हैद्राबादी हिन्दी ची थोडि झलक म्हणून लिहिले आहे .. इंदुरि झलक वाचून जरा तल्लफ आली म्हणून ..
स्थळ - हैदराबादेतील एक मुन्सिपल ओफिस जिथे जन्म नोन्दणी होते ते
"स्स्लाम आलेकुम मिया .. खॅरियत ??"
"बोलो , क्या काम है?" डोळे वर न ऊचलता साहेब बोलले ..
"छोटासा काम है बस .."
"अरे छोटा , बडा सब काम करने के वास्तेच बैठे है , बोलो."
"मिया , ये अस्लम , मेरा छोटा भाई"
"तो ?"
"इनो एक छोकरि हूई परसूं को , ह्यां कोटि अस्पताल मेंईच हुई .."
"हां , काम बोलो" अजुनहि साहेबाची नजर काहि वर येइना ..
"ये बरथ सरटिफिकिटां ..."
"फोर्म भरो .. बाहर .. "
"नहि मियां .. ये सरटिफि़किटां मिलेसो है .. असलम, वो द्योव तो साब को "
"फिर ?" अत्ताशी वास लागल्यामूळे साहेवाची मान वर झाली.
"ये सरटिफि़किटां में थोडा मिश्टेक हुयेसो है .."
"क्या हुआ .. इधर में कोइ करेक्शन नहि होता .. वो ई-सेवा में जाओ "
" व्हां सेईच आये ह्यां पे .. "
"अच्चा बोलो .. क्या हुआ है ?"
" ये छोकरि का नाम गलत लिखेसो है "
"नाम जो फोर्म में भरा होगा .. वोईच होगा .. फोर्म में गलत लिखा होगा तुमने, तो गलत आता .. हम लोगां अपने जहेन से नहि लिखते नामां "
"मियां ये .. फोरम तो ये असलम भरा है .. गलति तो इस्सिकिच है .. मिया .. आप बोलो .. घर में गर बडे बूढे कोइ मुन्नी बोले .. तो कोइ ये लिखा के लाता क्या सरटिफिकिटां में ? चार बूकां मेरे से झ्यादा पढेसो है .. पर अकल के मामले में एकदम आटो रिक्शा .. एकदम स्लो .. चलतीच नै इस ...... कि .." एक अस्सल हैद्राबादि शिवि अन डोक्यावर एक टप्पल असलम च्या वाट्याला आलि ..
" मियां अब्बि आप हि कुछ करो "
" ये कब का है बर्थ ? २०१० ??" साहेबाने हिरवा कागद हातात धरत म्हट्ले ..
" हां मियां .. "
" ये फिर आन्लाईन हो गया .. फिर नै होता .."
"अरे कुछ करो मियां .. आपके पास बडि ऊम्मिद लेके आयेसो है .."
"खर्चा आता .. भोत खर्चा आता .. वो रेकार्ड निकालना .. आन्लाइन चेंज कराना .. भोत लोगां है भई .."
"अब्बि गलति किये तो भुगतना तो पडताईच ना साब .. आप कर्रो .. काम तो करो .. "
"मै पैलेच बोलतूं .. फिर नक्को बोलो के खर्चा झ्यादा हुआ बोलेके .."
"ओ साब .. जो बी है .. सो - दोसो .. देके देंगे .. " असलम च्या तोंडातुन फुट्लेल्या पहिल्याच वाक्याने साहेबाचा इगो हर्ट ..
"भोत खर्चा बोले तो क्या सो दोसो होते क्या ... आप ऐसा करो .. मुन्नीच रहने दो .." हिरवा कागद परत टेबलाच्या टोकावर ठेऊन साहेब फाइलींमधे डोके घालायला लागले ..
"अर्रे ऐसा गुस्सा नक्को करु मियां .. अस्लम .. मूं खोल्ना नै बोला ना मै तुम्को पैलेईच .. ह्यां तुमारि गल्त्यां सुदार्ते सुदार्ते झिन्दगी घिस जायेंगि .. पर तुम नक्को सुदरूं .. जाव बाहर जाके कुछ ठंडा लेके आओ साब के लिये .. "
"अर्रे जाव बोला ना .. ............. क्या सूनने को नै आता .." पुन्हा एकदा सर्व कुळाचा ऊद्धार ..
एकदाचा असलम बाहेर गेल्यावर साहेबाने परत डोके वर केले ..
