सफर क्राकोची - १

nishant's picture
nishant in भटकंती
3 Jan 2013 - 4:14 am

नमस्कार मंडळी,
मिपावरचा हा माझा पहिलाच लेख आहे. आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल. युरोपमधे माझी चालु असलेली भटकंती यावर आधारीत हा लेख आहे. मागील वर्षी आम्ही केलेल्या क्राकोच्या सफरीचे थोडक्यात वर्णन लिहित आहे.

दिवस पहिला :

ख्रिसमस आणि युरोपचे एक वेगळेच नाते आहे आणि ते अनुभवायचे असेल तर युरोपमधील कोणत्याही शहराला त्या दरम्यान भेट देणे हे आलेच!! तर अशीच मागील वर्षी ख्रिसमसच्या आठवड्यात मी, सपत्नीक व मित्रपरिवारा बरोबर Central Europe मधील Poland ह्या देशात, ७व्या शतकात वसलेल्या Krakow या अतीशय टुमदार शहराला भेट द्यायचे ठरवले.

k1
* Bratislava - Krakow रोड ट्रिप

Bratislava या Slovakia च्या राजधानी पासुन ७ तास कारने प्रवास करुन Krakow ला पोहोचलो. होस्टेलचे बुकिंग आधीच केले असल्यामुळे गाडी थेट होस्टेल जवळच उभी केली. बाहेर तापमान साधारण -७ degree celcius एवढे होते. नजर जाईल तिथ पर्यंत बर्फ पसरला होता आणि वरुन पावसाची रिपरिप चालुच होती. एकदाचे होस्टेलमधे चेक-इन केले, सामान खोलित ठेवले आणि मग क्राकोच्या मेन सेंटर मध्येच फेरफटका मारायचे ठरले.
पाषाणयुगापासुन अस्तिवात असलेले आणि ७व्या शतकात वसलेले हे युरोप मधील एक ऐतिहासिक शहर आहे. त्यात आपल्या शहरांचे जुनेपण टिकवुन ठेवणे यात युरोपियन लोकांचा खासच हातखंडा आहे., त्यामुळे शहरात फिरताना आपण भुतकाळात कधी पोचलो हे समजतच नाही. आमचे होस्टेल, क्राकोच्या "Ryneck glowny" (रायनेक ग्लाउनी) अर्थात मेन मार्केट स्क्वेएर पासुन जवळच असल्याने, बाहेर पडताच आम्ही थेट स्क्वेएर मधे पोचलो.

k2
* मेन स्क्वेएर - डाव्या बाजुला सेंट मेरीज कॅथिड्रल आणि त्या समोरील ख्रिसमस मार्केट

क्राकोचा हा स्क्वेएर १५व्या शतका पर्यंत युरोप मधला सर्वात मोठा स्क्वेएर मानला जायचा. या एकाच स्क्वेएरमधे एकिकडे सेंट मेरीज चर्च, मधे टाउन हॉल आणि बाजुला सर्वत्र ख्रिसमस मार्केट थाटले गेले होते. त्याच्या मधोमध होता लाईट्स आणि ग्लिटरने सजवलेला उंच ख्रिसमस ट्री.
St.Merry's Basilca अर्थात सेंट मेरीज चर्च हे लाल दगडात बनवलेले १४व्या शतकातील चर्च आहे. युरोपमधील इतर cathedral's इतके भव्य नसले तरी ह्या चर्चचे ऐतिहासीक महत्व आहे आणि एक गंमत अशी की, ह्या चर्चच्या मनोर्यावरुन दर तासाला trumpet वाजवले जाते. परंतु त्याचे सुर पुर्ण केले जात नाहीत (थोडक्यात एखाद्या टेप वर चालु असणारे गाणे मधेच बंद केल्या सारखे). ह्याचे कारण असे की कोणे एकेकाळी क्राकोवर शत्रुने चाल केली होती आणि ते सैन्य ह्या चर्च वरच्या trumpet वादकाने बघितले आणि लोकांना सावध करण्यासाठी ह्या पठ्ठ्या जोरजोरात trumpet वाजवु लागला. त्याचे सुर ऐकुन क्राकोवासी आणि त्यांचे सैनिक सतर्क झाले व त्यांनी शहराचे रक्षण केले. पण ह्या सगळ्या भानगडीत शत्रुने मात्र ह्या trumpet वादकाचा तीराने खात्मा केला. त्यामुळे त्याच्या प्रित्यर्थ अशी हि trumpet वादनाची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.
चर्च आतुन साधारणच होते. चर्चच्या आत फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे, कॅमेरा म्यान करुन ठेवला होता. चर्च मधुन निघुन मग पुढे पेटपुजे साठी आम्हि भारतीय होटेल कडे वाटचाल केली. होटेल मधे ऐन भुकेच्या वेळी पोचल्याने बिर्याणी, पनीर, चिकन कढाई, रोटी ह्यावर यथेच्छ ताव मारुन आम्ही गाव भटकंतीला पुन्हा सुरवात केली.
आमच्या ग्रुपमधे २ बायका असल्याने आमची वारी थेट वळली ती shopping mall कडे. १४व्या शतकातुन थेट २१व्या शतकात प्रवेश झाल्या सारखे वाटले. मॉल मध्ये नेहमीची शॉपिंग झाली आणि आम्ही परत होस्टेल मध्ये पोचलो ते दुसर्‍या दिवशी लवकर उठुन भटकंतीला निघायचे या विचारानेच.

