'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
26 Apr 2012 - 11:17 pm

ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. :)

संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे. सध्या सगळीकडे क्लाउड कंप्युटिंगचा नारा ऐकू येतो आहे. कंपन्यांच्या IT डिपार्टमेंट्समध्ये तो एक बझवर्ड झाला आहे. तर काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग...

समजा तुम्ही एक संगणक तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत घेणार आहात. त्यासाठी तुम्ही इंटेलचे हार्डवेयर असलेला संगणक फायनल केलात. त्या हार्डवेयरच्या डिव्हाइस ड्रायव्हर्सची एक DVD तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, ती तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज ठरवलीत. त्यासाठीही तुम्हाला एक OS DVD मिळेल. त्या DVD साठवण्यासाठी तुम्हाला एक बॉक्स घ्यावा लागेल.
आता संगणक घेतलात तर त्यावर तुम्ही काही अ‍ॅप्लिकेशन नक्कीच चालवणार असाल (म्हणजे त्याचसाठी तुम्ही संगणक घेत आहात हे गृहीत धरले आहे :) ) तर त्या अ‍ॅप्लिकेशन्सच्याही DVD मिळतील व त्या तुम्हाला संभाळून ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधिचा DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा DVD बॉक्स घ्यावा लागेल. काही वर्षांनंतर तुमचे हार्डवेयर जुने झालेले असेल त्यातले काही भाग तुम्ही बदलायचे ठरवले. पुन्हा नविन डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या DVD तुम्हाला मिळाल्या. परत DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे पुन्हा नविन बॉक्स. आता तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचे नवे वर्जन आले आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायचे ठरवले. त्याच्या पुन्हा नव्या DVD. आता तुम्ही तुमच्या मुलाकरिता अजुन एक नविन संगणक घ्यायचे ठरवता. काही आप्लिकेशन्सची जुनी वर्जन्स तुमचा मुलगा वापरणार आहे. परत नविन बॉक्स मुलासाठी. ह्या प्रत्येक वेळी तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. ह्यात मध्येच काही DVD ऐनवेळी खराब झाल्या तर मग तुम्हाला पुन्हा नविन DVD मिळविण्याची मारामार करावी लागणार. पुन्हा तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार.

येवढी यातायात जर एक-दोन संगणकांसाठी असेल तर शेकडो / हजारो कर्मचारी काम करत कंपन्यांचे काय होत असेल याचा विचार करा. ह्या सर्व हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर विकत घेण्याच्या आणि त्याच्या मेंटेनंन्ससाठी येणार्‍या खर्चाला 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO)' म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांची ही कॉस्ट अतिशय प्रचंड असते, त्यासाठी जे कुशल मनुष्यबळही लागते तेही प्रचंड महाग असते.

'क्लाउड कंप्युटिंग' नेमके ह्याच समस्येवर उत्तर आहे. आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटकारा. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे. :)

क्लाउड कंप्युटिंग म्हणजे सर्व, ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर आणि डाटा (माहिती) हे एका मध्यवर्ती, प्रचंड आकाराच्या (लॉजिकली) संगणकावर ठेवायचे. त्या मध्यवर्ती संगणकाची संगणनशक्ती वापरून ती OS, अ‍ॅप्लिकेशन्स त्या संगणकावर रन करायची आणि डाटा/डॉक्युमेंट्स (माहिती) त्याच मध्यवर्ती संगणकाच्या मेमरीत साठवून ठेवायचा. ह्या मध्यवर्ती संगणकासाठी लागणार्‍या हार्डवेयरची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संगणकाची सेवा पुरवठा करणार्‍याची असणार. आता नविन हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर तुम्हाला आपसुकच अपग्रेड होऊन मिळणार. थोडक्यात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर ह्या तुम्हाला सेवा म्हणून मिळणार. तुम्ही फक्त त्या सेवा वापरण्याचा मोबदला सेवा पुरवठादाराला द्यायचा. एकढाच तुमचा खर्च. बाकीची सगळी यातायात तो सेवा पुरवठादार तुमच्यासाठी, तुमच्या वतीने करणार.

क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला 'क्लाऊड' असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.


(चित्र आंतरजालावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे इंटरनेट. त्यामुळे क्लाउड हे नाव 'रूपक' म्हणून वापरले गेले आहे, मध्यवर्ती संगणकाच्या अमूर्त रुपासाठी. तर हे असे आहे अमूर्त रुप क्लाउड कंप्युटिंगचे:


(चित्र विकिपीडीयावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंग हे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकारांत विभागले गेले आहे.

  • इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
  • प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
  • सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)

इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर हा क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे. ह्यावरच सगळा डोलारा उभा आहे. ह्या प्रकारात सर्व प्रकारचे सर्व्हर्स, नेटवर्क डिव्हायसेस, स्टोरेज डिस्क्स तत्सम हार्डवेयरचा समावेश होतो. इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा घेतल्यावर, आपल्याला फक्त हार्डवेयर कोणते हवे ते ठरवायचे असते, बाकीच्या किचकट गोष्टी सेवा पुरवठादार आपल्या वतीने करतो. ही सेवा 'जेवढा वापर तेवढे बील' अश्या तत्वावर चालते. वापर वाढला तर बील जास्त वापर कमी झाला तर बील कमी अशी 'इलास्टिक' सेवा असते ही. त्यामुळे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' मध्ये प्रचंड बचत होते.

IBM® Cloud ह्या नावाने IBM ही इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवते.

प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
उद्या जर मला एक ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस देणारी वेब साईट चालू करायची असेल तर मला आधि एक डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, मग सर्व्हर स्पेस विकत घ्यावी लागेल, डाटाबेस विकत घ्यावा लागेल आणि मग साईट चालू होईल. जर साईट खूप चालली आणि खुप युजर्स मिळाले तर मला जास्त सर्वर स्पेस विकत घ्यावी लागेल आणि असेच बरेच काही. हे सर्व झेंगाट मलाच बघावे लागेल. पण हे सर्व नको असेल तर मी क्लाउड वर प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस ही सेवा विकत घेऊ शकतो. ज्यामुळे माझे अ‍ॅप्लिकेशन ह्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जाईल आणि सर्व प्रकारची अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह जबाबदारी सेवा पुरवठादाराची असेल. म्हणजे मी नोकरी संभाळून आता ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस चालू ठेवू शकतो. ;)

अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहु ह्या प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवणार्‍या कंपन्या आहेत.

सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)
ह्या प्रकारात मध्यवर्ती संगणकावर सॉफ्टवेयर सेवा (अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर), सेवा पुरवठादार पुरवतो आणि आपण आपल्याकडचा संगणक किंवा मोबाइल वापरून ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो. गुगलच्या सर्व सेवा (डॉक्स, ड्राइव्ह, पिकासा, कॅलेंडर ई.), ई-मेल सर्विसेस, मायक्रोसॉफ्ट्ची ड्रॉपबॉक्स सेवा, ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम ह्या सर्व सेवा सॉफ्ट्वेयर अ‍ॅज अ सर्विस ह्या प्रकारात मोडतात.

तर असे आहे हे क्लाउड कंप्युटिंग, कळले का रे भाऊ! :)

कळले म्हणताय ? तर मग ह्या भाऊंना आता कोणीतरी समजावून सांगा

तंत्रलेखमाहिती

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

26 Apr 2012 - 11:22 pm | बॅटमॅन

>>क्लाउड कंप्युटिंग हे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकारांत विभागले गेले आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)

पण आमचा प्रतिसाद मात्र एकच आहे- लेख झालाय Khaas!!

नेत्रेश's picture

26 Apr 2012 - 11:24 pm | नेत्रेश

अतीशय सोपे करुन सांगितले आहे.
धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2012 - 11:50 pm | भडकमकर मास्तर

ळेख भारी आहे पण तरी

आमचा बुवा सर्कारी अधिकार्‍यांवरच विश्वास आहे... ;)

sagarpdy's picture

27 Apr 2012 - 12:00 am | sagarpdy

५-६ महिन्यापूर्वी या चलच्चीत्राचे दर्शन झाले. आज पुन्हा एकदा पोट धरधरून हसत बसलो आहे.

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2012 - 12:01 am | पिवळा डांबिस

आमच्यासारख्या आयटी 'ढ' गांना बरीच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 12:05 am | संजय क्षीरसागर

लेख आवडला

पाषाणभेद's picture

27 Apr 2012 - 12:24 am | पाषाणभेद

सुंदर लेख.

क्लाउड कॉम्पुटींला डाटासेंटरमधल्या लागणार्‍या हार्डवेअरप्रमाणे सॉप्टवेअर प्रणालीदेखील महत्वाची ठरते. बाजारात एमएस विंडोजचे हायपर व्ही सर्व्हर, व्हीएमवेअर व्हीस्पिअर, झेन हायपरवायझर यासारखी ऑपरेटींग सिस्टमही लागते. एखाद्या ग्राहकाला ऐनवेळेला किती मेमरी जास्त द्यायची किंवा कमी करायची, किती प्रोसेसर मध्ये बदल करायचा याची काळजी ह्या ऑपरेटींग सिस्टम्स घेतात. अर्थात त्यात योग्य तो बदल त्यातील अ‍ॅप्लिकेशन्स डेव्हलप करवून घ्यावा लागतो.
यात बिलींगसाठी लागणारी प्रणालीदेखील फार महत्वाची आहे. यात मुळ सॉप्टवेअर कंपन्या किती प्रोसेसर्स तुम्ही हार्डवेअरमध्ये वापरले आहेत त्यावर लायसन्स फी आकारतात.

सोत्रिंनी सांगितलेले सव्यापसव्य आणि उलाढाली पहाता या गहन विषयाबद्दल अत्यंत सोप्या भाषेत समजाऊन सांगणार्‍या लेखाबद्दल सोत्रिंचे धन्यवाद.
मला मागचा गुगलवरचा लेखही खूप आवडला होता.

रमताराम's picture

27 Apr 2012 - 1:13 am | रमताराम

माहिती सुरेख आहे. खुद्द आम्ही स्वत: क्लाउड वर काम करत असूनही हे सगळे फ्याड आहे असे आमचे ठाम मत आहे. शेवटी Y2K चे भूत उभे करून सर्विस इंडस्ट्रीने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीला खुळं (सुज्ञ आयटी हमाल योग्य तो पर्यायी शब्द वाचतीलच) बनवलं तसाच हा क्लाउड चा उदोउदो आहे. ते सर्कारी बेणं येकदम येडं आस्लं तरी क्लाउड च्या कॉन्सेप्ट ला बळी पडणारे सात येडे हैत. तिच्यायला जी काय म्हाईती बगायची ती येका जागी बगा ना राव. आईच्यान सांगा किती लोक हापिसची कामे मोबाईलवरून करतात, घ्या तुळजाभवानीची आण. आन् नसंल तर ह्ये खूळच न्हवं का?

(ढगातला) रमताराम.

Nile's picture

27 Apr 2012 - 1:30 am | Nile

ते सर्कारी बेणं येकदम येडं आस्लं तरी क्लाउड च्या कॉन्सेप्ट ला बळी पडणारे सात येडे हैत. तिच्यायला जी काय म्हाईती बगायची ती येका जागी बगा ना राव. आईच्यान सांगा किती लोक हापिसची कामे मोबाईलवरून करतात, घ्या तुळजाभवानीची आण. आन् नसंल तर ह्ये खूळच न्हवं का?

हे आमच्या मानववस्तीपासून शेकडो किलोमीटरवर खाणीत काम करणार्‍या सहकार्‍यांना सांगा त्यांना पटेल. नाही, ते सुद्धा क्लाऊड वापरतात म्हणून म्हणतोय. :-)

घरची कामं हाफिसात बसून मोबाईलवर करणारा
(जमीनीवरचा)हेराम! ;-)

पाषाणभेद's picture

27 Apr 2012 - 1:39 am | पाषाणभेद

अजिबात खुळ वैगेरे नाही. जुन्या लोकांना नविन लोकांची टेक्नॉलॉजी समजणार नाही. फार उपयोगाचे तंत्रज्ञान आहे हे.
एका साध्या माऊसक्लिकने तुमचे प्रोसेसींग पॉवर डबल/ ट्रिपल होते, रॅम वाढल्या, घटल्या जाते, हार्डडिस्क वाढवली जाते हा चमत्कार नाही महाराजा. ते सगळे बॅकग्राउंडला होते. त्यामुळे तुमच्यासारख्या क्लाउड कॉम्पुटींग वापरणार्‍यांना काहीही माहीती होत नाही. परंतु जे होते ते गुंतागुंतीचे आहेच पण उपयोगीदेखील आहे.

