✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्‍हा

श
श्रीरंग_जोशी यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 11:32  ·  लेख
लेख
कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते. त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती. कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे. भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे. नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा. एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते. इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती. काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे. सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल. एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57586 वाचन

💬 प्रतिसाद (196)

प्रतिक्रिया

ते सोडा

जय - गणेश
गुरुवार, 05/31/2012 - 11:46 नवीन
ते सोडा हो मला हे सांगा की सुंदर, आकर्षक, रेखीव चेहऱ्याच्या आणि सावल्या रंगाच्या सावूत इंडियन मुली लग्ना-नंतर पुरी सारख्या का फुगतात ?
  • Log in or register to post comments

ते तसे पंजाबी मुलींच्या

विजुभाऊ
गुरुवार, 05/31/2012 - 11:57 नवीन
ते तसे पंजाबी मुलींच्या बाबतीत सुद्धा होते. ते जाऊदेत. मी एकदा हैद्राबादला असताना एकजण वी ट्रीटेड येवरी मिशन याज अ कास्ट सेंटर. एवरी मिशनरी हॅज अ कास्ट यलीमेंट. असे म्हणत होता. माझ्या डोक्यात मिशन = मिशन स्टेमेंट. मिशनरी = ख्रिस्ती धर्मप्रचारक असे अर्थ येत होते. त्यामुळे त्याचे बोलणे मला कळत नव्हते थोड्यावेळाने मला समजले तो मशीन ला मिशन म्हणत होता. आणि मशीन ला मिशनरी म्हणत होता
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहाहाहाअहाहाहाहाहाहा

वेल्लाभट
Fri, 04/26/2013 - 20:02 नवीन
हाहाहाहाहाहाहाअहाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कित्ती कित्ती कौतुकास्पद एकी

शुचि
गुरुवार, 05/31/2012 - 12:03 नवीन
आमच्या कंपनीत ऑनसाइट्/ऑफशोर सध्या विशिष्ठ प्रांतातील नोकरदारांचा भरणा चालू आहे. इझ इट अ वंडर की प्रोजेक्ट मॅनेजर त्याच प्रांतातून आला आहे. जरी हे मान्य केले की की ऑनसाआईट इंटर्व्ह्यू घेणारा एक पॅनल असतो तरी ऑफशोर त्यानेच सर्व निवडले आहेत.
  • Log in or register to post comments

व्हाट टापिक यू रेज स्सार

गवि
गुरुवार, 05/31/2012 - 12:09 नवीन
व्हाट टापिक यू रेज स्सार ..साउधिंन्डियन पिप्पल वन्डर्फुल स्सार.. कम कम, ज्वाईन नो.. ह्याव सम स्न्याक्स... ह्याव ह्याव.. ओ.. फास्टिन्गा? व्वोके व्वोके..
  • Log in or register to post comments

हा

चिरोटा
गुरुवार, 05/31/2012 - 12:30 नवीन
कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे.
Kavita चा उच्चार कविटा असा होवू नये म्हणून kavitha असे लिहितात. उच्चार मात्र कविता असाच केला जातो.
नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा.
मात्रा इंग्रजीत जोडली जाते. भाषेत्(निदान कन्नडमध्ये तरी मात्र जोडली जात नाही) शब्द महेंद्र असाच लिहिला जातो. शेवटचे अक्षर तोडायची पद्धत नसल्याने तसे केले जाते. जिथे अक्षर तोडावे लागतेच तेथे पर्याय नसतो.मार्केट हा शब्द कन्नडमध्ये मार्केट्ट असा लिहिला जातो.(मार्केटा असा उच्चार होवू नये म्हणून). अवांतर- कन्नडमध्ये मुंबई मुंबै असा लिहितात. तेंडुलकर तेंडुल्कर तर गडकरी गड्करी असा लिहिला जातो.तिन्ही शब्दांचे उच्चार पाहिलेत तर ते योग्य वाटते.
  • Log in or register to post comments

टी आ?

प्रीत-मोहर
गुरुवार, 05/31/2012 - 12:34 नवीन
टी आ?
  • Log in or register to post comments

इल्ले! कापी मा !! - ( मद्रासी

सोत्रि
Fri, 06/01/2012 - 11:09 नवीन
इल्ले! कापी मा !! - ( मद्रासी ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मला पाल!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/01/2012 - 15:55 नवीन
मला पाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

इन्नडा!

