(ठसे)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
11 Jul 2008 - 7:39 pm

सुखावलं की लाडात यायचं..
मनोमन हुंदडायचं!
दुखावलं की भुंकायचं..
आतल्या आत गुरगुरायचं!

रस्त्या-रस्त्याच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा ओला!
एक ठसा कोरडा!

एक ठसा मातीतून उठून,
एका मनावर गेला उमटून..
एका ठशात पाणी साठून,
एक डोळ्यात आला भरुन..

'मागे' वळून पाहताना मग..
तळीच डोळ्यात येतात जमून!!
डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी
'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन!

(स्वाती ताईंचे सुंदर काव्य 'ठसे' वाचून एका क्षणात ठशांची गर्दी मनात झाली आणि निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवणारा माझा लाडका 'बोरिस' जाऊन १० वर्षे झाली त्याच्या आठवणीने मनात उमटलेले ठसे असे बाहेर पडले....)

चतुरंग

(ता.क. सुरुवातीला हे काव्य 'विडंबन' ह्या प्रकाराखाली टाकले होते पण त्यातला गंभीर आशय लक्षात घेता पुनः संपादित करुन काव्य प्रकारात टाकले आहे, त्यामुळे सदस्यांच्या प्रतिक्रिया थोड्या विसंगत वाटतील, क्षमस्व!)

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 7:43 pm | यशोधरा

बोरीसच फोटोही टाकायचा ना....

कविता वेळेची वाट बघत नाही!
चतुरंग

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 8:30 pm | केशवसुमार

कविता वेळेची वाट बघत नाही!
१००% सहमत
(सहमत)केशवसुमार
स्वगतः ह्याला नक्की कविताच म्हणायचे होते का? :W

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 8:28 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम गंभीर विडंबन..
केशवसुमार

धनंजय's picture

12 Jul 2008 - 3:03 am | धनंजय

प्रतिसाद काढून टाकला आहे.

वरदा's picture

11 Jul 2008 - 8:32 pm | वरदा

गंभीर आणि सुंदर विडंबन
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 1:38 am | विसोबा खेचर

'मागे' वळून पाहताना मग..
तळीच डोळ्यात येतात जमून!!
डोळ्यांकाठच्या ओल्या किनारी
'बोरिस'च्या आठवणी रहाती भरुन!

वा! अतिशय सुरेख विडंबन रे रंगा!

आपला,
(जुन्या ठशांतच बहुत करून रमणारा!) तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Jul 2008 - 2:02 am | ब्रिटिश टिंग्या

एक ठसा मातीतून उठून,
एका मनावर गेला उमटून..
एका ठशात पाणी साठून,
एक डोळ्यात आला भरुन..

बाकी केसुजींनी म्हटल्याप्रमाणे हे गंभीर विडंबन!

प्राजु's picture

12 Jul 2008 - 2:35 am | प्राजु

विडंबन असली तरी कविता वाचून कालवा कालव झाली मनात..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

12 Jul 2008 - 3:03 am | धनंजय

तुम्हाला तुमचा बोरिस.

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 5:05 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मदनबाण's picture

12 Jul 2008 - 4:09 am | मदनबाण

हा ठसा पार्ट २ आवडला !!. :)

मदनबाण.....

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 11:58 am | स्वाती फडणीस

वा वा