दम बिर्याणी..[व्हेज]
साहित्य : ४-५ कांदे, कोथिंबिर आणि ३-४ टमाटे, २५० ग्रॅम फ्लॉवर,३-४ गाजर,हिरवी मिरची ,४-५ लिंबु, तेल ,दही, गुलाब जल..
मसाले : आले-लसुण, तेजपान, दालचिनी, बाजा, काळी मीरी,जिरे, .लवंग,, हिरवी व काळी विलायची, ..धणे पुड, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ,लाल तिखट...पुदीना...
कृती :
सर्वात आधी बिर्याणी मसाल्याची तयारी करुन घेऊ..
त्यासाठी कांदे अगदी बारीक चिरुन घ्या..
त्यानंतर टमाटेही चिरुन घ्या..अगदी बारीक हं..
त्यानंतर चिरलेले गाजर आणि फ्लॉवर थोडावेळ पाण्यात राहुद्या म्हणजे ककाही माती वैगैरे लागली असेल तर ती निघुन जाईल.. नंतर त्याना थोड्या तेलात तळुन घ्या..
त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या.. आणि लिंबुही चिरुन घ्या..
चिरलेल्या लिंबुंचा एका वाटीत रस काढुन ठेवा..[त्यातुन बिया काढुन घ्यायच्या विसरु नका हं.]
आलं-लसुणची बारीक पेस्ट करुन घ्या..
आता बिर्यानी साठी भात बनवुन घेऊ..
त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा..पाणी गरम झाल्यावर त्यात थोडे तेल..मीठ चवीप्रमाणे आणि मसाल्यांमधुन बाजा आणि दालचिनी टाका..
आणि उकळत्या पाण्यात धुतलेला अखंड बासमती तांदुळ ३ वाटी टाकुन झाकण ठेवुन द्या..
भात पुर्ण शिजु न देता साधारण ८० % शिजल्यावर तो गॅस वरुन उतरवुन घेऊन, त्यातील पाणी चाळुन घ्या आणि ताटांमध्ये मोकळा करुन ठेवा..म्हणजे तो त्यातील वाफेने पुर्ण शिजणार नाही..
आता बिर्याणी साठी मसाला बनवुन घेऊ..
(आधी साहित्य तयार करुन ठेवल्याने आता कष्ट कमी पुरतील..)
कढीत थोडे तेल टाकुन ते तापल्यावर... फोडणीसाठी जिरे टाकुन घ्या..
जिरे तडतडायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, दालचिनी, बाजा, तेजपान, काळे मिरे..हिरवी काळी विलायची हे टाकुन थोडे चाळत रहा..
कांदा थोडा तांबुस-सोनेरी रंगावर आला की त्यात टमाटे घाला..आणि चाळुन घ्या..
त्यात आता हळद, धणे पूड, चवीनुसार मीठ..बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालुन घ्या..
बनलेल्या मसाला बराच कडक आहे..त्याला थोडा माईल्डनेस येण्यासाठी क्रीम किंवा दही घालु शकता..
आता मसाल्यात डीपफ्राय केलेल्या भाज्या घाला..फ्लॉवर, गाजर, घेवडा...
ही झाली पुर्वतयारी ..
आपण आत्तापर्यंत ८०% शिजलेला भात आणि बिर्याणीचा मसाला बनवुन ठेवल्या..
आता खरी कृती चालु होतेय..
बिर्याणीला दम देणे..
प्रथम एक जाड बुडाचे पातेले[भांडे] घ्या..
त्यात पुर्वी बनवुन ठेवलेल्या बिर्याणी मसाल्यातील अर्धा मसाला व्यवस्थित पसरवुन घ्या..
त्यावर थोडीशी कोथिंबिरही पेरा..
आणि स्लीट मारलेली हिरवी मिरचीही.. (उभी कापलेली)
त्यावर ८० % शिजलेल्या अखंड बासमती भाताचा एक थर द्या..साधारण निम्मा भात वापरुन घ्या..
