व्हेज दम बिर्याणी..
दम बिर्याणी..[व्हेज]
साहित्य : ४-५ कांदे, कोथिंबिर आणि ३-४ टमाटे, २५० ग्रॅम फ्लॉवर,३-४ गाजर,हिरवी मिरची ,४-५ लिंबु, तेल ,दही, गुलाब जल..
मसाले : आले-लसुण, तेजपान, दालचिनी, बाजा, काळी मीरी,जिरे, .लवंग,, हिरवी व काळी विलायची, ..धणे पुड, हळद, मीठ, बिर्याणी मसाला ,लाल तिखट...पुदीना...
कृती :
सर्वात आधी बिर्याणी मसाल्याची तयारी करुन घेऊ..
त्यासाठी कांदे अगदी बारीक चिरुन घ्या..
त्यानंतर टमाटेही चिरुन घ्या..अगदी बारीक हं..
त्यानंतर चिरलेले गाजर आणि फ्लॉवर थोडावेळ पाण्यात राहुद्या म्हणजे ककाही माती वैगैरे लागली असेल तर ती निघुन जाईल.. नंतर त्याना थोड्या तेलात तळुन घ्या..
त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या.. आणि लिंबुही चिरुन घ्या..
चिरलेल्या लिंबुंचा एका वाटीत रस काढुन ठेवा..[त्यातुन बिया काढुन घ्यायच्या विसरु नका हं.]
आलं-लसुणची बारीक पेस्ट करुन घ्या..
आता बिर्यानी साठी भात बनवुन घेऊ..
त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा..पाणी गरम झाल्यावर त्यात थोडे तेल..मीठ चवीप्रमाणे आणि मसाल्यांमधुन बाजा आणि दालचिनी टाका..
आणि उकळत्या पाण्यात धुतलेला अखंड बासमती तांदुळ ३ वाटी टाकुन झाकण ठेवुन द्या..

भात पुर्ण शिजु न देता साधारण ८० % शिजल्यावर तो गॅस वरुन उतरवुन घेऊन, त्यातील पाणी चाळुन घ्या आणि ताटांमध्ये मोकळा करुन ठेवा..म्हणजे तो त्यातील वाफेने पुर्ण शिजणार नाही..
आता बिर्याणी साठी मसाला बनवुन घेऊ..
(आधी साहित्य तयार करुन ठेवल्याने आता कष्ट कमी पुरतील..)
कढीत थोडे तेल टाकुन ते तापल्यावर... फोडणीसाठी जिरे टाकुन घ्या..
जिरे तडतडायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, दालचिनी, बाजा, तेजपान, काळे मिरे..हिरवी काळी विलायची हे टाकुन थोडे चाळत रहा..
कांदा थोडा तांबुस-सोनेरी रंगावर आला की त्यात टमाटे घाला..आणि चाळुन घ्या..
त्यात आता हळद, धणे पूड, चवीनुसार मीठ..बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालुन घ्या..
बनलेल्या मसाला बराच कडक आहे..त्याला थोडा माईल्डनेस येण्यासाठी क्रीम किंवा दही घालु शकता..
आता मसाल्यात डीपफ्राय केलेल्या भाज्या घाला..फ्लॉवर, गाजर, घेवडा...
ही झाली पुर्वतयारी ..
आपण आत्तापर्यंत ८०% शिजलेला भात आणि बिर्याणीचा मसाला बनवुन ठेवल्या..
आता खरी कृती चालु होतेय..
बिर्याणीला दम देणे..
प्रथम एक जाड बुडाचे पातेले[भांडे] घ्या..
त्यात पुर्वी बनवुन ठेवलेल्या बिर्याणी मसाल्यातील अर्धा मसाला व्यवस्थित पसरवुन घ्या..
त्यावर थोडीशी कोथिंबिरही पेरा..
आणि स्लीट मारलेली हिरवी मिरचीही.. (उभी कापलेली)
त्यावर ८० % शिजलेल्या अखंड बासमती भाताचा एक थर द्या..साधारण निम्मा भात वापरुन घ्या..
त्यातील शिजताना टाकलेले अक्खे गरम मसाले काढुन घ्या..
त्यावर लिंबाचा र व गुलाबपाणी शिंपडा..आणि पुदिन्याची पाने, उभ्या चिरलेल्य मिरच्या पेरुन टाका..
त्यावरुन परत एक बिर्याणी मसाल्याचा थर द्या..
