ती खोली

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
29 Jan 2013 - 12:39 pm

माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली
बंदच असते आजकाल
खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून
-------
त्या खोलीत एक टोपली आहे
जुन्या खेळण्यांनी भरलेली
डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात
काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत
मी जिंकून आणलेल्या
फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता
आरपार रंगीत जग दिसायचे
तसे दिसत नाही आताशा
-------
बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर
धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे
खर तर एक पंख तुटलाय त्याचा
पण जरा जोरात धक्का दिला तर
खुरडत खुरडत चालते कधी कधी
-------
एक माकडही आहे
चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे
आताही चावी दिल्यावर
हातातल्या इटुकल्या काड्या
वरखाली करते
पण आता काड्यांखालचा
तो ढोल तेवढा निखळून पडलाय
-------
खरंच
खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून
------
त्या टोपलीत
कायम हसणारा एक बाहुला होता
गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा
आडवं केलं की
शहाण्या बाळासारखा झोपणारा
आणि बसवलं की
निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा
कुठे गेला कुणास ठाऊक....
बरेच दिवस शोधतोय
-------
खरंच
खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून

।- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/०१/२०१३)

करुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

29 Jan 2013 - 1:36 pm | संजय क्षीरसागर

कमाल केली आहेस.

स्पा's picture

29 Jan 2013 - 1:39 pm | स्पा

चायला .......

धमाल मुलगा's picture

29 Jan 2013 - 2:25 pm | धमाल मुलगा

झक मारली अन् कविता वाचली!

खाली गवि म्हणतात त्याबाबत १०१% सहमत.

सुरेख, आठवणींना लाभलेली 'खोली' आवडली :)

आई ग्ग... मिका.. तू कविता लिहू नको बाबा.

कविता लिहायला घेतलीस की चरचरवणारं, आतून हलवणारं काहीतरी लिहीतोस.

तुझ्या कवितांची ती अशक्य हुरहूर नकोच.. तू किरकोळ "सेफ" टाईप लिखाण करत जा बाबा..

साधं ललित, चित्रपट परीक्षण, पाककृती, विनोदी, प्रेमकथा असे आणि कितीक प्रकार पडलेत.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2013 - 3:38 pm | प्रसाद गोडबोले

+१

चाणक्य's picture

29 Jan 2013 - 3:43 pm | चाणक्य

+१

अक्षया's picture

29 Jan 2013 - 2:15 pm | अक्षया

+ १

यशोधरा's picture

29 Jan 2013 - 2:20 pm | यशोधरा

मस्त.

अज्ञातकुल's picture

29 Jan 2013 - 2:37 pm | अज्ञातकुल

:-) मनापासून आवडली.

उपटसुंभ's picture

29 Jan 2013 - 3:05 pm | उपटसुंभ

वा..!

सस्नेह's picture

29 Jan 2013 - 3:24 pm | सस्नेह

'रम्य' बालपणाच्या आठवणीत रमण्याच्या कल्पनेला सुरुंग लावलात..

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2013 - 3:39 pm | प्रसाद गोडबोले

मनातली खूप खोलवरची तार छेडलीत मिकाराव !

अप्रतिम कविता !!

५० फक्त's picture

29 Jan 2013 - 3:51 pm | ५० फक्त

हल्ली मलाच नव्हे तर सग़ळ्यांनाच बालपण फार आठवायला लागलंय,

तर्री's picture

29 Jan 2013 - 4:12 pm | तर्री

त्या टोपलीत
कायम हसणारा एक बाहुला होता
गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा
आडवं केलं की
शहाण्या बाळासारखा झोपणारा
आणि बसवलं की
निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा
कुठे गेला कुणास ठाऊक....
बरेच दिवस शोधतोय

अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.

अग्निकोल्हा's picture

29 Jan 2013 - 11:05 pm | अग्निकोल्हा

अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.

अगदी शब्दशः तिव्र सहमत.. किती सहज वाक्ये... अन्...

सखी's picture

1 Feb 2013 - 10:58 pm | सखी

कविता खुपच आवडली. गवि आणि इतर काही़जणांशी असहमत होऊन लिहीत रहा असे म्हणावेसे वाटते.

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:12 pm | पैसा

पूर्ण सहमत.

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 5:11 pm | शैलेन्द्र

खरच होती रे अशी एक खोली.. खरच होती :(

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2013 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर

खूपच अर्थगर्भ कविता. विचार केला की जाणवतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी 'खोली' असते. त्यात कमीजास्त खेळणी असतात आणि त्या खेळण्यांना बिलगलेल्या अस्वस्थ आठवणी.

आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2013 - 6:26 pm | सानिकास्वप्निल

सहमत

तिमा's picture

29 Jan 2013 - 7:57 pm | तिमा

काय अवस्था करता मिकाराव तुम्ही आमची! भरुन आलं वाचताना!

jaypal's picture

29 Jan 2013 - 9:28 pm | jaypal

मुजरा स्विकराव.

प्रत्येकाचे एक खोली आणि आपापली खेळणी असतात.
तशीच माझी पण आहे.
आधुन मधुन धुळ झटकतो.
मनसोक्त खेळतो आणि परत ठेवतो.
पुन्हा धुळ बसण्यासाठी...

