भला उसकी कमीज मेरे कमीज......

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
25 May 2012 - 10:50 am

गेली साठ-सत्तर र्वष चाललेल्या डिर्टजंट वॉरचा आढावा घेतल्याशिवाय टिनोपालच्या कथेचा अध्याय वाचता येणार नाही. १९५९ साली हिंदुस्थान लिव्हरने सर्फ बाजारात आणले आणि बकेट वॉशची पद्धत सुरू झाली. स्वस्तिक केमिकल्सचा डेट नावाचा एक डिर्टजट ब्रँड सोडल्यास सर्फच्या स्पर्धेत कुणीच नव्हतं.
सत्तरीच्या दशकात निरमा नावाच्या ब्रँडने हिंदुस्थान लीव्हरची झोप उडवली. सर्फची शुभ्रतेची मक्तेदारी संपली. ‘दूध सी सफेदी निरमा से आये’ या ओळीनं सर्फचा ब्रँड रिकॉल संपवून टाकला.
ज्यावेळी सर्फ १२-१३ रुपये किलोने विकलं जायचं तेव्हा निरमाची किंमत तीन रुपये किलो होती. छायागीत आणि सोबत निरमाची जाहीरात. दृकश्राव्य माध्यमाची ती उगवती वर्षे होती. छायागीतच्या लोकप्रियतेचा संपूर्ण भरघोस फायदा निरमाला मिळाला. सर्फ गावखेड्यात पोहचत नवहतं पण निरमा तिथे पोहचलं. गावागावात निरमाची गाडी फिरायची . रोख पैसे द्या आणि माल घ्या अशी अट असूनही निरमाचा माल ताबडतोब खपायचा.
हिंदुस्थान लिव्हरने समजदार ललिताजींना (कविता चौधरी) आणलं. ‘अच्छी चीज और सस्ती चिज’ मुद्दा मांडून बघितला. व्हील नावाची नवीन वॉशिंग पावडर निरमाच्या स्पर्धेत आणली. ‘दूर हो जा मेरी नजरों से’ ही कॅम्पेन सुरू करून बघितली.
आज भारतात येऊन सर्फला ६० वर्ष होत आली, सर्फची जिंगल कुणालाच आठवत नाही, पण ‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जिंगल आठवत नाही असं कुणीच नसेल.. निरमाला संपवण्यासाठी लीव्हरने स्लोगन्स आणि टॅग लाइनचे जे युद्ध सुरू केले ते आजही चालूच आहे.
आता तर स्पर्धकांची संख्या वाढली आहे. शुभ्रतेच्या या बाजारावर काबू करण्यासाठीची धडपड आता एका वेगळ्याच पातळीवर गेली आहे. उदाहरण टाइड या ब्रँडचे घ्या. इतर ब्रँडच्या तुलनेत हा तसा नवीन ब्रँड, पण गेल्या काही वर्षांत टाइडच्या मूळ फॉम्र्युलात कमीत कमी २० वेळा बदल करून बघण्यात आला.
इतकी सगळी धडपड कशासाठी, तर शुभ्र कपडय़ाचे स्वप्न विकायची हिस्सेदारी आपल्या वाटय़ास जास्तीत जास्त यावी म्हणून.
हीच मक्तेदारी काही वर्षांपूर्वी टिनोपालकडे होती. कपडे किती शुभ्र तर टिनोपालमध्ये धुतल्यासारखे. टिनोपाल त्यावेळचा शुभ्रतेचा मानदंड होता. जे पांढरेशुभ्र असेल ते टिनोपाल. टिनोपाल म्हणजे साबण किंवा वॉशिंग पावडर नव्हे. टिनोपाल म्हणजे ऑप्टिकल ब्राइटनर. त्याला फ्लुरोसंट व्हाइटनिंग एजंट हे दुसरे नाव आहे.
कपडा कितीही स्वच्छ धुतला तरी एक पिवळसर झाक राहते, ज्यामुळे शुभ्र पांढऱ्या रंगाचा परिणाम येत नाही, काही तरी कमी आहे असे वाटत राहते. पांढऱ्या रंगाचा झगमगाट दिसत नाही. हे न्यून पुरते करण्यासाठी ऑप्टिकल ब्राइटनरचा वापर केला जातो.
दुसरा पर्याय आहे ब्लिचिंग एजंट वापरण्याचा. त्यामुळे शुभ्रता येते खरी पण तात्पुरतीच. ब्लिचिंग ही रासायनिक प्रक्रिया असल्यामुळे कापड कमजोर होते आणि हळूहळू विरते.
ह्या खेरीज आणखी एक उपाय म्हणजे पिवळसर रंग झाकून टाकणे. ज्याला मास्किंग एजंट असेही म्हणतात. या मास्किंग एजंटपैकी आपल्याला परिचित म्हणजे नीळ. (एके काळी रॉबिन ब्ल्यू नावाचा एक ब्रँड लोकप्रिय होता.) निळीच्या निळसर परिणामाने पिवळट मळकट छटा कमी व्हायची, पण निळीच्या पाण्यात कपडे बुडवायचे तंत्र जमले नाही, तर पिवळ्या रंगासोबत निळे ढगही पांढऱ्या कापडावर दिसायला लागायचे.
टिनोपाल ह्या सगळ्यापेक्षा वेगळे तंत्र वापरते. ते कपडय़ाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांना शोषून त्याऐवजी चमकत्या निळ्या किरणांना परावर्तित करते. ह्या हलक्या निळ्या रंगाचा परिणाम मानवी डोळ्यांना झगमगत्या पांढऱ्या रंगासारखा दिसतो. ह्या पांढऱ्या रंगाला म्हणतात ‘टिनोपाल की सफेदी’.
हवाहवासा वाटणारा हा शुभ्र पांढरा रंग आणण्यासाठी फारशी खटपट करण्याची आवश्यकता नसायची. कपडे धुऊन झाले की बादलीभर पाण्यात दोन चमचे दाणेदार टिनोपाल घोळवून त्या पाण्यातून कपडे काढले की, कपडा झगमग चमकायला लागायचा. निळ्या रंगाची-पांढऱ्या झाकणाची टिनोपालची डबी घरात असणे हे घराच्या पुरोगामित्वाचे लक्षण समजले जायचे. भसकाभर साबणाची पावडर वापरून जी सफेदी यायची नाही, ती सफेदी टिनोपालच्या दोन चमच्यात मिळायची. अर्थात टिनोपालची किंमतही जास्त असल्यामुळे कमावत्या माणसांचे कपडे टिनोपालमध्ये आणि बाकीच्या कपडय़ांसाठी पाचशे एकचा बार असा भेदभावही केला जायचा.