वरच्या थराला पण समान कृती करा..
आता सर्व थर लावुन झाल्यावर ह्या भांड्याला वरच्या बाजुला कणकेचा जाड थर लावुन घ्या..
आणि त्यावर झाकण घट्ट लावा..म्हणजे व्यवस्थित दम बसेल...
भात ८०% शिजलेला असल्याने त्याला जास्त उष्णतेची गरज नाहीये..
त्यामुळे जाड तवा घेऊन तो गॅस वर तापवुन घ्या..मग हे कणकेने पॅक केलेल्या झाकणाचे भांडे तव्यावर ठेवा..अर्ध्या मिनिटानंतर गॅस मंद आचेवर करुन १० मिनिटांनी बंद करा..
त्यानंतर झाकण उघडुन मस्त चळुन घ्या..
व्हेज दम बिर्याणीचा सुंदर घमघमाट सुटलेला आहेच...लगेच गरमागरम बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार....
सोबत तोंडी लावायला बुंदी रायता पण घेऊ शकता बरंका..

टीप : प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..
प्रतिक्रिया
खतरनाक ! वर्णन व फोटो.
किती "इनवॉल्व्ह" होवून लिहिली आहे !
लाजवाब !
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
धन्यु..! करुन पाहिली की
धन्यु..! करुन पाहिली की अभिप्राय कळवा..खव मध्ये..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
आणी ही बिर्याणी लोकांना 'दम'
आणी ही बिर्याणी लोकांना 'दम' घालुन खायला लावा !!!
किंवा आणी ही बिर्याणी
किंवा आणी ही बिर्याणी लोकांना दमाने खायला सांगा
स्वप्निलघायाळ आणि sagarpdy
स्वप्निलघायाळ आणि sagarpdy तशी काही गरज पडतच नाही हो..
लोकं वासानेच दुरवरुन उडत येतात...
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
जियो! डावखुरेसाहेब जियो!
जियो! डावखुरेसाहेब जियो!
जबरा !!!आवडली दम
जबरा !!!
आवडली दम बिर्याणी.
दही/क्रीममुळे रंग थोडा फिका झाला आहे. मसाल्यात लाल तिखटाच प्रमाण वाढवुन समतोल साधला जाईल.
बाकी तुमची मिरच्यांच्या बाबतीत 'ऐपत' बरीच दिसते.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
जबरा !!! आवडली दम
धन्यु..
तुम्हाला आवडेल तसे..

तुम्ही त्यात माहीर आहात..
काका अहो मिरच्या चवीपुरत्याच आहेत..नंतर काढल्या जातात..
किंवा त्या पुर्ण असल्याने खातांना काढल्या जातात..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
झकास वर्णन
झकास वर्णन, पण फोटू दिसत नाहीत
बिर्याणीचं सोडा
पन वो भाजी जो दम के लिये बिछायी उसने हमकी जान लेली.
जाड बुडाच्या पातेल्या मधले रिफ्लेक्शन/भरीवपणा जबरदस्त.
बिर्याणी मस्तच असणार ही खात्री. "डावखुरा" यांची "उजवी" पाकृ.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
पन वो भाजी जो दम के लिये
कातिल आलाय तो फोटु..
म्हणुनच जरा मोठा टाकलाय..
धन्यु...
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
कसाबलाही हीच बिर्याणी देतात
कसाबलाही हीच बिर्याणी देतात का हो?
माझी पिसाळलेला हत्ती,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.
हा वदग्रस्त विषय होऊ
हा वदग्रस्त विषय होऊ शकेल..
पण तस्सा चान्स मिळाला..समजा सोनिया आजींनी बोलावलेच तर त्याला ह्या बिर्याणीनेच फासाला लटकवेल[म्हण्जे यमसदनी जाण्याची व्यवस्था करेल] नक्की..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
छान रेसीपी..आणि फोटोज..:)
छान रेसीपी..आणि फोटोज..
अभिनंदन!!
जीव गेला हो पाकृ बघुन. १०० /
जीव गेला हो पाकृ बघुन. १०० / १०० तुम्हाला या मादक बिर्याणीसाठी
********************************************
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
"मादक" ही उपमा पाकृ साठी जगात
"मादक" ही उपमा पाकृ साठी जगात पहिल्यांदाच वापरली गेली असेल नाही?
