फिलहाल ..जी लेने दे -भाग २

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
10 Apr 2012 - 2:01 pm

फिलहाल ..जी लेने दे .....

------------------------------------------------------------------------------

संध्याकाळची वेळ , कॉलेज ग्राउंडवर अभय अन त्याचे मित्र क्रिकेट खेळायला जमा झाले होते .
अभय: अरे हा वैभ्या राहिला कुठ ? किती वेळाचा येतो येतो म्हणतोय अजून पत्ता नाही लेकाचा.
किरण : साला तो कधी कुठे वेळेवर पोहचला का आजपर्यंत ? जाम पकलो आज यार अन नेमकी कँटीन पण बंद ,
काय सुचत नाय ब्वा काय करायचं ते ? चल एखादा पिक्चर टाकायचा का आज ?
अभय : कुठला ? कोणता आलाय नवीन ? तो #%^&^%#^& का ? त्या साल्यात हिरो होण्यासारख काय मटेरीअल आहे रे ,साला तोच त्याचा रडका चेहरा अन त्येच बुळबुळीत डायलॉग , हां ...ती हिरोईन भारी आहे वंटास आयटम आहे एकदम !!!! ;)
वैभ्याची वाट बघू , पाच दहा मिनिट नाहीच आला तर बघू काय करायचं ते ? त्या वैभ्याकडे बॅट आहे म्हणून फारच भाव खातो यार तो ! इथे किती वेळचे माती खात बसलोय आपण बॅटवाचून :(
असे बोलत असताना अभ्याच लक्ष बेंचवर पडलेल्या
बॅडमिंटन रॅकेटवर गेल , रॅकेट हातात घेऊन एक दोनदा फिरवून बघितल
“अरे हे कुणाच तरी विसरलेले दिसतंय बहुतेक ,चला टाइमपासची सोय झाली “ म्हणत अभ्याने जरा दूर जावून रॅकेट बॅटसारख पकडलं
हे किरण्या ....कर रे बॉलिंग, बघूं जमत का ?
किरण्या : अबे ए .sssss..ते बॅडमिंटनच रॅकेट आहे आपला क्रिकेट बॉल चालणार नाही याला, थांब आलोच !
पाचेक मिनिटात किरण्या आला त्याच्या हातात एक प्लास्टिकचा पोपटी कलरचा बॉल होता.
किरण्याने पोझिशन घेतली अन बॉल टाकला , अभ्याने त्या फुल्लटॉस वर एक दणकून शॉट मारला
आयला भारी रे ,अजून एक टाक बघू ,पुन्हा एक बॉल ,पुन्हा एक शॉट
" आयला जमल कि रे ,वैभ्या बॅट घेऊन येईपर्यंत इससे काम चलाते है,क्या?
बॉल वर बॉल ,शॉट वर शॉट चालू झाले .इतका वेळ वाळलेल्या काड्या चावत बसलेली मित्रमंडळी देखील यात सामील झाली .किरण्या बॉल वर बॉल टाकत होता पण अभ्या काही आऊट होत नव्हता .
रँकेटचा भला चौडा आकार काही बॉल अन स्टम्पला भिडू देत नव्हता अभ्याला जाम मजा येत होती शॉट वर शॉट मारायला ,घामाघूम किरण्याने हाय खाली , बॉल महेशकडे पास केला .
चल .....तू टाक यार ही ओव्हर !
महेशने रण - अप घेतला हात उंचावला फुल स्पीडने फुलटॉस टाकणार टाकत आहे असे भासवून गप्पकन सरपटी टाकला, गंडवल साल्याने मुद्दाम , अभ्यानेही तो सरपटी बॉल फट्ट - दिशी जोर लावून मारला ...... पण त्या नादात रॅकेटचे तीन तेरा झाले, तारा तुटल्या गेम ओव्हर !!
