चिउ आणि काऊ

मानव's picture
मानव in जनातलं, मनातलं
10 Apr 2012 - 9:19 pm

एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती.

त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे.चिउ म्हणायची "काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की"

मग चिउ म्हणायची "ठिक आहे ,उद्या नक्की बोल हं माझ्याशी"काऊचे पण चिऊवर जिवापाड प्रेम होतेच पण परत दुसरा दिवस उजाडला की काऊ परत कामात व्यस्त होई.काऊ मनात ठरवायचा की आपण उद्या नक्की चिऊ शी बोलु ,चिऊला सांगु की त्याच किती प्रेम आहे तिच्यावर ! पण काऊ एवढा व्यस्त राही की त्याला जेवायलाही वेळ पुरत नसे,आपलं प्रेम व्यक्त करायच असे काऊने ठरवुन कित्येक दिवस,महिने,वर्ष निघुन गेली.

चिऊ मात्र क्षणाक्षणाला तीच प्रेम व्यक्त करी ,चिऊ ला माहित होत की या व्यवहारी दुनियेत प्रेमाच्या शब्दांना काहीच किंमत नसते तरीही ती ते व्यक्त करत राही तिच्या कृतीतुन,बोलण्यातुन.काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"

पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच.त्यासाठी त्याने पट्कन काम उरकल आणि तो लवकर घरी आला.चिऊ त्याची वाटच पहात होती.

तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात.जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत.

काऊ मनात म्हटला अरे गेली कित्येक वर्ष आपण चिउकडे निट पाहिलच नाही,की तिला कधी "तु कशी आहेस "हे ही विचारल नाही ! तो चिऊ ला म्हटला "राणी कशी आहेस ग तु?" चिऊ म्हटली " मी एकदम छान आहे रे राजा,तु माझ्याबरोबर आहेस यातच मला खुप आनंद मिळतो रे "

जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" काऊ मनात म्हटला किती वर्षांनी आज ही काहीतरी मागिते आहे,आपण हिला कधी काय हवय म्हणुनही विचारल नही,आज नकीए हिची ही छोटीशी अपेक्षा पुर्ण करुयात.

काऊने चिऊला मिठित घेतल आणि दोघेही शांत एकमेकांच्या कुशीत पडुन राहिले.चिऊला झोप लागली काऊला मात्र झरझर डोळ्यापुढुन निघुन गेलेली वर्शः आठवायला लागली.वेळोवेळी चिऊने घेतलेली काऊची काळजी,काऊ आजरी असताना तेला वाटनारी चिंता,तो बरा व्हावा म्हणुन केलेले उपवास.त्याला त्या गोष्टींच त्यावेळेस हसु येत असे त्यावरुन तो तीची चेष्टाही करी.आज मात्र त्या मिठीत त्याला तीच त्या मागच प्रेम दिसत होत.

बराच वेळ झाला तरी चिऊ काही उठेना म्हणुन काऊने तिला हळुच उठवायचा प्रयत्न केला पण चिऊ काही उठेना ,मग तिला गदागदा हलवुन पहिल तरीही चिऊ काही हालचाल करेना.काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच.

काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.

काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

10 Apr 2012 - 9:27 pm | प्रास

हे भगवान्! या मानवाला कुणीतरी समजवा.... इतका काय तो सतत बोर्डावर रहायचा अट्टाहास?

कृपया लेखन प्रकाशित करताना २-३ दिवसांचा संयम पाळा, मानव मेघपुष्पे....!

मानव's picture

10 Apr 2012 - 9:34 pm | मानव

अहो प्रत्येक पोस्ट वाचलीच पाहिजे असाही काही कायदा नाही आहे.
तुमचे प्रास,अनुप्रास दुसरीकडेही देऊ शकता की !

प्रास's picture

10 Apr 2012 - 9:35 pm | प्रास

हो शक्तिमान! चुकलंच माझं.....

चालू द्या....