लोकं डेडीकेटेट सर्व्हर्स वापरायचे सोडूण क्लाऊडकडे जात आहेत हे माझ्या पाहण्यातले आहे.

रमताराम's picture

27 Apr 2012 - 2:24 am | रमताराम

मी स्वतः क्लाउड वर काम करतो आहे हा तपशील कृपया ध्यानात घ्या.

जुन्या लोकांना नविन लोकांची टेक्नॉलॉजी समजणार नाही.
खो: खो: खो:. नाही म्हणजे उत्तर टाळण्याचा उपाय चांगलाय. पण इथे फारसा कामात येणार नाही. कारण मी स्वतः क्लाउड अंतर्बाह्य माहित असलेला माणूस आहे नि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मला 'जुने' म्हणताना 'आपली माहिती - भले ढगात का स्टोर केली असेना - चुकीची असण्याची शक्यता तुम्ही विचारात घेतलेली नाही. मी गणितातला पदवीधर... आहे नि गेले दोन वर्षे यावरच काम करतो आहे . गेले वर्षभर मी मायक्रोसॉफ्टचा प्रोजेक्ट 'अल्गोरिदम एक्स्पर्ट' म्हणून राबवत होतो. या सार्‍या अल्गोज् ची निव्वळ वापरणार्‍यांना नाही त्याच्या कित्येक पट अधिक माहिती मला आहे मालक. सो 'पुट अप ऑर शटप'. :)

तुम्ही क्लाउड तंत्रज्ञानाची अपरिहार्यता मला समजावून सांगू शकाल काय? माझ्या मते क्लाउड तंत्रज्ञान हे 'मल्टिप्रोसेसर' कम्पूटरप्रमाणेच (जे उगाचच आपण 'लेटेस्ट हवा' या नावाखाली विकत आणतो नि जेमतेम 'सेलेरॉन' प्रोसेसर पुरेसा होईल असे ब्राउजिंगचे काम त्यावर करत बसतो.) अलम दुनियेत जेमतेम ०.१% लोकांच्या कामाचे आहे. इतरांनी उगाच क्यालिप्सो ड्यान्स करू नये.

अवांतरः सोत्रिंनी उल्लेख न केलेला असा तिसरा प्रकार माझ्या पाहण्यात आहे तो म्हणजे 'डास' (DaaS) किंवा Data As A Service' यात उगाचच उड्या मारत आपली सगळी माहिती ढगात साठविणार्‍यांची काशी करत, त्या डेटावर बिजनेस इंटलिजन्स (म्हणजे काय देव जाणे) अल्गोज् वापरून अनाहुत सल्ले देणारे तंत्रज्ञान विकसित केले जाते. सध्या येतात तसे अनाहुत बिजनेस अथवा 'मार्केटिंग' कॉल्स वाढतील याची मानसिक तयारी करून ठेवा म्हणजे झाले.

क्लाउड हे वैयक्तिक वापराच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नाहि (आता मोबाईलवर गाणी पण ऐकता येतात तसे माझी फाईल मला मोबाईलवर वाचता येईल हे 'थिअरेटिकल' समाधान देण्यापलिकडे काही नाही. मुळात तो 'फोन' आहे हेच विसरून गेलो तर गोष्ट वेगळी.) त्याचा वापर मुख्यत्वे करून संस्थास्वरूप यूजर्ससाठीच आहे. तस्मात गुगलने ऑफर चालू केली तरी तुम्ही आम्ही धावण्यात काही फारसा अर्थ नाही.

(सोत्रि तुम्ही यातून बाहेर रहा बरे का.) क्लाउडचा उदोउदो करणार्‍यांनी मला नेटवर्कवरील/सर्वरवरील (ज्याचे मिररिंग होते) फाईल नि क्लाउडवरील फाईल यात कोणती अधिक उपयुक्त, सेफ, वगैरे वगैरे सप्रमाण, साधार समजावून सांगावे.

जाताजाता सोत्रिंच्याच लेखातील एक परिच्छेद उद्धृत करतो.

क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला 'क्लाऊड' असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.

पाषाणभेद's picture

27 Apr 2012 - 3:23 am | पाषाणभेद

तुम्ही त्यावर काम करतात म्हणून, तुम्ही गणितातले तज्ञ म्हणून व तुमच्या म्हणण्याने ते "जुनेच तंत्रज्ञान आहे हे किंवा क्लाउड हे वैयक्तिक वापराच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नाही" खरे ठरत नाही.

क्लाउड कॉम्पुटींगचा वापर करता सर्वसामान्यांना आधीच्या वापरात व आताच्या वापरात त्याचा काहीच फरक जाणवणार नाही. उगाच नाही सर्व्हरवर जास्त लोड आला तर यात मेमरी अ‍ॅटो अपग्रेड होते, प्रोसेसर अपग्रेड होतो ते.

हं पण जुना विचार करता आधीही वर्डस्टार मध्ये लेटर टायपींग करता येत होते व आताही वर्ड २०१० मध्येही लेटर टायपिंग करता येते. नव्यामध्ये काहीही नवीन नाही असा विचार करता येतो.

जो जसा विचार करतो त्याला तसे वाटेल. जगात माणसे किती प्रकारची? या प्रश्नाचे उत्तर स्त्री-पुरूष, श्रीमंत-गरीब, आयटीतले काम करणारे- न करणारे, भांडवलदार-नोकरदार अशा अनेक अंगानी देता येईल.

क्लाउडचा वापर कोण कसा करतो त्यावर सारे अवलंबून आहे. कुणी फक्त स्टोरेज म्हणून करेल तर तो त्याचा वापर योग्य करत नाही (किंवा तो डेटा कसल्याही प्रकारे अ‍ॅक्सेस करतो म्हणून योग्य प्रकारे उपयोग होतोही आहे !!) असे 'समजले' जावू शकते.

जावूद्या. तुम्हीच वर म्हटले की शटप म्हणून जास्त बोलत नाही. :-)

पाषाणभेद's picture

27 Apr 2012 - 3:24 am | पाषाणभेद

आणखी एक. आयटीत नवनवीन गोष्टी येत असतात त्यामुळेच आपण कमीतकमी हमालीची तरी कामे करतोय. अन्यथा सगळे घरी बसलो असतो. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2012 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

मोजक्या आणि सुलभ शब्दात अतिशय सोप्या पद्धतीने उलगडलेले लिखाण एकदम आवडले.

