ज्याचा त्याचा चंद्र.
लेखनप्रकार
याच महिन्यात माणसानी चंद्रावर पहिले टाकून एकूणचाळीस वर्षं पूर्ण होतील. या निमीत्तानी चंद्राविषयी माहिती गोळा करताना काही संवाद ऐकले. काही स्वगतं ऐकली. वाचून बघा. आणखी वाढवा.थोडसं हलकं फुलकं लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------काय म्हणतेस आज्जी.
काहीनाही . हे शरद उपाध्यांचं ऐकतेय बाई.
आज्जी तुझी रास कर्क ना गं ?
होय गं बाई
....आणि बाबांची पण कर्कच ना?
आज्ज्जी चंद्रावर माणूस गेला तेव्हा तू काय करत होतीस गं?
तुझ्या बापाचे कुले धूत होती..
क्कयतरी विचारत असतेस.
मला एक सांग ..गेलाय कुठे तुझा बापूस ?
का? बसलेत बाहेरच.
अगं त्याची रास पण चंद्राची ,माझी पण तीच.
तो नील आर्मस्टांग चंद्रावरून बोलला ते जगाला ऐकू गेलं आणि काल पासून याला हाक मारतेय ती बाहेरच्या खोलीत ऐकू जाईना?
लग्नानंतर चंद्र बदलतात का काय की . ह्या उपाध्यालाच विचारते एक दिवस.
------------------------------------------------------------------------------------------------आपण भौतीक शास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी. हो ना?
हो. साडेसत्ताविस दिवसात चंद्र एक प्रदक्षीणा पूर्ण करतो होय ना?
होय. त्याचा तुमच्या बायकोशी काय संबंध आहे ते आपल्याला माहिती आहे ना?
वैज्ञानीक सत्य नाही पण अंदाज आहे.
आपला तो वैज्ञानीक सेफ पिरियडचा अंदाज कसा चुकला मग?
आता मी एक विचारू .
विचारा.
आपण आय्.टी. मध्ये प्राविण्य मिळवलं आहे ना?
हायर काँप्युटींग मध्ये आपण हुशार आहात.
आहेच.
मग तो वैज्ञानीक अंदाज आपण आपल्या बोटाच्या पेरावर जो हिशोब करता त्यामुळे चुकला आहे.
चंद्राला दोष देण्यात काय अर्थ आहे?
फक्त आपल्या दोघांच्या शास्त्राला हे कळ्त नाहीय्ये की सकाळी पोटात हलकल्लोळ करणारा कोण?
ल़क्ष्मी की चंद्र?
=============================================================
प्रिय बाबा, मि तूमची इ मेल वाचली.
चंद्रावर माणूस गेल्याची इन्फो तुमी छन लिहीली आहे.
मि माझ्या प्रो़जेक्ट मधे युज करील.
बट डॅड आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज. अँड दॅट टू ऍट अर्लीएस्ट.
मम्मा सेज लिहीणं वगैरे इज ऑल बुलशीट इफ यु कांट अफोर्ड इट.
डॅडा. प्लीज मेक योर रायटींग दॅट वर्थ.
आय मस्ट हॅव रोलेक्स ऑयस्टर मून फेज
------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
9559
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
:)
हा हा
नर्मविनोदी किस्से/संवाद
In reply to नर्मविनोदी किस्से/संवाद by बेसनलाडू
+१
In reply to +१ by धनंजय
+१, पण
हाहाहा..
मस्त चटपटीत!
In reply to मस्त चटपटीत! by चतुरंग
:)
In reply to :) by विसोबा खेचर
म्हणजे
In reply to म्हणजे by केशवसुमार
कच्चा माल ?
In reply to कच्चा माल ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे खरच की..
In reply to अरे खरच की.. by केशवसुमार
तुम नही सुधरोगे :-)
In reply to तुम नही सुधरोगे :-) by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे खरच की..
In reply to कच्चा माल ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे खरच की..
In reply to अरे खरच की.. by केशवसुमार
:-) :-)
In reply to :-) :-) by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा!!!
In reply to अरे खरच की.. by केशवसुमार
केशवसुमार,
In reply to केशवसुमार, by रामदास
च्यालेंज ?
मजेदार..
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मजेदार आहे
छानच...