"मियां .. आप बोलो भै खर्चा .. ये नये झमाने के लड्कों को तमीझ नै बात करने कि .."
"पन्द्रासो लगते .."
"अर्रे मियां .. थोडा सबर से बोलो .. "
"बोला ना .. खरचा आता .. तो खरचा आता .."
"मियां ..अब्बि क्या बोलूं मैं ........मेरे अब्बू कि बात है .. मेरे अब्बू ठैरे पूराने झमाने के .. बडि पूरानी बाते करते .. पर कब्बी कब्बी सोंचूं तो सहि लगति है .. वो बोलते .. पैसा कमाओ .. झरूर कमाओ .. भोत कमाओ .. पर साथ हि साथ दुआ भी कमाओ .. वर्ना पैसा तो होंगा .. पर काम नै आयेंगा .. "
साहेबाच डोकं अजून पण फाइलिंमधे च होते ..
"अच्छा .. ऐसा करो .. चौदासो दे दो .. इदर लिख के दो ..नया नाम .. और हफ्ते भर में आना "
साहेबाने शंभर रुपयात दुवा विकत घेतलि अन पुढ्ल्या सरटिफिकिटांच्या मागे लागला ..
प्रतिक्रिया
4 Apr 2012 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार
तुमचे सदस्यनाम 'पहाटवारा' अर्थात आमच्या सु.शिं. च्या एका अप्रतिम पुस्तकाचे नाव असल्याने तुम्ही लिहाल ते सगळे बाय डिफॉल्ट आम्हाला आवडेलच.
4 Apr 2012 - 3:00 pm | यकु
क्लास लिहिलंय.
आवडलं.
हैदराबाद में भौत दिन बिताये दिखताय आपने ;-)
4 Apr 2012 - 3:14 pm | पहाटवारा
तुमच्या इन्दुरी पेन वाल्याची भाषा वाचूनच जरा तल्लफ आलि हैद्रबादी त लिहायची ..
4 Apr 2012 - 3:13 pm | निश
पहाटवारा साहेब, अफाट लिहिल आहेत..
सही मस्त
साहेबाने शंभर रुपयात दुवा विकत घेतलि अन पुढ्ल्या सरटिफिकिटांच्या मागे लागला ..
हे बाक्य तर अप्रतिम
सलाम कबुल करो हमारा मिया.
4 Apr 2012 - 3:35 pm | बॅटमॅन
ओ पहाटवारा भाय, अंग्रेजा पिक्चरा देखा क्या तुमने?
4 Apr 2012 - 3:45 pm | ५० फक्त
ब-याच दिवसांनी हिंदीत सुदर्लेली झिंदगी वाचुन मजा आली, धन्यवाद.
4 Apr 2012 - 4:06 pm | जाई.
छान
हैद्राबादी भाषेचा तडका आवडला
4 Apr 2012 - 4:09 pm | मुक्त विहारि
आयला मग आमचे डोंबिवली नामक १०-१२ लाख वस्तीचे खेडेगाव बरे ...अजुन इथे पैसे मागत नाहित...निदान मला तरी तसाच अनुभव आला आहे...कदाचित ह्या माणसाकडे कशाला पैसे मागा असेही वाटत असेल....आणि वेळ मात्र नेहमीप्रमाणे....बहुदा वेळेत काम पुर्ण केले तर सरकारी कामगाराला वरुन प्रेम-पत्र मिळत असावे...४/५ दिवस म्हणाले की ८/१० दिवसांनी जायचे...दुसर्या दिवशी हमखास होते काम...त्याला हेलपाटा घालायला लावला ह्याचे समाधान आणि आपण आपले भाकित खरे ठरले म्हणुन आपले समाधान...दोघेही खुष....म्हणुन ती भारतमाता पण खुष...असा सगळा खुषीचा मामला...
4 Apr 2012 - 4:18 pm | पहाटवारा
अहो करेक्शन आहे ते .. नुसते नवे नाहि द्यायचे .. नव्याचा रेट कमी आहे .. २०० रु किंवा २ आठवडे ..
4 Apr 2012 - 4:39 pm | मुक्त विहारि
हा कधि अनुभव नाही आला....आणि येवु नये अशी रोज देवाला प्रार्थना करुन मगच झोपतो....अद्याप तरी देव प्रसन्न आहे...
4 Apr 2012 - 4:29 pm | प्रीती
मस्त!!...
4 Apr 2012 - 7:15 pm | मराठी_माणूस
मस्त. वाचताना खुप मजा आली.