@ ररा

Data As A Service'

बहूदा गूगलच्या दिसणार्‍या जाहिराती हे ह्याचेच बाळ आहे.

सोत्रि:

या 'ढगात' ठेवलेल्या डेटा च्या सुरक्षिततेची काय हमी घेता येईल, किंवा त्यासाठी काय सोयी उपलब्ध आहेत याविषयीही लिहा. कंपन्यांची industrial secrets, credit card कंपन्यांनी वा बँकांनी ठेवलेली आर्थिक माहिती, किंवा हॉस्पिटलांनी अशा 'clouds' मध्ये ठेवलेल्या पेशंट्स च्या वैयक्तिक स्वरूपाच्या रोगनिदानांची सुरक्षितता ही अशा sensitive डेटाची उदाहरणं आहेत. असा डेटा 'हरवू' नये, किंवा 'हॅक' होऊ नये म्हणून काय काळजी घेतात?

पाषाणभेद's picture

27 Apr 2012 - 1:54 am | पाषाणभेद

डेटा जरी 'ढगात' असला तरी तो डेटा एखाद्या 'स्टोरेज डिव्हाईस' वर असतो.
आता सुरक्षीतता हा फार व्यापक प्रश्न आहे.
डेटा डिलीट न होणे, हॅक न होणे, करप्ट न होणे, चोरी न होणे, जळला न जाणे असे त्याचे उपप्रकार आहेत.

आता असले 'स्टोरेज डिव्हाईस' किंवा प्रत्यक्ष क्लाउडचे सर्व्हर्स एखाद्या डाटा सेंटर मध्ये असतात. अन डाटा सेंटरमधली सुरक्षीतता तर सारे जण जाणतातच, कारण या आधीपासून, खुप वर्षांपासून डाटासेंटर ही इंडस्ट्री चालत आलेली आहे अन ती विश्वासार्ह आहे.

सॉप्टवेअर साईडनेसुद्धा डेटाची सुरक्षीतता राखली जाते. एसएसएल सर्टीफीकेट्स, एन्क्रिप्टेड पासवर्डस, फायरवॉल, युटीएम डिव्हायसेस अशा प्रकारची सुरक्षीतता त्यात येते.

कोणत्याही कॉम्पुटींग, नेटवर्कींग तसेच डेटा सुरक्षीततेच्या चेन मध्ये "लुज लिंक" ही ती चेन वापरणारा "माणूस" असतो. त्याने चुकी केली की डेटाची सुरक्षीतता धोक्यात येते हे लक्षात ठेवा.

थोडक्यात क्लाउड कॉम्पुटींग मध्ये डेटा आधीच्या प्रकारांसारखाच सुरक्षीत ठेवला जातो. (तो डेटा त्या त्या कंपन्या कसा वापरून घेतात हा वेगळा मुद्दा आहे.)

आताची गुगलची सर्व अ‍ॅप्लीकेशन्स क्लाउड कॉम्पुटींगची उदाहरणे आहेत.

बहुगुणी's picture

27 Apr 2012 - 2:48 am | बहुगुणी

मोठ्या प्रमाणावरच्या वैद्यकीय व्यवसायांसाठी, किंवा औषधनिर्मिती उद्योगांकडून, जसे FDA सुरक्षिततेचे मापदंड म्हणून काही प्रकारचे certifications मागते (GMP, GCP, GLP, - good manufacturing practice, good clinical practice, good laboratory practice वगैरे), तशा काही प्रकारची certifications आता या क्लाऊड कंप्युटिंग कंपन्यांनाही लागू होतील असं वाटतं (किंवा already उपयोगात असतील तर ती काय स्वरूपाची आहेत?)

या 'ढगात' ठेवलेल्या डेटा च्या सुरक्षिततेची काय हमी घेता येईल, किंवा त्यासाठी काय सोयी उपलब्ध आहेत याविषयीही लिहा.
हॅकर्स नेहमी सुरक्षा बंधनाच्या पुढेच असतात ! शिवाय सुरक्षा प्रणालीतले कच्च्या दुव्यांचा त्यांना फायदा देखील होतो.
इथे अगदी साधे उदा. देतो... ते म्हणजे फेसबुकचे !फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गचे स्वतःचे फेसबुक खाते मध्यंतरी हॅक झाले होते. आत्ता बोला !
झुकरबर्क सध्या १ डॉलर प्रतिवर्ष सॅलरी घेतो आहे म्हणे...पण त्याचे स्वतःचे अकाउंट हॅक झाले त्याचे काय ?
क्लाउड मधे इंटरनेट हे माध्यम आहे, त्यामुळे माझ्या मते त्यात सुरक्षतेचे धोके हे जरा जास्तच आहेत असे मला वाटते !
येणार्‍या काळात उपलोड डेटा अ‍ॅड रेन एनी व्हेअर असल्या क्लाउडचे सुरक्षतेच्या बाबतीत कुठली महत्वाची पाउले उचलतात हे पाहणे जास्त महत्वाचे ठरेल.

जाता-जाता :--- इंटरनेटवर गेलेली माहिती ही पर्सनल राहत नसुन ती पब्लीक होते असा माझा विचार आहे.

एखाद्या लेमॅनला समजेल अश्या भाषेत लेख लिहिल्या बद्दल सर्वप्रथम सोत्रिचे आभार.
बाकी ढगातल्या म्हातार्‍याशी रामाशी बर्‍याच अंशी सहमत आहे.
आमचा आपला डेडिकेटेड सर्व्हरच ब्येस.

चौकटराजा's picture

27 Apr 2012 - 6:24 am | चौकटराजा

हे समदं वरलं वाचून म्या पार चक्राउन ग्येलो हाय. सोत्री, पाभे, रमताराम ( नावतच 'रम' असल्याने ढगावर बसून काम करताहेत असे चित्र समोर आले पण तेंच्या म्हनन्यात राम हाये ! )आशा म्होटम्होट्या लोकांचे इचार आयकायला मिळ्तात हा येक आनंदाचा ढग आला म्ह्ननायचा !

रामदास's picture

27 Apr 2012 - 8:50 am | रामदास

पण सोप्या शब्दात समजावून सांगीतल्यावर कळले.

मदनबाण's picture

27 Apr 2012 - 9:05 am | मदनबाण

मस्त माहिती देणारा लेख.... अजुन यावर वाचायला आवडेल.

