*** चैत्र नवरात्र ***

सध्या ठाण्यात चैत्र नवत्राचे उत्सवी दिवस सुरु आहेत्,ठाण्यातल्या जांभळी नाका इथे असलेल्या मैदानात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी देवी स्थानापन्न झालेली दिसली आणि मला तिचे दर्शन घ्यायची इच्छा झाली.
जमेल तसे फोटु काढण्याचा प्रयत्न केला आहे कृपया गोड मानुन घेणे. :)


प्रवेश करता क्षणीच गजाननाचे लोभस दर्शन झाले. :)

देखावा अतिशय सुंदर बांधण्यात आला आहे.


मुख्य देवी समोरच पुजा-अर्चना करण्यासाठी देवीची स्थापना करण्यात आलेली आहे.
या देवीला नमन करुन मुख्य देवीच्या मुखकमलाकडे दॄष्टीक्षेप वळवला...


मागच्या वर्षी शारदीय नवरात्रात देखील मला देवीचे स्वरुप टिपण्याची संधी मिळाली होती,पण ज्या वेळी फोटो काढले होते तेव्हा देवीच्या हातात आयुधे नव्हती ! यावेळी आयुधांसकट देवीचे दर्शन घडले. :)


गोंधळींचा गोंधळ ऐकावयास मिळाला...क्षणभर मला मी कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदीरातच असल्याचा आभास झाला. :)


देवी समोरच विविध प्रकारच्या होम कुंडांची मांडणी करण्यात आली होती,त्याच्या छताकडे माझे लक्ष गेले.

विवध देवींच्या तसबीरी लावलेल्या दिसल्या,होम हवन जोरात सुरु होते,तसेच वेगळ्या वेगळ्या आकाराची होम कुंडे देखील होती.


लोक या यज्ञस्थळी प्रदक्षिणा घालत होते,मी सुद्धा एक प्रदक्षिणा घातली अन् घराची वाट धरली.

*फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर) :)

मदनबाण.....

प्रतिक्रिया

सही रे बाणा..... सगळे फोटो मस्त !!

देखावा अतिशय सुंदर आहे. :) :)

सगळे फटु मस्त आलेत! एक सांग, मैदानात उत्सव म्हटलं तर ती सजावट, गणपतीबाप्पा सगळं तात्पुरतं आहे? असेल तर धन्य! शिवाय ते भुत्ये बघून मजा वाटली!

एक सांग, मैदानात उत्सव म्हटलं तर ती सजावट, गणपतीबाप्पा सगळं तात्पुरतं आहे?
व्हय जी, समदं तात्पुरतं हाय ! :)

मबा रे! अरे तु काय च्यायनेलचा कॅमरामन आहेस काय ?
लै भारी रील उतरलीय बघ.

कट!

:)

मस्त फोटु रे बाणा.

पण शेवटचा फोटो आवडला नाही. परवानगी न घेता कुणाचेही एव्हड्या जवळून फोटो काढू नयेत असं माझं मत आहे.

पण शेवटचा फोटो आवडला नाही. परवानगी न घेता कुणाचेही एव्हड्या जवळून फोटो काढू नयेत असं माझं मत आहे
धन्यवाद दादा... मी स्वतः कोणाची परवानगी न घेता फोटो काढत नाही,पण गर्दीचा फोटो काढताना कोणा कोणाची परवानगी घेणार ? ;)

सुंदर

नेहमी प्रमाणे बाणाने अचुक लक्ष्यवेध केलेला आहे सलाम...सलाम...सलाम... गणपति/हार काँबिनेशन नजरेत भरण्या जोगे आहे... :-)

देवीचा फोटो फार आवडला, मी प्रींट मारला तर चालेल? मला हवाय असाच फोटो पूजे करिता.

बाकि कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात कुठे दिसले गोंधळी तुम्हाला? पाय ठेवायला जागा नसते तिथे.

सारेच फोटो आवडले, अग्दी शेवटचा सुद्धा होऽ ऽ!

मी प्रींट मारला तर चालेल? मला हवाय असाच फोटो पूजे करिता.
बिनधास्त प्रींटवा... आपली काय बी हरकत नाय बघा ! :)

बाकि कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात कुठे दिसले गोंधळी तुम्हाला? पाय ठेवायला जागा नसते तिथे.
देवळात प्रवेश केलात तर काही वेळा गरुड मंडपात किंवा त्याच्या बाजुला बरेच वेळा गोंधळी दिसतात. लग्न सराईच्या वेळी मुख्यता गोंधळींची उपस्थीती दिसुन येते.

मला देविचा फोटू फारफार आवडला आहे किती लोभसवाणा अन सुन्दर चेहरा आहे :)

सुंदर फोटो, मस्त आलेत रे मबा.

शतचंडी / सहस्रचंडी यज्ञ सुरु असावा. यजुर्वेदात दिल्याप्रमाणे यज्ञकुंडांची मांडणी असते.

धन्यवाद रे बाणा.
दरवर्षी प्रमाणे यंदाही न चुकता देवीचे दर्शन घडवून आणलेस. :)

वा छान दर्शन घडवलत.

असेच म्हणतो.

अमृत

सुंदर फोटो आले आहेत
देवीचा फोटो पाहून मन प्रसन्न झालं :)
धन्यवाद

मस्त फोटो

खूप छान फोटो आहेत. गणपती बाप्पा खरंच लोभस आहे आणि देवीची मूर्ती तर अगदी सुरेख आणि रेखीव! अगदी प्रसन्न आहेत सगळ्या मूर्ती आणि देखावा.

अहा........सुरेख आहेत फोटो !!
बाप्पा आणि देवीची मूर्ती किती लोभसवाणी आहे..... !!

सर्व मंडळींना धन्स ! :)

मला ही तो फोटो खूप आवडला.

आमच्या इथे एका मैत्रिणीने माता की चौकी ठेवली होती. तिथे देवीची छान छान भजने म्हटली. मी महिषासुर मर्दिनी स्तोत्र म्हटले.
इतर सर्व मैत्रिणींनीं खूप सारे पदार्थ करून आवले होते.
सर्वच अनुभव मस्त होता.

चैत्री नवरात्र!!!???
चला आणखी वेगळ्या दहा दिवसात धिंगाणा घालायची सोय झाली पुढल्या पिढीची!
बाकी फोटो मस्तच.

सर्व चित्रे अतिशय सुंदर आली आहेत. ज्यांनी या मूर्ती घडवल्या त्यांचे अतिशय कौतुक वाटले. अगदी दैवी काम केले आहे.

सुरुवातीची गणेशाची आणि देवी तसेच इतर सर्व - सगळेच आवडले.