रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in कलादालन
6 Dec 2012 - 8:17 pm

मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्‍या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अ‍ॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या. व्यक्तिशः मला त्या खुपच आवडल्या.

पहा तुम्हाला आवडतात का..

सर्वात पहिली गणरायाची रांगोळी.
1

आणि हो, प्रत्येक रांगोळीसोबत एक सुंदर काव्यसुध्दा लिहिण्यात आलं होतं.

रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर सुरू असणार्‍या मालिकेत आपल्या अभिनयाने छोटा पडदा गाजवणारी हि बाल अभिनेत्री.
2

मदर तेरेसा.
3

माननीय सिंधुताई सकपाळ. यांच्या हनुवटीवर असणारा मुस इतक्या बेमालुमपणे काढला होता कि खरोखरचा भासत होता. दुर्दैवाने माझ्या मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढले असल्याने मला तो चांगल्या रितीने टिपता आला नाही. :(
4

मराठीतले दोन दिग्गज अभिनेते, ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने अनेक मराठी सिनेमात क्रुर खलनायक साकारले.
5

कँसरसारख्या भयानक आजारालासुध्दा मोठ्या धैर्याने तोंड देणारा आपला लाडका युवराज!
6

बाबु मोशाय....
7

यश चोप्रा!
8

ह्या रांगोळीच्या कलाकाराने बुध्दाच्या मुर्तीवरची शायनिंग अतिशय जबर काढली होती.
9

हि पण चांगली काढली होती.
10

स्टिव्ह जॉब्स!
11

सायना नेहवाल. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
12

संस्कृतीछायाचित्रणरेखाटन

प्रतिक्रिया

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम आल्या आहेत. बुद्धाची रांगोळी हा फोटो असल्यासारखी आहे. अशक्य ग्रेट कला आहे. फक्त एकच राहून राहून वाटते की शिनेमातील कलाकारांना आजकाल बराच भाव मिळतोय. त्यात खूप वाईट असे काही नसले तरी फार ग्रेटही काही नाही.

अनन्न्या's picture

6 Dec 2012 - 8:29 pm | अनन्न्या

प्रत्यक्ष पाहता आल्या असत्या तर आणखी बहार आली असती. सुंदर कलाक्रुती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल धन्यवाद!

लीलाधर's picture

6 Dec 2012 - 8:32 pm | लीलाधर

प्रत्यक्ष नै पण अप्रत्यक्षरित्या फटूतून रंगावली प्रदर्शन घडवलत धन्यवाद. रांगोळ्या फारच छान आहेत विशेषत: बुद्धाची तर लाजवाब :)

मस्त रे किसना ! :) धाग्याची वाट पाहत होतो.... :)
मला सिंधुताई आणि बुद्ध या दोन रांगोळ्या जास्त आवडल्या. :)
पुढच्या वेळी या ठिकाणी चक्कर टाकायचा विचार नक्की करीन !

(कला प्रेमी)

सानिकास्वप्निल's picture

6 Dec 2012 - 9:47 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम कलाकृती :)
बुद्धाची रांगोळी आणी चिमुकल्या रमाबाई (तेजस्विनी)ची रांगोळी खूप आवडली
धन्यवाद

निवेदिता-ताई's picture

6 Dec 2012 - 9:57 pm | निवेदिता-ताई

सुंदर , अप्रतिम

खेडूत's picture

6 Dec 2012 - 10:30 pm | खेडूत

बहुतेक सगळ्या सुंदर आल्या आहेत. बुद्ध, युवी आणि स्टीव्ह जॉब्स विशेष छान!
राजेश खन्ना च्या चित्रातला (भूतकाळ सुचवणारा ) कृष्ण धवल इफेक्ट पण लक्ष्यवेधक.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या.... :-)

बोट जातात रांगोळी टाकुन. तासन तास बसुन एकाग्रतेने काढावी लागते रांगोळी. मुख्य म्हणजे चुकेला फार कमी वाव. कारण एक दुरुस्त करायला गेल की दुसर खराब होत. युवीच्या कपाळावरच्या शीरा फार छान उमटल्यात. सार्‍याच रांगोळ्या अप्रतिम.

प्रचेतस's picture

7 Dec 2012 - 8:57 am | प्रचेतस

खूप सुंदर.

चौकटराजा's picture

7 Dec 2012 - 9:08 am | चौकटराजा

फारच कसदार ! सर्वांची ओळख व्यवस्थित पटते हे रंगावलीचे यश कारण ते रांगोळीत खास अवघड आहे.
किसनदेवा , अशीच किर्पा ठ्वा !

नितिन काळदेवकर's picture

7 Dec 2012 - 9:08 am | नितिन काळदेवकर

रांगोळीचा एक एक ठिपका हा बोलका झाला आहे असे वाटते.स्टिव्ह जॉब्स,गौतम बुध्दांची,सिंधुताई सकपाळांची रांगोळी अप्रतिमच.या सर्व रांगोळीत सर्वात कठीण रांगोळी कोणती असेल तर ती यश चोप्रा यांची. त्यात ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत त्या काढणे म्हणजे कठीणच.

ज्ञानराम's picture

7 Dec 2012 - 9:22 am | ज्ञानराम

मस्तच , मला हेवा वाटतो या कलाकारांचा..

सूड's picture

7 Dec 2012 - 9:33 am | सूड

मस्तच !!

ऋषिकेश's picture

7 Dec 2012 - 9:36 am | ऋषिकेश

वा!

अप्रतिम बोलायला शब्दच नाहि खरच!!