माणसाची कमाई आणि कपडा - माणसाची ऐपत आणि कपडा - माणसाची इभ्रत आणि कपडा याची घट्ट सांगड कपडय़ाच्या शुभ्रतेशी जोडल्याने टिनोपालसारख्या ऑप्टिकल ब्राइटनरला पर्याय नव्हता. ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चे मूल्य वाढले की, ऑप्टिकल ब्राइटनरची गरज वाढत जाते.
महात्माजी होते तोपर्यंत चळवळीला टिनोपालची गरज नव्हती. गांधी टोपीला कसलाच डाग नव्हता. त्यानंतरच्या काळात ज्यांना टोपी घालूनही उजळ माथ्यानं फिरायची पंचाईत होती त्यांच्या सोयीसाठी टिनोपालची सफेदी फारच गरजेची होती. त्यामुळे टिनोपाल पोलीटीकल स्टेट्स सिम्बॉल झाले. टिनोपालच्या एका धुलाईत कपडय़ावरचे मळके डाग लपायला लागले आणि हो गयी मली मोरी चुनरिया अशी हळहळ वाटणारे संत कालबाह्य झाले.
सिबा गायगी नावाच्या एका कंपनीचा हा ब्रँड आता बीएसएफ या रसायन कंपनीकडे आहे. फार पूर्वी लायसन्स संपल्यावर टिनोपालचं रानीपाल झालं.
सगळ्याच डिर्टजट पावडरमध्ये आता ऑप्टिकल ब्राइटनर असते, त्यामुळे टिनोपाल किंवा रानीपालची वेगळी अशी गरज संपली आहे.
टिनोपाल म्हणजे काय हे आता बऱ्याच जणांना आठवणारही नाही.टिनोपालचे अस्तित्व वेगळे राहिलेले नाही. काही कंपन्या रानीपाल नावानं अजूनही ऑप्टिकल ब्राइटनर विकतात, पण ते काही खरे नाही.
ज्या ब्रँडचा लोकाश्रय संपला तो ब्रँड मावळला.
मावळत्या ब्रँडला अधूनमधून आठवणींचे अर्घ्य द्यायचे.
ग्रेट ब्रँड्स डु नॉट डाय, दे जस्ट फेड अवे.
खरं सांगायचं झालं तर कपडय़ांमध्ये रंगभेद- रंगीत आणि पांढरे - असा फक्त कपडे धुवायला टाकताना करावा, पण हे तत्त्व समजताना काहीतरी गल्लत झाली आणि माणसांनी कपडय़ाच्या रंगाप्रमाणे माणसंच वेगळी केली.
हा व्हाइट कॉलर तर तो ब्ल्यू कॉलर. पांढरपेशे किंवा व्हाइट कॉलर आणि श्रमजीवी ब्ल्यू कॉलर. कायदा सगळ्यांना सारखाच पण व्हाइट कॉलर माणसांच्या मोर्चावर पोलीस छडीमार करायचे, तर ब्ल्यू कॉलरवाल्यांवर लाठीमार करायचे.
न्याय सगळ्यांना एकसारखा पण काही वेळा असं वाटतं की, आपल्याकडे दोन इंडियन पीनल कोड आहेत. एक आयपीसी व्हाइट आणि एक आयपीसी ब्ल्यू.
२००१ सालच्या मे महिन्यातील एका रात्रीची गोष्ट. जुहूच्या एका रस्त्यावर फरदीन खानला अटक करण्यात आली. झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून काही ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. मुंबईच्या फिल्मी विश्वाला हादरवून टाकणारी ही बातमी बहुतेक सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापली गेली. चाहत्यांची गर्दी कोर्टात झाली. अपेक्षेप्रमाणे त्याची ताबडतोब जामिनावर सुटकाही झाली. खटला उभा राहण्यासाठी दहा र्वष लागली. गेल्या वर्षी २०११ साली फरदीनवरचे आरोपपत्र कोर्टासमोर आले. मामुली प्रमाणात अमली पदार्थ विकत घेण्याच्या आरोपाखाली खटला पुढे चालवण्यात आला. या वर्षी फरदीन मार्च महिन्यात कोर्टापुढे हजर झाला. कोर्टासमोर त्याने निवेदन दिले की, तो आता व्यसनमुक्त झाला आहे. कोर्टाने त्याचे निवेदन स्वीकारून कलम ६४ (अ) NDPS अ‍ॅक्ट १९८५ ची तरतूद वापरून या खटल्यातून अभय दिले आणि मुक्त केले.
अंमली पदार्थाची केस -दहा वर्षांनी कोर्टासमोर यावी - अकराव्या वर्षी त्यातून अभय मिळावे. सगळं काही सोयीचं- सुरळीत आणि सुटसुटीत.
ही बातमी वाचताना २०-२२ वर्षांपूर्वीची एक बातमी आठवली. मुंबईच्या एका मिल कामगाराची रात्रपाळी सुटल्यावर गेटवर झडती घेण्यात आली. त्याच्या खिशात पंधरा ग्राम टिनोपाल सापडले. त्याची रवानगी ताबडतोब पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोर्टात आणि कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्या कामगाराची परिस्थिती जेमतेमच असल्याने सरकारतर्फे वकील मिळून खटला उभा राहायाला काही दिवस गेले. कोर्ट जामीन द्यायला तयार झाले, पण त्याचा जामीन कोणी देईना. सहा महिने तुरुंगात काढल्यावर खटला उभा राहिला आणि तीन महिन्यांची शिक्षा झाली.
अंमली पदार्थ बाळगले तर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अभय आणि १५ ग्राम टिनोपाल चोरलं तर सहा महिने जेलात.
आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