त्यातील शिजताना टाकलेले अक्खे गरम मसाले काढुन घ्या..
त्यावर लिंबाचा र व गुलाबपाणी शिंपडा..आणि पुदिन्याची पाने, उभ्या चिरलेल्य मिरच्या पेरुन टाका..
त्यावरुन परत एक बिर्याणी मसाल्याचा थर द्या..
वरच्या थराला पण समान कृती करा..
आता सर्व थर लावुन झाल्यावर ह्या भांड्याला वरच्या बाजुला कणकेचा जाड थर लावुन घ्या..
आणि त्यावर झाकण घट्ट लावा..म्हणजे व्यवस्थित दम बसेल...
भात ८०% शिजलेला असल्याने त्याला जास्त उष्णतेची गरज नाहीये..
त्यामुळे जाड तवा घेऊन तो गॅस वर तापवुन घ्या..मग हे कणकेने पॅक केलेल्या झाकणाचे भांडे तव्यावर ठेवा..अर्ध्या मिनिटानंतर गॅस मंद आचेवर करुन १० मिनिटांनी बंद करा..
त्यानंतर झाकण उघडुन मस्त चळुन घ्या..
व्हेज दम बिर्याणीचा सुंदर घमघमाट सुटलेला आहेच...लगेच गरमागरम बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार....
सोबत तोंडी लावायला बुंदी रायता पण घेऊ शकता बरंका..
टीप : प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..
प्रतिक्रिया
7 Sep 2012 - 4:58 pm | तर्री
किती "इनवॉल्व्ह" होवून लिहिली आहे !
लाजवाब !
13 Sep 2012 - 7:15 pm | डावखुरा
धन्यु..! करुन पाहिली की अभिप्राय कळवा..खव मध्ये.. :)
7 Sep 2012 - 5:02 pm | स्वप्निल घायाळ
आणी ही बिर्याणी लोकांना 'दम' घालुन खायला लावा !!!
7 Sep 2012 - 5:05 pm | sagarpdy
किंवा आणी ही बिर्याणी लोकांना दमाने खायला सांगा ;)
13 Sep 2012 - 7:16 pm | डावखुरा
स्वप्निलघायाळ आणि sagarpdy तशी काही गरज पडतच नाही हो..
लोकं वासानेच दुरवरुन उडत येतात...
7 Sep 2012 - 5:03 pm | sagarpdy
जियो! डावखुरेसाहेब जियो!
7 Sep 2012 - 5:14 pm | गणपा
जबरा !!!
आवडली दम बिर्याणी.
दही/क्रीममुळे रंग थोडा फिका झाला आहे. मसाल्यात लाल तिखटाच प्रमाण वाढवुन समतोल साधला जाईल.
बाकी तुमची मिरच्यांच्या बाबतीत 'ऐपत' बरीच दिसते. ;)
13 Sep 2012 - 7:22 pm | डावखुरा
धन्यु..
तुम्हाला आवडेल तसे..
तुम्ही त्यात माहीर आहात..
:)
काका अहो मिरच्या चवीपुरत्याच आहेत..नंतर काढल्या जातात..
किंवा त्या पुर्ण असल्याने खातांना काढल्या जातात..
7 Sep 2012 - 5:16 pm | मी_आहे_ना
झकास वर्णन, पण फोटू दिसत नाहीत :(
7 Sep 2012 - 5:20 pm | इरसाल
पन वो भाजी जो दम के लिये बिछायी उसने हमकी जान लेली.
जाड बुडाच्या पातेल्या मधले रिफ्लेक्शन/भरीवपणा जबरदस्त.
बिर्याणी मस्तच असणार ही खात्री. "डावखुरा" यांची "उजवी" पाकृ.
13 Sep 2012 - 7:24 pm | डावखुरा
कातिल आलाय तो फोटु..
