"शिवराय"

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जे न देखे रवी...
1 Dec 2012 - 1:27 pm

त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली |
तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली |
दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी |
झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी |
लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण |
वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन |
संत महात्म्यांनी केला देवाचा धावा |
या धरतीला ताराया अवतार घ्यावा |
संतांची गरीब रयतेची, देवास आली दया |
म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया |
शिवरायांनी ऐसे अघटीत केले |
शून्यातून स्वराज्य उभे राहिले |
अफझलचा कोथळा बाहेर काढीला |
औरंग्याचा तर माजच जिरवला |
आदिलशहा निजामासी जागीच रोखले |
इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले |
संतांचे देवालयांचे केले रक्षण |
खळ, नि दुर्जांनांचे करुनी निर्दालन |
त्रेतायुगी होते जसे रामाचे रामराज्य |
कलियुगी आमच्या शिवरायांचे शिवराज्य |
जय शिवराय

वीररसकविता

प्रतिक्रिया

अनिल तापकीर साहेब, वा मस्त कविता आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2012 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

आता एक कविता तानाजी मालुसरेंवरती होऊ द्या मालक.

शैलेन्द्र's picture

21 Dec 2012 - 10:48 am | शैलेन्द्र

अनुमोदन..

अनिल तापकीर's picture

1 Dec 2012 - 7:30 pm | अनिल तापकीर

निश्,राजकुमार धन्यवाद
राजकुमारजी लवकरच लिहितो

ज्ञानराम's picture

3 Dec 2012 - 9:33 am | ज्ञानराम

एकदम मस्त , खूप छान .. छत्रपती शिवरायांचा त्रिवार ...जय जयकार..

सुकामेवा's picture

3 Dec 2012 - 9:58 am | सुकामेवा

कविता १ नंबर

अनिल तापकीर's picture

3 Dec 2012 - 11:05 am | अनिल तापकीर

ज्ञानराम,नि पंकज जी धन्यवाद
जय शिवराय

शिवप्रसाद's picture

15 Dec 2012 - 4:43 pm | शिवप्रसाद

सुंदर रचना

सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं

राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं

देवल गिराविते , फिराविते निसान अली
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी

गौर गणपती आप , औरनको देत ताप
आपनी ही बार सब , मारी गये दबकी

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की

कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी

- कविराज भूषण।

याचा अर्थ असा की हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले।हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}

अनिल तापकीर's picture

15 Dec 2012 - 10:28 pm | अनिल तापकीर

शिवप्रसाद्,आनि बाबा पाटील धन्यवाद
पाटीलसाहेब खुप छान माहिती दिली आभारी आहे

पाषाणभेद's picture

16 Dec 2012 - 12:16 am | पाषाणभेद

शिवछत्रपतींचा विजय असो!!

अनिल तापकीर's picture

16 Dec 2012 - 9:09 am | अनिल तापकीर

धन्यवाद्,पाषाण्भेदजी

शिवप्रसाद's picture

20 Dec 2012 - 2:23 pm | शिवप्रसाद

कोणितरी जाणकार व्यक्तीने
"शिवाजीराजे नसते तर..........
हा धागा टाकावा

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 2:35 pm | अनिल तापकीर

धन्यवाद शिवप्रसाद
मला कितपत जमेल हे नाही सांगता येत पण दुसरे कोणी लिहला तर मनापासुन स्वागत

चिर्कुट's picture

20 Dec 2012 - 4:18 pm | चिर्कुट

मस्त आहे काव्य..

अनिल तापकीर's picture

22 Dec 2012 - 12:46 pm | अनिल तापकीर

चिर्कूट आनि शैलेंद्र धन्यवाद,
शैलेंद्रजी आपल्या सुचनेचे स्वागत काम चालु आहे. म्हणजे कालच सिंहगडावर जाऊन आलो आहे.

शैलेन्द्र's picture

24 Dec 2012 - 3:57 pm | शैलेन्द्र

जब्बर्दस्त..
शक्यतो घोरपडीवाला व्हर्जन टाळा, कारण त्याला ऐतीहासीक आधार नाही..

अनिल तापकीर's picture

26 Dec 2012 - 12:39 pm | अनिल तापकीर

बरे झाले तुमचा प्रतिसाद पाहिला कारन तानाजींची वीर गाथा आताच टाकणार होतो.
बदल करुनच आता टाकतो.
धन्यवाद