सानिकास्वप्निल's picture

10 Apr 2012 - 9:35 pm | सानिकास्वप्निल

हेच म्हणायचे होते....

बरं झाल जाहीर चुक कबुल केलीत ते !

प्रास's picture

10 Apr 2012 - 9:44 pm | प्रास

तुम्हाला उपहास कळत नाही हे जाहिरपणे मान्य केल्याबद्दल आभारी आहे.

मानव's picture

10 Apr 2012 - 9:49 pm | मानव

केविलवाणा प्रयत्न.

केविलवाणा प्रयत्न.

बोर्डावर रहायचा, कुणाचा चाललाय ते स्पष्ट दिसतंय, नै? ;-)

बोर्ड आमचं,बिल आम्ही देणार आणि पोटदुखी इतरांना,हे लक्षण ठीक न्हवे.हाजमोला घ्या.

इती अध्याय समाप्तम...

प्रास's picture

11 Apr 2012 - 10:58 am | प्रास

भांडंच जर असं असेल तर पाणी भरावं कसं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2012 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयुष्यात हे केलं नाही, ते केलं नाही. हे करता आलं नाही, ते करायचं राहून गेलं.
प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे. गेल्या क्षणाबद्दल तर अजिबात कुरकुर नको.
न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये.

-दिलीप बिरुटे

गणामास्तर's picture

10 Apr 2012 - 9:59 pm | गणामास्तर

हा घ्या सल्ला.

गवि काकांनी दिलेले सल्ले कुठे कुठे उपयोगी पडतात नै. ;)
"गविकाकांचा सल्ला" हे सदर लवकरच चालू करा बुवा आता, किती दिवस रखडवणार अजून? :)

निवेदिता-ताई's picture

10 Apr 2012 - 10:34 pm | निवेदिता-ताई

:)

अन्या दातार's picture

10 Apr 2012 - 11:32 pm | अन्या दातार

आता तुम्हाला कसले सल्ले पाहिजेत? का सल्लागार समितीच्या सदस्य होण्याची प्रतिक्षा करताय??

मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या चिउ काउच्या गळ्यात मारावी हे फार वाईट झालं, एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ?

प्रास's picture

11 Apr 2012 - 2:56 pm | प्रास

मानवानं मानवाची गोष्ट बिचा-या चिउ काउच्या गळ्यात मारावी हे फार वाईट झालं, एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ?

हा अल्टिमेट प्रतिसाद आहे.

कसा काय नजरेतून सुटला ब्वॉ, कळ्ळंच नाही. :-)

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 3:30 pm | प्यारे१

>>>>एक चिउ आणि काउ एकत्र झोपलेत हे कल्पुनच माझं हात पाय गार पडत होते, ऑनर किलिंग वगैरे प्रकार आहेत का नाही ?

धन्य हो लेखकराव....!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

कित्ती गोग्गोल गोश्त आहे. मला खुप अव्द्ली.

अजुन शंगा ना...

दानव
इयत्ता दुशली, तुकली ब

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2012 - 12:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

पराभाऊंचा विजय असो!! :D :D :D

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 3:08 pm | मृत्युन्जय

_/\_
_/\_
_/\_

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2012 - 12:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गोष्ट ठिक आहे.

स्पा's picture

11 Apr 2012 - 1:34 pm | स्पा

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार

नाहीतर उद्या आम्हाला 'मन्या आणि डान्या' अशी कथा वाचायला लागायची.

ए अश काय ले पला दादा
एवढ मम्म कलून चिऊ काऊ ची गोष्ट ऐकून गाई गाई कलत होतो ना
मी नाही उठ्नाल जा

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 2:50 pm | प्रचेतस

दांबिश मुग्गा आहेस तू.

फटके द्यायला हवे तुला.

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
संत्रस्त आत्मा
सांसारिक जग हेच मिथ्या आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार

बागुलबुवाला बोलवा रे.

