व्हेज दम बिर्याणी..
त्यानंतर टमाटेही चिरुन घ्या..अगदी बारीक हं..
त्यानंतर चिरलेले गाजर आणि फ्लॉवर थोडावेळ पाण्यात राहुद्या म्हणजे ककाही माती वैगैरे लागली असेल तर ती निघुन जाईल.. नंतर त्याना थोड्या तेलात तळुन घ्या..
त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या.. आणि लिंबुही चिरुन घ्या..
चिरलेल्या लिंबुंचा एका वाटीत रस काढुन ठेवा..[त्यातुन बिया काढुन घ्यायच्या विसरु नका हं.]
आलं-लसुणची बारीक पेस्ट करुन घ्या..
आता बिर्यानी साठी भात बनवुन घेऊ..
त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा..पाणी गरम झाल्यावर त्यात थोडे तेल..मीठ चवीप्रमाणे आणि मसाल्यांमधुन बाजा आणि दालचिनी टाका..
आणि उकळत्या पाण्यात धुतलेला अखंड बासमती तांदुळ ३ वाटी टाकुन झाकण ठेवुन द्या..
भात पुर्ण शिजु न देता साधारण ८० % शिजल्यावर तो गॅस वरुन उतरवुन घेऊन, त्यातील पाणी चाळुन घ्या आणि ताटांमध्ये मोकळा करुन ठेवा..म्हणजे तो त्यातील वाफेने पुर्ण शिजणार नाही..
आता बिर्याणी साठी मसाला बनवुन घेऊ..
(आधी साहित्य तयार करुन ठेवल्याने आता कष्ट कमी पुरतील..)
कढीत थोडे तेल टाकुन ते तापल्यावर... फोडणीसाठी जिरे टाकुन घ्या..
जिरे तडतडायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा, दालचिनी, बाजा, तेजपान, काळे मिरे..हिरवी काळी विलायची हे टाकुन थोडे चाळत रहा..
कांदा थोडा तांबुस-सोनेरी रंगावर आला की त्यात टमाटे घाला..आणि चाळुन घ्या..
त्यात आता हळद, धणे पूड, चवीनुसार मीठ..बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालुन घ्या..
बनलेल्या मसाला बराच कडक आहे..त्याला थोडा माईल्डनेस येण्यासाठी क्रीम किंवा दही घालु शकता..
आता मसाल्यात डीपफ्राय केलेल्या भाज्या घाला..फ्लॉवर, गाजर, घेवडा...
ही झाली पुर्वतयारी ..
आपण आत्तापर्यंत ८०% शिजलेला भात आणि बिर्याणीचा मसाला बनवुन ठेवल्या..
आता खरी कृती चालु होतेय..
बिर्याणीला दम देणे..
प्रथम एक जाड बुडाचे पातेले[भांडे] घ्या..
त्यात पुर्वी बनवुन ठेवलेल्या बिर्याणी मसाल्यातील अर्धा मसाला व्यवस्थित पसरवुन घ्या..
त्यावर थोडीशी कोथिंबिरही पेरा..
आणि स्लीट मारलेली हिरवी मिरचीही.. (उभी कापलेली)
त्यावर ८० % शिजलेल्या अखंड बासमती भाताचा एक थर द्या..साधारण निम्मा भात वापरुन घ्या..
त्यातील शिजताना टाकलेले अक्खे गरम मसाले काढुन घ्या..
त्यावर लिंबाचा र व गुलाबपाणी शिंपडा..आणि पुदिन्याची पाने, उभ्या चिरलेल्य मिरच्या पेरुन टाका..
त्यावरुन परत एक बिर्याणी मसाल्याचा थर द्या..
वरच्या थराला पण समान कृती करा..
आता सर्व थर लावुन झाल्यावर ह्या भांड्याला वरच्या बाजुला कणकेचा जाड थर लावुन घ्या..
आणि त्यावर झाकण घट्ट लावा..म्हणजे व्यवस्थित दम बसेल...
भात ८०% शिजलेला असल्याने त्याला जास्त उष्णतेची गरज नाहीये..