मस्त 'ऐतिहासिक' सुरुवात आणि अंतर्मुख करणारा शेवट...टिपिकल रामदास स्टाईल!

अर्धवटराव's picture

25 May 2012 - 11:14 am | अर्धवटराव

मिपाकर असण्याच्या सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक म्हणजे रामदासजींचे लेख.
परत एकदा __/\__

अर्धवटराव

मी-सौरभ's picture

25 May 2012 - 1:23 pm | मी-सौरभ

सहमत

मदनबाण's picture

25 May 2012 - 11:18 am | मदनबाण

भूतकाळात परत नेउन ठेवणारे लेखन ! :)
उगाच टाटा का ओके धुलाई का साबुन ही जाहिरात आठवुन गेली !
बाकी खानावळीने काहीही केल तरी ते चालवुन घेतल जात...मग ते फुटपाथ वरील लोकांना आपल्या गाडी खाली चिरडणे असो वा... चितळाची शिकार !

विजुभाऊ's picture

25 May 2012 - 11:52 am | विजुभाऊ

"अरे देवा साबण की हो विसरले मी" म्हणत व्हील बार ने कपडे धुणारी लीला मिश्रा आठवल्या.
अन पाठोपाठ शोलेतली त्यांची ती अजरामर बसंती की मौसी ही

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2012 - 11:57 am | बिपिन कार्यकर्ते

काय बोलायला शिल्लकच नाही! नुसताच दंडवत. माहिती असणं हेच मूळात ग्रेट पण ती अशी मस्तपैकी मांडणं हे ग्रेटेस्ट!

बेष्ट!

सोत्रि's picture

25 May 2012 - 8:51 pm | सोत्रि

बिकांशी बाडीस

-( रामदासी ) सोकाजी

चौकटराजा's picture

25 May 2012 - 12:04 pm | चौकटराजा

मी गेले चार एक महिने अधुन मधुन आपली लेखन कीर्ति ऐकत होतो. पण आपण कोंणत्याही
विषयावर अगदी धरून ठेवेल असे लिहिता हे मला जाणवले. आता मी आपले इतर साहित्य
वाचायला मोकळा.
धन्यवाद !