म्हणुनच जरा मोठा टाकलाय.. ;)
धन्यु...
7 Sep 2012 - 5:22 pm | पुण्याचे वटवाघूळ
कसाबलाही हीच बिर्याणी देतात का हो?
13 Sep 2012 - 7:28 pm | डावखुरा
हा वदग्रस्त विषय होऊ शकेल..
पण तस्सा चान्स मिळाला..समजा सोनिया आजींनी बोलावलेच तर त्याला ह्या बिर्याणीनेच फासाला लटकवेल[म्हण्जे यमसदनी जाण्याची व्यवस्था करेल] नक्की..
7 Sep 2012 - 5:24 pm | अक्षया
छान रेसीपी..आणि फोटोज..:)
अभिनंदन!!
7 Sep 2012 - 5:32 pm | मृत्युन्जय
जीव गेला हो पाकृ बघुन. १०० / १०० तुम्हाला या मादक बिर्याणीसाठी
13 Sep 2012 - 7:30 pm | डावखुरा
"मादक" ही उपमा पाकृ साठी जगात पहिल्यांदाच वापरली गेली असेल नाही?
7 Sep 2012 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..>>> उरलेला दम इथे दिलात काय...? ;)
एकदम आचारी श्टाइल बिर्याणी हां..!
आणी शेवट्ची ती दम देणारी स्मायली,,, आंम्ही आमच्या भांडारात नेऊन ठेवली बरं का...! ;)
13 Sep 2012 - 7:32 pm | डावखुरा
नाय हो मालक..ते असंच..आपला मिपाकरांवर असलेला थोडाफार हक्क बजावला.. ;)
तुमची स्मायली फार भन्नाट आहे..स्पून हातात ठेवुन सरळ तोंड बुचकळुन चालु पडलीय.. :)
हहपुवा झाली..आणि जेव्हा पाहतो तेव्हा अजुनही होते..
धन्यु..
7 Sep 2012 - 5:37 pm | चिंतामणी
हे यामुळे कळले. आता चालू ठेव.
पण " प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका.." असा दम नको भरूस. मिपाकर प्रतिक्रीया देतीलच.
13 Sep 2012 - 7:34 pm | डावखुरा
काका आधीपण तुम्ही पाकृ पाहिल्यात की माझ्या..
पण बर्राच ग्याप होता म्हणा..मध्ये
7 Sep 2012 - 5:49 pm | उदय के'सागर
बिर्याणी हा जीव-की-प्राण ह्या प्रकारातला, त्यामुळे तुमची ही पाककृती निश्चीतच आवडली. पण अहो केवढ्या त्या हिरव्या मिरच्या हो... बाप रे... म्हणजे ते असतं ना असं की गुप्त-धनाचा हंडा समोर आहे पण त्यावर तो नागोबा वेटोळा घालून बसलाय ... तसं ते मिरच्या पाहून झालं हो...
(सध्या एक हिरवी मिरची जरी खाल्ली तरी .......... जाऊ द्या काय काय सांगायचं आता :( )
7 Sep 2012 - 6:00 pm | वामन देशमुख
एकदम सही रे भिडू! हैदराबादी दम बिर्याणी अगदी अशीच बनवतात!
7 Sep 2012 - 6:05 pm | कच्ची कैरी
मस्त आणि काहीशी झणझणीत वाटतेय बिर्याणी !!
7 Sep 2012 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार
जियो डावखरे शेठ !
पाकृ तुफान आवडली आहे एकदम. फोटो देखील एकदम 'लालच आहा लपलप' आले आहेत.
बाकी काली विलायची म्हणजे मसाला विलायची का ?
8 Sep 2012 - 12:31 am | डावखुरा
हो बरोब्बर ओळखले..मसाला विलायचीच...
7 Sep 2012 - 6:33 pm | michmadhura
खूप छान रेसिपी.