4 Apr 2012 - 7:19 pm | पैसा
इ हायदराबादी हमकु भोत पसंद आया!
4 Apr 2012 - 7:27 pm | परिकथेतील राजकुमार
ओ म्याडमजी इ प्रतिसाद हमकु नेपाली लगताए.
परा बहाद्दुर
4 Apr 2012 - 7:35 pm | पैसा
राष्ट्रभाषा आहे ती. कशीही बोल, पण बोल!
4 Apr 2012 - 7:45 pm | मृत्युन्जय
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा चुकीचा प्रचार केल्याबद्दल आणी अफवा पसरवल्याबद्दल तुमच्यावर मानहानीचा दावा का दाखल करु नये याची कृपया ४.५ पटण्यासारखी कारणे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा.
मिनसे (मिसळपाव नवनिर्माण सेना) कार्यकर्ता
4 Apr 2012 - 8:22 pm | स्मिता.
हैद्राबादी हिंदीतला लेख आवडला. (आणि नेपाळी हिंदीतला प्रतिसाद सुद्धा ;) ) 'द अंग्रेज' (तोच ना?) पाहिल्यापासून ती भाषा आवडायला लागलीये.
4 Apr 2012 - 7:26 pm | मृत्युन्जय
मिया मजा आया पढनेको. ढांसु एक्दम्.
4 Apr 2012 - 7:27 pm | रेवती
छान.
4 Apr 2012 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. संवाद वाचतांना मजा आली. धन्स.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2012 - 2:11 am | पिवळा डांबिस
हा हा हा, मस्त किस्सा!
मुन्नी बेनाम हुयी... अस्लमअब्बा तेरे वजहसे!!!!
:)
5 Apr 2012 - 7:59 am | नगरीनिरंजन
हैदराबादी लहेजा कानाला फार गोड वाटतो.
5 Apr 2012 - 8:30 am | यकु
हे दोन संवाद पुन्हा पुन्हा वाचले.
ग्रेटच उतरलंय.
5 Apr 2012 - 10:34 am | प्रीत-मोहर
भोत अच्छा किस्सा सुनाया मियां... कबसे हैदराबाद मैं रय्ते?
(हयदराबादी और नेपाली हिंदी की पंखी)
प्रीमो
5 Apr 2012 - 12:30 pm | पहाटवारा
धन्यवाद सर्वांना ..
अन्ग्रेझ चा ऊल्लेख काहि जणांनी केला , पण मला त्यापेक्शा वेलडन अब्बा मधला लहेजा जास्ती भावला .. खासकरून मिनिशा लाम्बा चा ( लाम्बा म्हणजे कदाचीत नेपाळ्यांशी संबधीत असेल :) .. पण इथे तिने मस्त बोललेय .. )
6 Apr 2012 - 1:56 pm | दादा कोंडके
द अंग्रेज एकदा बघायला ठिकय. उगिचच कॉलेज मधल्या (जास्तं करून हॉस्टेलवर रहाणार्या) पब्लिकनं डोक्यावर घेतलंय. केवळ हौशी कलाकार घेउन सिनेमा तयार केलाय ते ठिकय, पण म्हणून "डालरां-डालरां" चे संवाद आठवून डोळ्यात पाणी येइपर्यंत लोकं हसताना बघितलं की आश्चर्य वाटतं. वेलडन आब्बा ग्रेटच.
5 Apr 2012 - 12:35 pm | मनराव
वाचता वाचता "अंग्रजची" ....आणि त्यातल्या इस्माईल भाईची.......आठवण झाली.
5 Apr 2012 - 12:48 pm | शरभ
अंग्रेझची आठवण झालीच...
"२५ सालसे चार मिनार पे बैठा हुं....मेरेको क्या तो भी समझे तुम लोग ?"
"डिस्क ब्रेका है रे...काहे के बैन्गन के डिस्क ब्रेका रे ?"
5 Apr 2012 - 3:50 pm | विसुनाना
झकास लेहजा आणि नेमके चित्रण.
***
इधरिच है क्या तुम? किदर र्हैते , मियां? बोले नै... मिलना पडता |
5 Apr 2012 - 4:49 pm | चिगो
क्या लिखते, क्या लिखते भै.. एकदमीच बढीया..
6 Apr 2012 - 6:35 am | नंदन
लै भारी
6 Apr 2012 - 6:31 pm | स्वाती दिनेश
किस्सा एकदम रोचक पध्दतीने मांडला आहेत,
स्वाती