जगणे सुरात आले

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
19 Apr 2012 - 11:08 am

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          - गंगाधर मुटे
---------------------------------

गझल

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे.

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

हे तुमचे कडवे एकदम बहारदार झाल आहे.

स्पंदना's picture

19 Apr 2012 - 2:22 pm | स्पंदना

सुरेख मुटे साहेब. सुरेख.
गझल आवडली.

बॅटमॅन's picture

19 Apr 2012 - 3:33 pm | बॅटमॅन

मस्त गझल!! तालात म्हणताना मस्त वाटते :)

जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा अशी गझल !
मुटे साहेब, हम्म ! एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे ! क्या बात है !

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

हा कबीराचा संदेशच वाटतो, व्वा क्लास !
कधीतरी यायला हरकत नाही पण अशाच जमलेल्या कविता घेउन या !
धन्यवाद !
पुकशु

गंगाधर मुटे's picture

21 Apr 2012 - 9:16 pm | गंगाधर मुटे

<<< एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे !>>>

चौरासाहेब,
तसे वगैरे काही नाही हो. गेल्या सहा महिन्यात पुरेसा वेळ मिळणेच दुर्मिळ झाले आहे. ही माझी खंत आहे. (आंतरजालावर दर्जेदार लेखन उपलब्ध असूनही, वाचायला मिळत नाही, ही दुसरी खंत)
एक वर्षा आधी माझ्याकडे एवढी उसंत होती की नऊ महिन्यात मी ८० पेक्षा जास्त कविता रचल्या. (लिहिल्या किंवा पाडल्या असेही म्हणता येईल) आणि दहाव्या महिन्यात "रानमेवा" हा काव्यसंग्रह प्रकाशित करून मोकळा झालो.

असो. काळाचा महिमा दुसरे काय. लवकरच मी आंतरजालावर पूर्वीसारखा मुक्तसंचार करू शकेल, अशी आशा आहे.

अप्रतिम!
सर्वांग सुंदर! एकेक कडवे गोड झाले आहे :)

मूकवाचक's picture

19 Apr 2012 - 4:18 pm | मूकवाचक

+१

कवितानागेश's picture

19 Apr 2012 - 5:27 pm | कवितानागेश

.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2012 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

वा...वा..वा..! मुटे काका...,एकेक ओळ वाचताना, मन अगदी त्रुप्त झालं :-)

पिवळा डांबिस's picture

20 Apr 2012 - 12:38 am | पिवळा डांबिस

मुटेसाहेब, गझल आवडली...

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
क्या बात है! वा!!

sneharani's picture

20 Apr 2012 - 3:30 pm | sneharani

अप्रतिम!मस्त झालीये गझल!!
:)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2012 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय आवडल्या गेली आहे.

एकदम सुरेख.

मेघवेडा's picture

20 Apr 2012 - 6:03 pm | मेघवेडा

सुरेख! आवडली गझल.

पैसा's picture

20 Apr 2012 - 6:05 pm | पैसा

गझल आवडली!

नंदन's picture

20 Apr 2012 - 6:15 pm | नंदन

गझल आवडली. पहिला आणि शेवटून दुसरा शेर खासच!

गंगाधर मुटे's picture

24 Apr 2012 - 12:43 pm | गंगाधर मुटे

सर्वांना धन्यवाद. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2012 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान गझल. आवडली.

-दिलीप बिरुटे

इनिगोय's picture

30 Apr 2012 - 3:22 pm | इनिगोय

वाट दाखवल्याबद्दल रमतारांमाचे आभार.