ज्याचा त्याचा चंद्र.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
10 Jul 2008 - 9:28 pm

याच महिन्यात माणसानी चंद्रावर पहिले टाकून एकूणचाळीस वर्षं पूर्ण होतील. या निमीत्तानी चंद्राविषयी माहिती गोळा करताना काही संवाद ऐकले. काही स्वगतं ऐकली. वाचून बघा. आणखी वाढवा.थोडसं हलकं फुलकं लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------काय म्हणतेस आज्जी.
काहीनाही . हे शरद उपाध्यांचं ऐकतेय बाई.
आज्जी तुझी रास कर्क ना गं ?
होय गं बाई
....आणि बाबांची पण कर्कच ना?
आज्ज्जी चंद्रावर माणूस गेला तेव्हा तू काय करत होतीस गं?
तुझ्या बापाचे कुले धूत होती..
क्कयतरी विचारत असतेस.
मला एक सांग ..गेलाय कुठे तुझा बापूस ?
का? बसलेत बाहेरच.
अगं त्याची रास पण चंद्राची ,माझी पण तीच.
तो नील आर्मस्टांग चंद्रावरून बोलला ते जगाला ऐकू गेलं आणि काल पासून याला हाक मारतेय ती बाहेरच्या खोलीत ऐकू जाईना?
लग्नानंतर चंद्र बदलतात का काय की . ह्या उपाध्यालाच विचारते एक दिवस.
------------------------------------------------------------------------------------------------आपण भौतीक शास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी. हो ना?
हो. साडेसत्ताविस दिवसात चंद्र एक प्रदक्षीणा पूर्ण करतो होय ना?
होय. त्याचा तुमच्या बायकोशी काय संबंध आहे ते आपल्याला माहिती आहे ना?
वैज्ञानीक सत्य नाही पण अंदाज आहे.
आपला तो वैज्ञानीक सेफ पिरियडचा अंदाज कसा चुकला मग?
आता मी एक विचारू .
विचारा.
आपण आय्.टी. मध्ये प्राविण्य मिळवलं आहे ना?
हायर काँप्युटींग मध्ये आपण हुशार आहात.
आहेच.
मग तो वैज्ञानीक अंदाज आपण आपल्या बोटाच्या पेरावर जो हिशोब करता त्यामुळे चुकला आहे.
चंद्राला दोष देण्यात काय अर्थ आहे?
फक्त आपल्या दोघांच्या शास्त्राला हे कळ्त नाहीय्ये की सकाळी पोटात हलकल्लोळ करणारा कोण?
ल़क्ष्मी की चंद्र?
=============================================================
प्रिय बाबा, मि तूमची इ मेल वाचली.
चंद्रावर माणूस गेल्याची इन्फो तुमी छन लिहीली आहे.
मि माझ्या प्रो़जेक्ट मधे युज करील.
बट डॅड आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज. अँड दॅट टू ऍट अर्लीएस्ट.
मम्मा सेज लिहीणं वगैरे इज ऑल बुलशीट इफ यु कांट अफोर्ड इट.
डॅडा. प्लीज मेक योर रायटींग दॅट वर्थ.
आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज

------------------------------------------------------------------------------------------------

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

10 Jul 2008 - 10:48 pm | ऋषिकेश

मस्त! आवडलं!! टि.पी आहे ;)

तुझ्या बापाचे कुले धूत होती..
=))

आमची भर:
ढाले पाटील उवाच
"पुढील ४० वर्षांनंतर अखिल "भारतीय" साहित्य संमेलन चंद्रावर भरवू अशी मला खात्री आहे."

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा's picture

11 Jul 2008 - 12:07 am | वरदा

मस्तच

तो नील आर्मस्टांग चंद्रावरून बोलला ते जगाला ऐकू गेलं आणि काल पासून याला हाक मारतेय ती बाहेरच्या खोलीत ऐकू जाईना?
लग्नानंतर चंद्र बदलतात का काय की . ह्या उपाध्यालाच विचारते एक दिवस.

हा हा हा हा....सह्हीच
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बेसनलाडू's picture

11 Jul 2008 - 12:10 am | बेसनलाडू

(खुसखुशीत)बेसनलाडू

धनंजय's picture

11 Jul 2008 - 12:19 am | धनंजय

मजा आली.

सर्किट's picture

11 Jul 2008 - 12:26 am | सर्किट (not verified)

हेच म्हणतो.