k3
* शॉपिंग मॉल मधे

दिवस दुसरा :

सकाळी ९ च्या सुमारास Wawal castle वर पोचलो. हा castle, wawal नावाच्या टेकडीवर बांधलेला असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. हा किल्ला जरी ११व्या शतकातला असला, तरी इथे अगदी ५०,००० वर्षापुर्वीपासुन वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत आणि ज्याचे जतन ह्या किल्ल्यात केलेले आहे. त्यातल्याच एका दंतकथे नुसार, ह्या टेकडीवरील रहिवाश्यांचे एक dragon संरक्षण करत असे. त्या dragonची आठवण म्हणुन, आता ह्या टेकडी खाली dragonची प्रतिकृती बनवली आहे.

k4
* Wawal castle

k5
* ड्रॅगन

किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य मोहक होते. समोर वाहणारी विस्तुला नदी, त्या पलीकडे न्यु क्राको शहर आणि सर्वत्र पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि बर्फ म्हणजे स्नो फाईट हि आलीच!! मग एकमेकांना बर्फाचे गोळे मारत, आमचा किल्ला बघुन झाला. आता आम्ही पुढे निघालो ते क्राकोचे main attraction असलेले - "Auschwitz-Birkenau" (आउश्वित्स-बर्कनाव) अर्थात दुसर्‍या महायुद्धातील Death camp.

k6
* किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य

k7
* स्नो फाईट

क्रमशः

सफर क्राकोची - २

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

3 Jan 2013 - 7:24 am | श्रीरंग_जोशी

सुंदर आहेत सर्व छायाचित्रे. वर्णनही आवडले. मिपावर स्वागत.

पु. भा. प्र.

अवांतर - नाझींच्या छळछावण्यांसाठी इतिहासाच्या काळ्या पानांत गेलेले हे ठिकाण एवढे सुंदर आहे हे पाहून सुखद धक्का बसला.

सर्व फोटु़ छान अजुन येउ द्यात :)

पैसा's picture

3 Jan 2013 - 10:49 am | पैसा

वर्णन, फोटो खूपच छान. एका अगदी कधी न ऐकलेल्या शहराची ओळख करून देत आहात. धन्यवाद!

ह भ प's picture

3 Jan 2013 - 10:49 am | ह भ प

सफर घडवल्याबद्दल धन्स..
या निमित्ताने केदारजी, इस्पीकचा एक्काजी यांनापण खुप खुप धन्स.

इस्पिक राजा's picture

3 Jan 2013 - 11:38 am | इस्पिक राजा

फोटो चांगले आहेत. पण क्राको बद्दल उत्सुकता नाही वाटली त्यामुळे. क्राको तसे छळछावण्यांमुळे माहिती होते. बाकी शहर म्हणुन फारसे नाही आवडले. म्हणजे फोटोत जे दिसले त्यावरुन फारसे नाही आवडले.

अमोल केळकर's picture

3 Jan 2013 - 11:53 am | अमोल केळकर

सफर आवडली :)

अमोल केळकर
मला इथे भेटा

मिपावर स्वागत!!! सुंदर धागा. क्राकोवबद्दल थोडंसं वाचलं होतं ते सिडने शेल्डनच्या ब्लडलाईन कादंबरीमध्ये. शहर तर फारच सुंदर दिसतंय! मजा आली वाचताना.

अनिल तापकीर's picture

3 Jan 2013 - 5:33 pm | अनिल तापकीर

खुप सुंदर

फोटो आणि माहिती दोन्ही छान !!!

>>'परंतु त्याचे सुर पुर्ण केले जात नाहीत.'
हे कळलं नाही.

वाक्यात दुरुस्ती केली आहे. :)

मेघनाद's picture

3 Jan 2013 - 6:45 pm | मेघनाद

छायाचित्र छानच.....नवीन शहराची माहिती मिळतेय.

वर्णन व सर्व फोटू मस्त आलेत. आमच्याकडे यावर्षीही फारसे बर्फ नसल्याने अजून बर्फातले खेळणे राहिले आहे. पहिला फोटू फार सुंदर आलाय. तसेच मॉलमधलाही रंगीबेरंगी आणि छान.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Jan 2013 - 9:54 pm | निनाद मुक्काम प...