Nile
Fri, 06/01/2012 - 23:23 नवीन
इन्नडा तंबी! सुडा पालं कुडे! वाट मला, मला? इन्ना रास्कला! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कन्व्हेन्शन्स

मिहिर
गुरुवार, 05/31/2012 - 13:35 नवीन
h चा वापर त्यांच्या आणि आपल्या वापरण्यातला फरक आहे. यात चूक किंवा बरोबर असे काही नाही. 'त' आणि 'ट' साठी 't' आणि 'थ' आणि 'ठ' साठी 'th' ही आपली रीत आहे. तर 'त' आणि 'थ' साठी 'th' आणि 'ट' आणि 'ठ' साठी 't' ही त्यांची रीत आहे. आपल्याला 'त' आणि 'थ' मधील फरक दाखवणे तर त्यांना 'त' आणि 'ट' यातील फरक दाखवणे जास्त महत्त्वाचे वाटते. (दाक्षिणात्य भाषांमध्ये 'त' आणि 'थ' यांच्या उच्चाराविषयी खूप फरक बर्‍याचदा केला जात नाही, असे वाटते) तसेही 'th' चा उच्चार 'त' आणि 'थ' च्या जवळपास होतो. 'ठ'शी त्याचा दूरान्वयेही संबंध नाही. तरीही आपण 'ठ' साठी ते वापरतोच ना? त्यांच्या दृष्टीने आपले असे करणे विचित्रपणाच नाही का? 'भास्कर'चे 'बास्कर' स्पेलिंग करणारी व्यक्ती बहुधा तमिळभाषक असावी. तमिळमध्ये ख, घ, थ, भ अशी 'महाप्राण' अक्षरे नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीचे नाव 'बास्कर'च असेल. इंग्रजीतील उच्चार म्हटले तर मराठीभाषकांचेही बरेच मजेशीर होतात. प्रमुख उदाहरण म्हणजे 'v' चे 'व्ही' होणे. यातला 'ह' आला कुठून असा प्रश्न माझ्या दाक्षिणात्य मित्रांना पडतो. आमच्या लॅबमध्ये 'voltage' चा 'होल्टेज' असा उच्चार करणारे लॅब असिस्टंट मराठीच होते. 'फिजिक्स' मधला 'ज' भाजीतला 'ज' नसून जमिनीतला आहे हे मला दाखवून माझी चूक सुधारणारा मित्र तेलुगुभाषकच होता. तालव्य 'झ'साठी (माझी मधला झ) 'z' वापरणारे आपणच! 'झेंडा', 'मुझे'(हिंदीतले) लिहिताना 'zenda', 'muze' अशा प्रकारची स्पेलिंग्ज मराठीमाणसांकडून सर्रास केले जातात, जी इतरभाषकांना वैचित्र्यपूर्ण वाटू शकतात. माझा मुद्दा त्यांचे बरोबर आणि आपले चूक किंवा त्याउलट असा नाही. ह्या दोन स्पेलिंग करणाच्या रीती आहेत इतकेच. मी मराठी रोमनमध्ये लिहिताना 'झ' साठी (झेंड्यातला सुद्धा) 'z' लिहितो, कारण दोन अक्षरे (jh) लिहिण्याऐवजी एकच अक्षर टंकणे सोपे वाटते. पण हिंदी रोमनमध्ये लिहिताना 'मुझे' साठी (jh) आणि 'जमीन', 'मर्जी' साठी (z) वापरतो.
  • Log in or register to post comments

मला जे सांगायचे होते ते आधीच

बॅटमॅन
गुरुवार, 05/31/2012 - 13:55 नवीन
मला जे सांगायचे होते ते आधीच सांगितल्याबद्दल +१०० :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

+१

आबा
गुरुवार, 05/31/2012 - 15:12 नवीन
अगदी अगदी... तसंही "ठ" आणि "थ" या दोन्हींसाठी आपण "th" वापरतोच की! तसच हे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

तुम्चे सासर मद्रास चे वाटते??

कौतिक राव
Tue, 06/05/2012 - 10:42 नवीन
काय स्सार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

मला तर वाटते की श्रीरंग

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 06/05/2012 - 11:59 नवीन
मला तर वाटते की श्रीरंग जोश्यांचे सासर मद्रास चे असावे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

आमचे सासर महाराष्ट्रातच....

