आवडणारे ब्लॉग्स

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Sep 2012 - 3:04 am

मिसळपाववरती गाण्यांचे धागे खूप येऊन गेले आहेत. अमकी अमकी गाणी आवडतात,वेडावतात वगैरे. पण कोणत्या साईटस्/ब्लॉग्स मिपाकरांना आवडतात आणि का याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या आवडनिवडीत, ब्लॉग्सच्या यादीत ही भर पडेल - हे मुख्य. :-D

माझी आवडते ब्लॉग्स सांगते. मला पुढील साईट्स्/ब्लॉग्स नितांत आवडतात -
(१) http://www.psychologytoday.com/
मानसशास्त्रावर आधारीत लेखांचा हा एक फार मोठा खजिनाच आहे. यातही अनेक विभाग आहेत - आनंद, आरोग्य, निराशा, लैंगिकता, राजकारण , झोप वगैरे. रोज या ब्लॉगवर एकदा तरी फेरी होतेच.

(२) http://kavitabhavlelya.blogspot.com/
हा मराठी कवितांचा ब्लॉग मस्त आहे. खूप सुंदर , न वाचलेल्या कविता मला येथे मिळाल्या.

(३) http://www.authorsden.com/
इंग्रजी कविता या ब्लॉगवरती आहेत. पैकी E. W. richardson आणि myrna badgerow हे माझे विशेष आवडते कवि/कवयित्री.
http://www.rumi.org.uk/ - रुमी कवितांचा हा ब्लॉगही खूपच आवडतो.

(४) http://subhashite.blogspot.com/
अनेक संस्कृत सुभाषितांचा येथे संग्रह आढळेल.

(५) http://www.anubhuti-hindi.org/kavi.htm आणि http://www.kavitakosh.org/ हे दोन ब्लॉग्स हिंदी कवितांकरता फारच उत्तम आहेत.

(६) http://astrology-numerology.com/ - जर कुंडली माहीत असेल तर स्वभाव आदि पहाण्यासाठी हा ब्लॉग उपयुक्त आहे. तर मूळ कुंडली मांडण्याकरता - http://www.indiapress.org/horoscope/rishicalc.html हे पान

(७) स्तोत्रांकरता - http://sanskritdocuments.org/ बेस्ट!!!

"पैस/बचत" या विषयावर एक खूप उपयुक्त ब्लॉग एका स्नेह्यांनी सांगीतला होता पण आत्ता आठवत नाही. नंतर प्रतिसादात लिहीन.

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

इतक्या प्रकारचे ब्लॉग्ज आहेत हेच माहित नव्हते.
आता समजले म्हणून फेरफटका मारीन असे नाही.
मिपावरही काही सदस्य सहीत त्यांच्या ब्लॉगची माहिती देतात.
एखाद् दुसर्‍या वेळेला गेले असीन, पण एकूणात नाहीच.

पैसा's picture

7 Sep 2012 - 8:57 pm | पैसा

ब्लॉज्ग आहेत हे माहिती होतं, पण शोधायचा टंकाळा. इथे आयत्याच लिंका दिल्याबद्दल धन्यवाद!