पुढच्या लेखासाठी शुभेच्छा
युरोपियन युनियन च्या स्थापनेनंतर व रशियाचे विघटन झाल्यावर अनेक पूर्व युरोपच्या देशांनी मोकळा श्वास घेतला , आणि ह्यात झपाट्याने प्रगती करणारे
राष्ट्र म्हणून पोलंड अग्रस्थानी आहे , अनेक पोलिश माझे मित्र आहेत.
ह्या देशात भटकंती करायची आहे ,पाहूया कधी जमते ते.
तुमच्या सचित्र लेखातून चांगली माहिती मिळत आहे.
येऊ दे .अजून

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jan 2013 - 6:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पोलिश मित्राकडून क्राकोबद्दल बरीच माहिती ऐकलेली आहे. दुसर्‍या महायुद्धात आणि पुढे कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी पोलंडमधल्या सुंदर शहरांची पार लावली पण क्राकोचं सौंदर्य टिकून आहे असं म्हणतात. अनेक ठिकाणी पाहिलेल्या फोटोंमधून ते पटतंही. मुख्य चौक, कासल आणि कासलवरून दिसणार्‍या दृष्याचे फोटो फारच सुंदर आहेत. विशेषतः अमेरिकेतली ठोकळेबाज, आधुनिक, प्लास्टीकी शहरं बघितल्यानंतर युरोपातली गरीब शहरंही सुंदर वाटतात. (होय, मी पाश्चात्य जगात बर्‍याच देशात फिरल्याची ही अ-क्षीण जाहिरात आहे.) क्राको सुंदरच दिसतंय.

क्राकोमधे अन्य काही जुन्या-नव्या कथिड्रल, चर्चेस वगैरे आहेत का? (पोलिश लोकं आता फार धार्मिक वाटतात विशेषतः कम्युनिस्ट राजवट उलथल्यानंतर आणि पोप जॉन पॉलमुळे; म्हणून आगाऊ चौकशा!) पोलंडमधे पोलिश भाषा सोडून इतर काही कानावर आलं का? भाषेची अडचण तुम्हाला आली का? ब्राटीस्लाव्हा-पोलंड असा प्रवास केलात, तर ब्राटीस्लावाही दाखवा की! स्लोवाकीयामधे स्किईंग सोडून इतर काही होत नाही असा माझा गैरसमज आहे, तो फोटोबिटो दाखवून खोडून काढलात तर फार आवडेल.

nishant's picture

4 Jan 2013 - 1:33 pm | nishant

आत्ता पर्यंतचे प्रवास वर्णन आवडल्या बद्दल धन्यवाद!!
क्राकोमधे अन्य काही जुन्या-नव्या कथिड्रल, चर्चेस वगैरे आहेत का?
क्राकोमधे हे एक मुख्य कॅथिड्र्ल आहे आणि अजुन एक wawal castle मधे आहे. क्राको पासुन जवळच असलेले Wadowice गाव, म्हणजे पोप जॉन पॉल २ यांचे जन्मस्थान.. आम्ही मात्र तिथे जाउ शकलो नाही. तसेच Jasna Gora या क्राको पासुन १ तासाच्या अंतरावर असलेल्या गावात, Jasna Góra Monastery ह्या ठिकानी जगप्रसिद्ध Black Madonna चे painting आहे. परंतु वेळेअभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही.
पोलंडमधे पोलिश भाषा सोडून इतर काही कानावर आलं का? भाषेची अडचण तुम्हाला आली का?
युरोपमधल्या कुठल्याहि टुरिस्ट ठिकाणी गेल्यास, हमखास इंग्लिश बोलले जाते. त्याला क्राको देखिल अपवाद नाही.

हा लेख पुर्ण झाल्यावर मी Czech Republic, Slovakia, Hungary, Austria, Greece etc देशांत केलेल्या भटकंतीचे प्रवासवर्णन लिहायचा प्रयत्न करेल.
सगळ्यांचे धन्यवाद!!! :)

५० फक्त's picture

4 Jan 2013 - 8:23 am | ५० फक्त

लई भारी फोटो आणि माहिती सुद्धा.

अशोक सळ्वी's picture

7 Jan 2013 - 10:05 pm | अशोक सळ्वी

निशान्त, खुप छान लेख झालाय. शिवाय फोटो पण खुप छान आहेत. चालु ठेवा वाचतो आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2013 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे

पूर्व युरोपीय देशांबद्दल खूप कमी माहिती आणि बरेच गैरसमज असतात. त्यामुळे तुमच्या या खूपच छान लेख आणि चित्रांचे खूप महत्व आहे. पहिले आणि शेवटून दुसरे चित्र ही दोने विशेष आवडली.

पुभाप्र.

धन्यवाद... भाग तिसरा लौकरच टाकत आहे :)

रोहन अजय संसारे's picture

17 Jan 2013 - 9:49 am | रोहन अजय संसारे

छान लेख