स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)

स्त्रियांना नक्की काय हवे असते?

हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. ****

तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.****

****

त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात...
जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते. आणि जर वर्षानंतर त्याच्याकडे उत्तर नसेल तर त्याला फासावर चढवण्यात येणार होते.****

****

प्रश्न होता : स्त्रियांना नक्की काय हवे असते?****

****

अशा प्रश्नाने खरे तर अत्यंत बुद्धिमान माणूसही गोंधळून गेला असता. तरुण आर्थरसाठी तर याचे उत्तर शोधणे अशक्यप्राय होते; पण मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा उत्तर शोधणे जास्त सोयीस्कर होते, म्हणून त्याने राजाचे आव्हान स्वीकारले. तो त्याच्या राज्यात परतला आणि त्याने सर्वांना हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. राजकुमारी, राजगुरू, बुद्धिवंत आणि अगदी दरबारी विदूषकालादेखील त्याने हा प्रश्न विचारला. मात्र, एकाकडेही त्याचे समाधान होईल असे उत्तर नव्हते.****

****

अनेक जणांनी त्याला म्हाता-या चेटकिणीचा सल्ला घेण्याचे सुचवले. आता फक्त तीच याचे उत्तर देऊ शकेल, असे ब-याच जणांचे मत होते. मात्र, चेटकिणीने त्यासाठी खूप मोठी किंमत मागितली असती.****

****

असे होता होता शेवटी वर्षाचा अखेरचा दिवस उजाडला. आता आर्थरकडे चेटकिणीकडे जाऊन तिलाच या प्रश्नाचे उत्तर विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कबूल केले, मात्र, त्या आधी राजाला तिने मागितलेली किंमत चुकवण्याचे कबूल करावे लागणार होते.****

****

त्या म्हाता-या चेटकिणीला सर लॅन्सलोटशी लग्न करायचे होते! सर लॅन्सलोट म्हणजे राजाच्या खास माणसांमधील सर्वात प्रामाणिक व्यक्ती आणि मुख्य म्हणजे राजा आर्थरचा सर्वात जिवलग मित्र! आर्थर नुसत्या कल्पनेनेच शहारला. चेटकीण पाठीला कुबड आलेली आणि सुरकुतलेल्या चेह-याची म्हातारी होती. तिच्या तोंडात एकच दात होता. तिच्या अंगाला असह्य वास येई. तिला चित्रविचित्र आवाज काढण्याचीदेखील सवय होती. आर्थर राजाने त्याच्या उभ्या आयुष्यात असा नमुना पाहिला नव्हता.
त्याने आपल्या जिवलग मित्राच्या गळ्यात अशा चेटकिणीला बांधण्यास नकार दिला आणि जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी दर्शवली.****

****

लॅन्सलोटला जेव्हा ही अट समजली, तेव्हा त्याने तडक राजा आर्थरला गाठले आणि त्याला समजावले की, आर्थरच्या आयुष्यापुढे हा त्याग काहीच नाही व तो चेटकिणीशी लग्न करायला तयार आहे. अखेरीस लग्नाची जाहीरपणे घोषणा केली गेली आणि आर्थरने चेटकिणीला प्रश्न विचारला :****

****

‘तर, स्त्रियांना नेमके काय हवे असते?’****

****

चेटकीण म्हणाली, ‘*स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वत: घ्यायला हवे
असतात.’*****

****

राज्यातल्या प्रत्येकाला जाणवले की, चेटकिणीने खरोखरच खूप समर्पक असे उत्तर दिले आहे आणि आता आपल्या राजाचा जीव वाचणार. तसेच झाले. शेजारच्या राजाने आर्थर राजाला मुक्त केले आणि लॅन्सलोट व चेटकिणीचे लग्न धूमधडाक्यात झाले.****