च्यायला ,चांगला मूड आला होता , श्या.......म्हणत अभ्या मागे वळला ,
मागे " काळ्या कलरचा track- सुट घातलेली एक मुलगी उभी होती तिने अभ्याच्या हातातातले रॅकेट खस्स्कन हिसकावून घेतले. तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या ,तिचा त्रासिक अन रडवेल्या चेहरा सर्व काही सांगून जात होता .ती त्या रॅकेटकडे निरखून बघत होती .
अभ्याला काय कळायचे ते कळाले होते ,बाकीचे मित्रमंडळ एव्हाना सोय बघून लंपास झालेले होते .
अभ्या तसा निडर होता पण का कोण जाणे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आज !
आज त्याच त.. त ..प.. प.. झालेलं होत ,नुसता सॉरी इतकंच म्हणू शकला .
तिने त्याच्याकडे एक जळका कटाक्ष टाकला ,अन काहीही न बोलता आल्यापावली निघून गेली .
अभ्या बाईक काढत होता तेव्हा सगळी चौकडी पुन्हा शेड खाली जमा झाली कुठून कुठून !
किरण्या : " साला काय बोलली का रे तुला ती ,?झापल असेल नै? आवेशावरून तर झाशीची राणीच वाटत होती
अभ्या : म्हणूनच शेपूट घालून पळाले लेकहो तुम्ही ?
तसा किराण्याचा चेहरा ओशाळला
अभ्या : ते जाऊ दे पण तिच्या रॅकेटची वाट लावली रे आपण , पण कोण आहे रे ती ? कुणी ओळखत का तिला ?
किरण्या : का का का ? क्यू पेहली नजर मे घायल हो गया क्या बे तू ?
अभ्या : ए किरण्या.s.sssssssss जास्तीचा शहाणपणा नको करूस , देईल एक उलट्या हाताची ठेऊन , एक नवीन रॅकेट घेऊन देतो रे तिला , किती हिरमुसली होती ती!!
झाले.. सर्वांच्या बाईक कट्ट्याच्च्या दिशेने न वळता स्पोर्ट कीट च्या दुकानाकडे वळल्या
दुसर्या दिवशी संध्याकाळी अभ्या एकटाच कॉलेजात पोहचला , शोधाशोध केली , काही मुल ग्रावंड वर फुट्बॉल खेळत होती .
च्च.च्च च्च ... अभ्याने कपाळावर हाताची मुठ मारून घेतली ," साला कुणालातरी
नाव तरी विचारायला हव होत ,ऐन वेळी एव्हढी अक्कल कुठून पाजळायला आलीये ,जरा निराशेनच अभ्याने बाईकला किक मारली .मनात रुखरुख वाटत होती कसलीशी, किरण्याला फोन लावला
" अरे ती आज आलीच नाही ग्राउंड वर”
वैभ्या : ती कोण ?
अभ्या : अरे ती , कालची मुलगी
किरण्या : अरे मग कुणालातरी विचार ना बे
अभ्या : काय विचारू ? नावगाव माहित पाहिजे ना ?
किरण्या : येडाच आहेस तू , नाव तरी विचारायचं ना काल?
अभ्या : साला .... काल माझीच तंतरलेली तिला बघून , अन तिला नाव विचारू वरतून ?
"एक्सक्यूज मी !!!! रॅकेट तुटल तर तुटल, पण मला तुमच नाव सांगा ना प्लीज प्लीज " त्या रॅकेटनेच धुतला असता तिने मला "
****