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
@प्रतिक्रिया द्यायला कंजुसी
@प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..>>> उरलेला दम इथे दिलात काय...?
एकदम आचारी श्टाइल बिर्याणी हां..!

आणी शेवट्ची ती दम देणारी स्मायली,,, आंम्ही आमच्या भांडारात नेऊन ठेवली बरं का...!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
बस नाम ही काफि है। 
अत्रुप्त...!
नाय हो मालक..ते असंच..आपला
नाय हो मालक..ते असंच..आपला मिपाकरांवर असलेला थोडाफार हक्क बजावला..
तुमची स्मायली फार भन्नाट आहे..स्पून हातात ठेवुन सरळ तोंड बुचकळुन चालु पडलीय..
हहपुवा झाली..आणि जेव्हा पाहतो तेव्हा अजुनही होते..
धन्यु..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
अक्षय- मस्त रे. तुझ्याकडे ही कला आहे--
हे यामुळे कळले. आता चालू ठेव.
पण " प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका.." असा दम नको भरूस. मिपाकर प्रतिक्रीया देतीलच.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
काका आधीपण तुम्ही पाकृ
काका आधीपण तुम्ही पाकृ पाहिल्यात की माझ्या..
पण बर्राच ग्याप होता म्हणा..मध्ये
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
बिर्याणी हा जीव-की-प्राण ह्या
बिर्याणी हा जीव-की-प्राण ह्या प्रकारातला, त्यामुळे तुमची ही पाककृती निश्चीतच आवडली. पण अहो केवढ्या त्या हिरव्या मिरच्या हो... बाप रे... म्हणजे ते असतं ना असं की गुप्त-धनाचा हंडा समोर आहे पण त्यावर तो नागोबा वेटोळा घालून बसलाय ... तसं ते मिरच्या पाहून झालं हो...
)
(सध्या एक हिरवी मिरची जरी खाल्ली तरी .......... जाऊ द्या काय काय सांगायचं आता
------------------------------------------------
मनं वढाय वढाय.....
सही रे
एकदम सही रे भिडू! हैदराबादी दम बिर्याणी अगदी अशीच बनवतात!
मस्त
मस्त आणि काहीशी झणझणीत वाटतेय बिर्याणी !!
www.mejwani.in
वाह वाह वाह !
जियो डावखरे शेठ !
पाकृ तुफान आवडली आहे एकदम. फोटो देखील एकदम 'लालच आहा लपलप' आले आहेत.
बाकी काली विलायची म्हणजे मसाला विलायची का ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
हो बरोब्बर ओळखले..मसाला
हो बरोब्बर ओळखले..मसाला विलायचीच...
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
मस्तच
खूप छान रेसिपी.
भलतेच उत्साही दिसताय.
भलतेच उत्साही दिसताय.
सुंदर, सादरीकरण अप्रतिम.
सुंदर, सादरीकरण अप्रतिम. नक्की करून बघेन .
बाजा म्हण्जे काय ?
पुष्करिणी
मस्तच हो.
एकदम डिट्टेल मधी लिहिलेली मस्तच पाकृ.
डावखुरे मालक पाकृ एक्दम उजवी.
बाजा म्हण्जे काय ?
खरेच बाजा म्हणजे काय हो ?
..........................................................................
........सासको खिलाये चटनी
♥
♥ मेरी प्यारी पत्नी
फोटो वरून बाजा म्हणजे स्टार फूल असावं..
बाजा म्हणजे स्टार फूल (Star-anise) असावं असं वाटतं, (स्टार फूल म्हणजे मराठीत काय?)
बाकी पाककृती कातिल आहे! वाचनखूण साठवली आहे.
चक्रफूल. बाकी बिर्याणी मस्तच.
चक्रफूल.
बाकी बिर्याणी मस्तच. पण मिरच्या वगळूनच करावी लागेल.
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
अगदी बरोबर..त्यालाच खान्देशात
अगदी बरोबर..त्यालाच खान्देशात बाजा म्हणतात..म्हटलं बोली भाषेतलाच शब्द वापरु..
बाजा=चक्रफुल=Star-anise
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
बाद्यान.
त्या मसाल्याला (Star-anise) 'बाद्यान' असे म्हणतात.
चक्रीफुल, बदरामफुल (उत्तरप्रदेशात) अशी नांवेही ऐकली आहेत. 'बाजा' प्रथमच ऐकले.
