बायोहजार्ड भाग १ /३

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
3 Aug 2012 - 10:35 pm

वसूने डाव्या कोपराने स्टेरलियम च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला.

मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस. ला होती तेंव्हा तिच्या टप्पोर्‍या बोलक्या डोळ्यात भरपूर पोट्टी बुडाली होती. विजय त्यातलाच एक. ज्या डोळ्यात तो तासन तास हरवून जायचा त्याखाली आता काळी वर्तुळे येउ लागली होती. वसुने मेकअप चे सहाय्य कधीच घेतले नाही ती वर्तुळ लपवायला. विजयने परदेशी उच्च्शिक्षणासाठी त्याच्या प्रेमाचा त्याग केला; तेंव्हाच तिचा पुरुष जमातिवरचा विश्वास उडायला हवा होता. पण तस झाल नाही. मायक्रोबायोलॉजि - एम डी च्या शेवटच्या वर्षाला होती ती... तेंव्हा एका देखण्या प्राध्यापकाच्या प्रेमात पडली. बाहुपाशात विसावली. मनालिच्या हवेचा कैफ अन केरळच्या समुद्राची नशा आकंठ प्यायली दोघ एकत्र. पण प्राध्यापक महाशय आणखी बर्‍याच विद्यार्थीनिंबरोबर भारत दर्शन करून आले होते. अन त्यांचा प्रवासी बाणा मोठा चिवट होता. तेही जहाज एका दुसर्‍या बंदराला लागलं. माकडीण मेली. वसू रडली नाही त्यादिवशी. नंतर कधीच रडली नाही ती. अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून पी एच डी पूर्ण केलं आणी तिथेच रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू लागली. जिद्दीच्या, कष्टाच्या आणी अंगभूत हुषारीच्या जोरावर अतिशय कमी वेळात तिथल्या मयक्रोबायोलॉजी विभागाची प्रमुख बनली ती. तेही एव्हढ्या कमी वयात .... ४३ म्हणजे कमीच वय हो त्या पोस्ट साठी.

वसून आत पाउल टाकताच डॉ जॉन तिच्याकडे पहात मान हलवता झाला. हसायची सोय न्हवती कारण बायोहजार्ड चेंबरमधे तोंडावर मास्क घालून बसला होता तो. आता मास्क च्या आड हसलं काय ? किंवा जिभ दाखवून वेडावल काय ? दिसणार कसं समोरच्याला ? पण वसू कधीच हसण्याला प्रतिसाद द्यायची नाही. चेंबरबाहेरही नाही. कोणाच्याच नाही. वसू ची एक ज्युनियर अमेरिकन मुलगी हॉस्पिटल मधून आलेली सँपल्स चेक करत होती. युरिन, स्टूल, स्पुटम ची रूटीन सँपल तिन बाजुला काढली. टीबी ची , एंडोस्कोपी करून काढलेली वगैरे स्पेशलाइस्ड सँपल्स वेगळी केली. अत्ता मुद्दा असा की. युरिन इंन्फेक्षन झालय म्हणजे कुठल्यातरी जंतूचा संसर्ग झालाय. पण कोणत्या जंतूचा ? ते कस ओळखणार ? त्यासाठी ते सँपल एका क्ल्चर प्लेट वर लावायच ती ३७ डिग्री सेल्सियसला उबवायची. त्या क्ल्चर प्लेट मधलं अन्न खाउन जंतू वाढतात. आणी सुरेख अशा कॉलोन्या बनतात त्यांच्या.

त्या कॉलोन्यांचे गुणधर्म प्रत्येक जंतुसाठी वेगवेगळे असतात. म्हणजे प्स्यूडोमोनास ह्या बॅक्टेरियाची कॉलोनी हिरवी असते. इ कोलाय नावाच्या जंतूची कॉलोनी लाल रंगाची बनते.

कॉलोन्यांच्या रंगावरून, त्यांच्या रासायनिक गुणधर्मावरून, आणी मायक्रोस्कोपखाली त्या जंतूचे निरिक्षण करून त्याची बिनचुक प्रजात ओळखता येते.

त्या जंतूंची प्रजात ओळखण आता फारच महत्वाच बनत चालल होत. कारण अँटीबायोटीक्सना (प्रतिजैविक औषधे) हे रोगजंतू प्रतिकारशक्ती डेव्हलप करू लागले होते. प्रत्येक प्रजातीसाठी वेगळं अँटीबायोटीक् आवश्यक बनलं होतं. त्यामुळे जंतूची प्रजाती ओळखण हे औषधोपचारासाठी अतिशय आवश्यक बनल होतं. आणी वसू या शास्त्रातल्या सर्वश्रेश्ठ तज्ञांपैकी एक होती.

ती काम करायची जीव तोडून, विद्यार्थ्यांना शिकवायची जीव तोडून, पण जीव कोणालाही लावत न्हवती. बॅक्टेरियांच्या कॉलन्यात रमत होती. पण मनुश्याच्या कॉलन्यातून - समाजातून तिचा जिव उठला होता.
तिन सगळ्यांसाठीच रेसिस्टन्स तयार केला होता.

एक गोष्ट सोडून...

(क्रमशः)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

4 Aug 2012 - 1:50 am | रामपुरी

विनोद आणि शिंद्यांचं काय झालं?
हे वसु प्रकरण पूर्ण करायची बोली असेल तर पुढचे भाग वाचतो. काय ते एकदाच तुकडा पाडायचं सोडून उगा वाट बघायला लावता राव तुम्ही... त्या नियतीचं एव्हाना लग्न होऊन तिला पोर देखील झाले असेल.
पुभाप्रहेवेसांनल.

५० फक्त's picture

4 Aug 2012 - 7:41 am | ५० फक्त

धन्यवाद, १/३ हे तुम्हीच मान्य केलं आहे म्हणुन.

इरसाल's picture

4 Aug 2012 - 10:02 am | इरसाल

बिना फेसमास्क ती पोर सँपल कशी चेक करत होती. फटु बदला.

JAGOMOHANPYARE's picture

4 Aug 2012 - 10:13 am | JAGOMOHANPYARE

छान

लेखाचा आणि चित्रांचा काय संबंध ते काही कळलं नाही
आणि भाग १ ते ३ हेही काही कळलं नाही..

वाचतोय

मन१'s picture

4 Aug 2012 - 10:27 am | मन१

वाचत आहे.

राजघराणं's picture

4 Aug 2012 - 2:01 pm | राजघराणं

ही गोष्ट तीन भागात संपवतो. नंतर बडवतो

म्हणून भाग -१/३ असे लिहिले आहे

५० फक्त's picture

4 Aug 2012 - 4:01 pm | ५० फक्त

म्हणून भाग -१/३ असे लिहिले आहे - म्हणजे -१,०,१,२,३. असे पाच भाग का ?

पैसा's picture

4 Aug 2012 - 5:33 pm | पैसा

मी पण विनोदचं काय झालं हे विचारायला आले होते. उत्सुकता वाढली आहे. या कथेतही बर्‍याच शक्यता दिसत आहेत. बघूयात कुठे पोचायला होत ते!