बस इतकच......
दुसर्या दिवशी किरण्या डिटेल बुलेटीनसह अभ्याच्या घरी दाखल झाला
नाव : तन्वी देसाई .
बी .कॉम .फायनल ईयर
पत्ता : गुलमोहोर हौसिंग सोसायटी .
रोज संध्याकाळी जिमखान्यावर येते प्रक्टिस करायला ,बँडमिंटन मस्त खेळते .
तू बोललास तर सेल नंबरपण आणून देतो तुला बोल ,पायजे का ?बोल बोल ? म्हणत किरण्याने डोळा मुडपला अभ्याला पहिल्यांदाच किराण्याच्या जासुसीच कौतुक कराव वाटल पण चेहर्यावर विशेष काही न जाणवू देता त्याने फक्त थँ ...क्स एव्हढच म्हटल

अभ्याला कसही करून तन्वीला भेटून ते रॅकेट द्यायचं होत ,म्हणून संध्याकाळी स्वारी जिमखान्यावर दाखल झाली
बराच वेळ टेहळनित गेला पण तन्वीचा पत्ता नव्हता ,किरण्याला बुकलून काढावेसे वाटत होते .
किरण्याची समाधी लागलेली होती ,बाकीच्या खेळणाऱ्या बर्याच होत्या ;)
किरण्या गुंगून गेला होता ,लेकाची पापणीही पडत नव्हती
अभ्या: आर यु शुअर ? ती येईल ना रे ? :
अभ्या काय बरळतो आहे मघापासून याचे किरण्याला काही घेणे देणे नव्हते किरण्याला कधी नव्हे तो बँडमिंटन नावाचा खेळ फार इंटरेस्टिंग वाटत होता आज !
डोक्यात एक टप्पू बसल्यावरच किरण्याने अभ्याकडे पाहिलं
डोक चोळत म्हणाला " अरे यार !!!! अबे येईल ना यार ,(साला..... मेरा मजा क्यू किरकिरा कर रहा बे तू हे मनातल्या मनात ,किरण्याची काय हिंमत अभ्याला अस बोलायची )

किरण्याने परत समाधी लावली .
किराण्याची समाधी भंग करत अभ्या ओरडला " ए किरण्या एक तास होत आलाय काही पत्ता नाही तिचा ,मी मुर्खासारखा बडबडतो आहे एकटाच !
आता मात्र किरण्या चिडला मनातल्या मनात डाफरला " का माझ्या आनंदात मिठाचे खडे घोळावातोय
हा? म्हणत उठून मागे वळला म्हणत जागेवरून उठला ,त्याने अभ्याकडे मान वळविली ,
अभ्याचा भयंकर वैतागलेला चेहरा , कपाळावर आठ्या , एक भुवई उंचावलेली असा रुद्र्वातर झाल्यावर पुढे काय होते हे किरण्याला चांगलेच ठाऊक होते
अभ्या आपल्याकडेच रोखून पाहतो आहे अस पाहून किरण्या नर्व्हस झाला , हाताची नखे कुरताडायला लागला तो अभ्याची खाऊ कि गिळू नजर टाळण्याचा प्रयत्न करू लागला ,भिरभिरल्या सारखा इकडेतिकडे बघू लागला चेहरा तर असला निरागस केला होता लेकाने !!!!
कावराबावरा झालेला किरण्या अचानक आपल्या फाटलेल्या साऊंड मध्ये चीत्कारला
" अ.. आली ..आली..बे ...ती ..... आली. एकदाची.( हुश्श ..वाचलो )

अभ्या इतका वेळ जिची वाट पाहत होता आतुरतेने ,एकदा तिच्याकडे मान वर करून पाहायला देखील त्याच धाडस होईना .त्याला काही सुचेनास झाल ,काय करू नक्की ? बोलू कि नक्को ? चिडलेली असेल तर उगीच राडा करेल माझा इथे ,काय करू नक्की ?
" ए चल बे , इतक काय घाबरायचं , प्रपोज थोडी करतो आहोत आपण तिला ,नुसत रॅकेट तर द्यायचं आहे तिला,
श्या... उगीच भेदरलो मी अस मनातल्या मनात बोलून अभ्या पुढे झाला
" हाय ,... ते परवा .... तुमच रॅकेट.... सॉरी परत , अभ्याची बोलताना गोची झालेली पाहून किरण्या पुढे आला आणि घडाघड बोलू लागला तन्वी भांबावल्यासारखी दोघांची पोपट पंची ऐकत होती.
तन्वीने फक्त “इट्स ओके,माझ्याकडे आहे अजून एक नो प्रोब्लेम “ म्हटले अन चालू लागली
तसा अभ्या तिच्या पुढ्यात उभा राहून म्हणाला " हे नवीन रॅकेट तुमच्याकरिता " प्लीज ठेवा मला अपराध्यासारख वाटणार नाही तन्वीने एक गोड स्माईल देत thank-you म्हटले अन त्याच्या हातातून रॅकेट घेतले अन निघुन गेली .
अभ्याला खूप बरे वाटले :) त्याने बाईकची चावी काढली अन दरवाजाच्या दिशेने निघाला
किरण्यालाही नाईलाजाने जड पावलाने सुम्याच्या पाठीमागे जावेच लागले