****

मिलनाची घटिका जसजशी समीप येऊ लागली, तसा लॅन्सलोटने आता पुढे काय वाढून ठेवले आहे, असा विचार करत शयनकक्षात प्रवेश केला; पण शयनकक्षात पाऊल ठेवताच तो विस्मयचकित झाला. पलंगावर सुरकुतलेल्या, खंगलेल्या चेटकिणीच्या जागी एक सुंदर तरुण स्त्री बसली होती.****

****

आश्चर्यचकित झालेल्या लॅन्सलोटने तिला घडला प्रकार विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ती एका विद्रूप चेटकिणीच्या रूपात असतानादेखील लॅन्सलोट तिच्याशी आदराने आणि सौजन्याने वागला म्हणून यापुढे ती केवळ अर्धा दिवस विद्रूप चेटकिणीच्या रूपात वावरेल आणि उरलेला अर्धा दिवस सुंदर पत्नीच्या रूपात.****

****

‘तुम्हाला कसे आवडेल?’ तिने विचारले, ‘दिवसा सुंदर असणे की रात्री?’****

****

लॅन्सलोट क्षणभर अडखळला.****

****

दिवसा त्याला एक सुंदर पत्नी मिळाली असती, जिच्यासोबत तो समारंभांमध्ये मिरवू शकला असता; पण घरी परतल्यावर मात्र एका म्हाता-या चेटकिणीसोबत त्याला रात्र काढावी लागली असती.****

****

किंवा****

****

जर ती दिवसभर म्हातारी चेटकीण बनून वावरली असती तर त्याला एका सुंदर स्त्रीसोबत रात्री घालवता येणार होत्या.****

****

(जर तुम्ही पुरुष असाल तर) तुम्ही काय निवडले असते? ****

****

(जर तुम्ही स्त्री असाल तर) तुमच्या पतीने काय निवडले असते? ****

****

****

****

****

****

****

****

लॅन्सलोटने काय निवडले ते खाली दिलेलेच आहे; परंतु प्रथम तुमची निवड ठरवा आणि मग खाली पाहा.****

****

सर लॅन्सलोट हुशार होता. त्याला चेटकिणीने राजा आर्थरला दिलेले उत्तर आठवले.
त्याने उत्तर दिले की, त्या स्त्रीने स्वत:च ठरवावे की तिला कसे राहायचे आहे.**
**

****

हे ऐकल्यावर ती म्हणाली की ती सर्वकाळ सुंदर राहील. कारण लॅन्सलोटने तिला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते.****

****

तर, कथेचे सार काय?****

****

कथेचे सार असे आहे की,****

****

*प्रत्येक स्त्री कितीही सुंदर असली तरीही तिच्यामध्ये एक चेटकीण असते!****

****

*जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.****

****

जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तिच्या पद्धतीने; नाही तर कोणत्याच पद्धतीने नाही! :)****

****

(आधारित स्वैर अनुवाद)

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

स्वैर अनुवादही मस्त आहे.

मला स्वतःला लेखातील स्टार कमी करायला आवडतील.

नक्की

***
कोणत्या कथेचा

***
अनुवाद

***

आहे हा?
****

हेच
****
म्हणते
****

**
+१
**
**
असेच म्हणतो..
**
**

कुणाकडून तरी ऐकली होती

कॅन्टरबरी टेल्स मधील गोष्ट आहे ही.

प्रत्येक स्त्री कितीही सुंदर असली तरीही तिच्यामध्ये एक चेटकीण असते!
खी.खी.. खी... ;) चला आता पाशवी शक्ती हैदोस घालणार तर !
एखाद वेळेस स्त्री ची तुम्ही केलेली स्तुती त्या विसरतील पण अपमान मात्र बरोबर लक्षात ठेवतील ! जरा एखादीला तू चेटकीण आहेस / दिसतेस असे सांगुन तर बघा ! ;) नुसते काय गं चेटके असे जरी म्हंटले तरी ते कायमचे त्यांच्या स्मरणार राहणार याची खात्री. ;)

जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.
बिचार्‍या पुरुषांना कोण विचारतय ? त्यांनी फक्त मम म्हणायचे !