प्यारे१'s picture

25 May 2012 - 12:15 pm | प्यारे१

चला रामदासकाका,
प्यार्टी पायजेत म्हन्जे पायजेतच आपल्याला !
का म्हणून विचारताय?
शिक्कामोर्तब झालंय तुम्ही छान लिहीता याचं ... ! ;)

आता आम्ही सुखानं डोळे मिटायला मोकळे! :)

चौकटराजा's picture

25 May 2012 - 6:12 pm | चौकटराजा

प्या, इतक्यात सुखानं डोळे कशाला मिटायचे बुवा? डोळे उघड तर पहिले ! ( दुसर्‍याचे नाही )
पुप्रशु

भडकमकर मास्तर's picture

25 May 2012 - 12:04 pm | भडकमकर मास्तर

अहाहा.. नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन.... "टिनोपाल, कोकेन, फरदीन , शिक्षा " आणि शी र्षक फारच मस्त

विसुनाना's picture

25 May 2012 - 12:06 pm | विसुनाना

'लेख आवडला. '

असे लिहून थांबणे अशक्य आहे.
'१५२ किमी/तास वेगाने येणारा चेंडू टप्पा पडल्यावर ८० किमीवर आला आणि लेग स्टंपवरून ऑफ स्टंपकडे हातभर वळाला. शिवाय मिडल स्टंपवरचा चेंडू पॅडला लागूनही त्रिफळाचित झालो.'
असे काहीतरी मनात आले.

मोहनराव's picture

25 May 2012 - 6:41 pm | मोहनराव

+१

छान.

आता पुढचा लेख पारले जी का?

प्रचेतस's picture

25 May 2012 - 12:13 pm | प्रचेतस

रामदासकाकांचे लेख म्हणजे मेजवानीच.

नंदन's picture

25 May 2012 - 12:18 pm | नंदन

>>> काय बोलायला शिल्लकच नाही! नुसताच दंडवत. माहिती असणं हेच मूळात ग्रेट पण ती अशी मस्तपैकी मांडणं हे ग्रेटेस्ट!
--- बिकांशी बाडिस!

बाकी ह्या वर्गविभागणीवरून एक साबणाच्या पावडरचीच जाहिरात आठवली. बीडीडी चाळीसदृश्य इमारतीच्या सज्ज्यात उभी राहून टिपिकल कनिष्ठ मराठी मध्यमवर्गातली एक बाई इंग्लिश मिडीयममधली मुलं किती स्मार्ट असतात, हे मोठ्या अप्रूपाने सांगते आहे अशी थीम असणारी. त्यावर 'लोकमानस'मध्ये मराठी माध्यमातील ('व्हर्नीज्') मुलांच्या तौलनिक स्मार्टपणाबद्दल गरमागरम चर्चा झडलेली आठवते.

ब्रॅण्‍डेतिहासाच्या अंगाने समाजमनाची केलेली हळुवार धुलाई खूपच गंमतीशीर.
धन्यवाद रामदासजी.

खुपच छान!शेवट तर एकदम twist!!

श्रावण मोडक's picture

25 May 2012 - 1:46 pm | श्रावण मोडक

स्मृतिरंजनासोबतचे अंजनही.

नाना चेंगट's picture

25 May 2012 - 2:44 pm | नाना चेंगट

+१

कपिल काळे's picture

25 May 2012 - 2:07 pm | कपिल काळे

नेहमीप्रमाणेच मस्त !!

साबण हा लेखाचा विषय असल्यामुळे पाठीला साबण चोळणे ह्या मिपावरील रुढ वाक्प्रचाराची आठवण झाली. अर्थात ही लेख आंघोळीच्या साबूबद्द्ल नसून कपड्याच्या सबूबद्द्ल आहे हीगोष्ट निराळी !!

असो. पण निरमाची आमच्या गावात मिळणारी, स्टेपलरपीना मारलेली पिशवी आठवली. तसेच घरातून आता गायब झालेली टीनोपालची बाटली सुद्धा !

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2012 - 2:09 pm | प्रकाश घाटपांडे

उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी! चलो उसकी कमीज गंदी कर दे!
रामदासांचा लेख आवडला!

पिंगू's picture

25 May 2012 - 2:18 pm | पिंगू

जुन्या स्मृती चाळल्या गेल्या.. निरमा ब्रँडला विसरणे सहज शक्य नाही.

पण लेखाचा शेवट मात्र अंतर्मुख करणारा..

- पिंगू

सोत्रि's picture

25 May 2012 - 8:56 pm | सोत्रि

जुन्या स्मृती चाळल्या गेल्या

पिंगु लेका, तुझं वय काय... तु बोलतो काय ? ;)

- ( 'व्हाइट कॉलर' कमीज घालून 'ब्लु कॉलर' कामे करणारा ) सोकाजी

जुन्या म्हणजे बालपणातल्या रे..