श्रीरंग_जोशी
Tue, 06/05/2012 - 12:03 नवीन
सासर जर मद्रासमध्ये असते तर याविरुद्धचा धागा इडलीदोसा. कॉम वर निघाला असता तो सुद्धा तामीळ भाषेत. इल्ले इल्ले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

पिशी अबोली
Fri, 04/26/2013 - 17:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

टाटाला TATA असेच

अमृत
गुरुवार, 05/31/2012 - 13:57 नवीन
लिहितात (THATHA असे न लिहीता)हे बघून जीव भांड्यात पडला होता माझा :-) बाकी इकडे H चा उच्चार 'हेच' असा केला जातो अगदी परदेशात राहून आलेले दाक्षिणात्य बंधुपण 'हेच'च म्हणतात. आता काही उदाहरणे अतिथी -> Athidhi कसं काय सकाळीच? -> how come morning morning? उशीर झाला काय आज ? -> टुडे लेटा? जेवायला चल्तोस काय? -> लंचा? आणखी आठवेल तसा टंकतोच :-) अमृथ अन्ना
  • Log in or register to post comments

हा हा, चालायचंच. त्यांची तशी

मेघवेडा
गुरुवार, 05/31/2012 - 15:31 नवीन
हा हा, चालायचंच. त्यांची तशी तर्‍हा, आपली निराळी. त्यांच्याकडे 'ठ' आणि 'थ' ही व्यंजनेच नाहीत. तेव्हा ट साठी T आणि त साठी 'Th' साठी स्वाभाविकच आहे. (कुठे ईडलीदोसै.कॉम वर असंच मराठी भाषिकांची खिल्ली उडवणारा धागाही निघत असेल असे वाटून मौज वाटली.)
  • Log in or register to post comments

फक्त

चिरोटा
गुरुवार, 05/31/2012 - 16:03 नवीन
ठ आणि थ तामिळमध्ये नसावेत. मल्याळम्,तेलुगु,कन्नड मध्ये आहेत. तेलुगु/कन्नडमध्ये ह्रस्व/दीर्घ ए व ह्रस्व/दीर्घ ओ हाही प्रकार आहे. उ.दा. रीटेल मधला टे दीर्घ लिहितात्.फोन मधला फो दीर्घ फो. जोडाक्षरे कधीकधी वेगळ्या प्रकारे लिहिली जातात. चिन्ह शब्द अनेकवेळा चिह्न लिहिला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ईडलीदोसै.कॉम

मंदार कात्रे
Mon, 10/07/2013 - 17:45 नवीन
This Websense category is filtered: Parked Domain. Sites in this category may pose a security threat to network resources or private information, and are blocked by your organization. URL: http://idlidosa.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

जाऊदे आपण आपली भाषा सुधारूया

रघु सावंत
गुरुवार, 05/31/2012 - 16:27 नवीन
जाऊदे आपण आपली भाषा सुधारूया
  • Log in or register to post comments

आमचाही अनुभव

अमितसांगली
गुरुवार, 05/31/2012 - 17:31 नवीन
आमचाही अनुभव विचित्रच आहे या बाबतीत
  • Log in or register to post comments

अय्यो!

पैसा
गुरुवार, 05/31/2012 - 17:44 नवीन
मस्त लेख आणि प्रतिक्रिया पण बेश्टच आहेत. सौदिंडियन्स ना हसताना रजनीकांथाच्या दिव्य हिंदीची पण आठवण ठेवा बर्का!
  • Log in or register to post comments

शेजारी

तिमा
गुरुवार, 05/31/2012 - 18:04 नवीन
आमच्या शेजार्‍यांना बरीच वर्षे म्हणे 'गरवारे' हे 'गारवेअर' असे वाटत होते. असो. आमच्या 'तर्खडकरी' उच्चारांनाही बरेच जण हंसतात. कोणी को णाला नांवे ठेवू नये. अर्थ समजल्याशी मतलब.
  • Log in or register to post comments

तळवलकर

स्मिता.
Fri, 06/01/2012 - 13:27 नवीन
तुमच्या गारवेअर वरून आठवले, बंगलोरात 'तळवलकर' जिमच्या काही शाखा निघाल्यावर तिकडले लोक त्याला 'टॉल वॉकर' जिम म्हणत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

उलट किस्सा

मेघवेडा
Fri, 06/01/2012 - 16:19 नवीन
याउलट, एकदा आमच्या शेजार्‍यांच्या दारावरील "Walawalkar" ही पाटी एका मनुष्यानं 'वळवळकर' अशी वाचली होती ते आठवलं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

हाहाहा यावरून आठवल. आमच्या

आंबोळी
Sun, 06/03/2012 - 09:44 नवीन
हाहाहा यावरून आठवल. आमच्या हापिसातल्या एका वट्टमवार चे एक उत्तरभारतीयाने वाटमार केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

टॉलवॉकर? हा हा हा.

