं किंवा अध्यात्मिक ज्ञान ऐहिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ वाटतं. पण वस्तुस्थिती तशी नाही जगायला ऐहिक ज्ञान हवं आणि मजेत किंवा स्वच्छंद जगायला स्व गवसायला हवा!

ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट अज्ञान ठरवत नाही ..
पण गीतेच्या श्लोकाचा खालील अन्वयार्थ तर स्पष्ट "अज्ञान" हा शब्द वापरुन सांगत आहे. की बाकीचे अज्ञान आहे म्हणून..

अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे),
तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे,
एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे.
यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल ,
तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).

यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे.. पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल . अर्थात वरील अन्वयार्थ बरोबर आहे हे गृहीत धरुन.. मिपावरील संस्कृत पंडीतांनी यनावालांनी लावलेला अन्वयार्थ एकदा तपासावा..

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 4:00 pm | संजय क्षीरसागर

तेवढंच तर म्हणायचंय

पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल .

अजिबात नाही. एकतर गीतेच्या काळात `शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी असण्याची शक्यता नाही त्यामुळे त्या श्लोकाचा अनुरोध विज्ञानाकडे नाही.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे `एवरिथिंग मर्जेस अ‍ॅट अ सिंगल पॉइंट ऑफ टाईम : दॅट इज नाऊ!'

त्यामुळे या घडीला योग्य संदर्भ आणि समतोल विचारसरणीनं पाहिलं तर अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आणि आपापल्या जागी उपयुक्त आहे.

अँड वेन वन कॅन हॅव बोथ वाय चूज वन? आणि तो सूज्ञपणा आहे!

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 4:15 pm | बाळ सप्रे

गीतेच्या काळात शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी नसली, अनुरोध विज्ञानाकडे नसला तरी बाकी सगळं (अध्यात्म सोडुन जे काही असेल ते) अज्ञान म्हणणे हे अतिशयोक्तच !!

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 4:20 pm | संजय क्षीरसागर

एका श्लोकात किती डिस्क्लेमर बसवणार? अर्थात, तुम्हाला अर्थाशी कर्तव्य की शब्दाशी हे आता तुम्ही पाहा. माझा मुद्दा मी निर्विवादपणे मांडला आहे.

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 4:31 pm | बाळ सप्रे

जो शब्दांचा अर्थ आहे तोच घेतला जाणार.. गीतेतला आहे म्हणून चांगला अर्थ शोधुन तो याचा अर्थ आहे असे करणे योग्य नव्हे..
असे बेधडक विधान असेल तर डिसक्लेमर हवच.. नाहीतर अर्थ शब्दांचा अर्थ घेतला जाणारच..

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 4:48 pm | संजय क्षीरसागर

यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल ,
तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).

अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते. याचा अर्थ ते व्यर्थ आहे असा नाही.

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 5:05 pm | बाळ सप्रे

तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं

कारण तोच मुद्दा आहे.

व्यर्थ की उपयुक्त हा मुद्दा नाहीच आहे.. ज्ञान की अज्ञान हा आहे..
तुम्हीही याप्रत आलात

अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते

एखाद्या गोष्टीला अज्ञान म्हणण ही हेटाळणी झाली.. मग "पण ते व्यर्थ नाही" ही सारवासारव झाली!!!

संपूर्ण गीता चुकीची आहे म्हणणं चूक आहे.

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 6:44 pm | बाळ सप्रे

संपूर्ण गीता चुकीची कोण म्हणतय???

आणि हवा तसा अर्थ काढुन नव्हे.. जो अर्थ शब्दातुन सरळ निघतोय तोच पहाता हा श्लोक नक्कीच अतिशयोक्त आहे.. (अर्थात हा अर्थ बरोबर असल्यास!!)

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

एका श्लोकावरुन तुम्ही गीतेविषयी पराकोटीचा अर्थ काढतायं

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2013 - 6:57 pm | संजय क्षीरसागर

तसाच अर्थ निघतो!

बाळ सप्रे's picture

22 Oct 2013 - 7:35 pm | बाळ सप्रे

माझ्या कुठल्याही प्रतिसादात गीतेवर सरसकट भाष्य नाही त्यामुळे.. सगळा आक्षेप त्या श्लोकाच्या अर्थावर आहे..