अगदीच तसं नाही, एखादी दंतवैद्यीण मिळत्ये का बघा. खाडकन झोप उडेल. :D

स्वातीविशु's picture

11 Apr 2012 - 2:56 pm | स्वातीविशु

चिऊताई चिऊताई..... दार......उघड....ह्या गोष्टीचा वरील लेख भाग दुसरा आहे का ? ;)

भाग २ आवडला. :)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

दुसरा भाग आम्ही ऐकलेला काहीसा असा आहे :-

कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड..

चिऊतै :- थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते.

कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड..

चिऊतै :- थांब माझ्या बाळाचा भांग पाडते.

कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड, माझ्या बरोबर माझी मुलगी पण आहे.

चिऊतैचे बाळ :- आई पावडर माझी मी लावतो. तू आधी जाऊन दार उघड.

चिगो's picture

11 Apr 2012 - 10:25 pm | चिगो

कावळा :- चिऊतै चिऊतै दार उघड, माझ्या बरोबर माझी मुलगी पण आहे.

चिऊतैचे बाळ :- आई पावडर माझी मी लावतो. तू आधी जाऊन दार उघड.

च्यायला, "इयत्ता दुशली, तुकडी ब" मधेच पंख फुटले की राव तुम्हाला.. ;-)

लगे रहो..

इनिगोय's picture

11 Apr 2012 - 3:17 pm | इनिगोय

एवढे प्रतिसाद देऊन या धाग्यावरचे 'प्लेम' व्यक्त करतायत मंडळी!

...पाहून माझे डोळे अश्रुने दबडबलेले आहेत आणि हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल आहे.

तिमा's picture

11 Apr 2012 - 8:52 pm | तिमा

गोष्ट वाचून हे समजले की त्या काऊ-चिऊला मूलबाळ नव्हते. त्यामुळेच इतके दिवस चिऊ जिवंत राहिली होती.
अवांतर : काऊ-चिऊचे हायब्रीड मूल कसे दिसेल त्याची कल्पना येत नाही.

गणपा's picture

15 Apr 2012 - 3:33 pm | गणपा

जयंत कुलकर्णी's picture

11 Apr 2012 - 11:06 pm | जयंत कुलकर्णी

काही खास, वेगळे आगळे, असेल तरच मिपावर टाकावे हा अलिखित नियम आहे मित्रा. तो पाळावास हा सल्ला.

अन्या दातार's picture

11 Apr 2012 - 11:25 pm | अन्या दातार

प्रासभौंच्या या कॉमेंटची प्रकर्षाने आठवण झाली.

एक बेसीक प्रश्न मला नेहमी पडतो चिमणी आणि कावळ्याची जोडी कशी हो जमेल ??? आणि जमली तर चिमणा काय कावळीच्या मागे जिव घालवेल का ?

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2012 - 12:48 am | संजय क्षीरसागर

प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे.

काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,.... लेखकाचं भाषाप्रभुत्व लक्षात घ्या)

>तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती.

ही कथेची मध्यवर्ती संकल्पना आहे, `स्री थोडक्यात तृप्त असते पण पुरूष कायम सेटींगच्या मागे' हा अनादीक्रम लेखकानं सुरूवातीला मांडला आहे.

>काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की"

झोप हाच खरा मानवी शत्रू आहे आणि तो पुरूषाला अवेळी घेरतो (नेहमीचा अनुभव म्हणजे `पुरूष कायम जागा आणि स्त्री लगेच झोपेच्या स्वाधिन होते' या वाचकांच्या मूळ धारणांनाच लेखकानं शह दिलायं हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे)

>काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"

इथे लेखकानं स्त्री सुलभ लज्जेचं बेमालूम वर्णन केलंय पण ते वाचकांच्या सहज लक्षात येण्यासारखं नाही. जर चिऊ `आय लव यु!' च्या ऐवजी नुसती `काऊ लव मी' म्हणाली असती तर गोष्ट तिथेच संपली असती हे लेखकानं हेरलंय.

>तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"

इथे लेखकानी संयमाची परिसिमा काय असते ते दाखवलंय, काहीही झालं तरी आधी जेवण! काय आधी आणि काय नंतर याचं तारतम्य हवं.

>जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत.

इथे लेखकानं पुरूषी संयमाची परिसिमा गाठलीये! `ती आज वेगळीच भासत होती' असं म्हटल्यावर वाचकांना वाटतं `आ गया काऊ लाईनमे' पण तसं नाहीये प्रथम चिऊची तब्येत महत्वाची (वाचक हो शिका, आधी जेवण मग तब्येतीची विचारपूस)

>जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग"

सामान्य वाचक समजेल की जेवण झालं, तब्येतीची विचारपूस झाली आता नक्की काही तरी होणार! पण नाही, लेखकाला कथा एका वेगळ्याच उंचीवर न्यायची आहे. काऊ आता फारसं काही करू शकत नाही हे चिऊला माहितीये पण लेखक अशी वाक्य चिऊच्या तोंडी घालत नाही, मोठ्या खुबीनं तो वाचकाला (आणि त्यांच्या जोडीनं काऊला) सकाळपर्यंत वाट पहायला लावतो.

इथे पुन्हा लेखकाच्या विद्वत्तेला दाद द्यावी लागते कारण काऊनं जंगजंग पछाडले तरी त्याला इतक्या पहाटे जाग येणार नाही आणि चुकून आलीच तर चिऊ त्याला `ही काय वेळ आहे का?' असं विचारणार याची लेखकाला कल्पना आहे पण त्याला कथा लांबवून वाचकांच्या मनावरची पकड अजीबात सुटू द्यायची नाहीये.

>काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच.

इथे वाचकाला (जरी हा त्याचा नित्याचा अनुभव वाटला) तरी तो एकदम त्या अनुभवातून बाहेर येतो, त्याला वाटतं आता काऊ नक्कीच काही तरी करणार!

>काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.

इथे देवाघरीचा अर्थ `देवघरात' असा आहे, म्हणजे मनानी ती देवपूजेत मग्न झाली होती. लेखकानं हा अर्थ मोठ्या खुबीनं मांडलायं `तिच्या चेहर्‍यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.'

जे सांगायला संतमहंतांना ग्रंथ लिहायला लागतात ते लेखक एका छोट्या कथेत सांगून जातो. `चिऊ आणि काऊ काही तरी करतील' या सामान्य जनकामनेला `ईश्वर प्रेम हेच सर्व श्रेष्ठ' असं लेखक हळूवारपणे सुचवतो आणि त्याचं `तिच्या चेहर्‍यावरचं एकप्रकारचं समाधान' असं वर्णन करतो.

>काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.

इथे लेखकानं जाताजाता कथेला पुन्हा कलटणी दिलीये.

`काऊला पुढचं सगळं दृष्य अंधुक दिसायला लागल होतं' काय करणार बिचारा? `काऊ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे' हे लेखकानं सुरूवातीलाच क्लिअर केलंय. यातून लेखकाला काऊला पुन्हा कामाची (इथे कार्यालयीन कामकाज असा अर्थ आहे) काळजी लागली आणि ....`त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होतं' (इथे `कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने' म्हणजे इंग्रजीतील `लव' आहे) हे लेखक इतक्या बेमालूमपणे सुचवतो की वाचकाला, `लेखक पुढचा भाग कधी टाकतो 'याची प्रतिक्षा लागून राहते.

पुष्करिणी's picture

12 Apr 2012 - 2:41 am | पुष्करिणी

हैला...असं आहे होय हे,
मला वाटलं आत्मा -परमात्मा आहेत काउ-चिउ

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2012 - 10:44 am | परिकथेतील राजकुमार

मला वाटलं आत्मा -परमात्मा आहेत काउ-चिउ

ही मानवाने लिहिलेली आत्म्यांची कथा आहे, जी वाचून वाचक परमात्म्यात लिन होतो.