'क्लाउड कंप्युटिंग' ची संकल्पना १९६० साली John McCarthy ने मांडली होती.
व्हीएमवेअर व्हीस्पिअर वर मी काम केले आहे. रॅम / प्रॉसेसर / हार्ड डिस्क वाढवणे हे सगळे अगदी सोपे असते.
मुंबईत बसुन डलासमधे अमेरिकेतल्या एका नामांकित इश्युरन्स कंपनीचे सर्व्हस तयार करण्याचे काम माझ्याकडे होते. एका वेळी ८ सर्व्हस इन्स्टॉल करताना मजा यायची ! नंतर नंतर मात्र कंटाळा आला आणि सरळ एसएपी मधे उडी मारली !
जर तुम्ही अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम वरुन काही खरेदी करत असाल तर त्याच्या मागे कुठेतरी मी आहे... ;) कारण सध्या अप्रत्यक्षपणे मी अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम वाल्यांसाठी काम करत आहे. :)

(सध्याच्या एसएपी बेसीस हमाल) ;)

'क्लाउड कंप्युटिंग' ची संकल्पना १९६० साली John McCarthy ने मांडली होती.

अनेक क्षेत्रात हे असेच होत असावे. मी 'आय. टी. वाला' नाही. 'टेल्हिव्हिजन ब्रॉडकास्टींग इंजिनीयरींग' हे माझे क्षेत्र आहे, अर्थात गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आमच्या क्षेत्राची व आय.टी. च्या क्षेत्राची बरीच सरमिसळ झालेली आहे. तेव्हा माझा थोडाफार अभ्यास कॉंप्युटर्स, नेटवर्कींग इत्यादींचाही आहे. माझ्या क्षेत्राबद्दल सांगायचे तर, गेल्या दशकांत अगदी सहज वापरात आलेल्या अनेक संकल्पना जुन्याच आहेत. ह्यातील काही संकल्पना विवीध तर्‍हेने गेल्या अनेक दशकांपासून वापरात आलेल्या आहेत (उदाहरण द्यायचे झाले तर 'Data Compression schemes': श्वेत दूरदर्शनच्या काळापासून चालत आलेले line interlacing चे टेक्निक, तसेच रंगीत दूरदर्शनमध्ये सुरूवातीपासूनच वापरात आणले गेलेले chroma encoding ही ह्याचीच उदाहरणे होत). काही संकल्पना पूर्वी माहिती होत्या पण त्या राबवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हते. जसजसे ते उपलब्ध होऊ लागले तसतशा ह्या संकल्पना आर्थिक दृष्ट्या सहजरीत्या वापरात आणल्या जाऊ लागल्या.

लेख माहितीपूर्ण आहे, पण त्यातील

'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन...

ह्याविषयी बराच साशंक आहे. हे वाक्य बहुधा संदर्भाविरहीत घेतले असावे असे वाटते.

तसेच पाषाणाभेद ह्यांच्या प्रतिसादांतूनही असेच काही सूर दिसून येतात. रमताराम ह्यांनी थोडे जास्तच सिनीकली त्यांचे म्हणणे मांडले आहे, ते बहुधा त्यांच्या मुद्द्यास अधोरेखित करण्यासाठी असे मला वाटते. त्यांच्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत नाही, परंतु त्यांचा एक मुद्दा अगदी रास्त आहे-- क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्‍यांना (individuals) नव्हे असे त्यांचे म्हणणे आहे. पाषाणाभेद ह्याविषयी प्रतिवाद करतांना दिसत नाहीत.

जुन्या काळात काही फारसे माहिती नव्हते, आता एकदम काही लखाखते ज्ञान जगापुढे आलेले आहे, हा अत्यंत चुकिचा गैरसमज आहे, आणि त्यामागे, तसे प्रतिपादन करणार्‍यांची अपुरी माहिती असावी, असे म्हटले तर ते चुकिचे ठरू नये.

काही संकल्पना पूर्वी माहिती होत्या पण त्या राबवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हते. जसजसे ते उपलब्ध होऊ लागले तसतशा ह्या संकल्पना आर्थिक दृष्ट्या सहजरीत्या वापरात आणल्या

१००% सहमत!

ह्याविषयी बराच साशंक आहे. हे वाक्य बहुधा संदर्भाविरहीत घेतले असावे असे वाटते.

हे मत IBM च्या थॉमस वॅटसनचे आहे. टॉप १० मिसकोट मध्ये हे वाक्य येते.
"I think there is a world market for maybe five computers." -- Thomas Watson, chairman of IBM, 1943.
http://en.wikipedia.org/wiki/Thomas_J._Watson इथेही त्याचा उल्लेख आहे.

मी ह्याचा संदर्भ प्रथम अच्युत गोडबोल्यांच्या 'किमयागार' ह्या पुस्तकात वाचला होता. लेखात हा संदर्भ, संगणक क्षेत्रातल्या आत्तापर्यंतच्या एकंदरीत वाटचालीची कल्पना यावी म्हणून घेतला होता.

क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्‍यांना (individuals) नव्हे

हे रास्त कसे काय ते जरा विस्तृतपणे सांगाल का?

- (विद्यार्थी) सोकाजी

प्रदीप's picture

29 Apr 2012 - 7:40 am | प्रदीप

वॉटसनचे वक्तव्य 'मिसकोट' आहे आणि ह्यावर तुम्ही दिलेल्या विकीच्या पानावर थोडाफार उहापोह केलेला आहे. So, it seems it is just that-- a misquote!

मुळात हे वॉटसनने म्हटले होते का, ह्याविषयीच एकवाक्य नाही. तसेच अनेकदा मोठ्यांचे उद्गार, चुकिच्या संदर्भात घेतले जातात, तसे हे काहीसे असावे.

क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्‍यांना (individuals) नव्हे

हे रास्त कसे काय ते जरा विस्तृतपणे सांगाल का?

मी 'वैयक्तिक वापर करणार्‍यांना (individuals) [हे फायदेशीर नसेल] ' लिहीले आहे, ती माझी मिस्टेक आहे, हे कबूल करतो. मला म्हणायचे होते ते असे की, क्लाऊड कॉम्प्युटींग सध्या individuals ना परवडण्याइतके स्वस्त नसावे? आणि त्याहून त्यांना सध्याच्या अ‍ॅव्हरेज वापरात तसल्या टेक्नॉलॉजीची जरूर आहे का? पुढेमागे किंमती कमकमी होत जातील, तसेच वैयक्तिक वापरातील रीसोर्सेसची जरूरीही वाढेल, तेव्हा हे तंत्रज्ञान वैयक्तिक वापरासाठी 'वापरण्यायोग्य' होईल. थोडक्यात हे 'वैयक्तिक वापर करणार्‍यांना सध्या फायदेशीर नसेल व खरे तर ते त्यांना सध्या आवश्यकही नसावे'.