नंतर योगायोगाने ;) अशा भेटी वरचेवर होऊ लागल्या , एकमेकांचे नंबर एकस्चेन्ज झाले ,फोनवर गप्पा चालू झाल्या
एकमेकाचे स्वभाव ,आवडीनिवडी कळल्या सुरुवातीला फक्त जुजबी बोलणारी तन्वी तासन तास अभ्याशी बोलू लागली
**********************************************************
अभ्याच्या डोळ्यासमोर सर्व तरळून गेले .अभ्या गालातल्या गालात हसला .गाडी स्टेशनावर लागली ,नागपूर आलं होत
अभ्या उतरन्याच्या गड्बडीत,तेव्हढ्यात अभ्याचा मोबाईल बीssप झाला
" नक्की चिडलेल्या तन्वीचा मेसेज असणार ", म्हणून आतुरतेने अन घाइघाइत अभ्याने मेसेज पाहिला ,

" क्या होगा आपकी लव्ह लाईफ मे? क्या केहता है आपका लव्ह मीटर ?जानने के लिये डायल करे #@##@@##
५ रुपये प्रतिदिन " ;)

साल्ल्ला....... ह्या मोबाईल कंपन्याच्या आईचा @@#$#$@@ अशी सणसणीत शिवी हासडून अभ्याने चरफडत मोबाईल खिशात कोंबला.

क्रमश :

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

च्यामारी !
लव्हकथा लईच रंगवून लिहिलीय की.
मजा आया

पुढचा भाग पुढच्या उन्हाळ्यात का? ;-)

पियुशा's picture

10 Apr 2012 - 3:06 pm | पियुशा

http://www.misalpav.com/node/20873
फिलहाल च्या पहिल्या भागाची लिंक

प्यारे१'s picture

10 Apr 2012 - 3:19 pm | प्यारे१

पुढचा म्हणजे .... पुढचा अथवा नंतरचा अथवा प्रस्तुत भाग लिहील्यावर येणारा भाग!

भाग २ नंतर पुढचा भाग ३ असं अपेक्षित आहे. तो कधी येणार असं यक्या विचारतोय! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

कथेत '#%^&^%#^'' किंवा '@@#$#$@@'' हे काय आहे ते समजले नाही.

अर्थात ते अपशब्द असतील तर ते लिहिण्याचे टाळायचेच होते तर कथेत का वापरले असावेत ? प्रतिसादात असे घडणे समजू शकतो, मात्र कथेत असे का असावे ?

आजकाल कथेत, चित्रपटात २/३ अस्सल शिव्या आल्या म्हणजेच तो चित्रपट अथवा कथा आजच्या काळाशी रिलेटेड आहे असा एक गैरसमज पसरत चालला आहे का ? आणि जर अशा शिव्या व्यक्त होणे हे स्वाभावीक मानले तर मग त्या स्पष्ट लिहिण्यात घाबरायची गरज काय ?

पेठकर काका तुम्ही पराचा आयडी वापरणे कधी थांबवणार आहात? ;-)

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

हि उलट्या हाताची थप्पड माननिय परिकथेतील राजकुमार ह्यांना आहे की मला????

अबाबाबा ऽऽऽऽ
तुम्ही रागावले! :(
असं नाही हो काका.. पराची प्रतिक्रिया वाचून एकदम छडी हातात घेऊन उभे असलेले पेठकर काका दिसले म्हणून म्हणालो हो.
.

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 4:21 pm | प्रभाकर पेठकर

बस्स काय..! मी काय हातात छडी घेऊन उभा असतो? उगाच आपलं कायच्च्याक्काई..!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

काकांशी सहमत.

श्री. यक्कु ह्यांची प्रतिक्रिया अंमळ अश्लील असल्याने उडवल्या जावी.

वपाडाव's picture

10 Apr 2012 - 2:37 pm | वपाडाव

@@#$#$@@ = घो
#%^&^%#^& = ??? हे काय ते कळालं नै... जरा प्रकाश टाकाल का...

