प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे.
निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :)
समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो...
कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो...
आपली माणसं आपलीच नाती
तरी लेखकाची वाचकास भीती
तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती ||
आजवर ज्यांची वाचली समीक्षा
भलताच त्यांचा चेव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी
तुकोबात माझा जीव होता
कळावा पिच्चर म्हणूनिया किती
लेखकच्या झूंडी इथे येती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती ||
भांबावल्यागत व्यर्थ हे वाचणं
काही काही समजत न्हाई
एक एकेकाचे लेखन बघुनी उमगलं
जसा चष्मा तसा तो पाही
थेट्राच्या कापडी अन सारखीच फिल्म
तरी लेख वेगळे, वेगळा जुल्म
ट्यार्पीचीच भक्ती ट्यार्पीचीच प्रीती
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती ||
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 6:46 pm | सुहास..
वेळ जात नाहीये का रे ;)
11 Jun 2012 - 6:46 pm | इष्टुर फाकडा
शोषितांच्या वेदनेला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन :)
11 Jun 2012 - 6:49 pm | जाई.
हम्म.
11 Jun 2012 - 6:56 pm | पैसा
+१ =))
11 Jun 2012 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते
= )))))))))))
आज खर्या अर्थाने तुकाराम महाराजांचा निर्वाणदिन साजरा झाला मिपावर!
11 Jun 2012 - 7:55 pm | आबा
:)
11 Jun 2012 - 8:47 pm | स्वानन्द
भारीच :)
11 Jun 2012 - 9:13 pm | अर्धवटराव
नानासाहेब... तुम्हीच फडकवा एखादं निषाण आता :D
अर्धवटराव
11 Jun 2012 - 9:20 pm | सुहास झेले
लैच :D
11 Jun 2012 - 9:24 pm | कवितानागेश
:D
11 Jun 2012 - 9:27 pm | स्मिता.
हा हा हा... मस्त! तुकोबांनी सदेह वैकुंठगमन का केले असावे ते आज इथे मिपावर कळले.
11 Jun 2012 - 9:56 pm | भडकमकर मास्तर
उद्या पालखीत म्हणावं म्हणतो..
चांगलं जमलंय
11 Jun 2012 - 10:51 pm | अविनाशकुलकर्णी
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती
जा फोन्डा तिथे फेणीचा बार बार
घ्या गुटका ,मिळतिल सारी उत्तर
11 Jun 2012 - 11:15 pm | चिगो
एकदम टकाटक, नाना.. :-)
12 Jun 2012 - 3:19 am | प्रभाकर पेठकर
समर्पक काव्य निष्पत्ती.
12 Jun 2012 - 4:16 am | श्रीरंग_जोशी
नानासाहेब - तुमचे एक विडंबन १०० धाग्यांवर भारी पडते....!
12 Jun 2012 - 8:49 am | घाशीराम कोतवाल १.२
हाण !!!!!!!!!
नान्या बॅक इन अॅक्शन लगे रहो ...
झक्कास
12 Jun 2012 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, हा नाना ना. एकदा सुटला की आवरत नाही. :)
आता गुमान वाचायचं ना जे चाल्लंय ते. पण नै.
असो, मस्त रे नाना.
-दिलीप बिरुटे
12 Jun 2012 - 2:19 pm | ऋषिकेश
खिक्
12 Jun 2012 - 2:20 pm | sneharani
मस्त!!
= ))
13 Jun 2012 - 9:33 am | श्रीरंग_जोशी
मिपावर रुजत असलेले जहाल व मवाळ गट पाहून काही गोंधळलेले सदस्यही म्हणू शकतात
तात्याबा...... कोणता झेंडा घेऊ हाती...?
14 Jun 2012 - 9:07 am | घाशीराम कोतवाल १.२
तात्याबा...... कोणता झेंडा घेऊ हाती...?
कोण तात्याबा........
सध्या दिसत न्हाई कुठ
तुम्हाला गावल का?
15 Jun 2012 - 7:22 am | श्रीरंग_जोशी
सध्या त्यांचा वावर अदृश्य स्वरूपात असावा.
14 Jun 2012 - 6:34 pm | बॅटमॅन
>>एक एकेकाचे लेखन बघुनी उमगलं, जसा चष्मा तसा तो पाही
अगदी!
>>थेट्राच्या कापडी अन सारखीच फिल्म, तरी लेख वेगळे, वेगळा जुल्म
बैलाचा डोळाच फोडलात!!!!!!!!! एकच नंबर :)
>>ट्यार्पीचीच भक्ती ट्यार्पीचीच प्रीती
अंतिम सत्य..
15 Jun 2012 - 6:45 pm | यशोधरा
भारी! आणि समर्पक.