बाजा हा अपभ्रंश असेल
बाजा हा अपभ्रंश असेल कदाचित..त्याला दगडफुल असेही नाव आहे..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
नाही.
त्याला दगडफुल असेही नाव आहे..
नाही. 'दगडफुल' हा मसाल्याचा सर्वस्वी वेगळा प्रकार आहे. तो एका बाजूने काळा एका बाजूने पांढरा आणि वाळलेल्या, चुरगळलेल्या छोट्या छोट्या पानांसारखा असतो.
नमस्कार, Star Anise म्हणजे
नमस्कार,
Star Anise म्हणजे दगड्फुल नव्हे. दगड्फुल इथे - किंवा इथे बघा.
बिर्याणी छान झालेली दिसते. मी केली तर खालील बदल करीन -
१. कांदा (उभा कापुन) वेगळा परतुन घेउन भाताचे थर रचतांना घालेन
२. टोमॅटोचा कमी वापर
धन्यवाद!
- पांथस्थ
| पाकृ : कुकींग विथ हार्ट | अनुदिनी: रानातील प्रकाश... | छायाचित्रे: फ्लिकर |
बरोबर.
बरोबर. तुम्ही दिलेल्या जोडणींमध्ये दाखविलेली दगडफुलाची छायाचित्रे बरोबर आहेत.
धन्यु..पांथस्था..आपल्याला
धन्यु..पांथस्था..आपल्याला एवढी डीप माहीती नाही बाजा मागितला की दुकानदार देतो..
हेच अपेक्षित आहे..>>>

----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
आहाहा... बाकी तुमचा गणपती
आहाहा...

बाकी तुमचा गणपती बाप्पा मस्त आहे.
मदनबाण.....
बैचेन हुई तोरे कारन... (Ther Perfumed Garden) Abhijit Pohankar
वा!
लय भारी!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
लै भारी. बिर्याणीवर तळलेला
लै भारी.
बिर्याणीवर तळलेला कुरकुरीत कांदा पसरला असतात तर अजून बहार आली असती.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
वाह मस्त
वाह
मस्त
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
मस्त.
लै भारी.
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
छान पा.क्रु...
मस्त वर्णन ..बिर्याणी आवडली.
कौशी
लाजवाब !!!
इतक्या नजाकतीने दिलेली बिर्याणी रेसीपी आजवर बघितली नाहि.
प्रचंड आवडेश.
अर्धवटराव
-रेडि टु थिंक
धन्यु..करुन पहा मग आता..
धन्यु..करुन पहा मग आता..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
मस्त डिश...
झक्कास..
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
भारी!!!
बिर्याणी पाहून कलेजा खल्लास झाला

काय झकास दिसत आहे राव
बाकी इतक्या मिरच्या बर्या झेपतात तुम्हाला
***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/
बाकी इतक्या मिरच्या बर्या झेपतात तुम्हाला
हा हा हा.
हेच म्हणायचे होते.
एकदम सहमत.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
डावखुरा'जी...... अप्र अप्र
डावखुरा'जी...... अप्र अप्र अप्र अप्र अप्र अप्रतिम!!!... गॉर्जिअस!!!.... इतकी साग्रसंगीत प्रोजेक्टेड डीटेल्ड स्ट्रॅटेजिकल बिर्याणी पाहूनच मन भरलं!!!... आणि "व्हेज बिर्याणी" इतकी सुन्दर दिसूही शकते... हे नव्यानेच कळले!!!!
कीप इट अप!!!!
कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
मस्तच!
खत्रा पाकृ!
लिंबं आणि मिरच्याचं प्रमाण बघून वाटलं बिर्याणी तयार झाल्यावर त्यातल्याच काही बांधायच्या की काय?
__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!
दादा... दंडवत स्वीकारा !!!
>>लिंबं आणि मिरच्याचं प्रमाण बघून वाटलं बिर्याणी तयार झाल्यावर त्यातल्याच काही बांधायच्या की काय ?
- फुटलो
अर्धवटराव
-रेडि टु थिंक
लिंबु-मिरची
त्या मिरच्या बारीक चिरुन न घातल्याने नंतर काढुन टाकण्यात येतात ..दम देतो तेव्हा पुरेसा तिखटपणा मिळतो..आणि मुळात त्या मिरच्या गावराणी नसल्याने फार तिखट नाहीत..