गीतेविषयी पराकोटीचा अर्थ काढतायं

याला काहीही आधार नाही..
सारवासारव हा शब्द - त्या श्लोकाचा चांगला अर्थ शोधुन काढुन दाखवण्याच्या तुमच्या प्रयत्नांसाठी होता..

उद्दाम's picture

21 Oct 2013 - 1:02 pm | उद्दाम

मोक्षाला गेलेल्यांच्या यादीत हिंदु लोक जास्त असतील तर आनंदच आहे.

एकदा गांधीजींना लेप्रसी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलावले होते. ते म्हणाले, लेप्रसी हॉस्पिटल सुरु करणे यापेक्षा ते बंद करताना मला जास्त आनंद होईल.

हिंदु धर्माचेही तसेच आहे. सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिला की कुणाला जन्मच घ्यायची गरज लागणार नाही आणि मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल.

केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा.

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2013 - 1:49 pm | संजय क्षीरसागर

केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा

तुम्हाला मोक्ष म्हणजे काय ते माहिती नाही आणि धर्म म्हणजे काय ते ही माहिती नाही. उगीच प्रतिसादातून फ्रस्ट्रेशन दाखवण्याला काही अर्थ नाही.

प्रसाद गोडबोले's picture

21 Oct 2013 - 2:05 pm | प्रसाद गोडबोले

झाली बॅटींग सुरु ?
=))

उद्दाम's picture

21 Oct 2013 - 2:12 pm | उद्दाम

ते ज्ञान आम्हाला असतं तर आम्ही क्षीरसागरात झोपायला नसतो का गेलो?

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2013 - 2:54 pm | संजय क्षीरसागर

क्षीरसागरात झोपायला नसतो का गेलो?

सहमताये! पांघरुणात झोपणं सगळ्यात बेस्ट! :smile:

विषेशतः अज्ञान म्हणजे काय हे इतक निट लिहल्यावर आता कशाला समोरच्यांवर असा अकाली चढतोस (चढाइ करतोस). कशाला समोरच्याला ही अक्कल नाही ती अक्कल नाही म्हणायलाच हवे काय ? त्यापेक्षा जे तुला जे माहित आहे ते विषद कर. समोरच्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव आपोआप होइल.

धन्या's picture

21 Oct 2013 - 3:06 pm | धन्या

मराठीत एक म्हण आहे, लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण.

साहेब,
हे एव्हडे सहजशक्य नाही असे वाटते,माझ्या वाचनानुसार ला़खात एखाद्याला मोक्ष मिळतो ईतके व्यस्त प्रमाण आहे,बाकी जाणकार त्यावर भाष्य करतीलच.

उद्दाम's picture

21 Oct 2013 - 2:28 pm | उद्दाम

पण ज्याने ही यादी बनवली तोही मोक्ष पावलेलाच असेल का?

मग जर तो मोक्ष पावला आहे, तर त्याच्या वाट्याला 'यादी करणे' हे कर्म कसे आले?

अनिरुद्ध प's picture

21 Oct 2013 - 2:36 pm | अनिरुद्ध प

ब्वा तुम्ही,यात "जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित."यात ही यादी कोणी केली आहे याचा उल्लेखही नाही तर तो मोक्षाला पावला किवा नाही हे कोण आणि कसे ठरवणार?

उद्दाम's picture

21 Oct 2013 - 2:43 pm | उद्दाम

पण तुमच्या वाक्यातील ते जे 'निश्चित' आहे, ते, जोवर अशी यादी प्रत्यक्ष कुणी काढून समोर ठेवत नाही, तोवर अर्थहीन ठरते.

आधी अशी यादी काढा. आणि ती दाखवा.

बरं, मोक्षाला गेलेला आत्मा भारतीय की अमेरिकन हे कसे ठरवणार? म्हणजे या जन्मात भारतीय असलेला मनुष्य गेल्या जन्मात अम्रेरिकेत कुत्रा असू शकतो, अँड वाइस वर्सा. भारतीय , अमेरिकन ही ओळख शरीराला असते, आत्म्याला नाही, शरीर तर मेलं, मग आता आत्म्यांचे भौगोलिक स्थानाण्मुसार वर्गीकरण कसे काय करणार बुवा?