रेवती
Fri, 06/01/2012 - 22:10 नवीन
टॉलवॉकर? हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

फिलर

मराठे
गुरुवार, 05/31/2012 - 18:09 नवीन
इंग्रजी 'एच' इतर (अ-इंग्रजी) भाषियांनी एक 'फिलर' सारखं वापरलं आहे, त्यामुळे जेव्हा एखाद्या भाषेतलं व्यंजन इंग्रजीत लिहायची वेळ येते आणी त्यासाठी तंतोतंत इंग्रजी अक्षर सापडत नाही तेव्हा हा 'एच' त्यांच्या मदतीला धावतो. काही ठिकाणी इंग्रजी 'जे' पण याच पद्धतीने वापरलेला दिसतो (उदा: सॅन होजे असा उच्चार असलेला शब्द सॅन जोस असा लिहिलेला आढळतो). शेवटी इंग्रजीत फक्त २६ अक्षरं.. प्रत्येक भाषेतले उच्चार त्यात लिहून दाखवायचे म्हणजे थोडं रिसायकलींग करावंच लागतं. माझ्या आडनावाचं इथली लोकं जे कडबोळं करतात त्याची तर्‍हा काय वर्णावी! 'मार्थ' काय, 'मराथ्' काय! अर्थात त्यात आपल्याकडे जे स्पेलिंग शिकवतात त्यातच प्रॉब्लेम आहे. 'मोरे' आडनावाचा माझा मित्र आज 'मोर' बनून राहिलाय! जर त्याने स्पेलिंग 'MORAY' असं केलं तर त्याचा उच्चार बरोबर केला जाईल. शब्दात शेवटी 'इ' असेल तर मधल्या मूळाक्षराचा उच्चार बदलतो- हे ज्ञान माझ्या मुला बरोबर टिव्हीवर शैक्षणीक कार्यक्रम बघताना झालं. आम्हाला शाळेत सरळ धोपट इ चा उच्चार एह् असा होतो असं शिकवलं होतं... चालायचंच!
  • Log in or register to post comments

मार्था

सोत्रि
Fri, 06/01/2012 - 11:40 नवीन
माझ्या आडनावाचं इथली लोकं जे कडबोळं करतात त्याची तर्‍हा काय वर्णावी! 'मार्थ' काय, 'मराथ्' काय!
अगदी अगदी! माझ्या एका जुन्या कंपनीतील अमेरिकन ऑफिस मॅनेजर मला तिथे पहिल्यांदा बघून तीन ताड उडाली होती. तो पर्यंत फक्त इ-मेल कम्युनिकेशन झाल्यामुळे मला ती 'मार्था' समजून बसली होती. पण प्रत्यक्षात दाढी मिशीवाला बुवा बघितल्यावर तिला आश्चर्य वाटले होते ;) - ( मार्था (?) ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/31/2012 - 19:24 नवीन
नक्कीच आपले उच्चारही परिपूर्ण नसतात. परंतु वेगळेपणाची जाणीव झाल्यावर सुधारणा केली जाते. जसे Opportunity चा उच्चार लहानपणापासून अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय असूनसुद्धा विदेशात आल्यावर ऑपरट्युनिटी असे बदलणारे काही लोक मी पाहिलेत. अन अनुभवाबरोबर उच्चारांमधली प्रगती दखलपात्र नक्कीच असते. याउलट दक्षिण भारतीयांचे. सलग १०-१२ वर्षे परदेशात राहूनसुद्धा यंटायर, यम्पटी असेच उच्चार करण्याचा हेका न सोडणे. अशा वेळी विदेशी सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे असतात. परदेशात असूनही कुठल्याही सार्वजनिक स्थळी आपला कंपू जमवून मातृभाषेत जोर-जोरात गप्पा हाणणे हा आणखी एक अवगुण.
  • Log in or register to post comments

!

