सफर क्राकोची - ३

nishant's picture
nishant in भटकंती
14 Jan 2013 - 3:08 am

सफर क्राकोची - १
सफर क्राकोची - २

थंडीचे दिवस असल्याने दुपारीच कधीतरी सुर्यास्त झाला होता; त्यामुळे पुन्हा क्राकोच्या main square मधे पोचेपर्यंत ख्रिसमस मार्केट आणि माक्रेट हॉल, दिव्याच्या प्रकाशात झगमगत होता. त्यात वरुन पडणारा कापसा सारखा पांढरा शुभ्र बर्फ, कडाक्याची थंडी आणि कडाडुन लागलेल्या भुकेमुळे अजिबात वेळ न घालवता सरळ हॉट वाईनचा स्टॉल गाठला. गरमा गरम वाईन आणि त्या सोबत रोस्टेड पोटॅटो, मश्रुम, कबाब हादडायला सुरवात केली. सुट्टीचा सिझन असल्याने सर्वत्र आमच्या सारख्या प्रवाशांची वर्दळ चालुच होती. त्यात स्टॉल्स मध्ये विकायला ठेवलेल्या पोलंडच्या काही खास अशा handmade crockerys, पॉलिश टॉफिज, सॉसेजेस हे सगळेच आकर्षित करत होते. सँटाक्लॉज बरोबर फोटो काढायला तर लहानांन पासुन मोठ्यां पर्यंत सगळ्यांचीच गर्दी, त्यात गंमत म्हणजे हा सँटा गिफ्ट देण्या ऐवजी प्रत्येका कडुन फोटोचे पैसे उकळत होता!! बाकी मार्केट मधे कुठे कोण बेधुंद पणे नाचत होते, गात होते तर कुठे वाईन आणि एकुनच दारुचा overdose झाल्याने नुसतेच झिंगत होते; पण ह्याचा कुणाला कसला त्रास असा जाणवत नव्हता. उलट हे सगळे अनुभवण्यात गंमत वाटत होती आणि त्यामुळे Aushwitz बघताना आलेला उदासपणा केव्हा गायब झाला हे समजले देखिल नाही.

m1
* Main market hall

kfh
* Clock टॉवर

m3
* रोस्टेड पोटॅटो, मश्रुम आणि हॉट वाईन

sd
* पॉलिश चिज

df
* पॉलिश handmade crockery

dfg
* हॉट वाईन स्टॉल

kjh
* Main square

ksjdfg
* हॉस्टेलकडे जाणारा रस्ता

रात्री उशिरा पर्यंत आम्ही मार्केट मधेच फिरत होतो. त्यातला main market hall हा शेकडो वर्षांपासुन क्राकोमधल्या लोकांसाठी खरेदीची मुख्य जागा होती, पण आता मात्र आत मधे टुरिस्टसाठिच सगळ्या वस्तु विकायला ठेवल्याचे दिसले. तसे आम्ही नेहमी प्रमाणे सफरीची आठवण म्हणुन काही वस्तु पटापट खरेदी करुन होस्टेल वर निघालो. दिवसभर झालेल्या भटकंतीमुळे झोप कधी लागली हे समजले देखिल नाही.

दिवस तिसरा:

सकाळी उशिराच डोळे उघडले. आवराआवर होई पर्यंत सकाळचे ११ वाजुन गेले होते. आजचा दिवस ख्रिसमसचा असल्याने बहुतेक सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात फिरताना आद्ल्या दिवशी सारखी वर्द्ळ दिसली नाही, तर त्या उलट एक शांत क्राको अनुभवता आले. आमचा आजचा कार्यक्रम क्राकोचे UNESCO world heritage चा दर्जा लाभलेले Salt mines बघायचा होता, परंतु आज ख्रिसमस असल्याने mines बंद आहेत असे हॉस्टेल मधेच समजले, त्यामुळे आम्ही सगळे थोडे हिरमुसलोच. तरी पुढच्या खेपेस या mines बघायला नक्की परतु, अशी मनाची समजुत काढुन जेवायला हॉटेलात शिरलो. जेवताना आम्ही खास पोलंडचि speciality असलेले egg soup मागवले होते. मी सोडुन कुणालाही आवडले नाही. मित्राने पोलंडमधे मिळणारी Hot beer मागवली, जी त्याच्या घशाखाली उतरता उतरत नव्ह्ती. बाकी जेवण बरे होते. त्या-त्या गावचे काहितरी खावे असे आम्ही फिरताना नेहमीच करतो. कधी तो प्रयोग सफल होतो आणि मृणालिनीबाई लगेच मिपावर त्याची पाकृ आपल्यासाठी सादर करतातच ;)

lkfh
* क्राको रेल्वे स्टेशन

fgkhl
* युरोपियन तिळाच्या फ्रेश ब्रेडचा स्टॉल

lkgh
* क्राकोमधे फेरफटका मारताना...

uir
* City tour car

po
* बग्गी

oi
* दुपारी ४ वाजता...