त्यामुळे जाड तवा घेऊन तो गॅस वर तापवुन घ्या..मग हे कणकेने पॅक केलेल्या झाकणाचे भांडे तव्यावर ठेवा..अर्ध्या मिनिटानंतर गॅस मंद आचेवर करुन १० मिनिटांनी बंद करा..
त्यानंतर झाकण उघडुन मस्त चळुन घ्या..
व्हेज दम बिर्याणीचा सुंदर घमघमाट सुटलेला आहेच...लगेच गरमागरम बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार....
सोबत तोंडी लावायला बुंदी रायता पण घेऊ शकता बरंका..
टीप : प्रतिक्रिया द्यायला कंजुसी करु नका..
In reply to खतरनाक ! वर्णन व फोटो. by तर्री
In reply to आणी ही बिर्याणी लोकांना 'दम' by स्वप्निल घायाळ
In reply to किंवा आणी ही बिर्याणी by sagarpdy
In reply to जबरा !!!आवडली दम by गणपा
जबरा !!! आवडली दम बिर्याणी.धन्यु..
दही/क्रीममुळे रंग थोडा फिका झाला आहे. मसाल्यात लाल तिखटाच प्रमाण वाढवुन समतोल साधला जाईल.तुम्हाला आवडेल तसे.. तुम्ही त्यात माहीर आहात.. :)
बाकी तुमची मिरच्यांच्या बाबतीत 'ऐपत' बरीच दिसते. ;)काका अहो मिरच्या चवीपुरत्याच आहेत..नंतर काढल्या जातात.. किंवा त्या पुर्ण असल्याने खातांना काढल्या जातात..
In reply to बिर्याणीचं सोडा by इरसाल
पन वो भाजी जो दम के लिये बिछायी उसने हमकी जान लेली. जाड बुडाच्या पातेल्या मधले रिफ्लेक्शन/भरीवपणा जबरदस्त.कातिल आलाय तो फोटु.. म्हणुनच जरा मोठा टाकलाय.. ;)
बिर्याणी मस्तच असणार ही खात्री. "डावखुरा" यांची "उजवी" पाकृ.धन्यु...
In reply to कसाबलाही हीच बिर्याणी देतात by पुण्याचे वटवाघूळ

In reply to जीव गेला हो पाकृ बघुन. १०० / by मृत्युन्जय
In reply to @प्रतिक्रिया द्यायला कंजुसी by अत्रुप्त आत्मा
In reply to अक्षय- मस्त रे. तुझ्याकडे ही कला आहे-- by चिंतामणी
In reply to वाह वाह वाह ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्तच हो. by अभ्या..
In reply to फोटो वरून बाजा म्हणजे स्टार फूल असावं.. by बहुगुणी
In reply to चक्रफूल. बाकी बिर्याणी मस्तच. by कवितानागेश
In reply to अगदी बरोबर..त्यालाच खान्देशात by डावखुरा
In reply to बाद्यान. by प्रभाकर पेठकर
In reply to बाजा हा अपभ्रंश असेल by डावखुरा
In reply to बाजा हा अपभ्रंश असेल by डावखुरा
In reply to नमस्कार, Star Anise म्हणजे by पांथस्थ
In reply to नमस्कार, Star Anise म्हणजे by पांथस्थ
In reply to लाजवाब !!! by अर्धवटराव
In reply to भारी!!! by सानिकास्वप्निल
In reply to बाकी इतक्या मिरच्या बर्या झेपतात तुम्हाला by चिंतामणी
In reply to मस्तच! by दादा कोंडके
In reply to लय दमादमानं वाचली पाकृ अन दम by पाषाणभेद
In reply to केवळ जब्रा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to निव्वळ अप्र्तिम by jaypal
In reply to सहसा पाकृ विभाग उघडतसुद्धा by अन्या दातार
In reply to सहसा पाकृ विभाग उघडतसुद्धा by अन्या दातार
In reply to क्वालिटी...!! by गवि
In reply to जब्रा by रमताराम
In reply to मा र डा ला !!! अवांतर : हा by सुहास..
In reply to सुंदर..... मस्त वर्णन अन मस्त by श्रद्धा.
In reply to मस्त वर्णन ..बिर्याणी by नावातकायआहे
खतरनाक ! वर्णन व फोटो.