मूकवाचक's picture

27 Apr 2012 - 9:00 am | मूकवाचक

लेखाची मांडणी, आशय आणि सोपे करून सांगण्याची शैली अप्रतिम आहे. सोत्रिंना मन:पूर्वक धन्यवाद.

सोत्रि's picture

27 Apr 2012 - 9:08 am | सोत्रि

ररा आणि पाभे,
तुमचे दिघांचेही, प्रतिसाद एकदम मस्त! म्हणजे 'विज्ञान : शाप कि वरदान' अश्या चर्चेच्या अंगाने आले आणि मूळ लेखला खूप छान अ‍ॅडिशन झाली.

क्लाउड हे वैयक्तिक वापराच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नाहि

हे मला तितकेसे पटले नाही. गुगलच्या सर्व सेवा ह्या क्लाउडचाच परिपाक आहेत. मी वैयक्तिकरित्या गुगल डॉक्स एक्स्टेंसिव्हली वापरतो. आमच्या मित्रांबरोबर केलेला दारू (खाणे-पिणे) खर्च डॉक्सच्या एक्सेल फाइल मध्ये अपडेट करून, ही फाईल सर्वांना शेयर केलेली असते. महिन्याअखेरिला हिशोबाप्रमाणे आपापले पैसे द्यायचे. ही फाइल आम्ही बिल दिल्या दिल्या मोबाइलवरून लगेच अपडेट करतो म्हणजे जो बिल पे करेल त्याची जबाबदारी फाइल अपडेट करण्याची. हा क्लाउडचाच महिमा आहे.

जरा एक जोरदार 'रिसेशन' येउद्या अजून एक म्हणजे ह्या क्लाउडचा महिमा त्यांनाही पटेल ज्यांना हे खूळ वाटत आहे.

- (आज शुक्रवार, संध्याकाळी 'ढगात' जायची आस लागलेला) सोकाजी

चौकटराजा's picture

27 Apr 2012 - 9:45 am | चौकटराजा

मच्या मित्रांबरोबर केलेला दारू (खाणे-पिणे) खर्च डॉक्सच्या एक्सेल फाइल मध्ये अपडेट करून, ही फाईल सर्वांना शेयर केलेली असते. महिन्याअखेरिला हिशोबाप्रमाणे आपापले पैसे द्यायचे.
ह्ये ढगात जान्याच्या खर्च काय आला ह्ये धेनात ठिवण्यासाटी आंगं ढगाचाच उपेग आप्ल्याला लई आवाल्डा !

मृत्युन्जय's picture

27 Apr 2012 - 10:16 am | मृत्युन्जय

लेख आवडला. पण तो विडिओ खुपच जास्त आवडला. काहिही म्हणा मला त्या माणसाचा आत्मविश्वास आवडला. एकदा भेटायला आवडेल या काकांना . त्यांना दंडवत घालेन म्हणतो.

सोत्रि साहेब, लेख जबराट झाला आहे.
अतिशय सटिक व अचू़क माहीती दिल्याबद्दल तुमच अभिनंदन

मुक्त विहारि's picture

27 Apr 2012 - 11:06 am | मुक्त विहारि

उत्तम माहिती...

पर युजर परवाना घेता येतो ..जेवढे तास वापरतो तेवढाच बिल येइल असे ही saas आहेत ..
त्या मुळे हे खुळ किंवा फॅड नसून एक उपयोगि तंत्रज्ञान आहे

उत्तम तपशीलवार माहिती.. धन्यवाद.

ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच.

हा इंट्रोदेखील एकदम खास.... :)

स्मिता.'s picture

27 Apr 2012 - 1:17 pm | स्मिता.

सोत्रि, या माहितीपूर्ण लेखाबद्दल तुमचे किती आणि कसे आभार मानावे कळत नाहिये!

हे तुम्हाला अति वाटेल पण मी स्वतः आयटीमधे काम करत असूनही ही 'ढग' काय भानगड आहे काही कळत नव्हतं. जिकडे तिकडे सगळे 'ढग-ढग' म्हणत असतात. फोनवर, जालावर सगळीकडे 'ढग' दिसायचा पण काही कळायचं नाही. कोणाला विचारलं तरी नीट उत्तर मिळालं नाही, डोकं भंजाळून गेलं होतं. तुमच्या लेखामुळे त्याचा बेसिक फंडा कळला. तसेच ररा आणि पाभे यांच्या चर्चेतून त्याबद्दलची आणखी माहिती मिळाली.

चौकटराजा's picture

27 Apr 2012 - 1:38 pm | चौकटराजा

बेसिक फंडा हा कोणता शब्द ? थंडगार बर्फ, राईटींग मधे लिहून दे , लेडीज स्त्रीयांसाठी फक्त अशा पाट्या या शब्दामुळे आठवल्या !
( जस्ट फॉर जोक हं ! )

स्मिता.'s picture

27 Apr 2012 - 3:47 pm | स्मिता.

पिवळा पितांबरसारखी अनेक शब्दांची द्विरुक्ती करायची आपली, म्हणजे आमची पद्धतच आहे हो चौराकाका! त्यामुळे शब्दाचा परिणाम दुप्पट होतो असं आम्हाला वाटतं ;)

जस्ट फॉर जोक हं !

हे सांगायची गरज होतीच का? नसतं सांगितलं तरी आम्ही जोक म्हणूनच घेतलं असतं. :)

असो. माहितीपूर्ण धाग्यावर जास्त विषयांतर करत नाही.