आणि ५-६ लोकांच्या बिर्याणीस ३ लिंब काही जास्त नाहीत..असे वाटते..सोबत पुदीना आणि गुलाबजल असल्याने त्याची तीव्रता कमी होत असावी..
बिर्याणीची टेस्ट अतिशय झकास असुन शक्यतो काही बदल न करता करुन पहावी..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
मातस्य ग्राम्यम...
मातस्य ग्राम्यम...
कसला जाळ बिर्याणी बनलीये साहेब
कोपरापासून __/\__
फोटो थोडे मोठे चालले असते, असो इनो घेतो आता
***************************************
- मन्या फेणे
जळजळ...
जळजळ...
या असल्या पाककृती करणार्यांना किडनॅप करता आले तर भारी मजा येईल..
बाब्बो...
खतरनाक ,पण झक्कास.
@ मोदक यांच्याशी १०० + बाडीस.
मिपावरील सर्व "सुग्रीव"* नां किडनॅप करुन एक मिपा कट्टा करावा हे आयोजकानां नम्रपणे सुचवतो.
"सुग्रीव"*- हा शब्द मिपावरच वाचनात आला.
नि३
कधी येऊ रे.. पुन्हा एकदा
कधी येऊ रे.. पुन्हा एकदा बनवायला आणि हादडायलासुद्धा...
- पिंगू
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
मस्त रे भावड्या
खायला घालताना कंजुषी करु नकोस्........मग आम्हाला पोवाडे गायला कंटाळा येणार नाही.
एलदम खतरा बिर्याणी आहे राव.....
वेताळ
मस्त..........
मस्त..........
--मराठी अन्ना
दम दमा दम.....! मस्तच.
दम दमा दम.....!
मस्तच.
________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं
लय दमादमानं वाचली पाकृ अन दम
लय दमादमानं वाचली पाकृ अन दम लागला. आता बनवतांना आनखी जास्त दम लागलं अन खातांनापन दमादमानंच खावं लागलं बाबा. काय करीतो!
एकुणच निगुतीनं करायची पाकृ आहे. सगळा सरंजाम गोळा करून आपण केलेली ताटली फारच छान आहे. वादच नाही.
आणखीही पाकृ येवू द्या.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
सर्वप्रथम धन्यवाद... अजु
सर्वप्रथम धन्यवाद...
अजु भरपुर पाकृ देणार आहे..
आधीच्या पाकृंवर पण नजर फिरवुन या..
आणि करुन पाहिल्यावर पण कशी झाली होती ते कळु द्या.. खव तुन..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
केवळ जब्रा.
जब्रा. आज रैवारचा योग पाकृतीला जुळुन यावा.
-दिलीप बिरुटे
मग केली होती का बिर्याणी?
मग केली होती का बिर्याणी?
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
वाचनखुण साठवलीये. १-२ दिवसात
वाचनखुण साठवलीये. १-२ दिवसात करणार.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
निव्वळ अप्र्तिम
फोटो आणि वर्णन एकदम खल्ल्लास
मी बिर्यानी( व्हेज/नॉनव्हेज )करताना
१) कांदा उभा चिरुन खरपुस तळुन मग वापरतो.
२) तेला ऐवजी साजुक तुप घेतो.
३) गुलाब जल न वापरता मी रोज इसेन्स + केवडा इसेन्स + कोमट दुधात भिजवलेले केशर वापरतो.
४) क्वांटीटी वाढवायची असल्यास अथवा आवडत असल्यास बटाटा वापरावा.
अवांतर = फायनल बिर्यानी जास्ती ओलसर ( दाल खिचडी सारखी) का दिसतेय ?
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
मी बिर्यानी( व्हेज/नॉनव्हेज )करताना
>>मी बिर्यानी( व्हेज/नॉनव्हेज )करताना...
मालक , कधी भेटयात मग?
सहसा पाकृ विभाग उघडतसुद्धा
सहसा पाकृ विभाग उघडतसुद्धा नाही. पण इतक्या प्रतिक्रिया आलेल्या बघून म्हणलं एकदा हा धागा वाचूयाच. धागा उघडला अन डोळ्याचे पारणे फिटले.
मस्त प्रेझेंटेशन. आवडले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
नुसत डोळ्यांच? बाई मला तर इथे
नुसत डोळ्यांच?
बाई मला तर इथे बसुनच तीचा तिखटपणा जाणवतोय. स्स हाय! सुर्रेख . काय प्रेझेंटेशन आहे! मस्त.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
हा हा हा.