अवांतर :--- स्त्रियांना नक्की काय हवे असते?
त्यांना सगळच हव हव असतं ! पण उगाच नको म्हणायची सवय असते. ;)

+१

त्यांना सगळच हव हव असतं ! पण उगाच नको म्हणायची सवय असते.
बाबौ. लैच अणुभवी दिस्ताय ब्वॉ.

----------------------------------------------
@त्यांना सगळच हव हव असतं ! पण उगाच नको म्हणायची सवय असते. > प्रचंड,प्रचंड,अतिप्रचंड सहमत...

गुर्जी, तुम्हाला कसा काय अनुभव हो?

-(अंगात एक चेटूक असलेला) सोकाजी

@तुम्हाला कसा काय अनुभव हो?>>> मी सहमत म्हटलं... सहसंमत नै कै ;)

>>>त्यांना सगळच हव हव असतं ! पण उगाच नको म्हणायची सवय असते. Wink

खल्लास ! सहमत आहे. ;)

अवांतर - हा मदन बाण लैच हाणूभवी आहे,

......त्यांना सगळच हव हव असतं ! पण उगाच नको म्हणायची सवय असते.....
....या नाही म्हणण्यामागील एक रहस्य म्हणजे 'नको' म्हटल्यावर नवरोबाने ते घेण्यासाठी आग्रह करावा, आणि मग नाइलाजाने तुम्ही म्हणत आहात म्हणून घेते, तसे मला काही नको होते, असे उपकार केल्यासारखे वागण्यातील मजापण लुटायची असते.... आणि नवरा जर 'नको तर नको' असा असला, तर कसा दुष्ट नवरा पदरी पडला आहे... हे उगाळण्यातली मजा लुटायची असते....

धन्यवाद. होतकरूंना अशा टिपा लै उपयुक्त आहेत.

हं, टिपा गोळा करताय... दुसरी पायरी... छान छान, चालू दे 8)
फोटो काढून घेतले का?

ही ही ही अजून पाणपत लै लांब आहे हो योगिनीतै ;) पण तिथे जायचे तर उदगीरच्या मोहिमेपासून तयारी पाहिजेच ना ;)

मतदार यादीत नाव नोंदवलेस का रे? ;-)

रोहिणीत नाव नोंदव बरे

गप रे मादका आपलं मोदका!

अमोल खरे.

एक शेर आठवला -

बोसा देते नहीं और दिल है हर लह्ज़ा निगाह,
जी में कहते हैं कि मु़फ्त आए तो माल अच्छा है।

[बोसा - चुंबन ; लहजा निगाह - नजेरेने साधलेला संवाद ]

मुफ्त माल का ख़याल तो बहुत अच्छा है ;)

इस शेर पे ....

अननुभवी पण हुश्शार मदनबाणाशी सहमत.

अनुभवी इजुभौंशी सहमत ;)

कवटीशी हाडं क्रॉस करून सहमत.

सुलभ पर्‍याशी बाडिस.

स्कॉचच्या शेवटच्या थेंबापासुन पर्‍याशी सहमत

एखादं पुस्तक वाचुन काय *** समजणार !! ;)

कथेच्या सारामुळे पाशवी शक्ती तुम्हास सरणावर चढवणार आहेत असे अनुमान आहे :)

तुम्ही सुंदर स्त्रीला बुद्धीमान म्हणाल तर तो तिच्या सौंदर्याचा अपमान होतो म्हणे
पण जर तुम्ही बुद्धीमान स्त्रीला सुंदर म्हणालात तर तो तिच्या बुद्धीचा अपमान होत नाही.

बघा वरील वाक्या बुद्धीमान या ऐवजी चेटकीण आणि बुद्धी या ऐवजी चेटूक शक्ती असा बदल करून पहा .

