जगणे सुरात आले
लेखनविषय:
जगणे सुरात आले
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले
दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले
पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले
मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले
का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले
कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!
- गंगाधर मुटे
---------------------------------
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले
चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले
दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले
पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले
मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले
का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले
कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!
- गंगाधर मुटे
---------------------------------
वाचने
6535
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे.
सुरेख मुटे साहेब. सुरेख. गझल
मस्त गझल!! तालात म्हणताना
जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा
In reply to जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा by चौकटराजा
तसे वगैरे काही नाही हो.
अप्रतिम! सर्वांग सुंदर! एकेक
In reply to अप्रतिम! सर्वांग सुंदर! एकेक by यकु
+१
In reply to +१ by मूकवाचक
+२
वा...वा..वा..! मुटे
+१
अप्रतिम
ज्जे बात !
सुरेख! आवडली गझल.
मस्त झालीय!
छान
सर्वांना धन्यवाद.
छान.
या मस्त कवितेची