कापूसकोन्ड्या's picture

27 Apr 2012 - 2:49 pm | कापूसकोन्ड्या

अनेक धन्यवाद!
अत्यंत क्लिष्ट विषय अगदी सोप्या पध्दतीने सांगीतला आहे. मी स्वतः जरी 'ढगात' काम करीत नसलो तरी इन्फोर्मेशन सिक्युरिटि मध्ये काम करतो आहे. क्लाउड चे महत्व खुप आहे आणि त्याला विरोधासाठी विरोध करणे अनुचीत आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

कापूसकोन्ड्या's picture

27 Apr 2012 - 2:50 pm | कापूसकोन्ड्या

अनेक धन्यवाद!
अत्यंत क्लिष्ट विषय अगदी सोप्या पध्दतीने सांगीतला आहे. मी स्वतः जरी 'ढगात' काम करीत नसलो तरी इन्फोर्मेशन सिक्युरिटि मध्ये काम करतो आहे. क्लाउड चे महत्व खुप आहे आणि त्याला विरोधासाठी विरोध करणे अनुचीत आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

चिरोटा's picture

27 Apr 2012 - 3:07 pm | चिरोटा

वाचनिय लेख.

आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटकारा. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे

भारतिय कंपन्यांना ह्यात किती संधी आहे ? केवळ User बनून वा गूगल्,अ‍ॅमॅझॉनचे API वापरणे ही मर्यादित संधी आहे. त्या पलिकडे जाण्यासाठी भारतिय कंपन्यांना काही संधी आहेत का ?
भारतिय कंपन्यांना सेवापुरवठादार बनण्यासाठी काय करावे लागेल ?

रेवती's picture

27 Apr 2012 - 8:04 pm | रेवती

छान माहिती. डेट्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न डोक्यात आला.
आता प्रतिसाद वाचते.
चित्रफीत 'बारीशच्या' संभाषणापर्यंतच पाहिली. हॅ हॅ हॅ.

आशु जोग's picture

27 Apr 2012 - 8:15 pm | आशु जोग

फार पूर्वी जेव्हा हार्ड ड्राइव नसत
तेव्हा ढग संगणनच चालत असे का हो

नाही, तेव्हा फ्लाँपी डिस्क मधून OS मेन मेमरी मध्ये आणून संगणन केले जायचे. प्रश्न असा हवा होता, 'ज्यावेऴी वैयक्तिक संगणक नव्हते तेव्हा ढग संगणन व्हायचे का'

- (ढगाऴलेला) सोकाजी

नितिन थत्ते's picture

27 Apr 2012 - 8:25 pm | नितिन थत्ते

लेख आणि प्रतिसाद आवडले. रमताराम यांच्या प्रतिसादाशी अधिक सहमत.

आणखी एका अडाणी म्हातार्‍याची शंका.

सध्या कंपनी स्वतःच्या डेटासेंटर मध्ये आपला डेटा ठेवते. तो त्या कंपनीच्या लॅनवरून किंवा वीपीएनच्या सहाय्याने अ‍ॅक्सेस करता येतो. स्वतळ्च्या लॅन/व्हीपीएनच्या सुरक्षेसाठी फायरवॉल वगैरे सुरक्षा साधने असतात. कंपनीने क्लाउडवर हा डेटा ठेवला की हे फायरवॉल वगैरे काही असणार का?

सर्व प्रकारची सुरक्षीतता क्लाउडमध्ये अंतर्भूत आहे, पण तो एक खूप वादाचा मुद्दा आहे.
ह्या क्लाउडमध्येही प्रायव्हेट क्लाउड आणि पब्लिक क्लाउड असे भेद आहेत सुरक्षीततेच्या दृष्टीने.

खरेतर हा विषय खूप गहन आहे. एका लेखात ह्याविषयीचा उहापोह होणे शक्य नाही पण मुलभूतरीत्या 'क्लाउड कंप्युटिंग' म्हणजे काय हे सर्वसामान्यांस कळावे हा हेतू होता लेखामागे.

- (सुरक्षेविषयी जागरूक असलेला) सोकाजी

नितिन थत्ते's picture

27 Apr 2012 - 8:28 pm | नितिन थत्ते

आम्ही लॅनवरून जेव्हा डेटा + अ‍ॅप्लिकेशन वापरतो तेव्हाचा परफॉर्मन्स आणि व्हीपीएनवरून (इंटरनेट द्वारा) वापरतो तेव्हाचा परफॉर्मन्स यात बराच फरक असतो. हाच फरक क्लाऊडवरून काम करताना दिसेल.

पाषाणभेद's picture

29 Apr 2012 - 12:52 am | पाषाणभेद

>>>> तेव्हाचा परफॉर्मन्स आणि व्हीपीएनवरून (इंटरनेट द्वारा) वापरतो तेव्हाचा परफॉर्मन्स यात बराच फरक असतो.

जेव्हा व्हिपीएन टनेल तयार होतो तेव्हा वेगवेगळ्या सिक्यूरीटी पॉलीसीज त्या टनेलला अ‍ॅप्लाय होत असतात. त्यात डेटा एन्क्रिप्शन-डिक्रिप्शन असले उपद्व्यापही येतात. त्यामुळे तो परफॉर्मन्स थोडा डाऊन होतो. जेव्हा जेव्हा युजर परफॉरमन्स चा इश्यु घेवून अ‍ॅडमीनकडे जातो तेव्हा अ‍ॅडमीन सिक्यूरीटीच्या काही पॉलीसी (MD5, MD7, SHA1 encryption, DES, 3DES, AES परत त्या AES मध्ये किती bit की (Key) पाहीजे- 128 bit, 192 bit, 256 bit? )कमी जास्त करून तो परफॉरमन्स अ‍ॅक्सेप्टेबल लेव्हल पर्यंत आणू शकतो.

अर्थात केवळ एकच युजर कल्पेंट करतो आहे म्हणून परफॉरमन्सशी कुणी अ‍ॅडमीन खेळ करत बसत नाही. हे सगळे नेटवर्क डिझाईन होते तेव्हाच काय वापरायचे ते ठरत असते. तसेच VPN चा एका बाजूचा फायरवॉल आपला जरी असला तरी पलीकडचा दुसर्‍या कंपनीचा असू शकतो, त्यामुळे तेथे जे सेटींग असेल तेच सेटींग आपल्याला (म्हणजे नेटवर्क अ‍ॅडमीनला) झकत करावेच लागते. त्यामुळे त्याचा रोल येथे (आपल्या नेटवर्क मधल्या VPN Firewall मध्ये) फक्त पलिकडच्या सेटींग कॉपी करण्याचा असतो. सर्व नेटवर्क आपल्याच बापाचे असल्यास त्यास मन मानेल तसे योग्य सेटींग तो करू शकतो.

क्लाउड व VPN वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्लाउडचा डेटा तुम्हाला VPN मध्ये घ्यायची इच्छा असेल तर तसे होवू शकते.