पण "रामदास" कडून जी अपेक्षा होती, त्याची पूर्ती झाली नाही, असे वाटते.

- (परखड) सर्किट

प्राजु's picture

11 Jul 2008 - 12:14 am | प्राजु

सह्हीच...
एकदम फुल्ल टू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

11 Jul 2008 - 12:18 am | चतुरंग

(स्वगत - रामदासांचा राशीस्वामी चंद्र दिसतो, कारण लिखाणाचे विषय एवढे पटापट बदलताहेत की चंद्राची चंचलता दिसून येते! :? )

चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 12:26 am | विसोबा खेचर

सहमत आहे..! :)

आपला,
तात्या आर्मस्ट्राँम.

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 3:42 am | केशवसुमार

तात्या भुजबळ :O
(नी(ल)ळा पडलेला )केशवसुमार..
स्वगतः हा रामदास कोण आहे ? हा कविता करतो का?

सर्किट's picture

11 Jul 2008 - 3:55 am | सर्किट (not verified)

स्वगतः हा रामदास कोण आहे ? हा कविता करतो का?

केसु, कच्चा माल शोधतो आहेस का ?

हे घे: http://www.misalpav.com/node/2364

- (मदतशील) सर्किट

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 4:13 am | केशवसुमार

मेल्या "केश्या"च्या
मनात
पाप विडंबाचं
कपटी.
कोवळी कविता
बेचिराख.
पहिल्या प्रकाशनात.

सर्किट's picture

11 Jul 2008 - 4:24 am | सर्किट (not verified)

वाटलंच होतं.

पण पूर्ण १८ मिनिटे घेतलीत शेठ !

- (कालमापक) सर्किट

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 4:55 am | केशवसुमार

'सर्किट' पहाटे
अचानक तडमडला
घड्याळ लाऊनगेला.
"केश्या"मेल्या वर
भार .
प्रतिसादाचा.
कोवळ्या सोवळ्या
'रामदासा'च्या कवितेला,
उभंलावणं
भरभर उगाचच.

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 4:30 am | केशवसुमार

शिवण तोंडावर
उसवली जरा
बघून बाय म्हणते.
छोटी झाली हाय माझी.
आता जाता बाजारात
ऐतवारच्या
घालू कशी नि काय.

सर्किट's picture

11 Jul 2008 - 4:46 am | सर्किट (not verified)

ये हुई ना बात ?

लेटन्सी वाढली असली, तरी थ्रुपुट तितकंच आहे अजून.

जियो !

- (आस्वादक) सर्किट

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 4:50 am | केशवसुमार

लेटन्सी वाढली असली, तरी थ्रुपुट तितकंच आहे अजून
खो खो खो खो :)) =))
(पडलेला)केशवसुमार

रामदास's picture

11 Jul 2008 - 6:13 am | रामदास

आपला स्पीड बघून चकीत झालो.
आता आपण दोघही समांतर कविता लिहू या.
कविता आणि विडंबन एकाच वेळी प्रकाशीत करू या.
मजा यील.

सर्किट's picture

11 Jul 2008 - 8:24 am | सर्किट (not verified)

रामदास,

आपण आमच्या केसुला च्यालेंज देऊ नका. त्याचा मूड असला तर तो तुमच्या कवितेच्या आधीही तिचे विडंबन टाकू शकतो.

पण सीरियसली, तो स्वतःच्या कविता (जरी वेगळ्या नावाने टाकत असला तरी) आणि त्यांची विडंबने आजवर एकाच वेळी टाकत आला अहे.

त्यामुळे नवीन काहीतरी च्यालेंज द्या. (जसा: मी एक कविता टाकतो, २४ तासाच्या आत त्याची दहा विडंबने आली नाहीत, तर तुझ्याच डोक्याची शंभर शकले.. वगैरे..)

- (केसुचा मेजर फ्यान) सर्किट

मदनबाण's picture

11 Jul 2008 - 3:52 am | मदनबाण

एकदम मजेदार.....

(नक्की चंद्रावर मानवाचे पाऊल पडले का ?) या विचारात अडकलेला..
मदनबाण.....

नंदन's picture

11 Jul 2008 - 4:13 am | नंदन

नर्मविनोदी लिहिले आहे. शीर्षकावरून ह्या हायकूची याद आली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

झकासराव's picture

11 Jul 2008 - 11:14 am | झकासराव
बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2008 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते

साहेब, मस्त लिहिले आहे. आजीबाई आवडल्या.

बिपिन.