कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर ....
कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे,
केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे,
क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्या'' वाजविणे...
असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात. अनेक ठिकाणी काहि कार्यालयं ही १ फॉरमॅट आखून काम करवून घेतात...तिथे त्रास नसतो..परंतू जी कार्यालय कस्टमर-पूजक प्रवृत्तीची असतात,तिथे मात्र गुरुजी हा प्राणी कार्यालयातल्या खुर्ची सारखाच यजमानांना त्या दिवसापुरता विकत अथवा भाड्यानी मिळालेला १ वस्तु विशेष असतो... ''कस्टमर-पूजक---मंगल-कार्यालयाचे गुरुजी'' हा टिळा आपण एकदा लाऊन घेतला की त्यापुढचे सर्व-काही सहन करण्याची शक्ति (आणी भक्ति) अंगात बाणवावीच लागते...
आणी अश्या कार्यालयात गेल्यावर मग सुरु होते...
.............................................द ग्रेट गुरुजी-जोकर सर्कस..........................................................
"कार्यालयाचा गुरुजी"म्हणजे
कार्यालयाचा असतो नोकर
त्याहुन खरं सांगायच तर
सर्कशीतला अस्सल जोकर
कधी घोड्यावर कधी रिंगणात
यावा लागतो प्रत्येक खेळ
जोकर नेहेमी तयार असता...
यजमान चुकवतात त्याची "वेळ"
ट्रॅफिकच्या त्या कारणांनिही
त्यांची बाजू लाऊन धरतात
पण उशिरा येऊन कार्या-लयात
नुस्तेच खुर्चीत' येऊन बसतात
तेव्हढ्यात त्यांना अठवण होते.
आपल्या मुलीचं लग्न आहे.
मुलगि खोलित जाऊन पहाता..
मेक-अप मध्ये मग्न आहे.
मग...हा ही येतो, तो हि येतो
जो येतो..गुरुजिंना धरतो
जोकर वेळेवर "तयार"असुन
उशीर का?...म्हणुन रागे भरतो.
तेव्हढ्यात मुलगी कावरी बावरी
धावत/पळत--स्टेजवर येते
आवरा..उरका घाई करत
यजमानस्वारी गुरुजिंना पिडते
मग सर्कस सुरु होते
एकेक कार्यक्रम पुढे जात
एका हतात माइक धरून
एस्कॉर्टिंग करताना दुखतो हात
इकडून टोला तिकडून टोला
चिडलात तरी हरि-नाम बोला
तेव्हढ्यात गर्दी शांत झाली
का???..तर म्हणे...नवरदेव आला
सगळा खेळ संपता येतो
जिवघेणा झोक्यांचा खेळ
गुरुजी खालच्या 'जाळ्यात' पडून
झुलवा/झुलवीचा साधतो मेळ
असल्या सगळ्या सर्कशीत
गुरुजिंचा खरच जोकर होतो.
मला(ही) अठवतं एके-काळी
मी कार्या-लयाचा नोकर होतो.
============================================================
प्रतिक्रिया
25 May 2013 - 6:45 am | चौकटराजा
आता गुर्जी तुम्ही जेके, डॉन यांच्या पदाला पोहोचले काय ? डायरेक्ट यजमानाचा डेटाबेस वाढलेला दिसतोय ! व्वा !
बाकी ते एस्कॉर्टच प्रशिक्षण वाया जाणार नाही. समानतेचं युग आहे. पुलंचे गुर्जी असते तर म्हणाले असते " पीड्या अरे शुद्धलेखन केलंयस की हगलायस... ?
25 May 2013 - 7:41 am | अत्रुप्त आत्मा
@यजमानाचा डेटाबेस 'वाढलेला' दिसतोय ! व्वा ! --- अरे शुद्धलेखन केलंयस की हगलायस...?
25 May 2013 - 9:05 am | प्रचेतस
काय हे काका, हे असं लिहून आपण एका कवीच्या कोमल मनाला किती डागण्या देत आहोत असं तुम्हांस अजिबातच वाटलं नाही का?