आबा
Fri, 06/01/2012 - 15:48 नवीन
हेका न सोडणे/ कंपू जमवणे, हे वर्णन फक्त दक्षीण भारतियांनाच लागू पडतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

>>परदेशात असूनही कुठल्याही

बॅटमॅन
Fri, 06/01/2012 - 16:24 नवीन
>>परदेशात असूनही कुठल्याही सार्वजनिक स्थळी आपला कंपू जमवून मातृभाषेत जोर-जोरात गप्पा हाणणे हा आणखी एक अवगुण. प्रचंड असहमत. आपापला कंपू करून आपल्या मातृभाषेत गप्पा मारणे (जोर-जोरात असो किंवा कसेही असो) ह्याला अवगुण म्हणणे हे मानसिक गुलामगिरीचे आणि न्यूनगंडाचे बर्‍यापैकी व्यवच्छेदक लक्षण आहे. स्वतःची मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान नसणे, अभिमान आहे असे सांगणे/आंजावरती लिहिणे तरी तो कृतीत-पक्षी प्राधान्याने मराठीतून बोलण्यात कधीच न दिसून येणे वगैरे असले की स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान असणार्‍यांचा राग येणे क्रमप्राप्त आहे. "आम्ही कसे मातृभाषेला डौन्मार्केट म्हणून दडपतो पण हे बघा कसे त्यांची मातृभाषा मिरवतात, (शिवाय त्यामुळे त्यांचे काहीही अडतदेखील नाही)", अशी ती जळजळ आहे, दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हाण तिच्यायला !!!!! एकदा भेट,

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 06/02/2012 - 00:25 नवीन
हाण तिच्यायला !!!!! एकदा भेट, या प्रतिसादाबद्दल ट्रीट देईन तुला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आलो की कळवतोच

बॅटमॅन
Sat, 06/02/2012 - 00:57 नवीन
आलो की कळवतोच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

असहमत!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 09:56 नवीन
मातृभाषा मिरवण्याची ही असली ओंगळवाणी संस्कृती त्यांची त्यांना लखलाभ!! मुळात मातृभाषा हि मिरवण्याचीच गोष्ट नसावी. परदेशात येऊन आपली भाषा व संस्कृती जपण्यासाठी मराठी मंडळे, बृहन्महाराष्ट्र संमेलने, विश्व साहित्य व विश्व नाट्य संमेलने या प्रकारचे दर्जेदार मार्गच परदेशातील मराठी माणूस अवलंबितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुठेतरी समजण्यात प्रचंड गडबड

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 10:44 नवीन
कुठेतरी समजण्यात प्रचंड गडबड होतेय. २ किंवा जास्त मराठी माणसांनी परदेशात आपापसात मराठी बोलले तर काय बिघडले? बाकी कुठला मार्ग दर्जेदार याबद्दल बरेच वाद घालता येतील, पण मराठीत बोलणे हे "ओंगळवाणे" कसे होऊ शकते हे मला अजूनही कळले नाही. जरा स्पष्ट करता का? >>मुळात मातृभाषा हि मिरवण्याचीच गोष्ट नसावी. मग काय तिची लाज वाटून न बोलण्याची गोष्ट असावी का? अन्यभाषिक लोकांना समजण्यास त्रास होऊ नये हे पटते पण म्हणून आपापसात मराठी बोलण्याला का इतका आक्षेप? काय घोडं मारलंय त्या बिचार्‍या मातृभाषेने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

उदाहरण

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 11:05 नवीन
याचे एक प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. बरेचदा विमानप्रवासापूर्वी बोर्डिंगसाठी उभे असताना, या लोकांच्या (तंबी, गारू, अण्णा वगैरे) त्यांच्या भाषेत जोर-जोरात गप्पा सुरू होतात. आजूबाजूला अथवा रांगेत उभी स्थानिक माणसे त्यामुळे त्रासलेली दिसतात. अश्या वेळी ते (स्थानिक माणसे) आपल्याकडेही जळजळीत कटाक्ष टाकतात. अन या गोष्टीचे या गोंधळी मंडळींना काही सोयरसुतूक नसते. याउलट मराठी माणसे आजू बाजूची परिस्थिती पाहूनच आपले वर्तन करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला वाटतं तुमची, मातृभाषेत