7 Sep 2012 - 6:49 pm | रेवती
भलतेच उत्साही दिसताय.
7 Sep 2012 - 6:55 pm | पुष्करिणी
सुंदर, सादरीकरण अप्रतिम. नक्की करून बघेन .
बाजा म्हण्जे काय ?
7 Sep 2012 - 7:09 pm | अभ्या..
एकदम डिट्टेल मधी लिहिलेली मस्तच पाकृ.
डावखुरे मालक पाकृ एक्दम उजवी.
बाजा म्हण्जे काय ?
खरेच बाजा म्हणजे काय हो ?
7 Sep 2012 - 10:58 pm | बहुगुणी
बाजा म्हणजे स्टार फूल (Star-anise) असावं असं वाटतं, (स्टार फूल म्हणजे मराठीत काय?)
बाकी पाककृती कातिल आहे! वाचनखूण साठवली आहे.
7 Sep 2012 - 11:56 pm | कवितानागेश
चक्रफूल.
बाकी बिर्याणी मस्तच. पण मिरच्या वगळूनच करावी लागेल.
8 Sep 2012 - 12:21 am | डावखुरा
अगदी बरोबर..त्यालाच खान्देशात बाजा म्हणतात..म्हटलं बोली भाषेतलाच शब्द वापरु..
बाजा=चक्रफुल=Star-anise :)
8 Sep 2012 - 1:25 am | प्रभाकर पेठकर
त्या मसाल्याला (Star-anise) 'बाद्यान' असे म्हणतात.
चक्रीफुल, बदरामफुल (उत्तरप्रदेशात) अशी नांवेही ऐकली आहेत. 'बाजा' प्रथमच ऐकले.
8 Sep 2012 - 9:13 am | डावखुरा
बाजा हा अपभ्रंश असेल कदाचित..त्याला दगडफुल असेही नाव आहे..
8 Sep 2012 - 9:51 am | प्रभाकर पेठकर
त्याला दगडफुल असेही नाव आहे..
नाही. 'दगडफुल' हा मसाल्याचा सर्वस्वी वेगळा प्रकार आहे. तो एका बाजूने काळा एका बाजूने पांढरा आणि वाळलेल्या, चुरगळलेल्या छोट्या छोट्या पानांसारखा असतो.
8 Sep 2012 - 10:15 am | पांथस्थ
नमस्कार,
Star Anise म्हणजे दगड्फुल नव्हे. दगड्फुल इथे - किंवा इथे बघा.
बिर्याणी छान झालेली दिसते. मी केली तर खालील बदल करीन -
१. कांदा (उभा कापुन) वेगळा परतुन घेउन भाताचे थर रचतांना घालेन
२. टोमॅटोचा कमी वापर
धन्यवाद!
8 Sep 2012 - 10:31 am | प्रभाकर पेठकर
बरोबर. तुम्ही दिलेल्या जोडणींमध्ये दाखविलेली दगडफुलाची छायाचित्रे बरोबर आहेत.
8 Sep 2012 - 12:29 pm | डावखुरा
धन्यु..पांथस्था..आपल्याला एवढी डीप माहीती नाही बाजा मागितला की दुकानदार देतो..
हेच अपेक्षित आहे..>>>

7 Sep 2012 - 7:42 pm | मदनबाण
आहाहा... :)
बाकी तुमचा गणपती बाप्पा मस्त आहे. :)
7 Sep 2012 - 7:48 pm | पैसा
लय भारी!
7 Sep 2012 - 8:09 pm | प्रचेतस
लै भारी.
बिर्याणीवर तळलेला कुरकुरीत कांदा पसरला असतात तर अजून बहार आली असती.
7 Sep 2012 - 8:59 pm | जाई.
वाह
मस्त
7 Sep 2012 - 9:18 pm | गोंधळी
लै भारी.
7 Sep 2012 - 9:37 pm | कौशी
मस्त वर्णन ..बिर्याणी आवडली.
