सुपर स्ट्रेसबस्टर

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
30 Sep 2013 - 2:12 pm

माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन."
दुसर्‍या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता. एका काल्पनिक पण खर्‍या वाटणार्‍या जगांत प्रवेश करता येत होता. अगदी स्वच्छंद, मनासारखे वागता येत होते. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगात शिरता येत होते. हळुहळु सगळी माहिती करुन घेतल्यावर एक रोमांचक सफर करुन आलो. ऐकाच तर.
सकाळची वेळ सेट केली. आणि फिरायला निघालो. पुढच्या वळणावर एक चहाची टपरी होती. पहिला चहा तो रस्त्यावर ओतत होता. त्याच्या डोक्यावर हातोड्याने एक प्रहार केला. त्याने घाईघाईने एक फडके आणून रस्ता साफ केला. समोरुन एक दुधाची गाडी अतिवेगाने येत होती. त्याच्यासमोर मधेच उभा राहिलो. करकचून ब्रेक दाबत गाडी थांबली. बाहेर तोंड काढून तो शिव्या देणार, एवढ्यात त्याच्या स्पीडॉमीटरवर एक हातोडा हाणला. गपचूप गेला साला. पुढच्या वळणावर एक माणुस रस्त्यावर थुंकला. त्याचे तोंड धरले, जबरदस्तीने उघडायला लावले, आणि तोंडात पिस्तुल खुपसले. भीतिने थरथर कापू लागला तो! मग दम देऊन सोडून दिला. तसाच पुढे गेलो. रस्त्याच्या कडेला काही भैये प्रातर्विधीला बसले होते. त्यांना पुढनं 'खो' देऊन त्यांच्याच घाणीत पाडले. आता बरेच गेम खेळता येणार होते.
गोविंदाचा गेम सिलेक्ट केला. ठाण्याच्या चौकात प्रचंड गर्दी होती. गोविंदा चढत होते आणि सारखे पडत होते. जखमी गोविंदांची रवानगी हॉस्पिटलमधे होत होती. काही नेते स्टेजवर उभे होते. डीजेचा आवाज तर गगनभेदी होता. एक 'आवाज' नांवाचा नेता फारच गुर्मीत दिसत होता. मी खिशातून वायरलेस हेडफोन काढले आणि त्याच्या कानावर पटकन बसवले. कानठळ्या बसून त्याचा चेहेरा वेडावाकडा झाला. डीजे ताबडतोब बंद झाला. लगेच बंदुक सरसावून मी ती, अतिउंचावरची हंडी फोडून टाकली, त्यामुळे तो जीवघेणा खेळ लगेच थांबला.
रेल्वेचा गेम चालू केला. काही टपोरी, येणार्‍या गाडीच्या दुसर्‍या तिसर्‍या डब्यातून, एकदम चालत्या गाडीतून, महिलांच्या घोळक्यांत हात पसरुन, उतरत होते. मी महिलांच्याही पुढे , हातात दोन तीन धारदार सुरे घेऊन उभा राहिलो. गुंडाचा कोथळाच निघाला. बूटपॉलिशवाले, कारण नसताना त्यांच्या खोक्यावर खाडखाड वाजवत होते. त्यांना काठीने फटकावले. पुन्हा गाडीकडे मोर्चा वळवला. गाडीच्या टपावर बसलेल्यांना लांब काठीने खाली पाडले. मग गाडीत शिरलो. पत्ते खेळणार्‍यांचे पत्ते हिसकावून गाडीबाहेर फेकून दिले. भजन करणार्‍या मंडळींचे ढोलके सुर्‍याने पंक्चर करुन टाकले. पुढचे स्टेशन येत होते. दाराकडे वळलो. दारात उभे राहून, इतरांना न उतरु देणार्‍या टग्यांना खाली ढकलून दिले.
ट्रॅफिकचा गेम चालू केला. एका चौकात उभा राहिलो. सिग्नल तोडणार्‍या एकूणएक गाड्यांच्या पुढच्या कांचा फोडून टाकल्या. दार उघडून बाहेर पानाची पिंक टाकणार्‍या ड्रायव्हरांना खेचून बाहेर काढले आणि त्यांच्याच शर्टाने त्यांना सगळे पुसायला लावले. बाजूला स्वस्थपणे हे सगळे बघणार्‍या हवालदाराच्या कानाखाली वाजवल्या. त्याच गेममधे मध्यरात्रीची वेळ सेट केली. एका मोठ्या रस्त्यावर बाजूच्या खांबाला दोर बांधून समोरच्या फूटपाथवर दोराचे दुसरे टोक धरुन बसून राहिलो. एकदम रोरावत दहा बारा रेसिंग करणारे मोटरसायकल स्वार आले. ऐनवेळी दोर खेचून सर्वांना खाली पाडले.
हे खेळणे हातात मिळाल्यापासून माझे ब्लड प्रेशर कमी झाले. चिडचिडा स्वभाव कमी झाला. सुपरमॅन झाल्यासारखे वाटू लागले. भाच्याला निरोप पाठवला. गेम फारच आवडला आहे, लवकरात लवकर, त्यांत बलात्कार्‍यांना शिक्षा देणारे आणि भ्रष्ट राजकारण्यांना वठणीवर आणणारे अपडेटस पण तयार करुन पाठवून दे.