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/04/2012 - 11:19 नवीन
मला वाटतं तुमची, मातृभाषेत बोलणे आणि जोरजोरात (दुसर्‍यांना त्रास होईल इतपत जोरात) गप्पा मारणे यात गल्लत होत आहे. तपासून बघा. मी स्वतः दाक्षिणात्य लोकांच्यात अगदी जवळच्या सहवासात कैक वर्षं काढली आहेत. त्यामुळे, विशेषत: तमिळींचे एक व्यवच्छेदक लक्षण मला जे जाणवले ते हे की एखाद्या समूहात इतरभाषिकांची काळजी न करता तमिळमधे तासन्तास गप्पा मारणे. खूप सार्‍या तमिळींच्या सहवासातून झालेल्या निरीक्षणावरून हे सांगतो आहे. इतकंच नव्हे तर हापिसातल्या मिटिंग्जही (बॉस तमिळ आणि अधिकांश सहकारीही तमिळ) तमिळमधेच व्हायला लागल्या. हे प्रकरण इतकं पाराकोटीला गेलं की त्यावरून खूप लफडी झाली ऑफिसमधे. आणि गंमत म्हणजे तमिळींकडून याचं समर्थन केलं जात होतं. 'तुम्ही शिका की मग तमिळ, आम्ही का शिकायचं हिंदी?' वगैरे मुक्ताफळंही ऐकायला मिळाली. अर्थात सगळेच तमिळी हे मुद्दाम करतात असं नाही. मूळात, लहानपणापासून तमिळ ही भाषा इतकी कानावर पडते त्यांच्या, हिंदी नाहीच आणि इंग्लिश शाळाकॉलेजमधेच, शिवाय करमणुकीची सगळी साधनं तमिळमधेच... त्यामुळे आपसूक तीच भाषा येते तोंडात. अनोळखी माणसालाही ते प्रथम, 'तमिळा?' असंच विचारतात. थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती मल्याळींमधेही दिसून येते. पण केरळात हिंदीविरोध बव्हंशी नाहीच त्यामुळे ते प्रयत्न करतात आणि कामचलाऊ ते उत्तम अशा कोणत्याही प्रकारचे हिंदी बोलायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१. असेच म्हणतो. जोरजोरात

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 11:30 नवीन
+१. असेच म्हणतो. जोरजोरात बोलणे आणि मातृभाषेत बोलणे यात झालेल्या गल्लतीमुळे असे होतेय, दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मी माझ्या चेन्नैच्या

प्रीत-मोहर
Mon, 06/04/2012 - 21:18 नवीन
मी माझ्या चेन्नैच्या वास्तव्यात काही वेगळच पाहिल. माझ्या हापिसजवळच्या एका शाळेत लेंग्वेज फेस्टीवल होत . तर तिथे ईंग्रजी /तमिळ या भाषाम्ची पूजा करा. इतर भाषांशी आपल देण-घेण नाही. त्या आपल्या भाषा नाहीत. अस लहान पोरांना सांगितल जात होत. तेही तिथले शिक्षक आणी राजकारणी व्यासपीठावरुन बोलत होते. बाकी चालुद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 23:52 नवीन
आपल्या देशाच्या दुर्दैवाने हे असेच आहे. परंतु आजकाल तेथील युवापिढीला इतर राज्यांतील युवा पिढीपासून तुटल्यासारखे वाटते (असे एका तमीळ मित्राकडून ऐकले आहे). म्हणजे भविष्यात चित्र पालटू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अरेरे

प्रदीप
गुरुवार, 06/07/2012 - 11:05 नवीन
खूप सार्‍या तमिळींच्या सहवासातून झालेल्या निरीक्षणावरून हे सांगतो आहे.
बिपीन, तुम्हीसुद्धा! (हिंदाळलेल्या मराठीकडे मिपाकरांनी 'लक्ष द्यावे' अशी अजिजीची मागणी नुकतीच इथे वाचल्याने हे तात्काळ लिहीत आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अर्रर्रर्र! क्षमस्व! पण काही

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/15/2012 - 12:15 नवीन
अर्रर्रर्र! क्षमस्व! पण काही लकबी आता अंगवळणी पडल्यासारख्या झाल्या आहेत. आपल्या कथाकादंबर्‍यासिनेमांमधले रिक्षावाले, धोबी इ. सुद्धा आजकाल हिंदीतच बोलतात तिथे असे बारीक बारीक काहीतरी येतंच तोंडून! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आम्ही कसे मातृभाषेला