अवांतरः मी एकदा असा प्रयोग करून पाहीला......त्या चेटकिणीचे स्त्रीचे रुपांतर सुंदर स्त्रीत झाले. आणि सुंदर स्त्री माझ्यासाठी कायमची चेटकीण झाली

अवांतरः मी एकदा असा प्रयोग करून पाहीला......त्या चेटकिणीचे स्त्रीचे रुपांतर सुंदर स्त्रीत झाले. आणि सुंदर स्त्री माझ्यासाठी कायमची चेटकीण झाली

विजुभौ,
जरा डिटेलवारी लिहा की तुमच्या प्रयोगाविषयी... कुणावर केलात ? कसा केलात? सामुग्री काय काय लागते? कृती काय वापरली? कुठल्या चेटकीणीवर केलात? मुळात तुम्हाला चेटकीण सापडली कुठे? तिचे साधारण कितपत सुंदर स्त्रीत रुपांतर झाले? नंतर ती तुमच्यासाठी चेटकीण का झाली? यात तुमचा काही हात आहे का? तुम्ही परत काही नविन प्रयोग करायला गेलात का काय तिच्यावर?

आधी : ननतरः असे फोटोही अपलोड करा.

जरा डिटेलवारी लिहा की तुमच्या प्रयोगाविषयी...
हो आज्ञा कीबोर्डवंद

तारे मिपा पर! ;)

विनोदाचा भाग सोडता गोष्ट आणि अनुवाद आवडले. फक्त सुरुवातीचं एक वाक्य थोडं चुकीचं वाटतंय.

(स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या.

हे (पुरुषांनो) जरा यावर विचार करा. (स्त्रियांनो ) कथेची मजा घ्या. असं केलं तर जास्त समर्पक नाही का होणार?

अगं पुरुष फक्त विचार करु शकतात किंवा श्वास घेऊ शकतात. अशा दोन्ही अपेक्षा कशा ठेवतेस? ;)

हेहेहे...
(नानांनी सांगितलंय खिक् केलेलं हल्ली बरं दिसत नाही, त्याएेवजी हेहेहे करावं.)

हीहीही .....( त्याच नानानी सांगितलं ,मुलिच्या जातीला ख्या ख्या ख्या केलेलं बरं दिसत नाई ,हीहीही करावं )

+१११११११११११११११

जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.****

****

जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तिच्या पद्धतीने; नाही तर कोणत्याच पद्धतीने नाही!

ही दोन्ही वाक्य बंडल आहेत ;)
काहीपण अट्ट्या सोड्ल्यात ;)

यालाच म्हणतात..
कोणाला कश्याच आणी बोढीला केसाचं ?
विधवा म्हणे मंगळ सुत्र केव्हढ्याला ?

*जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.****
'आणि तिच्या मताप्रमाणे वागू देतो तेव्हा तरी वेगळं काय घडतं मग?'..... असं आमचे बहुतेक विवाहित मित्र विचारतील असा अंदाज आहे.

गोष्ट म्हणून खूपच छान रंगविली आहे. मजा आली.

श्या! एव्हढे खडे असलेला भात ! कोण खाणार. जरा तांदुळ निवडायचे ना हो राघ साहेब. एव्हढा स्त्रीया हमखास येतील असा अंदाज करुन रांधलेला भात पण हे एव्हढाले खडे त्यात.

कथा कथा असते आणि वास्तव वास्तव....('वास्तव' हा शब्द 'विस्तव' ह्या शब्दाला जवळचा आहे, असे नाही वाटंत?)

आवडली. पण त्यातील फक्त दोन नंबराच्या साराशी सहमत.
माझा प्रॅक्टिकल अनुभव असा आहे की बायकोला तिच्या मतानुसार वागू द्यावे. कारण अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, मला वाटत असलेला निर्णय हा चुकीचा ठरला आणि निव्वळ, तिच्या मताप्रमाणे वागल्यामुळे आमची नांव आजतागायत खडतर मार्गाला लागलेली नाही. (हे बायकोला खूष करण्यासाठी लिहिले नाहीये, तर ही वस्तुस्थिती आहे.)