तिमा's picture

27 Apr 2012 - 8:34 pm | तिमा

आमचे या विषयातले ज्ञान शून्य असल्यामुळे केवळ 'आ' वासून वाचतो आहे. पण अडाणी माणसालाही कधीकधी प्रश्न पडतात.
डेटाची सुरक्षितता याची हमी कोण देणार ?
भारतातल्या बेभरवश्याच्या आंतरजालावर कितपत भरवसा ठेवता येईल ?

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2012 - 8:48 pm | अविनाशकुलकर्णी

एक शंका...या ढ्गा मुळे नोक~यात वाढ होणार कि आहे त्या नोक~या जाणार?

मराठी_माणूस's picture

27 Apr 2012 - 9:54 pm | मराठी_माणूस

छान उपयुक्त लेख

jaypal's picture

27 Apr 2012 - 10:07 pm | jaypal

वाटत होता पण तो एवढा सोपा करुन सांगीतलात की .............. काय बोलु ....... कया बात, कया बात....क्या बात. जबरा लेख, खुप आवडला . बुकमार्क केला आहे.

cloud

आमच्या मताप्रमाणे कॉपीराइटेड डेटा आणि अ‍ॅप्लिकेशन्ससाठी याचा फारच उपयोग होइल.

संदीप चित्रे's picture

27 Apr 2012 - 10:34 pm | संदीप चित्रे

सर्वात महत्वाचे म्हणजे 'क्लाउड कंप्युटिंग'ची माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल, ती ही मराठीमधे, अभिनंदन मित्रा!
तुझ्या एक से एक कॉकटेल रेसिपीजप्रमाणे ह्या लेखाची भट्टीही मस्त जमली आहे.
त्यात पाभे, रमताराम इ. मिपाकरांनी अत्यंत चांगली चर्चा सुरू केली आहे.

दादा कोंडके's picture

27 Apr 2012 - 11:04 pm | दादा कोंडके

ररांशी सहमत.

लेख छान पण ह्या तंत्रज्ञानामध्ये एकदम इनोवेटीव्ह काय आहे तेच कळलं नाही.

पुर्वी बँडविड्थ बॉटलनेक होती त्यामुळे एचटीएमेल सारखं तंत्रज्ञान आलं जीथं कमीतकमी डेटा पाठवला जाइल आणि जास्तीतजास्तं प्रोसेसींग होइल. (लाल रंग पिक्सेल बाय पिक्सेल पाठवायची गरज नाही फक्त कलर "रेड" म्हणलं की झालं). पण आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बर्‍यापैकी प्रगत झाली आहे आणि थोडसं प्रॉटोकोल स्टँडर्डायझेशन झालं आहे. त्यामानानं अ‍ॅप्स खूपच रीसोर्स ग्रीडी झाले आहेत (सध्याच्या हार्डवेअरच्या मानानंसुद्धा). त्यामुळे असं काहीतरी येणार हे ऑब्वीअस होतं. फाईल शेअरींगतर जुनंच आहे.

ही आयटीवाली लोकं साध्याच गोष्टींनाच काहीतरी फंडू नावं देउन पोटं जाळतात! :)

सोत्रि's picture

28 Apr 2012 - 12:33 am | सोत्रि

ही आयटीवाली लोकं साध्याच गोष्टींनाच काहीतरी फंडू नावं देउन पोटं जाळतात!

दादा, तुम्हाला गुपित कळले तर, पण तसे नाही केले तर आम्ही आमची पोटं कशी भरणार :D

- (पोट भरण्याचे धंदे करणारा) सोकाजी

जे.पी.मॉर्गन's picture

23 May 2012 - 3:00 pm | जे.पी.मॉर्गन

>>ही आयटीवाली लोकं साध्याच गोष्टींनाच काहीतरी फंडू नावं देउन पोटं जाळतात! <<

एका वाक्यात खातमा ! प्रोटोकॉल स्टँडर्डायझेशनमुळे बराच फरक पडलाय हे खरंच ! आणि एकंदरच आयटीच्या ह्या सगळ्या जार्गनला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातंय हे ही खरं. माहिती सुरक्षेचा लाखमोलाचा प्रश्न आहे तो वेगळाच.

एकंदरच व्हर्च्युअल जग असल्यानं आयटी इंडस्ट्रीलाचा गोष्टी ब्लो अप करण्याची सवय जडलीये. पण काळजी करू नका दादा... हे फार दिवस चालणार नाही. आज ना उद्या "करेक्शन" होईलच. चेपुच्या शेअरला मिळणारा प्रतिसाद पहिला इंडिकेटर मानायला हरकत नाही.

सोत्रि - नेहेमीप्रमाणेच झक्कास लेख! आणि ररा आणि पाभेचे प्रतिसादही.

BSNL ने मध्यंतरी Nova netPC ची एक स्कीम सुरू केली होती. त्यात कॉम्प्युटरला हार्ड डिस्क नव्हती तर एक सेट टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माऊस हे ३००० रुपयात आणि महिना २०० रु भाडं अशी काहीतरी स्कीम होती. ते क्लाउड कॉम्प्युटिंग होतं का?

पैसातै,
थोडक्यात तो क्लाउड कॉम्प्युटिंगचाच भाग होता, पण इन्डायरेक्ट.
सर्वजण विचार करण्यास उद्युक्त झाले, लेख लिहीण्याचा फायदा झाला म्हणायचा :)

- (आनंदी [पण आज आनंदाचे कारण टीचर्स हायलॅन्ड्स क्रीम] असणारा ) सोकाजी ;)

क्लाऊड कंप्युटिंगची इन्ट्रो आवडली.
लेख छान झाला आहे. आणि उदाहरणे दिल्यामुळे समजायला सोपा झाला आहे.
धन्यवाद..

स्वतन्त्र's picture

28 Apr 2012 - 3:05 pm | स्वतन्त्र

लेख लैच भारी जमलेला आहे !!!!

साती's picture

28 Apr 2012 - 3:10 pm | साती

मस्तच लेख.
एखादा नवा मुद्दा लोकांना सोप्पा वाटेल आणि सहज कळेल अश्या भाषेत सांगायची आपली पद्धत आवडली.
त्यामुळे हा संगणन मेघ आमच्या प्रमस्तिष्काच्या हजारो योजनांवरून न जाता थोडाफार मेंदूत प्रवेशकर्ता झाला. :)

धन्यवाद!