कोण म्हणतयं रे मला की वार्धक्य लागलयं... :D
- पिंगू

दिपक's picture

25 May 2012 - 2:32 pm | दिपक

बरिच नविन माहिती. लेखातील सुरुवातीचा भाग वाचताना उगाचच ’चष्मेबद्दुर’ चित्रपटातली ’मिस चमको’ आठवली. :-)
शेवट एकदम रामदास काका ष्टाईल.

उदय के'सागर's picture

25 May 2012 - 3:12 pm | उदय के'सागर

खुपच छान लिखाण.... जुन्या आठवणि ताज्या केल्यात तुम्हि.... वाचतांना अगदी ति रविवारची सकाळ समोर आलि... त्या रामायण, महाभारत, रंगोली, जंगलबुक, छायागित सगळ्यांच्या मधे-मधे ह्या जाहिराती चमकायच्या.... :)

हारुन शेख's picture

25 May 2012 - 8:39 pm | हारुन शेख

"ओह्हो दिपिकाजी , आईये आईये ये लीजिये आपका सब सामान तैय्यार "

"ये नही वो "

" लेकीन आप तो वोह हमेशा मेह्न्गीवाली टिकिया"

"लेती थी, पर वही मेहंगे दामोवाली सफाई कम दान्मो में मिले तो कोई ये क्युं ले, वो न लें "

" मान गये "

" किसे ? "

" आपकी पारखी नजर और निर्मा सुपर दोनो कों "

>>>

अर्धा मिनिटपण नाही लागला हे टंकायला इतकी हि जाहिरात अवचेतनात पक्की होती.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र's picture

25 May 2012 - 6:25 pm | शैलेन्द्र

काका, किती आठवणी ताज्या केल्यात हो..

घरात किराणा दुकाण होतं, १९८७-८८ ते ९४ पर्यंत अनेक ब्रँडचे युद्ध जवळुन पाहिलय.. काही विस्मृतीत गेलेली साबनांची/ डिटरजंटची नाव पटपट आठवली.. डंकनचा डबल बी- बिजली नावाचा एक लोकल साबन.. औरंगाबादवरुन येणारा दत्त कंपनीचा काळा साबन.. व्हील आणी रीन यांचे युद्ध, सर्फ आणी एरीयलची रस्सीखेच, हळुहळु संपत गेलेले निरमाचे मार्केट,

बाकी तुमच्या लिखानाबद्दल परत काय लिहायचं...

रामदास's picture

25 May 2012 - 7:30 pm | रामदास

तुम्ही म्हणताय तो धनतकचा डबल बी साबण .डबल बी म्हणजे बाँबेज बेस्ट. धनतकची अंधेरीला फॅक्टरी होती.तेथे आता सॉफ्टवेर पार्क आहे. धनतक आता पुण्यात तयार होतो.

शैलेन्द्र's picture

27 May 2012 - 12:01 pm | शैलेन्द्र

बरोब्बर काका.. धन्तक...

चौकटराजा's picture

26 May 2012 - 9:13 am | चौकटराजा

शैलू, लिनोपाल हे नाव आठवते काय ???

वारा's picture

26 May 2012 - 2:01 pm | वारा

पुर्वी व्हील रीन सर्फ आणी एरीयल यांच्यात भांडण आहे अस वाटायच. पण एकदा एच. एल. एल च्या प्लांट मधे जाण्याचा योग आला तेव्हा समजले की हे सारे एकाच कंपनीचे ब्रांड आहेत. म्हणजे एका मशीन मधुन रीन साबण बाहेर येतोय तर एकातुन सर्फ एक्सेल. पलीकडेच हमाम , लक्स व लाईफबॉय यांचे सुद्धा प्रोडक्शन चालु आहे. आणि बाहेर जाहीरातीत उगीच यांची भांडणे. गिर्हाईकाला गंडवणे दुसर काय.

शैलेन्द्र's picture

27 May 2012 - 11:58 am | शैलेन्द्र

गिर्‍हाइकाला गंडवण्यापेक्षाही, प्रत्येक प्रकारच्या गिर्‍हाइकाला हवे ते सगळे आपणच देणे हा प्रयत्न असतो.. जस ब्रिटानीया कंपनी, मारीपासुन ते बर्बॉनपर्यंत सगळे बिस्कीट बनवते तसचं..

लाईफ्बॉयचा ग्राहक वेगळा, हमाम्चा वेगळा, लिरीलचा वेगळा, लक्सचा वेगळा.. नसला वेगळा तरी कंपण्या स्वता: तसे वेगळे ग्राहकवर्ग तयार करतात..

vikramaditya's picture

27 Sep 2014 - 11:55 am | vikramaditya

प्रत्येक सेगमेंट साठी वेगळे प्रोडक्ट असते.