गोष्ट आवडली.***** धन्यवाद*****.

ह्यासाठीच तर आम्ही बंगळूर गावी असताना उपेक्षीत नवरे कमिटी स्थापीत केली होती.

स्वैर अनुवाद आवडला...

कथेचे सार तर मस्तच...

--
बाकी व. पु. काळेंचे एक वाक्य आठवले..

संसारात सर्व निर्णय बायकोला घेवु द्यावे, निर्णय बरोबर आला तर आपले काम झालेले असते, आणि निर्णय चुकला तरी आपल्या डोक्याला त्रास नसतो.

अंमलात कितीजणांनी आणली आहे खरं उत्तर मिळेल का?

या प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कौल विभाग सुरु करावा असे सुचवतो ;)

मला पण उत्सुकता आहे किती जण खरं बोलू शकतात याची.

हाताची घडी तोंडावर बोट.

कोण बोलेल त्याला मिळेल चोप.

चार क्षण सुखात गेले. :)

-दिलीप बिरुटे

कथेच सार :

प्रत्येक स्त्री कितीही सुंदर असली तरीही तिच्यामध्ये एक चेटकीण असते!

जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.

जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तिच्या पद्धतीने; नाही तर कोणत्याच पद्धतीने नाही!

कथेचा टर्निंग पॉइंट

लॅन्सलोटला जेव्हा ही अट समजली, तेव्हा त्याने तडक राजा आर्थरला गाठले आणि त्याला समजावले की, आर्थरच्या आयुष्यापुढे हा त्याग काहीच नाही व तो चेटकिणीशी लग्न करायला तयार आहे

चेटकीण कितीही धूर्त असली तरी लॅन्सलोटचं प्रेम राजावर आहे, तिच्यावर नाही. तस्मात अशा लग्नाला अर्थ नाही.

आता तरीही तो आपल्या मनाजोगतं वागावा म्हणून पुन्हा हा डाव :

आश्चर्यचकित झालेल्या लॅन्सलोटने तिला घडला प्रकार विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ती एका विद्रूप चेटकिणीच्या रूपात असतानादेखील लॅन्सलोट तिच्याशी आदराने आणि सौजन्याने वागला म्हणून यापुढे ती केवळ अर्धा दिवस विद्रूप चेटकिणीच्या रूपात वावरेल आणि उरलेला अर्धा दिवस सुंदर पत्नीच्या रूपात

हे खोटंय कारण

सर लॅन्सलोट हुशार होता. त्याला चेटकिणीने राजा आर्थरला दिलेले उत्तर आठवले.
त्याने उत्तर दिले की, त्या स्त्रीने स्वत:च ठरवावे की तिला कसे राहायचे आहे.

हे ऐकल्यावर ती म्हणाली की ती सर्वकाळ सुंदर राहील. कारण लॅन्सलोटने तिला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

अशा कपटी स्त्रीवर कुणीही प्रेम करणार नाही कारण तिनं पुरुषाला ` रात्र की दिवस ' अशा पेचात पकडून दोन्ही वेळचा स्वार्थ साधलाय.

अर्थात रात्रीच्या सुखासाठी दिवसा माझं ऐक हा डाव पूर्वापार आहे आणि तो अत्यंत चुकीचा आहे.

एक साधी गोष्ट आहे, जे पणाला लावलं जातय ते वापरलं गेलं तरच सुख आहे आणि सुख दोघांना सारखच आहे.

जर वापरलं गेलं नाही तर ते व्यर्थ आहे.

खरी परिस्थिती अशीये :

निर्णयाचं स्वातंत्र्य प्रसंगोप्तात आहे.

