आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:
'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका. थोडा वेळ चौर्यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वाचने
58008
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते यनावाला ते हेच का?
In reply to ते यनावाला ते हेच का? तुम्ही by शिल्पा ब
.
इथे यादी मिळेल.www.yumtimes
अरे व्वा!!!!
In reply to इथे यादी मिळेल.www.yumtimes by ग्रेटथिन्कर
आभारी आहे.
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
अरे वा
In reply to आभारी आहे. by ग्रेटथिन्कर
जे जे भेटे भूत , ते ते मानीजे
In reply to अरे वा by अनिरुद्ध प
.
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
?
In reply to . by उद्दाम
जाऊ द्या
In reply to ? by मुक्त विहारि
सकारात्मक बदल
In reply to जाऊ द्या by अनिरुद्ध प
एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं
In reply to सकारात्मक बदल by मुक्त विहारि
+ १.....
In reply to एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणाचं by धन्या
मी माणुस नाही ,मी गाढव आहे.
In reply to सकारात्मक बदल by मुक्त विहारि
मी माणुस नाही ,मी गाढव आहे.
In reply to जाऊ द्या by अनिरुद्ध प
गूड.....
In reply to मी माणुस नाही ,मी गाढव आहे. by ग्रेटथिन्कर
नारायण ! नारायण !
हा धागा अध्यात्म आणि विज्ञान
या सोत्रींना काम नव्हतं.
In reply to हा धागा अध्यात्म आणि विज्ञान by धन्या
गुरुजी....
In reply to या सोत्रींना काम नव्हतं. by सोत्रि
पातऴ चिखलात
In reply to हा धागा अध्यात्म आणि विज्ञान by धन्या
धन्या,,,,,
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
धन्या,,,,,
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
धन्या,,,,,
In reply to पातऴ चिखलात by मृत्युन्जय
अहाहा!
चला, मोक्ष मिळालेल्या
In reply to अहाहा! by पैसा
शेवटचा प्रतिसाद माझाच असायला
२०० साठी शुभेच्छा..
बाकी प्रतिसाद नंतर वाचतो,
ते पत्र स्वतंत्रपणे वाचलं तर
In reply to बाकी प्रतिसाद नंतर वाचतो, by आनंदी गोपाळ
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
यनावालांच्या पत्रा ठासून
In reply to अंधश्रद्धा निर्मूलनाच्या by प्रकाश घाटपांडे
त्या पत्राला "यनावाला"
In reply to यनावालांच्या पत्रा ठासून by धन्या
@धन्या -
ही जाहीर करायची परवानगी कोण
In reply to @धन्या - by म्हैस
ज्ञान वाटल्याने वाढते असा
In reply to @धन्या - by म्हैस
बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही
In reply to ज्ञान वाटल्याने वाढते असा by बलि
टिंगलखोर धन्या अशी सही करायला
In reply to बलिशेठ या गोष्टी तुम्हला नाही by धन्या
दुसरी गोष्ट अशी कि ज्ञान हे
In reply to @धन्या - by म्हैस
हे तुमचं विवेचन म्हणजे
गीता बाली आणि कविता
In reply to हे तुमचं विवेचन म्हणजे by म्हैस
त्या आध्यात्मिक आहेत का?
In reply to गीता बाली आणि कविता by ग्रेटथिन्कर
ते पूर्ण पोचलेले आहेत
In reply to त्या आध्यात्मिक आहेत का? by अत्रुप्त आत्मा
गीता हि काय एखादी कविता आहे
In reply to हे तुमचं विवेचन म्हणजे by म्हैस
गीता बाली आणि कविता कृष्णमुर्ती- समर्थ रामदास ---
शक्य आहे.
In reply to गीता बाली आणि कविता कृष्णमुर्ती- समर्थ रामदास --- by संजय क्षीरसागर
आताशी
@भेंडी काय चाल्लय अनं काय
In reply to आताशी by इरसाल
काय ठरलं?
आता तुम्ही एव्हढा आग्रहच करत असाल...
In reply to काय ठरलं? by प्यारे१
....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च
In reply to काय ठरलं? by प्यारे१
अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ
In reply to ....ये मेराईच्च्च्च्च्च्च्च by मोदक
मी म्हणतो आहे ना माझा
In reply to अंपायर ने थर्ड अंपायर के तरफ by प्यारे१
अरे हो! बॅट तुझी नसली तरी
In reply to मी म्हणतो आहे ना माझा by मोदक
एखादा खेळ आवडत नाही म्हणून
In reply to अरे हो! बॅट तुझी नसली तरी by प्यारे१
जल्ला इषय काय होता?
In reply to एखादा खेळ आवडत नाही म्हणून by मोदक
जल्ला इषय काय होता?
In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
जल्ला इषय काय होता?परंपरा प्यारे.. परंपरा. (येथे टुक्कार कखुकग मधल्या अतीटुक्कार* ह्रितीक रोशन च्या आवाजाचा फील आणावा) *हे ही मत प्यारेचेच!! ;-)काय चाल्लंय प्यारेकाका आँ?
In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
काय ओ?
In reply to जल्ला इषय काय होता? by प्यारे१
तसंच ठरलंय ना?
In reply to काय ओ? by पैसा
बाइज और एक्सट्रा रनो की वजह
In reply to काय ठरलं? by प्यारे१
हाय्ला
In reply to बाइज और एक्सट्रा रनो की वजह by अत्रुप्त आत्मा
हा धागा मला संपूर्ण कळला आहे
ज्ञान वाटल्याने वाढते असा
दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती)
ते असू द्या
In reply to दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) by प्रकाश घाटपांडे