7 Sep 2012 - 10:07 pm | अर्धवटराव
इतक्या नजाकतीने दिलेली बिर्याणी रेसीपी आजवर बघितली नाहि.
प्रचंड आवडेश.
अर्धवटराव
13 Sep 2012 - 7:36 pm | डावखुरा
धन्यु..करुन पहा मग आता..
7 Sep 2012 - 10:12 pm | मुक्त विहारि
झक्कास..
7 Sep 2012 - 11:02 pm | सानिकास्वप्निल
बिर्याणी पाहून कलेजा खल्लास झाला :)
काय झकास दिसत आहे राव :)
बाकी इतक्या मिरच्या बर्या झेपतात तुम्हाला ;)
8 Sep 2012 - 2:48 am | चिंतामणी
हा हा हा.
हेच म्हणायचे होते.
एकदम सहमत.
8 Sep 2012 - 6:53 pm | मृगनयनी
डावखुरा'जी...... अप्र अप्र अप्र अप्र अप्र अप्रतिम!!!... गॉर्जिअस!!!.... इतकी साग्रसंगीत प्रोजेक्टेड डीटेल्ड स्ट्रॅटेजिकल बिर्याणी पाहूनच मन भरलं!!!... आणि "व्हेज बिर्याणी" इतकी सुन्दर दिसूही शकते... हे नव्यानेच कळले!!!! :)
कीप इट अप!!!! :)
7 Sep 2012 - 11:21 pm | दादा कोंडके
खत्रा पाकृ!
लिंबं आणि मिरच्याचं प्रमाण बघून वाटलं बिर्याणी तयार झाल्यावर त्यातल्याच काही बांधायच्या की काय? :)
7 Sep 2012 - 11:22 pm | अर्धवटराव
>>लिंबं आणि मिरच्याचं प्रमाण बघून वाटलं बिर्याणी तयार झाल्यावर त्यातल्याच काही बांधायच्या की काय ?
- फुटलो =)
अर्धवटराव
8 Sep 2012 - 12:38 am | डावखुरा
त्या मिरच्या बारीक चिरुन न घातल्याने नंतर काढुन टाकण्यात येतात ..दम देतो तेव्हा पुरेसा तिखटपणा मिळतो..आणि मुळात त्या मिरच्या गावराणी नसल्याने फार तिखट नाहीत..
आणि ५-६ लोकांच्या बिर्याणीस ३ लिंब काही जास्त नाहीत..असे वाटते..सोबत पुदीना आणि गुलाबजल असल्याने त्याची तीव्रता कमी होत असावी..
बिर्याणीची टेस्ट अतिशय झकास असुन शक्यतो काही बदल न करता करुन पहावी.. :p
8 Sep 2012 - 9:31 am | स्पा
मातस्य ग्राम्यम...
कसला जाळ बिर्याणी बनलीये साहेब
कोपरापासून __/\__
फोटो थोडे मोठे चालले असते, असो इनो घेतो आता
8 Sep 2012 - 9:45 am | मोदक
जळजळ...
या असल्या पाककृती करणार्यांना किडनॅप करता आले तर भारी मजा येईल..
8 Sep 2012 - 1:06 pm | नि३सोलपुरकर
खतरनाक ,पण झक्कास.
@ मोदक यांच्याशी १०० + बाडीस.
मिपावरील सर्व "सुग्रीव"* नां किडनॅप करुन एक मिपा कट्टा करावा हे आयोजकानां नम्रपणे सुचवतो.
"सुग्रीव"*- हा शब्द मिपावरच वाचनात आला.
8 Sep 2012 - 2:02 pm | पिंगू
कधी येऊ रे.. पुन्हा एकदा बनवायला आणि हादडायलासुद्धा...
8 Sep 2012 - 7:19 pm | वेताळ
खायला घालताना कंजुषी करु नकोस्........मग आम्हाला पोवाडे गायला कंटाळा येणार नाही.