तंत्रमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाळ सप्रे's picture

30 Sep 2013 - 2:25 pm | बाळ सप्रे

तुमचा शेवटचा स्कोअर काय झाला? :-)
फारच इंटरेस्टींग गेम आहे.. भाचा फारच innovative आहे ..

मुक्त विहारि's picture

30 Sep 2013 - 2:39 pm | मुक्त विहारि

काल मी पण लोकल मध्ये स्पीकर फोन वर गाणी ऐकणार्‍यांचे मोबाईल फेकून दिले...

आज लोकलमधल्या फेरीवाल्यांवर आमची नजर आहे...

त्यांत बलात्कार्‍यांना शिक्षा देणारे आणि भ्रष्ट राजकारण्यांना वठणीवर आणणारे अपडेटस पण तयार करुन पाठवून दे.
यात बलात्कार्‍यांना उभ्या उभ्या चिरण्याची आणि भ्रष्ट राजकारण्यांची गाढवावर बसुन चपलांचा हार घालुन धिंड काढण्याची शिक्षा उपडेट करायला सांगा !

(कधी काळचा कॉन्ट्रा {Contra} प्लेयर)

वेल्लाभट's picture

1 Oct 2013 - 3:29 pm | वेल्लाभट

नाही नाही; त्यापेक्षा जुन्या प्रिन्स ऑफ पर्शिया चा तो उभा चिरणारा दरवाजा अ‍ॅड करायला सांगा. खच्च्च्च कन आवाज आणि बलात्कारी खलास... टॅ डॅडॅडॅ डॅ...डॅडॅडॅ.डॅ...

मदनबाण's picture

1 Oct 2013 - 3:33 pm | मदनबाण

सुचना मान्य !

( प्रिन्स ऑफ पर्शिया मधे अमॄतासाठी शोधाशोध करणारा) ;)

बॅटमॅन's picture

1 Oct 2013 - 6:14 pm | बॅटमॅन

काय आठवण करून दिलीत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तो टॅ डॅडॅडॅ डॅ...डॅडॅडॅ.डॅ... आवाज, ते लाल आणि सातव्या लेव्हलमध्ये हिरवे असणारे अमृत, ६व्या लेव्हलचा ढेरपोट्या शत्रू आणि शेवटचा जाफर, सगळेच कळायचं बंद करून टाकणारं होतं. बहुता प्राचीन काळी त्या डॉसगेम्सपैकी अल्लादीनवर एक कटाव लिहिला होता त्याची या निमित्ताने आठवण झाली........गेले ते दिवस.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2013 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

गेमच्या आयडियाची कल्पना छान आहे !

काँप्युटरचा सुळसुळाट होण्याअगोदरचे या गेमचे एक व्हर्शन जपानमधल्या काही कंपन्यांनी यशस्वीरित्या वापरलेले आहे. त्यांनी काम संपल्यावर बाहेर जाण्याच्या दरवाज्याजवळ कंपनीतल्या सगळ्या अधिकार्‍यांचे पुतळे आणि काही बांबू ठेवले होते. घरी जाण्यापूर्वी कामगाराना हव्या त्या पुतळ्यांना बांबूचे फटके मारून मगच घरी जा असे सांगितले होते... काही दिवसांनी केलेल्या परिक्षणात कामागारांच्या कुटूंबातील गृहकलहांचे प्रमाण लक्षणियरित्या घटलेले आढळले !

छोटा डॉन's picture

30 Sep 2013 - 2:56 pm | छोटा डॉन

इंटरेस्टिंग गेम आहे एकदम. मजेशीर वाटला.

- छोटा डॉन

गणपा's picture

30 Sep 2013 - 3:22 pm | गणपा

'मनो'रंजन आवडले. :)

पैसा's picture

30 Sep 2013 - 3:56 pm | पैसा

हे सगळे खेळात किंवा स्वप्नातच घडू शकते!

एक वर्शन मलापण पाठवुन द्या ना तिमा!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2013 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा

आंम्हाला आता हा गेम पाहीजे! :-\
कुठे येउ घ्यायला??? सांगा...सांगा आता! *angry*

अनिरुद्ध प's picture

1 Oct 2013 - 12:17 pm | अनिरुद्ध प

+१ आम्हाला पण

मी-सौरभ's picture

1 Oct 2013 - 6:10 pm | मी-सौरभ

अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप पन काढा ना राव :)

अग्निकोल्हा's picture

2 Oct 2013 - 12:50 am | अग्निकोल्हा

.

पाषाणभेद's picture

2 Oct 2013 - 2:13 am | पाषाणभेद

फारच छान कल्पना आहे.