कविता खुप आवडली माझ्या ईतर मित्रांबरोबर शेअर करण्या साठी परवानगी हवी आहे. फक्त आपले नाव व्यनी करा म्हणजे सोपे होईल.
cc

क्रान्ति's picture

29 Jan 2013 - 9:45 pm | क्रान्ति

मनात पार खोलवर उतरली कविता.

गेला ओसरुनी प्रकाश सगळा, हो म्लान ताजेपणा
आता शोधुनही न भेटति पुन्हा त्या शैशवीच्या खुणा

या शांताबाईंच्या ओळी आठवल्या.

किसन शिंदे's picture

29 Jan 2013 - 11:26 pm | किसन शिंदे

वाह!!

_/\_

मिका, काय लिहिता राव तूम्ही....स्पीचलेस!!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2013 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

और क्या बोलेगा? +1 टू किसन द्येव

सुहास झेले's picture

5 Feb 2013 - 3:41 pm | सुहास झेले

अतृप्त आत्मा ;-)

धन्या's picture

29 Jan 2013 - 11:31 pm | धन्या

शेवट मनाला भिडणारा. प्रत्येकाला अशी जाणिव कधी ना कधी होतेच.

कवितानागेश's picture

30 Jan 2013 - 12:34 am | कवितानागेश

:(

आनन्दिता's picture

30 Jan 2013 - 1:27 am | आनन्दिता

अतिशय सुंदर!!

इन्दुसुता's picture

30 Jan 2013 - 8:13 am | इन्दुसुता

आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.

पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते.
कविता आतवर हलवून गेली.

मदनबाण's picture

30 Jan 2013 - 9:54 am | मदनबाण

वा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jan 2013 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

मि.का. ची कविता म्हटल्यावर उघडुन वाचायचे टाळत होतो. पण आज शेवटी रहावलच नाही आणि जे अपेक्षीत होते तेच झाले. नकोरे असले काहीतरी लिहूस, ओरखाडे काढणार.
पैजारबुवा,

फिझा's picture

30 Jan 2013 - 11:07 am | फिझा

़कAAA y बोलवे .....नकोच्,,,काहि

मिका तुमच्या खोलीतली खेळणी आवडली .

दत्ता काळे's picture

1 Feb 2013 - 7:01 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

मराठे's picture

1 Feb 2013 - 11:07 pm | मराठे

वा:

चित्रगुप्त's picture

2 Feb 2013 - 12:20 am | चित्रगुप्त

आत्ता ही कविता वाचताना समोरच "कायम हसणारा, गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा बाहुला" खेळतोय, आणि उद्या त्याला सोडून दूरच्या मायदेशी जायचंय....
रडवलंत मिका.
ahn

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2013 - 10:03 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्षमस्व! :(

स्पंदना's picture

2 Feb 2013 - 8:24 am | स्पंदना

लिहीते रहा मिका.

नक्शत्त्रा's picture

4 Feb 2013 - 10:20 am | नक्शत्त्रा

किवता मनापासून आवडली.बालपण जगवणारी आिण जागवणारी ...

नगरीनिरंजन's picture

4 Feb 2013 - 10:52 am | नगरीनिरंजन

क्लास!
रिग्रेशन मस्त टिपलंय!

सुहास..'s picture

4 Feb 2013 - 1:03 pm | सुहास..

लईच सेन्टी मारलाय रे :)

बर्याच दिवसानी येथे आलो..
कविता वाचली .. तुझ्या शब्दांमार्फत कधी तुझ्या कवितेतुन मी माझ्या गावात .. माझ्या जुन्या घरात गेलो कळलेच नाही ... निरागस आठवणीनी सुद्धा आजकाल खुप जखमा होतात ..

दादा कोंडके's picture

5 Feb 2013 - 3:56 pm | दादा कोंडके

मस्त कविता!

चाणक्य's picture

5 Feb 2013 - 8:43 pm | चाणक्य

मिका, निव्वळ अप्रतिम...थेट काळजाला हात घालतोस तु

आगाऊ म्हादया......'s picture

1 Apr 2013 - 3:43 pm | आगाऊ म्हादया......

आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या खेळण्यांची आठवण आली ...आहेत अजून माझ्याकडे ...जपून ठेवलेली....
खेळेन म्हणतो परत...बालपण सापडेल कदाचित...धूळ असेल तर पुसेन त्यावरची...
खूप मस्त..

प्रीत-मोहर's picture

30 Apr 2013 - 7:06 pm | प्रीत-मोहर

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2013 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा. कविता आवडली.
शेवटच्या ओळी क्या कहने.

-दिलीप बिरुटे

अनिदेश's picture

3 May 2013 - 1:32 pm | अनिदेश

व्वा....!!!

दिपक वायळ's picture

5 May 2013 - 2:24 pm | दिपक वायळ

बालपणाची आठ्वण झाली
खूप छान

मृगनयना's picture

5 May 2013 - 3:37 pm | मृगनयना

सुंदर कविता . . .

पुन्हा वाचली.. पुन्हा एकदा हॅट्स ऑफ मिका.. त्रासदायक आहे हे..

प्राची अश्विनी's picture

15 Jan 2016 - 7:37 am | प्राची अश्विनी

फारच सुंदर!

एक एकटा एकटाच's picture

15 Jan 2016 - 10:58 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त