ते स्त्रीला जरुर द्यावं आणि तीचं योग्य असेल तर दाद देऊन तिच्या मनासारखं करावं.
तीचं पटत नसेल तर तिला निर्णयाची संपूर्ण जवाबदारी घ्यायला सांगावी म्हणजे चुकलं तर तिला समजू शकेल.
आपण तिच्या मनाविरुद्ध निर्णय घेतला आणि आपली चूक झाली तर ती सर्वस्वी मान्य करावी.

इथे वर एका प्रतिसादात म्हटलय :

बाकी व. पु. काळेंचे एक वाक्य आठवले..

संसारात सर्व निर्णय बायकोला घेवु द्यावे, निर्णय बरोबर आला तर आपले काम झालेले असते, आणि निर्णय चुकला तरी आपल्या डोक्याला त्रास नसतो.

वाक्य वपुंचं असलं तरी हे अत्यंत छुपेपणानं रात्रीसाठी दिवस काँप्रमाइज करणं आहे.

ही एकमेकांची फसवणूक आहे. त्यात काही मजा नाही.

>>> ही एकमेकांची फसवणूक आहे. त्यात काही मजा नाही

अगणित वेळा सहमत!

-(संजयचक्शूंनी जग बघणारा ध्रुतराष्ट्र) सोकाजी

प्रणिपात स्वीकारावा !

खरी परिस्थिती अशीये :

निर्णयाचं स्वातंत्र्य प्रसंगोप्तात आहे.

ते स्त्रीला जरुर द्यावं आणि तीचं योग्य असेल तर दाद देऊन तिच्या मनासारखं करावं.

स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण?

गीतेवर अभ्यास न करता निरुपण लिहु शकणार्‍या व्यक्तिला हा प्रश्न विचारायच्या तुमच्या हिमतीची दाद देते.

कथेचा आशय आणि तात्पर्य पाहा :

जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.

उगीच कुठेही आणि कसाही विरोधी सूर लावायचाच असा आग्रह का?

मूळ धागा जो आहे ती एक कथा आहे. मात्र तुम्ही जे लिहिलं आहे ते 'खरी परिस्थिती' असं काहीसं लिहून त्याखाली लिहिलं आहे. कथा ही कथा असल्याने, आणि त्यात परत ती गंमतीशीर पद्धतीने मांडल्यामुळे तिथे ते गंमतीतच घेतलं गेलं. तुम्ही खरी परिस्थिती म्हणून तुमचं मत मांडल्यावरही आम्ही तुम्हाला फार सिरियसली घेऊ नये असं तुमचं म्हणणं आहे का काय? तसं असेल तर नाही घेत ब्वॉ आम्ही तुम्हाला सिरियसली! सोडून देऊ, दुर्लक्ष करू!

***

उगीच कुठेही आणि कसाही विरोधी सूर लावायचाच असा आग्रह का?

मी,

०१. उगीचच कुठेही आणि कसाही विरोधी सूर लावतो.
०२. तसा आग्रहही धरतो.

या निष्कर्षावर आपण कसे आलात त्याबद्दल काही कळेल का? त्यामागे काही निरीक्षण / अवलोकन आहे की 'उग्गाच' कॅटेगरीतले अनुमान आहे ते?

तो उघड आहे

जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.

पण ते एकांगी आहे आणि वास्तविकात निरुपयोगी आहे असा माझ्या प्रतिसादाचा सरळ अर्थ आहे.

प्रतिसादाच्या आशयाविषयी काहीच न बोलता, आपण सरळ

स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण?

असा सवाल केलाय.

याचा अर्थ `ती स्वतःच्या मताप्रमाणे वागतेच , तुम्हाला विचारतय कोण? असा असेल तर तो व्यक्तिगत प्रश्न आहे.