मग त्या यादीत भारतीय किती आणि अमेरिकन किती हा वादच मूर्खपणाचा नाही का? का, मोक्षाला जाणारा त्याचे सगळे जन्म भारतातच काढतो आणि भोगवादी आत्मा त्याचे सगळे जन्म अमेरिकेतच काढतो की काय?

---------

अनिरुद्ध प's picture

21 Oct 2013 - 2:51 pm | अनिरुद्ध प

धन्यवाद्,पण माझ्या वरिल उत्तरातिल वाक्य हे मी लिहिलेले नसुन हे धागा कर्त्याने डकवलेल्या लेखातील आहे ते मी फक्त डकवुन बोल्ड केले आहे,तर याचे उत्तर एक तर लेखक किंवा फक्त धागाकर्ताच देवु शकेल.

धन्या's picture

21 Oct 2013 - 2:56 pm | धन्या

अवघड आहे. :)

ते पत्र श्री. य. ना. वालावलकर यांचं आहे. त्यामुळे याचं उत्तर तेच देऊ शकतील. मिपा आयडी यनावाला यांनी या धाग्यावर जरी प्रतिसाद दिला असला तरी पत्रलेखक श्री. य. ना. वालावलकर म्हणजे मिपावरचे यनावाला आहेत का ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे.

ग्रेटथिन्कर's picture

21 Oct 2013 - 5:31 pm | ग्रेटथिन्कर

औ तूमाला ठावं नाय काय, बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता, समद्या जीवांचा जल्म भारतातच झाल्यालाय... समदं जीव भारतीय हायती,कायबी आरडत जौ नगासा...
(मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)

काय म्हन्ता खरं की क्काय्,बरं जालं तुमी सान्गितलाव ते नायतर आमी अडानी हाव आमाला कोनी बी येतं आनी टपलीत मारुन जातय.

असंही म्हणतात की ब्रम्हदेवान स्वतःच्या मुलीशी काहीतरी गडबड केली होती. त्यामुळे त्याची पुजा केली जात नाही किंवा पुर्ण जगभरात दोन तीन ठीकाणे सोडली तर इतर कुठेही ब्रम्हदेवाचे मंदीर नाही.

त्या कहाण्यांचा कै संबंध नै.
ब्रह्मा मूळची वैदिक देवता. प्रजापती. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, अश्विनीकुमार यांबरोबर प्रजापतीची पण वेदांत सूक्ते आहेत. कालांतराने वैदिक देवता हळूहळू मागे पडत जाऊन त्यांची जागा विष्णू, इंद्र, देवी आदी दैवतांनी घेतली. मूर्तीपूजेच्या प्रसारामुळे साहजिकच त्यांची मंदिरे उभी राहिली व मूळच्या वैदिक देवतांचे पूजन थांबले.
ब्रह्माबरोबरच इंद्र, वायु, अग्नी आदी देवतांची पण मंदिरे नाहीतच. अगदी क्वचितच एखादे आढळेल.
बाकी विष्णू, शिव आदींच्या मध्ययुगीन मंदिरांमध्ये वैदिक देवतांच्या मूर्ती लै दिसतात.

बाकी ग्रेटथिन्कर यांच्या कंसातल्या वाक्याशी सहमत.

धन्या's picture

21 Oct 2013 - 7:27 pm | धन्या

ही सारी माहिती देवांची जन्मकथा या पुस्तकात विस्ताराने दिली आहे.

प्रचेतस's picture

21 Oct 2013 - 7:29 pm | प्रचेतस

दे की रे वाचायला.
उगा शेल्फात नै ठेवणार.

"(मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)"

चला नगु चा फायदा होत आहे असे वाटते.तरी पण ट्रोलिंगची सवय काही जात नाही.असो भारतात राहून प्रुथ्वी कशी काय बनवणार? हा प्रश्र्न आहेच...

म्हैस's picture

21 Oct 2013 - 3:13 pm | म्हैस

मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे. परंतु त्यांना ती समजलेली नहि. ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे. बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल. माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे . शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि. एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं

मागे एका लेखावर धन्या ह्यांनी प्रतिक्रिया दिली होती कि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली अहे.

हो.