25 May 2013 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा
चतुर उत्तरे देतो अगोबा
हळुच आग लावतो अगोबा
दिसत्या छोट्या ठिणगी मध्ये
फू फू फूंकर घालतो अगोबा :D
25 May 2013 - 8:56 am | प्रचेतस
अगगगग्गगगगगगा.
एका भटजीच्या मनाची व्यथा फारच प्रभावी शब्दांत तुम्ही मांडलीत.
25 May 2013 - 11:57 pm | ५० फक्त
एका भटजीच्या - या दोन शब्दांमध्ये एखादा शब्द राहिला काय टंकायचा का संपादित केलाय ?
26 May 2013 - 11:31 am | प्रचेतस
तुम्हाला 'खौट' हा शब्द अभिप्रेत आहे काय?
27 May 2013 - 11:20 am | ५० फक्त
नाही एक पाच अक्षरी प्रचंड ताकदवान शब्द आहे....
25 May 2013 - 9:37 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म्म..! गुरूजी नांवाच्या जीवाचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे.
25 May 2013 - 11:24 am | पैसा
म्हणूनच कोणीतरी म्हणतात ना, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणं चांगलं! तस्मात, तुम्ही पण स्वतंत्र उद्योजक व्हा बघू!
25 May 2013 - 11:47 am | अत्रुप्त आत्मा
मग 'हे' काय आहे?
हा हि उद्योगच झालाय
"यजमानसमाधान दायक पुरोहित रोज-गार ;) योजना" =))
26 May 2013 - 3:29 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे नक्की काय?
26 May 2013 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा
त्याचा गद्यविस्तार करावा लागेल... :-)
26 May 2013 - 7:54 pm | Bhagwanta Wayal
वा ! झकास...
27 May 2013 - 8:21 am | प्रकाश घाटपांडे
गुरुजी कार्यालयांच्या अनुभवांवर एकदा लिहा.आमचे एक नातेवाईक कार्यालयाचे मॅनेजर आहेत. ते म्हणतात कि लोकांना कार्यालयाची गरज आहे कार्यालयाला लोकांची गरज नाही अशी परिस्थिती आहे.
27 May 2013 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा
@लोकांना कार्यालयाची गरज आहे कार्यालयाला लोकांची गरज नाही अशी परिस्थिती आहे.>>> २०० टक्के खरं आहे... :)
27 May 2013 - 10:03 am | सौंदाळा
छान (मार्मिक) कविता
लग्न, पुजा आदि समारंभातले किस्से पण तुमच्याकडुन स्वतंत्र लेखात वाचायला आवडतील.
उदा. आम्ही एकदा लघुरुद्र करत असताना गुरुजींनी न्यास करायला सांगितले. (माझ्याकडे बघुन मी करतो तसे सर्व पुरुषांनी करा) त्यात अंगाभोवती चुटक्या वाजवुन नंतर टाळी वाजवुन प्राणायाम करायचा होता. गुरुजींकडे बघत बघत हे करताना मध्येच घामेघुम झालेल्या गुरुजींनी कमरेवर खाजवले आणि अजाणतेपणी एका माणसाने देखील त्याची पुनराव्रुत्ती केली आणि काही क्षणातच आपण काय केले हे समजल्यावर तो खजील झाला.
तुमच्याकडे भरपुर स्टॉक असेल अश्या विवीध किश्श्यांचा तो येउ द्या.
27 May 2013 - 10:10 am | अत्रुप्त आत्मा
@करताना मध्येच घामेघुम झालेल्या गुरुजींनी कमरेवर खाजवले आणि अजाणतेपणी एका माणसाने देखील त्याची पुनराव्रुत्ती केली >>> =)) नशीब..............! =))
27 May 2013 - 6:37 pm | प्रभाकर पेठकर
हे, 'नशीब गुरुजींनी कमरेवर खाजवले' असे वाचावे काय?
27 May 2013 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा
आपली इच्छा.......! ;)