भिंगरी's picture

27 Sep 2014 - 11:17 pm | भिंगरी

सुरवातीला 'स्वे' ही पावडर बरेच दिवस होती. खूप छान होती.चौकोनी खोक्यात एक किलो मिळायची.
तिच्या बरोबर मिळालेला प्लास्टीकचा मोठा डबा माझ्या आईने सतत वापरूनही ३०/३५ वर्ष टिकला.

विकास's picture

25 May 2012 - 6:34 pm | विकास

वरील अनेक प्रतिक्रियांशी सहमत, विशेष करून, "काय बोलायला शिल्लकच नाही! नुसताच दंडवत. माहिती असणं हेच मूळात ग्रेट पण ती अशी मस्तपैकी मांडणं हे ग्रेटेस्ट!"

एक प्रश्न डोक्यात आला: जुन्या काळाचा / कार्यक्रमांचाच नाही तर जाहीरातीचा पण आठवणीत ठेवणारे फक्त भारतीयच असावेत का? (त्यात मी देखील आहे).

एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’

शेवट अंतर्मुख करायला लावणारा आहे.

रामदास's picture

25 May 2012 - 7:33 pm | रामदास

जुना काळ / कार्यक्रम / जाहीराती यावर एका इंग्रजी संस्थळावर लिखाण केल्याचे आठवते आहे.

लेख संपतासंपता विचार करायला लावणारा.
आवडलाच आवडला.

मृगनयनी's picture

25 May 2012 - 6:51 pm | मृगनयनी

छान लेख रामदास'जी!
शेवटची अन्तर्मुख करायला लावणारी , ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’ ही ओळ जास्त टची वाटली.... :)

पुलेशु..

कपड्यांवरून माणसं ओळखली जाण्याच्या जमान्यात अश्या कपडे चमकवणार्‍या ब्रँडचं नशिब चमकलं नसतं तरच नवल.
रामदासकाकांचा लेख वाचून 'आवडला' असा प्रतिसाद फारच कोरडा वाटतो. स्मरणरंजन करता करता हसवणारं आणि त्याच वेळी अंतर्मुख करणारं लेखन... वाचायल्या मिळाल्याबद्धल खुप खुप धन्स!

सूड's picture

25 May 2012 - 7:11 pm | सूड

__/\__

स्मिता.'s picture

25 May 2012 - 7:22 pm | स्मिता.

रामदास काकांचा लेख वाचून कधीच अपेक्षाभंग होत नाही. लेखन अगदी रामदास काका ष्टाईल! शेवट डोकं पोखरणार्‍या विचारात टाकून गेला.

भरत कुलकर्णी's picture

25 May 2012 - 7:24 pm | भरत कुलकर्णी

उत्तम

तिमा's picture

25 May 2012 - 8:24 pm | तिमा

एकात एक दोन गोष्टी गुंफून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. यातील 'फॅक्टस' सगळे माहितीच होते, पण असं लिहायला नसतं जमलं कधी आम्हाला.
डेट हा डिटर्जंटही चांगला होता. पण ते जाहिरातीत कमी पडले. 'निरमा' पावडर मधे सोडियम कार्बोनेटचे प्रमाण खूपच जास्त असल्याने तो स्वस्त होता. आता तर, ही ,'अ‍ॅक्टिव्ह कंटेंट' कमी ठेवून जाहिरातबाजीवर माल विकण्याची निरमाची युक्ती, सगळ्यांनीच आत्मसात केली आहे.

हारुन शेख's picture

25 May 2012 - 8:44 pm | हारुन शेख

लेख आवडला. आपल्याकडे पैसा असेल तर वकिल चांगला मिळतो आणि वकील चांगला मिळाला कि न्याय चांगला मिळतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी_माणूस's picture

25 May 2012 - 9:01 pm | मराठी_माणूस

आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’

मन विषण्ण करणारे सत्य (....... all are equal, some are more equal)

धनंजय's picture

25 May 2012 - 9:08 pm | धनंजय

लेख आवडला.

पण दोन लेख मारून-मुटकून एक करून दिलेत, या कंजूषपणाबद्दल निषेध. शिवाय दोन लेखांचे एकमेकांशी तसे नीट फिटिंग होत नाही.

एक शंका : "१५ ग्रॅम टिनोपॉल खिशात असणे" यात गुन्हा नेमका काय? टोनोपॉल अमली पदार्थ म्हणून सुद्धा वापरतात काय? अथवा त्या माणसाने ते टिनोपॉल चोरले होते काय?

मराठी_माणूस's picture

25 May 2012 - 9:32 pm | मराठी_माणूस

एक शंका : "१५ ग्रॅम टिनोपॉल खिशात असणे" यात गुन्हा नेमका काय? टोनोपॉल अमली पदार्थ म्हणून सुद्धा वापरतात काय? अथवा त्या माणसाने ते टिनोपॉल चोरले होते काय?