परंतु त्यांना ती समजलेली नहि.

हे तुम्हाला कसं कळलं हे माहिती नाही. परंतू उत्तर हो असंच आहे. ज्ञानेश्वरी हा महासागर आहे. मज पामराच्यात तो महासागर पिण्याईतकी ताकद नाही. या महासागरातले जे काही थेंब माझ्या वाटयाला आले त्यात मी समाधानी आहे.

ज्या माणसाला अध्यात्म हा विषयच समजलेला नाही त्याने त्या विषयावरचे लेख लिहावेत हाच मोठा विनोद अहे.

मी अध्यात्मावर लेख लिहिलेला नसून अध्यात्माच्या नावाखाली आततायी मतांचा विरोध करणारा लेख लिहिला आहे.

बाकीच्या गोष्टींना अज्ञान म्हणणं हे बरोबर नहि. ह्याच्याशी मी सुधा सहमत अहेच. त्याला माहिती (Information) म्हणता येइल.

सहमत आहे.

माहिती म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेल्या असलेल्या गोष्टी शोधून काढणे .

अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टीचं आपल्याला जर आकलन नसेल तर ते अज्ञानच नाही का?

शास्त्रज्ञ शोध लावतात ते मुळातच असलेल्या गोष्टी शोधून काढतात . त्यांना नवीन निर्माण करता येत नहि.

हो. शास्त्रज्ञ निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करतात आणि ती माहिती जगासमोर ठेवतात. ते नविन असं काही निर्माण करत नाहीत.

एखादी पूर्णता नवीन गोष्ट समजणे ह्याला ज्ञान म्हणतात . आणि हे फक्त अध्यात्मातच शक्य अहे. म्हणून बहुदा लेखकाने इतर गोष्टींना अज्ञान म्हणल असावं

अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा.

चौकटराजा's picture

21 Oct 2013 - 5:44 pm | चौकटराजा

अध्यात्माने ज्या गोष्टी पूर्णता नवीन समजल्या अशा फक्त तीन गोष्टी सांगा. यासाठी आसाराम बापू यांच्या अध्यक्षते खाली एक खास अध्यात्म सेमिनार होणार आहे.
त्यासाठी दिगीराजा स्वागताध्यक्ष असणार आहेत. गरीबी ही मानसिकता आहे याचीही उकल होणार आहे. हातात जादूची काठी नसलेला जिनियस म्हणजे काय याची उकल होणार आहे. कळावे....ओ बो बो बो बो .....
आमच्या मते अध्यात्माने तीन गोष्टी नव्याने कळतात.
१. मी शाणा असून बाकी गाढव आहेत.
२. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं )
३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.

धन्या's picture

21 Oct 2013 - 6:03 pm | धन्या

१. मी शाणा असून बाकी गाढव आहेत.

तुम्ही आयटीत असता तर गाढव शब्दाच्या जागी एक वेगळा शब्द वापरला असता.

२. अध्यात्म आधी त्म मधला त म्हणजे तू चा अभ्यास मग म म्हणजे माझा अभ्यास. ( ह्या व्युत्पतीबद्द्ल पवि वर्तक माफी करा हं )

विश्वात ठसवलेला तो विठ्ठल असं एक निरुपद्रवी संप्रदाय म्हणतो.

३. अथांग करमणुकीसाठी विज्ञान विरूद्ध अध्यात्म हा कव्वालीचा जंगी मुकाबला फुकट पहायला ऐकायला मिळतो.

याच्याशी लै वेळा सहमत.

आंग आश्शी, आता कसें धाग्याला 'वजन' आले!

- (ह्या धाग्यावर आज 'संक्षी'प्त झालेला) सोकाजी

धन्या's picture

21 Oct 2013 - 11:13 pm | धन्या

आता आपल्याला कोपा कबानामदी पार्टी पायज्येल. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा

@कोपा कबानामदी पार्टी >>> B-)
को पा??? कब आना??? =))

शिल्पा ब's picture

21 Oct 2013 - 11:18 pm | शिल्पा ब

ते यनावाला ते हेच का? तुम्ही सुद्धा असला लेख फाट्यावर मारण्याऐवजी इथे देऊन आणखी त्यावर काकू काढून नेमकं काय साधलं ? असो.