आशु जोग
Mon, 10/07/2013 - 23:55 नवीन
आम्ही कसे मातृभाषेला डौन्मार्केट म्हणून दडपतो पण तुम्ही मनसेवाले काय हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/01/2012 - 21:55 नवीन
अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय असूनसुद्धा विदेशात आल्यावर ऑपरट्युनिटी असे बदलणारे
असे बदलणारे लोक अमेरिकेतली कोणतीतरी बोलीभाषा बोलतात (चूभूदेघे). अस्सल अमेरिकन o या मूळाक्षराचा उच्चार ऑ असा करत नाहीत, अ आणि आच्या मधला काहीसा करता. (राणीच्या) इंग्लिशमधे opportunity चा जो उच्चार होतो तो देवनागरीत लिहायचा असल्यास ऑपर्च्युनटी असा काहीसा लिहावा लागेल. अशीच गोष्ट schedule या शब्दाची. इंग्लिश उच्चार शेड्यूल, अमेरिकन स्केड्यूल. ड चा उच्चार ड आणि ज यांचं मिश्रण असणारा. देवनागरीत लिहीणार कसा आणि नाही एखाद्या मराठी माणसाला समजला तर त्याचा दोष काय? boulevard या मूळ फ्रेंच शब्दाचा उच्चार बुलऽवाह असा काहीसा होतो, इंग्लिश/अमेरिकन त्याला बुलवार्ड म्हणतात आणि मराठी उच्चार बु-ले-वा-र्ड. फ्रेंच, इतालियन अशा भाषांमधून जे शब्द इंग्लिश्/अमेरिकन भाषांमधे उचलले आहेत, त्यांत विशेषतः t आणि d यांचे उच्चार त आणि द असे काहीसे होतात. अमेरिकेत रहाणारे मराठी मातृभाषक बहुसंख्येने या अक्षरांचे उच्चार ट आणि ड असे करतात. उदाहरणार्थ tiramusu (टिरामिसू), enterprenuer (आंट्रप्रिन्युअर). तिरामिसूचा हा उच्चार ऐकून एखादा इतालियानो गोड खाणंच कायमचं सोडून देईल. खुद्द (उत्तर) इंग्लंडात, इंग्लिश लोकंच (वेल्श आणि स्कॉटीशही नाहीत) h, often यांचे उच्चार हेच आणि ऑफ्टन असे करतात. मराठी लोकं fridge, couch, dais, tube या शब्दांचे जे उच्चार करतात ते मातृभाषा इंग्लिश (किंवा अमेरिकन, कनेडीयन, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंडीश) असणारे किती लोकं करत असतील? बहुदा कोणीही नाही. चला मुलांनो, घाटी लोकांची टर उडवू. बाकीचं सोडा, इंग्लिशमधे वारंवार वापरला जाणारा शब्द आहे the. या 'द'चा उच्चार मराठी केल्यास, जीभ दाताच्या (मूळाशी/टाळूला लावून केल्यास) तो ही साफ चूक असतो. किती मराठी भाषिकांना हा उच्चार नीट करता येतो? निदान परदेशात रहाणार्‍या किंवा इंग्लिश्/अमेरिकन चित्रपट आणि टीव्ही पहाणार्‍यांना? फार कमी. एक दक्षिण भारतीय मित्र आणि मी यांच्या मते या the आणि एकूण th च्या उच्चारावरून कोणाचे उच्चार किती आंग्लाळलेले आहेत याचं बर्‍यापैकी अंदाज येतो. मेघवेडाच्या प्रतिसादात एक भर: मूळ भारतीय लोकांचा भारतीय उच्चार सुटत नाही. पॉश, उच्चभ्रू भारतीयांच्या उच्चारांवरून प्रांत समजत नाही, पण भारतीयपणाही सुटत नाही. शिवाय नीट अभ्यास केल्यास भारतीय उच्चारांवर ब्रिटीश संस्कार आहेत, अमेरिकन आहेत का ऑस्ट्रेलियन हे ही समजतं. टीपः इतर भाषांमधले उच्चार (मला समजले आहेत ते मूळ उच्चारांच्या फार जवळचे आहेत असं मी समजते आणि ते उच्चार) देवनागरीत लिहीणं अशक्य आहे. या विषयाचा अधिक आनंद लुटण्यासाठी मूळ पिग्मॅलियन मजेदार आहे. 'ती फुलराणी'त एवढा भाग फार सुरेख रूपांतरित केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१