मितभाषी's picture

7 Dec 2012 - 9:53 am | मितभाषी

अप्रतिम!!!!!!

दीपा माने's picture

7 Dec 2012 - 10:50 am | दीपा माने

अप्रतिम रांगोळ्या! ह्या कलाकारांचे भाग्य कधी फळफळणार? तुमच्यामुळे ठाण्यातल्या रांगोळ्या इथे अमेरीकेत पाहते आहे. आभारी आहे.

वपाडाव's picture

7 Dec 2012 - 5:05 pm | वपाडाव
वपाडाव's picture

7 Dec 2012 - 5:05 pm | वपाडाव

आपण कुठे राहता इकडे?

रोहित पवार's picture

7 Dec 2012 - 11:33 am | रोहित पवार

अप्रतिम रांगोळ्या!
खरच खुपच छान आहेत सर्वे आणि त्या मधे कोणास किती मार्क दयाचे हे तर परिसकाना सुधा आवघड गेले आसेल.......

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2012 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार

किसनदेवा धन्यवाद रे.

सगळ्या रांगोळ्या अगदी दृष्ट लागण्यासारख्या आहेत.

खरच अप्रतिम रांगोळ्या आहेत आणि तुमचे आभार त्या आमच्यापर्यत पोहचवण्यासाठि

शिद's picture

7 Dec 2012 - 1:42 pm | शिद

सार्‍याच रांगोळ्या अप्रतिम!!!

बुद्धाच्या चेहर्‍यावरचे शायनिंग, ती केळाच्या पानाखाली आडोसा घेणारी दोन पोरे अन स्टीव्ह जॉब्सच्या दाढीचे खुंट हे केवळ अप्रतिम!

स्मिता.'s picture

7 Dec 2012 - 3:37 pm | स्मिता.

अतिशय सुरेख रांगोळ्या आहेत. बुद्धाची प्रतिमा तर अप्रतिम!!

अप्रतिम रांगोळ्या आहेत सगळ्या.....काय कला असते एकेकाच्या हातात !!

सगळ्याच रांगोळ्या खूपच छान आहेत.... !

रसिकांच्या कौतुकाचे शब्द कलाकारांपर्यंत पोचायला हवेत खरंतर.

हुकुमीएक्का's picture

7 Dec 2012 - 10:53 pm | हुकुमीएक्का

फोटो खुप छान आलेत. . . युवराज सिंग, स्टीव जॉब्स व मदर तेरेसा यांच्या रांगोळीमधून inspirational संदेश मिळाला . . .

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम आहेतच ; पण आपल्याला राजेश खन्नाची रांगोळी विशेष आवडली बाबा

पियुशा's picture

9 Dec 2012 - 3:16 pm | पियुशा

डॉल्याचे पारणे फिटले ...अप्रतिम :)

कवितानागेश's picture

9 Dec 2012 - 11:24 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर रांगोळ्या. परत परत बघतेय. :)

पैसा's picture

10 Dec 2012 - 10:56 pm | पैसा

खूप छान आहेत रांगोळ्या.

सुधीर's picture

10 Dec 2012 - 11:01 pm | सुधीर

काय सुंदर कला आहे!

अल्पेश ठाकूर's picture

10 Dec 2012 - 11:09 pm | अल्पेश ठाकूर

सुंदर कला !

अल्पेश ठाकूर's picture

10 Dec 2012 - 11:09 pm | अल्पेश ठाकूर

सुंदर कला !

नंदन's picture

11 Dec 2012 - 5:48 am | नंदन

सुरेख रांगोळ्या. येथे फोटो दिल्याबद्दल आभार.

सविता००१'s picture

11 Dec 2012 - 9:59 am | सविता००१

झकास :)

अनिल तापकीर's picture

15 Dec 2012 - 7:28 pm | अनिल तापकीर

शब्दात वर्णन करता येणार नाही इतक्या सुंदर आहे

जेनी...'s picture

15 Dec 2012 - 9:39 pm | जेनी...

राजेश खन्ना खासच .

गोरख कालेकर's picture

6 Jan 2013 - 3:11 pm | गोरख कालेकर

खुपच छान

kanchanbari's picture

6 Jan 2013 - 3:23 pm | kanchanbari

अतिशय सुंदर......

अतिशय सुन्दर कौतुक करावे तेवधे थोदे वातते आहे !!

किसन शिंदे साहेब, मस्त रांगोळ्या आहेत लय भारी.
न्यु गर्ल्स स्कुलच्या मागे न्यु ईंग्लिश स्कुल आहे तिथे दिवाळीच्या काळात किल्ले प्रदर्शन असत. एक से एक बढिया किल्ल्यांचे प्रति़रुप असतात. जरुर या बघायला. माझ्या घरासमोरच ह्या दोनी शाळा असल्यामुळे ज्या ज्या वेळी रंगावली प्रदर्शन असत तेव्हा मी नेहमी जातो.

कौशी's picture

11 Jan 2013 - 8:25 am | कौशी

सर्व रांगोळया अप्रअतिम आहेत.

श्रिया's picture

11 Jan 2013 - 4:02 pm | श्रिया

लाजवाब रांगोळ्या !

समयांत's picture

15 Jan 2013 - 8:15 pm | समयांत

पैकी न्यु गर्ल्स स्कुल असले तरी रांगोळी प्रदर्शनात रांगोळ्या गर्ल्सकडून अपेक्षित करणे व्यर्थ. ;)
उकुदुघेन.

अप्रतिम रांगोळ्या. केळीचे पान डोईवर घेतलेल्या उनाड मुलांची रांगोळी , मुलांचे स्वच्छंद भाव फार आवडले.