फक्त धडाडीच्या गुंतवणूकदारांकारिता ! ( केबीआयएल : एक खिडकी ५ दारे )

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
11 Jul 2012 - 3:02 am

दोस्तांनो ,
श्री.सदानंद ठाकूर ह्यांच्या एका धाग्यावर मी दिवीस लॅब ची शिफारस केली होती. ( विमेनी त्याला झकास बुच मारले , त्याचा बदला घेण्याचे प्लान सुरु आहेत ) आज दिवीस लॅब १०५० पर्यन पोहोचला आहे . १० % परतावा १ महिन्यात मिळतो आहे. ह्या मध्ये अजुन दम आहेच पण त्याबरोबर एक नवी शिफारस आपल्याला करतो.
टायटल मध्येच डिस्लेमर आहे .
एक्सिट क्र. १ : धडाडी असेल तरच पुढे वाचा अन्यथा नको.

रू .२५० ई.पि.एस. असलेली कंपनी रू. ८०० मध्ये मिळत असेल तर ? ज्यांना बाजाराची अगदी जुजबी माहिती आहे ते ही म्हणतील , अकला कुबलच्या भावात मधुरी ?

किर्लोस्कर ब्रदर्स इन्वेस्टमेंट लि. (533297 KBIL ) हया कंपनीची शिफारस फक्त आणि फक्त मिपा करता करतो आहे.

गुंतवणूक कशी कराल ?
एक्सिट क्र. २ : धडाडी बरोबर चिकाटी आहे ना ? नसेल तर पुढे वाचूही नका.
कें.बी.आय.एल. चा आत्ता भाव रू ८०० आहे. आत्ता लगेच - आजच १/४ रक्कम गुंतवा. प्रवर्तकांचे भाग-भांडवल ६५ % आहे आणि खुल्या मार्केटात समभाग फक्त २०% . म्हणून उलाढाल कमी आहे. हाच भाव काही दिवसात रु. ७०० येण्याची शक्यता खूप आहे . त्यावेळी एक्सिट क्र. २ वर आपण होकार भरला आहे हे ध्यानात ठेवा व न भिता अजून १/४ रक्कम गुंतवा. असाच आता भाव रू.६०० आला तर अजून गुंतवा. जर २००८ प्रमाणे प्रचंड मंदी आली तरच , खरोखर पैशाची गरज असेल तरच रू.६०० खाली विका. ( हे केवळ प्रथेप्रमाणे सांगतो , मी म्हणेन अजून खरेदी करा )
एक्सिट क्र. ३ : भाव ऑक्टोबर ला रू.१००० मिळाला तर - दिवाळी साजरी करा. आपली धडाडी कामी आली .३ महिन्यात २० % मिळाले किंवा अजून १/४ रक्कम गुंतवा.
एक्सिट क्र. ४ : २०१२ च्या शेवटी भाव ११०० -१२०० पर्यंत असेत तर मस्त मज्जा करा किंवा अजून १/४ रक्कम गुंतवा.
एक्सिट क्र. ५ : एक्सिट क्र. ३ व ४ न घेता वाट पहा २ वर्षात रू२००० भाव मिळेल .

काही +काही -
+ : किर्लोस्कर ही एक चांगली व्यवस्थापन असलेली कंपनी आहे.
+ /- :ही होल्डिंग कंपनी आहे. हया कंपनीचा नफा इतर ग्रुप कंपनी वर अवलंबून आहे.
+ : चांगला डीविडट / बोनस देणारी कंपनी आहे .
- : प्रचंड मंदीत प्रचंड तोटा ( प्रती समभाग : रू५०० पर्यंत ) होवू शकतो.
+ : नशीब जबरी असेल आणि किर्लोकारानी एक जरी मोठा फंड घुसवला तर भाव कुठच्या कुठे जाईल. (जॅकपॉट आहे हा ! )

मिपा वर अनेक जाणकार आहेत. सगळ्या बाजुनी साधक बाधक विचार/ चर्चा होईल.

गुंतवणूकशिफारस

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

11 Jul 2012 - 9:30 am | अर्धवटराव

शेअर मार्केट वगैरे बाबतीत आमचं ज्ञान अगदीच बेताचं आहे. मिपा एक्स्पर्ट्स काहि मौलीक सल्ले देऊन धागा वृद्धिंगत करतील आणि आमच्या खिश्यात चार पैसे पडतील म्हणुन वाट बघतोय... तर इथे सन्नाटा :(
शेअर मार्केट मध्ये वैदीक-पौराणीक विमाने, गांधी - नेहरु - सावरकर, विज्ञान-अध्यात्म वगैरे इण्डेक्स असायला हवे होते.

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 10:59 am | नाना चेंगट

कुणाला कसा परतावा मिळत आहे याची वाट पहात आहे.

कुंदन's picture

11 Jul 2012 - 11:13 am | कुंदन

नान्या ने बोला है "कुछ भी हो सकता है... कुछ भी..." ;-)

धडाडी जरूर असावी, पण माफ करा, येवढच सांगू इच्छितो (कदाचित ते तुम्हाला माहित असेल, पण चुकुन नवखा धडाडीने नुकसान करून घेऊ नये म्हणून हा प्रतिसाद)
मासिक उत्त्पन्न-खर्च आणि स्वतःच्या भविष्यकालिन आर्थिक गरजा (साधारण पुढील ५ वर्ष) याचं गणित आखून प्रत्येकाने गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला किती "न्याय्य" परतावा "कधीपर्यंत" आणि कुठल्याकुठल्या गुंतवणूक माध्यमातून (पक्का परतावा देणारे माध्यम - Fixed income securities, रोखे Equity, सट्टा Derivative, खाजगी गुंतवणूक private equity, जुगार वा आणि काही) हवा आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं. प्रत्येकामध्ये अतिरीक्त परतावा excess return किती असू शकतो, धोका (risk) काय आहे, तरलता (liquidity) किती आहे, याचीही माहिती घ्यावी.

तर्री's picture

11 Jul 2012 - 12:59 pm | तर्री

सुधीर : तुमच्या मताशी तत्वतः १००% सहमत.
पण
नॉट टेकिंग एनी रिस्क इज बिगेस्ट रिस्क !
जो तो आपल्य मर्जी चा मालक कसे ?

कुंदन's picture

12 Jul 2012 - 11:09 am | कुंदन

बाकी सगळे ठिक आहे , पण धडाडी आम्हाला इतर कोणी शिकवायची गरज नाही. ;-)
आणि हे मि पा वरचे सगळे जाणकार जाणतातच !

तर्री's picture

8 Nov 2012 - 10:47 am | तर्री

के.बी. आ.एल. ची शिफारस मी ४ महिन्यापूर्वी केली होती.
आज भाव १२०० आहे !
हया गायी मध्ये अजून अजून खूप दुध आहे , एवढ्यात विकू नये.

तर्री's picture

27 Nov 2014 - 8:09 am | तर्री

के बी आय एल आज ४००० पार गेला आहे आणि २ वर्षात ४ पट परतावा मिळतो आहे.

" हया गायी मध्ये अजून अजून खूप दुध आहे , एवढ्यात सगळा माल विकू नये.

मै तो "मालामाल"" हो गया !

अजून आहेत का अशा काही शिफारशी? नक्की सांगा...

वेल्लाभट's picture

27 Nov 2014 - 12:31 pm | वेल्लाभट

सांगाच...