एलदम खतरा बिर्याणी आहे राव.....
8 Sep 2012 - 7:34 pm | उगा काहितरीच
मस्त..........
8 Sep 2012 - 7:41 pm | प्यारे१
दम दमा दम.....!
मस्तच.
9 Sep 2012 - 9:32 am | पाषाणभेद
लय दमादमानं वाचली पाकृ अन दम लागला. आता बनवतांना आनखी जास्त दम लागलं अन खातांनापन दमादमानंच खावं लागलं बाबा. काय करीतो!
एकुणच निगुतीनं करायची पाकृ आहे. सगळा सरंजाम गोळा करून आपण केलेली ताटली फारच छान आहे. वादच नाही.
आणखीही पाकृ येवू द्या.
13 Sep 2012 - 7:43 pm | डावखुरा
सर्वप्रथम धन्यवाद...
अजु भरपुर पाकृ देणार आहे..
आधीच्या पाकृंवर पण नजर फिरवुन या..
आणि करुन पाहिल्यावर पण कशी झाली होती ते कळु द्या.. खव तुन..
9 Sep 2012 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जब्रा. आज रैवारचा योग पाकृतीला जुळुन यावा. :)
-दिलीप बिरुटे
13 Sep 2012 - 7:45 pm | डावखुरा
मग केली होती का बिर्याणी?
9 Sep 2012 - 10:32 am | शिल्पा ब
वाचनखुण साठवलीये. १-२ दिवसात करणार.
9 Sep 2012 - 11:05 am | jaypal
फोटो आणि वर्णन एकदम खल्ल्लास
मी बिर्यानी( व्हेज/नॉनव्हेज )करताना
१) कांदा उभा चिरुन खरपुस तळुन मग वापरतो.
२) तेला ऐवजी साजुक तुप घेतो.
३) गुलाब जल न वापरता मी रोज इसेन्स + केवडा इसेन्स + कोमट दुधात भिजवलेले केशर वापरतो.
४) क्वांटीटी वाढवायची असल्यास अथवा आवडत असल्यास बटाटा वापरावा.
अवांतर = फायनल बिर्यानी जास्ती ओलसर ( दाल खिचडी सारखी) का दिसतेय ?
9 Sep 2012 - 12:42 pm | कुंदन
>>मी बिर्यानी( व्हेज/नॉनव्हेज )करताना...
मालक , कधी भेटयात मग?
9 Sep 2012 - 1:11 pm | अन्या दातार
सहसा पाकृ विभाग उघडतसुद्धा नाही. पण इतक्या प्रतिक्रिया आलेल्या बघून म्हणलं एकदा हा धागा वाचूयाच. धागा उघडला अन डोळ्याचे पारणे फिटले. :)
मस्त प्रेझेंटेशन. आवडले.
10 Sep 2012 - 8:48 am | स्पंदना
नुसत डोळ्यांच?
बाई मला तर इथे बसुनच तीचा तिखटपणा जाणवतोय. स्स हाय! सुर्रेख . काय प्रेझेंटेशन आहे! मस्त.
10 Sep 2012 - 9:39 pm | चिंतामणी
उघडला तर फक्त ह्या साठीच उघडत असशील ना.
10 Sep 2012 - 10:19 am | ५० फक्त
अतिशय धन्यवाद, नुसतं वाचुन प्रतिसाद द्यायला नको म्हणुन दिला नव्हता, काय घरी प्रयोग करुन पाहिला
थोडासा हसला, थोडासा रुसला, एकुण काय ३०% फसला, असो.
तुमचं प्रेझेंटेशन एकदम मस्त झालंय, मी मिरच्या आणि टोमॅटो अंमळ कमी घातले होते त्यामु़ळं गंडलं असावं बहुधा.
आता एकदा तुमच्याबरोबर करुन पहावी म्हणतो, कधी जमवाल ते बोला.