संध्याकाळी ५ पर्यंत आमचा फेरफटका पुर्ण झाला आणि क्राकोच्या आठवणींन सोबत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
असे हे UNESCO world heritage site असलेले क्राको शहर जरी छोटेसे आणि आडबाजुला असले तरी इथे येणार्‍या प्रत्येकाला मोहुन टाकते हे नक्कीच!!!

समाप्त

प्रतिक्रिया

सुरेख फोटोंनी सजलेली मालिका. या भागात आलेले फोटू मोहवून टाकणारे आहेत. पोलीश क्रोकरी गोड दिसत आहे.

प्रवासवर्णन आवड्ल्याब्द्द्ल आभारी :)

स्पंदना's picture

14 Jan 2013 - 5:32 am | स्पंदना

सुंदर फोटोज.
क्राको मध्ये फेरफटकात डाव्यावाजुला इमारतीच्या वर जी स्कल्पचर्स दिसताहेत त्याचा एखादा स्पष्ट फोटो असेल तर टाका ना.

फोटो आवड्ल्या ब्द्द्ल धन्यवाद ..
त्या स्कल्पचर्सचा मी समोरुन फोटो घेतलाच न्हव्ता, कदाचित तेव्हा तेथे असे काहि खास वाट्लेच नसावे.

दिपक.कुवेत's picture

14 Jan 2013 - 1:06 pm | दिपक.कुवेत

सगळे फोटो सुंदर...पण बहुतेक सगळे काळोखातले आहेत...पण तुमचा पण नाइलाझ दिसतोय कारण थंडिमुळे दिवस फार कमी असेल.

फोटो आवड्ल्या ब्द्द्ल धन्यवाद .. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2013 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो सुंदर आहेत, क्राको सुंदर आहे यावर पुन्हा एकदा विश्वास बसला. क्राको टूरीझमकडून थोडी रॉयल्टी मागून घ्या! ;-)

पहिला फोटो एच.डी.आर. करणं शक्य आहे का? आणखी सुंदर दिसेल. (एकच फोटो काढला असेल, पण रॉ-फॉरमॅटमधला असेल तर अजूनही एच.डी.आर. बनवता येईल.)

पोलिश व्होडका प्यायलीत का? पोलंडमधे एक खास व्होडका मिळते, झुब्रोव्का नावाची. त्या बाटलीत कोणत्यातरी गवताची काडी टाकलेली असते आणि तिचा विशेष स्वाद त्या व्होडकाला येतो. ही व्होडका अमेरिकेत आणायला बंदी होती (किंवा आहे). पण ही व्होडका चविष्ट असते खरी!
तुम्ही प्यायलेली गरम वारूणी मसालेदार होती का?

प्रतिसादाब्द्द्ल आभारी :)
आप्ल्या प्रतिसादांमुळे Europe मधल्या बाकि देशांचि माहिति देखिल लिहैला आवडेल.

*पहिला फोटो एच.डी.आर. करणं शक्य आहे का?
मला HDR Photography चि जास्त आवड नाहि, त्यामुळे तसे नाहि केले.

*पोलिश व्होडका प्यायलीत का?
मी फ्क्त wine पित अस्ल्यामुळे :) वोड्का try नाहि केला. पण एकुण्च Central-Eastern European म्द्य जब्रि असतात.. त्यत Hungary चे "Unicum" , पोलंड्चा Vodka, Czech Republic, Slovakia चा "Bechrova".. चेलेंजिग मान्ले जातात ;)

*तुम्ही प्यायलेली गरम वारूणी मसालेदार होती का?
होय.. मसालेदार आणी चविश्ट :)

पैसा's picture

16 Jan 2013 - 5:18 pm | पैसा

फोटो आणि वर्णन आवडले.

कवितानागेश's picture

16 Jan 2013 - 5:21 pm | कवितानागेश

मस्त. :)

अमोल केळकर's picture

16 Jan 2013 - 5:53 pm | अमोल केळकर

क्या बात है . मस्तच

अमोल केळकर
मला इथे भेटा

अनिल तापकीर's picture

16 Jan 2013 - 6:04 pm | अनिल तापकीर

अप्रतिम

अनन्न्या's picture

16 Jan 2013 - 6:46 pm | अनन्न्या

अप्रतिम!!

सानिकास्वप्निल's picture

16 Jan 2013 - 7:05 pm | सानिकास्वप्निल

क्राकोची सफर आवडली रे निशांत :)
फोटोबद्दल काय बोलणार ,ते तर नेहमीच सुरेख असतात
पोलिश क्रोकरी खास आवडली :)

क्रोकरीप्रेमी सानिका :)

रोहन अजय संसारे's picture

17 Jan 2013 - 9:58 am | रोहन अजय संसारे

सुंदर फोटो आले आहेत

अशोक सळ्वी's picture

21 Jan 2013 - 4:02 pm | अशोक सळ्वी

सफर छान चालू आहे. चालु राहू द्या. पूढ्चा देश कोणता?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2013 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट.............!

सर्व प्रतिसादांसाठि धन्यवाद.. पूढ्चि सफर लवकरच ;)