हीच शंका माझ्याही मनात आली होती, बहुतेक ते चोरल्याचा आरोपा असावा असे वाटते

रामदास's picture

25 May 2012 - 9:58 pm | रामदास

बहुतेल मिलमध्ये कपड्याच्या धुलाईच्या शेवटच्या टप्प्यात वापरला जातो. मिलमध्ये इंडस्ट्रीअल ग्रेडचे टिनोपाल वापरले जाते. पॅक संपल्यावर कामगार पिशवी उलटी करून जे काही खाली पडेल ते गोळा करून स्वतःचे कपडे धुतात. शॉप फ्लोअरचा अनुभव ज्यांना असेल त्यांना हेही माहीती असेल की बरेचसे कामगार आंघोळ -कपडे धुणे हे कंपनीच्या नळावरच करतात .असा काहीसा प्रकार त्या कामगाराबाबतीत झाला. चोरी पंधरा ग्रामची पण खटला भरताना तो कामगार अनेक वर्षे असेच करत असेल असे गृहीत धरून आरोप पत्र तयार करण्यात येते.
टिनोपाल अंमली पदार्थ नाही.
(हातभट्टीची दारू जोरदार व्हावी म्हणून पूर्वी त्यात साबणाचे पाणी मिसळले जायचे. बर्‍याच वर्षापूर्वी खोपडीचे बळी पडायचे ते अशाच उपद्व्यापामुळे.हे उगाच जाताजाता आठवले म्हणून सांगीतले.)

रामपुरी's picture

25 May 2012 - 9:45 pm | रामपुरी

टिनोपाल ची निळी डबी डोळ्यासमोर आली.
लेख अतिशय आवडला हे वे सां न.

पिवळा डांबिस's picture

25 May 2012 - 9:56 pm | पिवळा डांबिस

कमावत्या माणसांचे कपडे टिनोपालमध्ये आणि बाकीच्या कपडय़ांसाठी पाचशे एकचा बार असा भेदभावही केला जायचा.
करेक्ट!
शाळा-कॉलेजात असतांना निरमा-नीळ वरून कमवायला लागल्यावर आमची सर्फ-टिनोपॉलवर बढती झाल्याची आठवण आली!! :)
बाय द वे, ती निरमाच्या जाहिरातीतली तरूणी कोण होती हो? रंजीता ना?
नाय तुमची स्मरणशक्ती तल्लख आहे म्हणून विचारतोय!!!!
;)
बाकी तुमचा लेख आवडला वगैरे म्हणणं म्हणजे पिवळा पीतांबर म्हणण्यासारखं आहे म्हणुन ती औपचारिकता नको....

सुनील's picture

25 May 2012 - 11:14 pm | सुनील

ती निरमाच्या जाहिरातीतली तरूणी कोण होती हो? रंजीता ना?

मला सोनाली बेंद्रे आठवते आहे. बहुधा जिची चलती ती घेऊन नवी जाहिरात बनवतात.

OK च्या जाहिरातीत वेंगसरकर होता ते आठवले.

मन१'s picture

29 May 2012 - 1:31 pm | मन१

"सौंदर्य साबुन निरमा" ही ट्याग लाइन आणी त्यात सोनाली बेंद्रे. लख्ख आठवतय.

विजुभाऊ's picture

27 May 2012 - 12:09 pm | विजुभाऊ

बरोब्बर ओळखेलते हॉ डांबीसकाकाकी जै... रंजिता च ती. मिथुनची हीरॉईन

दादा कोंडके's picture

25 May 2012 - 10:47 pm | दादा कोंडके

लहानपणी वापरत असलेला ५०१ डबलबार आठवला. जास्त दिवस जावे म्हणून त्याबारचे चाकूने चार तुकडे करून वापरत असू.
निरमा बद्दलची आठवण म्हणजे, भोंदूसाधू मुलींच्या लग्नाचा प्रश्न घेउन आलेल्या पालकांना मुठीत हळद धरायला लावीत. लवकरच मुलीच्या लग्नाचा योग असणार्‍यांची हळद, कुंकू होत असे! :)

संदीप चित्रे's picture

25 May 2012 - 11:26 pm | संदीप चित्रे

बाकी काय म्हणू ?

चतुरंग's picture

26 May 2012 - 12:11 am | चतुरंग

टिनोपाल वरुन सुरु झालेले लिखाण सर्फ, निरमा, ५०१, रानीपाल असे सरकत सरकत कोकेनपर्यंत आले आणि एकदम अंतर्मुख करुन गेले. अशा सकृतदर्शनी वेगवेगळ्या वाटणार्‍या विषयांतर्गत काही जोडणारे सांधे असतील, काही एकत्र विणले गेलेले धागे असतील अशी कल्पना येणे देखील अवघड आणि ते लिखाणात उतरवणे तर त्याहून कठिण, तुमच्यातला मुरलेला कसबी लेखकच हे करु जाणे.