10 Sep 2012 - 11:43 am | गवि
चार घटक गोळा करुन त्याचा शब्दशः गोळा करुन शिजवून गिचका करणं हे खूप सोपं..
पण निगुतीने कष्ट घेऊन समरस होऊन बनवलेला कोणताही पदार्थ हा नेहमीच अत्यंत स्वादिष्ट असतो. केवळ अलंकारिक अर्थानेच त्यात "हृदय" उतरलेलं असतं असं नाही तर प्रॅक्टिकलीही त्यात अचूक प्रोसेस आणि सर्व आवश्यक घटक नीट वापरले जाऊन क्वालिटी येतेच येते. आजी लोकांच्या पदार्थाची चव अजूनही लक्षात असण्यामागे फक्त नात्यातली भावना नसते.. त्यांचं स्वयंपाकातलं "प्रोफेशनलिझम" त्यात असतं. (त्या घरगुती असल्या तरी "प्रोफेशनलिझम" शब्द बरोबर आहे.) दगडफूल म्हणा किंवा एखादा बारीकसा वाटणारा इन्ग्रेडिएंट घरात नसेल तर पोरांना दुकानात पिटाळून तो आधी आणल्याखेरीज तो पदार्थ पूर्ण न करणार्या या व्यक्ती. तडजोड नको.. शॉर्टकट नामंजूर. अमुक एक चाकवताची पातळभाजी ताकातली बेष्ट लागते तर ताकातलीच करणार.. ताकाशिवाय आजचा दिवस भाजी उरकून टाकू हा भागच शक्य नाही. एकवेळ बेत रद्द करतील..पण करायचं तर सर्व जिन्नस हवेतच..
तशीच ही बिर्याणी.. शिवाय हे वाचून बनवू इच्छिणार्यालाही शंका न रहावी अशा रितीने जे काही तपशीलवार दाखवलं आहे त्याचा जवाब नाही.
असंख्य धन्यवाद.
13 Sep 2012 - 7:49 pm | डावखुरा
तुमची प्रतिक्रिया वाचुन केलेल्या कष्टाचे सार्थक झाले...
धन्यु..
10 Sep 2012 - 12:08 pm | रमताराम
खतरणाक. दम न दिलेली बिर्यानी खाणं एरवी पसंत असतं आपल्याला. पण हे प्रकरण पाहून सालं एकदा दमदार बिर्यानी बी खौन बघावी असं वाटायलंय आता.
13 Sep 2012 - 7:51 pm | डावखुरा
खाऊनच बघा मग...एकदा..
हॉटेल मॅनेजमेंट वाल्या भावाने जमवलीय ही बिर्याणी..
10 Sep 2012 - 10:31 pm | सुहास..
मा र डा ला !!!
अवांतर : हा गणपा किंवा दिपालीताईंचा ड्युआडी तर नाही ना ;)
10 Sep 2012 - 10:49 pm | डावखुरा
त्यांना खरंच डुप्लिकेट आयडीची गरज आहे का सुहासराव..
11 Sep 2012 - 8:44 am | सहज
भारी!!
11 Sep 2012 - 11:00 am | अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
12 Sep 2012 - 12:49 pm | श्रद्धा.
सुंदर..... मस्त वर्णन अन मस्त फ़ोटो.... लवकरच करुन बघायला हवीय....
13 Sep 2012 - 7:58 pm | डावखुरा
करा की मग पट्कन..वाट कुणाची बघताय.. :)
13 Sep 2012 - 7:46 pm | नावातकायआहे
मस्त वर्णन ..बिर्याणी आवडली.
अवांतरः आय डी डावखुरा आणि कांदा उजव्या हातानी का कापताय? ;-)
13 Sep 2012 - 7:55 pm | डावखुरा
डावखुर्याने फोटो काढलाय...कांदा भावाने चिरला.. ;)