- (बाकी, हे सालं असलं काही आमच्या लैफमध्ये का नाही झालं असंच नेहमी वाटत राहणारा) वपाडाव

अन्या दातार's picture

10 Apr 2012 - 2:35 pm | अन्या दातार

उशीराने का होईना, आला ब्वा एकदाचा भाग!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Apr 2012 - 2:45 pm | निनाद मुक्काम प...

आपल्याला बुआ शीर्षक आवडले. कथेला एकदम फिट बसते
पुढचा भाग लवकर टाकावा. हि

स .न वी वी .

चला, तुम्ही लिहित्या झालात, बरं झालं. धन्यवाद. पुढचा लिखाण पटापटा करा बरं.

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 4:02 pm | प्रभाकर पेठकर

कथा चांगली असली तरी अनावश्यक वाढवल्यासारखी वाटत आहे.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

वपाडाव's picture

10 Apr 2012 - 4:08 pm | वपाडाव

काका, तुम्ही ही कथा अगदी कुमारवयात (शुद्ध मराठीत टीनेज) येउन वाचा म्हणजे कळेल...
डोन्ट जज धिस अ‍ॅस अ‍ॅन अडल्ट... ह.च घ्या बरं...

स्पा's picture

10 Apr 2012 - 4:11 pm | स्पा

ह्म्म्म
लैच गो ग्गोड वाटल वाचून ...
एखाद्या मराठी शिरिअल मध्ये खपून जाईल हा भाग

५० फक्त's picture

10 Apr 2012 - 5:24 pm | ५० फक्त

खपुन जाणार नाही, तर एवढ्या एका भागावर कमीत कमी ४-५ एपिसोड होतील सिरियलचे

प्रचेतस's picture

10 Apr 2012 - 4:52 pm | प्रचेतस

संवाद एकदम चुरचुरीत लिहिले आहेस.
कथा आवडली.
पुढचा भाग येऊ देत लवकर.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Apr 2012 - 8:46 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! लेखिकेचं भविष्य उज्ज्वल आहे! ;)

पैसा's picture

10 Apr 2012 - 9:00 pm | पैसा

फक्त जरा लवकर दे पुढचा भाग!

सानिकास्वप्निल's picture

10 Apr 2012 - 9:38 pm | सानिकास्वप्निल

हा ही भाग छान जमलाय गं पियुडे
पुढचा भाग लवकर येऊ दे :)

चाफा's picture

10 Apr 2012 - 10:55 pm | चाफा

छानच आहे :) आवडेश :)

किसन शिंदे's picture

10 Apr 2012 - 11:55 pm | किसन शिंदे

बर्याच उशीरा हा भाग टाकलाय :(

आता पुढचा भाग पटकन येऊ दे.

डायलॉग किंग म्हणाव लागेल, असा वाहता झरा आहे बोलण्याचा , आवडल.

वपाडाव's picture

14 Apr 2012 - 12:16 pm | वपाडाव

डायलॉग किंग???

काही गफलत झाली का तुझी तायडे???
क्वीन म्हणायचंय का तुला....

स्वातीविशु's picture

11 Apr 2012 - 12:54 pm | स्वातीविशु

हाही भाग आवडला. :)

स्नेहल महेश's picture

8 Sep 2015 - 12:43 pm | स्नेहल महेश

पुढचा भाग कुठे आहे

बाबा योगिराज's picture

8 Sep 2015 - 1:17 pm | बाबा योगिराज

बढिया जम्या है.....

पद्मावति's picture

8 Sep 2015 - 2:09 pm | पद्मावति

खूपच मस्तं कथा. दोन्हीही भाग वाचले.
पुढचा भाग कधी?

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 4:05 pm | महासंग्राम

पुढचा भाग कुठेय ??? एवढी स्टोरी त्यात आमच्या अभ्या शेठउल्लेख पण, मधातच लटकवली राव श्या याला अर्थे

अभ्या..'s picture

30 Sep 2016 - 4:53 pm | अभ्या..

कुठाय ती तन्वी, कुठाय?
मला सांग पिवशे पहिल्यांदा.