मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती

नाना चेंगट · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे. निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :) समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो... कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो... आपली माणसं आपलीच नाती तरी लेखकाची वाचकास भीती तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती || आजवर ज्यांची वाचली समीक्षा भलताच त्यांचा चेव होता… पुरे झाली आता उगा माथेफोडी तुकोबात माझा जीव होता कळावा पिच्चर म्हणूनिया किती लेखकच्या झूंडी इथे येती वैरी कोण आहे इथे कोण साथी तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती || भांबावल्यागत व्यर्थ हे वाचणं काही काही समजत न्हाई एक एकेकाचे लेखन बघुनी उमगलं जसा चष्मा तसा तो पाही थेट्राच्या कापडी अन सारखीच फिल्म तरी लेख वेगळे, वेगळा जुल्म ट्यार्पीचीच भक्ती ट्यार्पीचीच प्रीती तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती ||

वाचने 4812 वाचनखूण प्रतिक्रिया 25

इष्टुर फाकडा 11/06/2012 - 18:46
शोषितांच्या वेदनेला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन :)

बिपिन कार्यकर्ते 11/06/2012 - 19:44
= ))))))))))) आज खर्‍या अर्थाने तुकाराम महाराजांचा निर्वाणदिन साजरा झाला मिपावर!

स्मिता. 11/06/2012 - 21:27
हा हा हा... मस्त! तुकोबांनी सदेह वैकुंठगमन का केले असावे ते आज इथे मिपावर कळले.

अविनाशकुलकर्णी 11/06/2012 - 22:51
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती जा फोन्डा तिथे फेणीचा बार बार घ्या गुटका ,मिळतिल सारी उत्तर

प्रभाकर पेठकर 12/06/2012 - 03:19
समर्पक काव्य निष्पत्ती.

श्रीरंग_जोशी 12/06/2012 - 04:16
नानासाहेब - तुमचे एक विडंबन १०० धाग्यांवर भारी पडते....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/06/2012 - 14:16
च्यायला, हा नाना ना. एकदा सुटला की आवरत नाही. :) आता गुमान वाचायचं ना जे चाल्लंय ते. पण नै. असो, मस्त रे नाना. -दिलीप बिरुटे

ऋषिकेश 12/06/2012 - 14:19
खिक्

श्रीरंग_जोशी 13/06/2012 - 09:33
मिपावर रुजत असलेले जहाल व मवाळ गट पाहून काही गोंधळलेले सदस्यही म्हणू शकतात तात्याबा...... कोणता झेंडा घेऊ हाती...?

घाशीराम कोतवाल १.२ 14/06/2012 - 09:07
तात्याबा...... कोणता झेंडा घेऊ हाती...? कोण तात्याबा........ सध्या दिसत न्हाई कुठ तुम्हाला गावल का?

बॅटमॅन 14/06/2012 - 18:34
>>एक एकेकाचे लेखन बघुनी उमगलं, जसा चष्मा तसा तो पाही अगदी! >>थेट्राच्या कापडी अन सारखीच फिल्म, तरी लेख वेगळे, वेगळा जुल्म बैलाचा डोळाच फोडलात!!!!!!!!! एकच नंबर :) >>ट्यार्पीचीच भक्ती ट्यार्पीचीच प्रीती अंतिम सत्य..