उघडला तर फक्त ह्या साठीच उघडत असशील ना.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
अतिशय धन्यवाद, नुसतं वाचुन
अतिशय धन्यवाद, नुसतं वाचुन प्रतिसाद द्यायला नको म्हणुन दिला नव्हता, काय घरी प्रयोग करुन पाहिला
थोडासा हसला, थोडासा रुसला, एकुण काय ३०% फसला, असो.
तुमचं प्रेझेंटेशन एकदम मस्त झालंय, मी मिरच्या आणि टोमॅटो अंमळ कमी घातले होते त्यामु़ळं गंडलं असावं बहुधा.
आता एकदा तुमच्याबरोबर करुन पहावी म्हणतो, कधी जमवाल ते बोला.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
क्वालिटी...!!
चार घटक गोळा करुन त्याचा शब्दशः गोळा करुन शिजवून गिचका करणं हे खूप सोपं..
पण निगुतीने कष्ट घेऊन समरस होऊन बनवलेला कोणताही पदार्थ हा नेहमीच अत्यंत स्वादिष्ट असतो. केवळ अलंकारिक अर्थानेच त्यात "हृदय" उतरलेलं असतं असं नाही तर प्रॅक्टिकलीही त्यात अचूक प्रोसेस आणि सर्व आवश्यक घटक नीट वापरले जाऊन क्वालिटी येतेच येते. आजी लोकांच्या पदार्थाची चव अजूनही लक्षात असण्यामागे फक्त नात्यातली भावना नसते.. त्यांचं स्वयंपाकातलं "प्रोफेशनलिझम" त्यात असतं. (त्या घरगुती असल्या तरी "प्रोफेशनलिझम" शब्द बरोबर आहे.) दगडफूल म्हणा किंवा एखादा बारीकसा वाटणारा इन्ग्रेडिएंट घरात नसेल तर पोरांना दुकानात पिटाळून तो आधी आणल्याखेरीज तो पदार्थ पूर्ण न करणार्या या व्यक्ती. तडजोड नको.. शॉर्टकट नामंजूर. अमुक एक चाकवताची पातळभाजी ताकातली बेष्ट लागते तर ताकातलीच करणार.. ताकाशिवाय आजचा दिवस भाजी उरकून टाकू हा भागच शक्य नाही. एकवेळ बेत रद्द करतील..पण करायचं तर सर्व जिन्नस हवेतच..
तशीच ही बिर्याणी.. शिवाय हे वाचून बनवू इच्छिणार्यालाही शंका न रहावी अशा रितीने जे काही तपशीलवार दाखवलं आहे त्याचा जवाब नाही.
असंख्य धन्यवाद.
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
तुमची प्रतिक्रिया वाचुन
तुमची प्रतिक्रिया वाचुन केलेल्या कष्टाचे सार्थक झाले...
धन्यु..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
जब्रा
खतरणाक. दम न दिलेली बिर्यानी खाणं एरवी पसंत असतं आपल्याला. पण हे प्रकरण पाहून सालं एकदा दमदार बिर्यानी बी खौन बघावी असं वाटायलंय आता.
__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion
खाऊनच बघा मग...एकदा.. हॉटेल
खाऊनच बघा मग...एकदा..
हॉटेल मॅनेजमेंट वाल्या भावाने जमवलीय ही बिर्याणी..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
मा र डा ला !!! अवांतर : हा
मा र डा ला !!!
अवांतर : हा गणपा किंवा दिपालीताईंचा ड्युआडी तर नाही ना
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
त्यांना खरंच डुप्लिकेट आयडीची
त्यांना खरंच डुप्लिकेट आयडीची गरज आहे का सुहासराव..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
सहीच!!
भारी!!
-
मस्त
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.
सुंदर..... मस्त वर्णन अन मस्त
सुंदर..... मस्त वर्णन अन मस्त फ़ोटो.... लवकरच करुन बघायला हवीय....
श्रद्धा
करा की मग पट्कन..वाट कुणाची
करा की मग पट्कन..वाट कुणाची बघताय..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
मस्त वर्णन ..बिर्याणी
मस्त वर्णन ..बिर्याणी आवडली.
अवांतरः आय डी डावखुरा आणि कांदा उजव्या हातानी का कापताय?
डावखुर्याने फोटो
डावखुर्याने फोटो काढलाय...कांदा भावाने चिरला..
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच