आरक्षण

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
15 Feb 2013 - 10:15 pm

अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत;
असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं,

जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण
नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण
गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण
टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण
दुचाकीधारकांना कार रेस मधे
आरक्षण
सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण....

...यादी खूप मोठी आहे.

समाजविचार

प्रतिक्रिया

अच्छा, तरीच सध्या राजकारणात नालायकांचा एवढा सुळसुळाट झालेला दिसतोय. आरक्षण परिणाम होय?? :)

विकास's picture

15 Feb 2013 - 10:22 pm | विकास

popcorn

एक लाह्यांचा डबा आणि एक गलास तुमच्याशेजारी लावून बसतो मी पण!

प्यारे१'s picture

17 Feb 2013 - 6:07 pm | प्यारे१

लाह्या नै कै.... पॉपकॉर्न म्हणायचं.

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 10:24 pm | अभ्या..

नवीन सभासदांना मिपाच्या बोर्डावर आरक्षण..... मिळालेच पाहिजे :)

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 10:24 pm | बॅटमॅन

हम्म..

तुमचे सदस्यनाम बाकी यथार्थ बघा एकदम.

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 10:30 pm | अभ्या..

समजले नाही बॅट्या :(
वेल्ला म्हणजे अमेरिकन इंग्लिशमध्ये ब्युटीफुल किंवा इसाबेल चा शॉर्टफॉर्म.
मग भट कसे?

हा का? विंग्रजी अर्थ ठौक नाय बे, आपण हिंदी अर्थाने घेतला :)

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 11:47 pm | वेल्लाभट

@ प्रथमः होय हो.
@ अभ्या: राईट !
@ बॅटमॅन/अभ्या: हिंदी (किंबहुना पंजाबी) अर्थ अभिप्रेत आहे. वेल्ला:- रिकामटेकडा.

अविनाशकुलकर्णी's picture

16 Feb 2013 - 11:43 pm | अविनाशकुलकर्णी

मिपा मध्ये आमच्या धाग्यांना आरक्षण मिळेल का?

मिपा मध्ये आमच्या धाग्यांना आरक्षण मिळेल का? >>>>

=)) =)) =))

फुटलो च्यामायला !

बाकी जिलबीभट , सध्या , बहुधा, आखिल मिपा जिलबीवाटप केंद्राचे अध्यक्ष श्री स्पा, परदेशात टुर वर असावेत, नाहीतर आतापर्यंत तुम्हाला मिळाल्या असत्या,
शुभेच्छा

पूर्वीचे वैभवशाली दिवस आठवून अंमळ गहीवर येतो. फक्त बुद्धीमान लोकांनाच शिक्षणाचा हक्क ठेवल्याने सुयोग्य लोकांचा वावर सुयोग्य ठिकाणी झाला. त्या काळी अणूविज्ञान परमोच्च स्थानी पोहोचले असून, भारताचे अवकाशयान एक अब्ज लाख खर्व प्रकाशवर्ष दूरच्या ठिकाणी जात असे. त्या काळचे काही टॅब्लेट पीसी नुकतेच सापडले असून त्यावरूनच आयपॉडचा अविष्कार झाल्याचे मानले जात आहे. आधुनिक काळात न्यूटनने सांगितलेले तीन नियम हे नूतनशास्त्रींच्या ग्रंथातून घेतल्याचे बोलले जाते. या ग्रंथांचीअनेक पाने गहाळ झाली असून त्यात हजारो नियम असण्याची शक्यता आहे. न्यूटन ला केवळ तीनच नियम सापडले असावेत. पा-याच्या विमानांचे एक वेळापत्रक केळशीच्या टेकडीखाली सापडले असून संपूर्ण भारतभर त्यांची सेवा होती असे मानले जाते. अत्याधुनिक कार्सचा त्या काळच्या प्रगत तंत्रज्ञानानुसार सुळसुळाट असून एसी ऐवजी कारला मातीचा मुलामा दिल्याचे मृच्छकटीक या ग्रंथातल्या आरेखनावरून सिद्ध झालेले आहे. युद्धशास्त्रामधे क्षेपणास्त्रे आणि रणगाडे यांचा विकास हआरो वर्षांपूर्वीच झालेला होता. अशा प्रकारे सर्वत्र विद्वत्ता आणि विद्वान यांचा संचार जाहला असताही मुघल आणि इंग्रज यांनी आपले राज्य प्रस्थापित करून वाटोळे केले आणि त्यांच्या कमअस्सल विद्येमुळे देशाची अधोगती झाली.

- दु:खी खट

खटासि खट's picture

17 Feb 2013 - 11:22 am | खटासि खट

ओ खट राव
विषय काय, तुम्ही लिहीता काय.. कशाचा कशाला संबंध !! आं ?? (खव पहा)

खटासि खट

अमोल खरे's picture

17 Feb 2013 - 11:00 am | अमोल खरे

धाग्याचे नाव वाचुन मोठ्या अपेक्षेने आलो होतो. आमचा हिरमोड केल्यामुळे वेल्लाभट ह्यांचा त्रिवार निषेध.