असो, मागे एका पोस्टवर आपण सर्वस्वी विसंगत असा भजनी ताल लावला आणि आता आशायाला सोडून असा खडा सवाल केलात म्हणून विरोधी सूर वाटला

चुन चुन के मारुंगा चुन चुन के|

श्रेय:प्यारे१. :)

चुना लावून मारणारे का ;)

स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्‍याला आपोपाप कळावं" हे हवं असतं !

कमेंट ऑव्ह द डे.

अगदी

एकोळी धागा म्हणून सहज खपला असता. उगीच आम्ही वेड्यासारखे कथेच्या मागे लागलो ;)

तुला रे मेल्या काय अनुभव आहे?

अनुभव कशास हवा ? ते गाणं आहे ना 'विचारल्याविण हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा'.

सौ सोनार की, एक लोहार की!

अगदी बरोबर :)
..आणि अशक्य सुद्धा! :( ;)

म्हणूनच मला काही वेळ का होईना, संजय नार्वेकरचा हेवा वाटतो (अगं बाई...अरेच्चा!)

स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्‍याला आपोपाप कळावं" हे हवं असतं !
राइट्ट्ट्ट सर.
सहमत.

स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्‍याला आपोपाप कळावं" हे हवं असतं !

हे अगदी... बरोबर... हेच खर.......

स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्‍याला आपोपाप कळावं" हे हवं असतं !

हे अगदी... बरोबर... हेच खर.......

स्त्रीयांना "त्यांना काय हवं ते दुसर्‍याला आपोपाप कळावं" हे हवं असतं !

हे अगदी... बरोबर... हेच खर.......

राईट्ट साऽर

१. तो मी आणलेला गुलाबी शर्ट का नाही घातलास.
२.मी केस मोकळे सोडु की बांधुन घेवु ?
३. ही साडी/ड्रेस मला कस्सा दिसतोय ?
४. ही भाजी कशी झालीय
५. आमच्या घरी नां .....................

बोला आता ह्या प्रश्नांना काय उत्तर द्याल.

म्हणुन लगेच
१. तो घातलेला शर्ट तात्काळ बदलावा, गुलाबी घालावा.
२. मला किनई भुरभुरणारे केस जाम आवडतात(जर तिने केस बांधावे असे तुम्हाला वाटत असेल तर) किंवा तु केस बांधुन खुप छान दिसतेस माझ्या वर्गातली ** केस बांधुन काय दिसायची तुला सांगु (हे, जर तुम्हाला तिने केस मोकळे ठेवावे असे वाटत असेल तर)
३.तुला काय काहीही* शोभुन दिसते नायतर तुझी मैत्रीण ( इथे तिच्या जवळच्या मैत्रीणीचे नाव घ्यावे हलकेच नाहीतर तुम्ही तिच्या मैत्रीणीला टापत असता हा आरोप मिळेल) अजिबात सेन्स नाही. (* मुद्दा क्रं. २ चा रेफेरेन्स चालेल.)
४.काहीही बोलु नये.
५.मौनव्रत आचरावे (काही बोलल्यास पुढील ३/४ दिवस उपवास घडण्याची संभावना. घरात युद्धसद्रुश्य वातावरण निर्मीती.)

तस्मात स्रियांना सर्वकाही मनासारखे व्हावे असे वाटत असते.

स्त्री असो वा पुरुष, निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवं असतं पण ते उलटले की त्याची जबाबदारी किती लोक घेतात? अन किती लोक दुस-यालाच दोष देतात?
अन निर्णयाच स्वातंत्र्य राजालाही कितपत असतं?
असो.
राजघराणं गमतीचा भाग सोडला तरीही एक मस्त कथा शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद.

अगं बाई...अरेच्चा ........ ;)

प्रभु रामरायांना नाही समजले ते आम्हा पामरांस काय समजणार? संदर्भ (सीतेचा कांचन मृग हट्ट)...

आणि हो ज्वलंत धाग्याचा ख फ झाला नाही हे पाहून डोले पानावले........

तुमचा धागा अशा स्वरुपात परत वाचायला मिळेल असे वाटले नव्हते.