मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेज दम बिर्याणी..

डावखुरा · · पाककृती
दम बिर्याणी..[व्हेज] साहित्य : ४-५ कांदे, कोथिंबिर आणि ३-४ टमाटे, २५० ग्रॅम फ्लॉवर,३-४ गाजर,हिरवी मिरची ,४-५ लिंबु, तेल ,दही, गुलाब जल.. मसाले : आले-लसुण, तेजपान, दालचिनी, बाजा, काळी मीरी,जिरे, .लवंग,, हिरवी व काळी विलायची, ..धणे पुड, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ,लाल तिखट...पुदीना... कृती : सर्वात आधी बिर्याणी मसाल्याची तयारी करुन घेऊ.. त्यासाठी कांदे अगदी बारीक चिरुन घ्या.. Image removed. त्यानंतर टमाटेही चिरुन घ्या..अगदी बारीक हं.. Image removed. त्यानंतर चिरलेले गाजर आणि फ्लॉवर थोडावेळ पाण्यात राहुद्या म्हणजे ककाही माती वैगैरे लागली असेल तर ती निघुन जाईल.. नंतर त्याना थोड्या तेलात तळुन घ्या.. Image removed. त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या.. आणि लिंबुही चिरुन घ्या.. Image removed. चिरलेल्या लिंबुंचा एका वाटीत रस काढुन ठेवा..[त्यातुन बिया काढुन घ्यायच्या विसरु नका हं.] Image removed. आलं-लसुणची बारीक पेस्ट करुन घ्या.. Image removed. आता बिर्यानी साठी भात बनवुन घेऊ.. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा..पाणी गरम झाल्यावर त्यात थोडे तेल..मीठ चवीप्रमाणे आणि मसाल्यांमधुन बाजा आणि दालचिनी टाका.. आणि उकळत्या पाण्यात धुतलेला अखंड बासमती तांदुळ ३ वाटी टाकुन झाकण ठेवुन द्या.. Image removed. भात पुर्ण शिजु न देता साधारण ८० % शिजल्यावर तो गॅस वरुन उतरवुन घेऊन, त्यातील पाणी चाळुन घ्या आणि ताटांमध्ये मोकळा करुन ठेवा..म्हणजे तो त्यातील वाफेने पुर्ण शिजणार नाही.. Image removed. आता बिर्याणी साठी मसाला बनवुन घेऊ.. (आधी साहित्य तयार करुन ठेवल्याने आता कष्ट कमी पुरतील..) कढीत थोडे तेल टाकुन ते तापल्यावर... फोडणीसाठी जिरे टाकुन घ्या.. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, दालचिनी, बाजा, तेजपान, काळे मिरे..हिरवी काळी विलायची हे टाकुन थोडे चाळत रहा.. Image removed. कांदा थोडा तांबुस-सोनेरी रंगावर आला की त्यात टमाटे घाला..आणि चाळुन घ्या.. Image removed. त्यात आता हळद, धणे पूड, चवीनुसार मीठ..बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालुन घ्या.. Image removed. बनलेल्या मसाला बराच कडक आहे..त्याला थोडा माईल्डनेस येण्यासाठी क्रीम किंवा दही घालु शकता.. Image removed. आता मसाल्यात डीपफ्राय केलेल्या भाज्या घाला..फ्लॉवर, गाजर, घेवडा... Image removed. ही झाली पुर्वतयारी .. आपण आत्तापर्यंत ८०% शिजलेला भात आणि बिर्याणीचा मसाला बनवुन ठेवल्या.. आता खरी कृती चालु होतेय.. बिर्याणीला दम देणे.. प्रथम एक जाड बुडाचे पातेले[भांडे] घ्या.. त्यात पुर्वी बनवुन ठेवलेल्या बिर्याणी मसाल्यातील अर्धा मसाला व्यवस्थित पसरवुन घ्या.. त्यावर थोडीशी कोथिंबिरही पेरा.. Image removed. आणि स्लीट मारलेली हिरवी मिरचीही.. (उभी कापलेली) Image removed. त्यावर ८० % शिजलेल्या अखंड बासमती भाताचा एक थर द्या..साधारण निम्मा भात वापरुन घ्या.. त्यातील शिजताना टाकलेले अक्खे गरम मसाले काढुन घ्या.. त्यावर लिंबाचा र व गुलाबपाणी शिंपडा..आणि पुदिन्याची पाने, उभ्या चिरलेल्य मिरच्या पेरुन टाका.. Image removed. त्यावरुन परत एक बिर्याणी मसाल्याचा थर द्या.. Image removed. वरच्या थराला पण समान कृती करा.. आता सर्व थर लावुन झाल्यावर ह्या भांड्याला वरच्या बाजुला कणकेचा जाड थर लावुन घ्या.. आणि त्यावर झाकण घट्ट लावा..म्हणजे व्यवस्थित दम बसेल... भात ८०% शिजलेला असल्याने त्याला जास्त उष्णतेची गरज नाहीये.. त्यामुळे जाड तवा घेऊन तो गॅस वर तापवुन घ्या..मग हे कणकेने पॅक केलेल्या झाकणाचे भांडे तव्यावर ठेवा..अर्ध्या मिनिटानंतर गॅस मंद आचेवर करुन १० मिनिटांनी बंद करा.. त्यानंतर झाकण उघडुन मस्त चळुन घ्या.. व्हेज दम बिर्याणीचा सुंदर घमघमाट सुटलेला आहेच...लगेच गरमागरम बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार.... सोबत तोंडी लावायला बुंदी रायता पण घेऊ शकता बरंका.. Image removed. टीप : प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..

वाचन 28999 प्रतिक्रिया 83