शिवाय संपूर्ण लिखाणात येणारी
"असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चे मूल्य वाढले की, ऑप्टिकल ब्राइटनरची गरज वाढत जाते."
"महात्माजी होते तोपर्यंत चळवळीला टिनोपालची गरज नव्हती. गांधी टोपीला कसलाच डाग नव्हता."
यांसारखी वाक्यं बदलत्या काळाच्या परिणामांचं आणि परिमाणांचं रुप खास रामदासी भाषेत दाखवतात! :)

(नावातच रंग असलेला)चतुरंग

अमित's picture

26 May 2012 - 9:18 am | अमित

या वरून ' विमल (?)' वॉशिंग पावडरची 'सुनो सुनो ए बाबूजी कहॉ चले? ' ही जाहीरात आठवली.

jaypal's picture

26 May 2012 - 10:29 am | jaypal

तुस्सी ग्रेट हो . तो$$$फु कुबुल करो ;-)

rb

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2012 - 10:34 am | प्रभाकर पेठकर

टिनोपॉलच्या नॉस्टॅलजिक आठवणींमध्ये त्या काळातील एकमेव घरगुती करमणूक उपकरण 'रेडिओ' ह्याचे योगदान फार मोठे आहे. येता-जाता 'टिनोपॉल, टिनोपॉल, टिSSनोपॉSSSSल' हि कानावर पडणारी जाहिरात मनावर कोरली गेली आहे. नुसता टिनोपॉल शब्द वाचनात आला की मन 'ती' जाहिरात गुणगुणायला लागते.

साबण कंपन्यांची जाहिरात युद्धं, विशेषाधिकार प्राप्त फरदिन खान आणि सरसामान्य अधिकारही नाकारलेला गरिब कामगार ह्यांची मनाला ताबडतोब भिडणारी तुलना श्री. रामदास ह्यांच्यातील सिद्धहस्त लेखकाचे दर्शन घडवितात.
अभिनंदन.

सुहास झेले's picture

26 May 2012 - 12:13 pm | सुहास झेले

निव्वळ अप्रतिम... !!!!

रामदास काका, तुमचे लेख म्हणजे आम्हा वाचकांना पर्वणीच :) :)

मराठमोळा's picture

26 May 2012 - 6:22 pm | मराठमोळा

बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या तुमच्या अप्रतिम लेखनामुळे..
लिखाणाची शैली आणि तुमचा अनुभव यांची सांगड म्हणजे केवळ एक दुग्धशर्करा योगच म्हणण्यायोग्य..
_/\_ :)

पियुशा's picture

27 May 2012 - 3:12 pm | पियुशा

मस्त लिखाण, आवड्ले !!!

समंजस's picture

27 May 2012 - 6:39 pm | समंजस

जुन्या आठवणींना उजाळा देणारा, समाजातील आर्थिक भेदभाव दाखवून देणारा,काळाप्रमाणे ब्रँडस जरी बदलत गेले तरी धंदा तोच, स्पर्धा तीच आणि प्रॉडक्टस तेच ही आठवण न विसरू देणारा आणि सरतेशेवटी भारतिय लोकशाहीचं खरं स्वरूप दाखवून देणारा असा हा लेख असल्याबद्दल धन्यवाद.

आणखी येउद्दयात :)

पैसा's picture

27 May 2012 - 7:30 pm | पैसा

लेख आवडला. त्याचवेळी धनंजयने लिहिलेल्याशी सहमत व्हावसं वाटतंय. २ लेखांऐवजी एका लेखाची कंजुषी कशाला हो?

रघु सावंत's picture

28 May 2012 - 10:10 pm | रघु सावंत

सर खरचं --------- " आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’

फटके कोणाला द्यायचे कामगाराच्या ,नशिबाला ,आरोपपत्र दाखल करणार्‍याला,न्याय देणार्‍याला काहीच समजत नाही.
मन विषण्ण करणारे सत्य

मन१'s picture

29 May 2012 - 1:32 pm | मन१

ससा डिटर्जंट टिकिया लाओ,टाटा का ओके धुलाई का साबुन,
व्हील, सुप्पर ५०१ ह्या सगळ्या जाहिराती आठवून गेल्या.
काळाची सफर घडावणार्‍या अवलियाला सलाम

कुसुमावती's picture

26 Sep 2014 - 12:49 pm | कुसुमावती

अप्रतिम लेख.

धनावडे's picture

14 Nov 2020 - 10:03 pm | धनावडे

__/\__

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 8:30 am | NAKSHATRA

मन विषण्ण करणारे सत्य