क्लिंटन
Fri, 06/01/2012 - 22:44 नवीन
अरे वा. उत्तम प्रतिसाद. बाकी अमेरिकेत दक्षिणेकडील राज्यांमधल्यांचे उच्चार थोडे वेगळे असतात. कृष्णवर्णीय लोक अजूनच वेगळे बोलतात. इंग्लंडमधले आणि ऑस्ट्रेलियातले लोक अजून निराळे उच्चार करतात. मी अमेरिकेतील आमच्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशनला गेलो असताना मला एक ऑस्ट्रेलियन विद्यार्थी भेटला होता. तो विद्यापीठात त्या दिवशी सकाळीच पहिल्यांदा आला होता आणि बोलताना बोलून गेला: "आय व्हिजिटेड द युनिव्हर्सिटी फॉर द फर्स्ट टाइम टुडाए". आता त्याचा टुडाए म्हणजे "टुडे" हे मला कळायला जरा वेळच लागला. तेव्हा प्रत्येकाची इंग्रजी भाषा बोलायची लकब वेगळी असते.तशीच दाक्षिणात्यांचीही लकब वेगळी आहे.आता यावरून त्यांची थट्टा उडवायचे कारण नाही. मराठी लोकही अनेकदा प्रत्येक शब्दाचा अगदी "मराठी बाण्याप्रमाणे" ठसठशीत उच्चार करतात. प्रमोद महाजनांच्या इंग्रजी बोलण्यातून ते अनेकदा जाणवायचे.डेव्हिल्स ऍडव्होकेट मध्ये करण थापरने प्रमोद महाजनांची घेतलेली या मुलाखतीत साधारण ५४ सेकंदांनंतर "we are able to communicate our viewpoint" चा उच्चार प्रमोद महाजनांनी केला आहे तसा मराठी माणूस सोडून इतर कोणाला तितक्या स्पष्टपणे जमेल असे वाटत नाही.तेव्हा यावरून मराठी उच्चारांचीही थट्टा उडवावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझे २ आणे

बॅटमॅन
Fri, 06/01/2012 - 23:38 नवीन
>>फ्रेंच, इतालियन अशा भाषांमधून जे शब्द इंग्लिश्/अमेरिकन भाषांमधे उचलले आहेत, त्यांत विशेषतः t आणि d यांचे उच्चार त आणि द असे काहीसे होतात. अमेरिकेत रहाणारे मराठी मातृभाषक बहुसंख्येने या अक्षरांचे उच्चार ट आणि ड असे करतात. बरोब्बर. t आणि d यांचे उच्चार हे मधले असतात, ज्यांना "अल्व्हिओलर" म्हणतात. म्हणजे त म्हणताना जीभ दातांना स्पर्श करते, आणि ट म्हणताना मागे जाते. आता यांच्या बरोब्बर मध्यभागी जीभ ठेवून उच्चार करा की मग इंग्रजी t चा उच्चार होईल. ट, ड हे उच्चार मूर्धन्य (रेट्रोफ्लेक्स) असतात, तर त, द हे दंत्य .अधिक माहितीकरिता हा दुवा बघता येईल. http://en.wikipedia.org/wiki/Voiceless_alveolar_stop तिथे उच्चारदेखील ऐकता येईल. >>बाकीचं सोडा, इंग्लिशमधे वारंवार वापरला जाणारा शब्द आहे the. या 'द'चा उच्चार मराठी केल्यास, जीभ दाताच्या (मूळाशी/टाळूला लावून केल्यास) तो ही साफ चूक असतो. किती मराठी भाषिकांना हा उच्चार नीट करता येतो? निदान परदेशात रहाणार्‍या किंवा इंग्लिश्/अमेरिकन चित्रपट आणि टीव्ही पहाणार्‍यांना? फार कमी. एक दक्षिण भारतीय मित्र आणि मी यांच्या मते या the आणि एकूण th च्या उच्चारावरून कोणाचे उच्चार किती आंग्लाळलेले आहेत याचं बर्‍यापैकी अंदाज येतो. अगदी प्वाइंटाचा मुद्दा. हा th साधारणपणे एखाद्या तोतर्‍या माणसाने 'स' चा उच्चार करावा त्यासारखा असतो- त्यातला "त/थ" हा अगदी आला-न-आला इतपतच असतो. "स वाटणारा थ" अशी त्याची अतिशय रफ व्याख्या करता येईल. त्याचा उच्चार इथे ऐकता येईल. http://en.wikipedia.org/wiki/Voiceless_dental_fricative आणि मराठी अ‍ॅक्सेंट नीट येण्या-न-येण्याचे व्यवच्छेदक लक्षण जसे ळ, च(चमचा मधला च) ह्या उच्चारांच्या शुद्धतेवरून कळून येते, तीच गोष्ट इंग्रजी अ‍ॅक्सेंटबद्दल या th च्या बाबतीत. विकिवर या विषयावर एक स्वतंत्र लेखच आहे. http://en.wikipedia.org/wiki/Pronunciation_of_English_th
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल

पिशी अबोली
Fri, 04/26/2013 - 17:57 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल थँक्यू.. (यातील 'थ'चा उच्चार मुद्दाम डेंटल नसलेला (थोडक्यात,बिन-आंग्लाळलेला) वाचावा.. :p )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा