म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम्‌ २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -

  1. अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
  2. पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
  3. मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
  4. आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!

... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.

प्रतिक्रिया

अहो प्रत्येकाचा एक बाप असतो, तो शोधा म्हणजे झाले.

एखादा आमदारपुत्र गाठा, त्याला दोन चार वेळा तुमच्या नव्या आणि सध्या मोकळ्या घरात रेव्ह पार्टीला, श्रमपरीहाराला पाठवून द्या. smiley

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर व्हायचा. पंचतन्त्रातली पक्षी, साप आणि मुंगुस हि गोष्ट आठवली. (किंवा अमोल पालेकर, स्वरूप संपत, शत्रुघ्न सिन्हा आणि उत्पल दत्त चा नरमगरम नावाचा सिनेमा) smiley

बाकी धाग्याच्या विषयावर अनुभव सांगणारे इथे नक्की सापडतील.

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

कुणीतरी पुढाकार घ्यायला नको का ?

आता संधी मिळाली आहे तर धागाकर्त्याने हा उपाय करून बघावा. ह्याचे जे काय परिणाम होतील त्यामुळे इतर अशा प्रकारच्या नाडलेल्या लोकांना नवीन रामबाण उपाय तरी सापडेल, किंवा निदान ह्याचे तोटे झाले तर ते काय असतील ह्याचे ज्ञान तरी होईल ना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

मेहेन्दळ्यांनी म्हटलं रोगापेक्षा उपाय भयंकर. मला वाटून गेलं की हाडी मासी मुरलेल्या गळवाला सणक आली म्हणून घरच्या सुरीने कापून काढावे की संयत वैद्यकीय उपचार घेऊन कसे बरे करावे या विवंचनेत असलेल्याला "अहो दारू पिऊन टुन्न व्हा नि वर एक इंजक्शन मारियुआनाचं मारा - बघा दुःख पळतं की नाही" असा सल्ला देण्यासारखं आहे! प्रतिसादातल्या खेळकरपणाचं स्वागत. तुम्ही तुमचं नाव खरंतर 'वस्तुस्थितीतील राजकुमार' ठेवायला हवं. तुमचे शौक वा गहन प्रश्नांवरचे आमदारांच्या रेव्ह पार्ट्या आदि गुलछबू उतारे पाहून तुमचा पत्ता १० जनपथ आहे की काय अशी शंका कुणालाही यावी! येऊ द्या अजून ... (शंका नव्हे, प्रतिसाद)

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

प्रचंड अनुभव आहे या गोष्टीचा.. तुमच्या अनुभवांची कार्बन कॉपी आहे असं समजा.. शब्दशः..

आपल्यासारखे कोणीतरी गावगाड्यात भरडले गेले / जात आहे हे पाहून बरं वाटावं की वाईट अशा द्विधा स्थितीत मन आहे..

गावाविषयी आणि गावकर्‍यांविषयी मला तिडीक बसली आहे.. असा होलसेल तिरस्कार अत्यंत चूक असतो हे माहीत असूनही ते टाळता येत नाहीये.. माझं ठाम मत हे तीन वेगवेगळ्या गावांमधे एकीकडे जमीन/सातबारा इ इ बाबत, दुसरीकडे घर, पंचायत, घरपट्टी, अशा सर्व अनुभवांतून झालं आहे.. ही गावंही कोकण, घाट, खानदेश अशा वेगवेगळ्या जॉग्रफीमधली आहेत.. त्यामुळे गावातली गुंडगिरी, दहशत, प्रत्येक कामात पैसे काढण्याची सरपंच, तलाठी आदिंची हाव, घराशी संबंधित सर्व सिव्हिल वर्क्स तिथल्या स्थानिक कारागिरांकडून करुन घेण्यासाठी धमकीचे फोन हे सर्व सर्व सोसलेलं आहे..

सुतार, मिस्त्री, प्लंबर, बांधकाम व्यावसायिक वगैरे हे लोक स्थानिक असण्याचा आग्रह समजू शकतो, पण ते ज्या गचाळ दर्जाचं काम करतात आणि दुप्पट किंवा तिप्पटही चार्जेस घेतात, त्याउप्पर बाहेरुन माणून आणू दिला जात नाही.. आणलेल्या माणसाला धमक्या / हाणामार्‍या करुन पळवून दिलं जातं.. आपल्यालाही धडाधड फोन येतात. गाडी भरुन माणसं जमाव करतात..

आणि म्हणे यांच्यासोबत शेजार जमवून आनंदाने रहायचं.. खेड्यातली जमीन कसणे, टुमदार घर वगैरे स्वप्नांचा कचरा झाला आहे....

मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली..

जाऊदे.. त्यातल्या आणखीन आठवणी काढून तपशीलवार देणं म्हणजे धुतलेले हात परत गटारात घालण्यासारखं आहे..

शहरी मित्रांना इतकंच सांगू इच्छितो की शहरातच घराची जुळणी करा.. लहानसा फ्लॅटही बरा.. किंवा मग खेड्यात जाणारच तर गाव विकत घेता येईल इतका जास्तीचा पैसा असला तरच हात घाला त्यात..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली..

वरील प्रतिसाद हा अतिशय विद्वेष पसरवणार आहे. सदर प्रतिक्रियेचा व प्रतिसादकाचा मी निषेध करतो.

सर्वच जाती धर्मांना कुठे ना कुठे चुकीची वागणूक ही मिळतच असते. काही काळापूर्वी बामणांनी इतरांना कसे वागवले होते हे प्रतिसादक महाशय विसरलेले दिसतात. ते गावाची गोष्ट करत आहेत, पण एकेकाळी कित्येक जाती-धर्मांना देवळात देखील प्रवेश मिळत नसे हे विसरून कसे चालेल ? अशाच गावांमधून दलितांचे हत्याकांड केल जाते आणि दलित स्त्रीयांना विवस्त्र फिरवले जाते. मात्र अश विषयांवरती कोणी उघडपणे निराशा, शोक व्यक्त करताना दिसत नाही.

अशा प्रकाराच्या प्रतिसादांची निदान मिसळपाव सारख्या निधर्मी संस्थळावरती दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

सही राहीली की ओ..

परादास आठवले
दुर्लक्षित पँथर
smiley

==============================

कपिलमुनी उवाच :

अपेक्षित प्रतिसाद.. आले छिद्रान्वेषी लोक लगेच..

बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला..

हल्ली साधा ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. (ब्रा म्हणता ब्रह्महत्या किंवा तत्सम अर्थाने.. )

लगेच अ‍ॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा..

गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की.

अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्‍याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

हल्ली ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. लगेच अ‍ॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा..

इथे ब्र काढण्याची सोय राहिली नाही अशी सुधारणा करायला हवी.

Have faith in God and in yourself; that will cure all. Hope for the best, expect the best, toil for the best and everything will come right for you in the end. - Sri Ramana Maharshi

काय ब्रं क्रावं.. बूच लावून केलेल्या सूचनेचं.. ?? smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला..

तो मुद्दाम दखल घेतली जावी अशा प्रकारे लिहिला गेल्याने दिसला.

गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की.

तुम्हाला माहिती नाही ? मग तुम्हाला तुमच्या जातीमुळे छळणारे तुमचे जातवालेच नसतील कशावरुन ? ज्ञानेश्वरांना देखील छळले होते म्हणे.

अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्‍याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..

अहो तशी पद्धत असते गावाकडे. बामणाचा वाडा, बामणाची विहीर, बामणाची जमिन इ.इ.

आणि काय हो महारवाडा, मांगाची वस्ती शब्द तुम्हाला खटकत नाहीत का ? नुसती 'बामणाची जमिन' शब्द वापरला तर किती लागला तुम्हाला तो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

पराषेट, मूळ विषयाला धरुन बोला.. फाटे फोडू नका..

गावकरी आणि शहरी लोकांचे त्यांच्यासोबतचे अनुभव असा विषय आहे.. त्याविषयी आपले मौलिक मत द्या.. उगाच धागा ओढत घोंगडी कशाला उसवायची म्हणतो मी... आँ ?!

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

सतत आपल्या जातीवर किती अन्याय होतो हे दाखवणार्‍यांपैकी तुम्ही एक आहात.

उलट 'वरील लेखात जाती विषयी आलेले वाक्य काढावे' अशी तुमच्यासारख्या समंजस सदस्यांनी मागणी करायला हवी होती. पण शेवटी तुम्हीपण त्यांच्यापैकीच निघालात. आम्ही लोक आता शिकतोय, तुमच्या बरोबरीला येतोय हे तुम्हाला सहन होत नाही.

मी व माझी संघटना तुम्हा लोकांचा निषेध करते. उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.

तुम्ही मला पाहिले असावेत अशी आशा करतो.. पुतळा बनविण्यास केवढे मटेरियल लागेल याचा अंदाज आहे ना? आणि जाळायलाही रॉकेलचा ट्यांकर मागवून ठेवा हो..

-(हितचिंतक) गवि

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

(हितचिंतक) गवि

आमचे हित झाल्याने ज्यांना चिंता वाटते ते हे हितचिंतक.

असो..

आम्ही ह्या विद्वेषी बामणी धाग्यावरुन रजा घेतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.
---- क्रांती चौकात सध्‍या पुतळे दहनास मनाई आहे.
तिथे मोठ्ठा फ्लायओव्हर बांधला, आणि दर सहा महिन्याला पाडला जात आहे.
तुम्ही बामणांचे नेहमी येणेजाणे असलेल्या बालगंधर्वसमोर, किंवा बामणांचा बजबजाट असलेल्या पुणे विद्यापीठासमोर उदबत्ती लाऊनच गविंचा निषेध करा! smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

तुला रे मेल्या कोणी शाप दिला.. ? यकुच बरा होतास की..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

इथे केलेली पापकर्मे भोवली हो!
भोगतोय आता किमान हजार वर्षे हा शाप.
(दग्ध आणि शापित) यक्कु.

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

दहन करायला नेलेला पुतळ्याचे भाडे थकलय. ते लवकर भरा.

ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न बाळगणार्‍याला पण जन्माने ब्राह्मण असल्यामुळे त्रास देणे हे देखिल निषेधार्थच आहे.. यात कुठेही पूर्वी ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायाला पाठिंबा नाही..

त्यांचा मुद्दा एवढाच होता.. पैसे खाणे हा एक छळ आणि वर तुमच्याप्रमाणे काही कारण नसताना जातिचा उल्लेख करायचा..

मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे गावाला.
फरक एव्हढाच आहे की, आम्ही शेती वीकली नाही .

निश

गावकरी जबरदस्तीने जमीन बळकावून त्यावर बसलेले असते आणि पूर्णतः बेकायदेशीररित्या जमिनीत घुसून बसलेले असूनही त्यांच्याकडे कोणत्याही क्षणी जमिनीवर हक्क सांगण्याची संधी कायद्याने असती तर कदाचित विकावी लागली असती..

असो.. पुन्हा जातीयवाद व्हायचा..

अधिक त्रांगडी न होता तुमचे गावतले सर्व काम पार पडो ही शुभेच्छा..

आमचीही रजा...

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत.

आपली जमीन जाण दुसर्‍या ला तेहि जबरदस्तीने ह्या सारख दु:ख नाही.

निश

विमे आणि पराची हि सौजन्यदाहक चर्चा वाचून डोळे पाणावले smiley

***************************************

- मन्या फेणे

तुमच्या डोळ्यांना पाणावाण्याखेरीज काही कामे नाही वाटते सध्या. फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे. smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे.

ते दातात सिमेंट भरायला जातात की. smiley

@ते दातात सिमेंट भरायला जातात की.>>>

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

शेवटचा हात मारुन झालाय म्हणे त्या शिमेटवर, त्यामुळे पाणावायला फक्त डोळेच उरलेत. ह्या पावसाळ्यात मिठीला पूर येऊ नये असं वाटत असेल तर आधी स्पाकाकाचे डोळे पाणावणं कसं थांबेल याचा शासनाने विचार करायला हवा.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

एकाच जात्यातले आपण दोन दाणे ....
भरडून जगणे हेच नशिबाचे देणे....

--मनोबा
"The last Christian died on the cross".

गवि!!! आवरा!!
राजीनामा मागतोय मला आमचा मॅनेजरऽऽ!
smileysmileysmileysmileysmileysmiley
smileysmileysmileysmiley
smileysmiley
smiley
कसले 'ब्रा' काढत बसलाय!

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

कसले 'ब्रा' काढत बसलाय!

हा हा हा.... भर शांततेत फिस्कन हसलो ना राव. तरी बर बॉस जवळ नव्हता.

-----------------------------------------------------------------------------------
जिंदगी से यही गिला हैं मुझे|
तु बहोत देर से मिला हैं मुझे|

तुम्ही जर कायमचं त्या घरात राहायला जाणार नसाल तर, तुमच्या मागं मा. श्री. परा, यांनी सांगितलं आहे तसंच होणार आहे तिथं, त्यापेक्षा सरळ तो बाप शोधा, पैसे टाका, काम करुन घ्या, मोकळ व्हा. अगदीच शक्य असेल तर त्यांच्या नावानं एखादं फ्लेक्स वगैरे लावायचं जमवता येईल का तुमचं नाव टाकुन ते पहा आणि मग बघा तुमची सगळी कामं कशी पटकन होतात ते पहा.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

कोणालातरी माझ्या बोलण्यातले मर्म कळाले तर.

मी तर म्हणतो हे देखील जमत नसेल तर गेला बाजार तिथल्या आमदाराला वास्तुशांतीला बोलवा आणि बघा मजा. ते ही जमत नसेल तर पैसे मागणार्‍या ४ लोकांच्यात फूट पाडा.

हाय काय आन नाय काय !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

कौंतेय,

आपला अनुभव कुणी बांधकाम व्यावसायिक आपल्या जाहिरातीत वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेटा मस्त पैकी आपला अनुभव लिहुन खाली ठळक अक्षरात जाहिरात करेल "हे सगळे त्रास सहन करण्यापेक्षा आमच्या प्रकल्पातील टुमदार घरकुल घ्या आणि घराबरोबर मनःशांतीही मिळवा"

सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात, काही ठिकाणी माघार घेणेच समंजसपणाचे असते. पण जर का हीच तुमच्या आयुष्याची महत्त्वाची लढाई असेल तर पूर्ण ताकदीने लढा आणि जिंकाच! कोण जाणे, त्या गावाबरोबर तुमचही नाव इतिहासात कोरले जाईल?

तीनही वाक्यं आशयगर्भ. आभार -

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात,
असं नव्हे तर, ज्याला आपण लढाई म्हणतो, ती लढाईच नसते, आपला ना तो गोष्टीतला ससा झाला आहे, पाठीवर पान पडलं तरी, आभाळ पडलं म्हणुन जगभर बोंबलत फिरणारा. कुठलीही छोटी गोष्ट आपण लढाई म्हणुन धरुन बसतो आणि मग ती हरली म्हणुन आपणच निराश होतो.

तुमचा पगार किती
तुम्ही बोलता किती
याच चालीवर
आपलं आयुष्य किती
आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे,

एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

सर्वप्रथम मिपाकर (आणि मायमराठीवर प्रेम करणार्‍या पाहुण्यांनाही) गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

काही गल्लत होतेय, मला जी लढाई अपेक्षित आहे ती, सदसद्विवेकबुद्धी आणि अंतर्मनाच्या कौलाने दिलेली लढाई! "ह्या लढाईसाठीच जणू आपला जन्म झालाय" असं वाटतं ती लढाई. मग ह्याचा शब्दशः अर्थ घेतला तर, तीच लढाई जी महाराज "स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असं म्हणून लढले, तीच लढाई ज्याच्यासाठी वीर बाजींनी खिंड लढवली, तीच लढाई ज्यासाठी नरवीर तानाजी "आधी लगीन कोंढाण्याचं" म्हणून रायबाचं लग्न बाजूला सारून लढले आणि शब्दशः अर्थ नाही घेतला तरी तीच लढाई ज्यासाठी लोकमान्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" असं म्हणून इंग्रज सरकार विरुद्ध दंड थोपटले, तीच लढाई ज्यासाठी आंबेडकरांनी दलितांवरील अन्याय दूर करण्याचं ठरवलं, तीच लढाई ज्याच्यासाठी कोलंबसाने अमेरिका आणि वास्को-द-गामाने भारतात जायचा मार्ग शोधला, तीच लढाई ज्यासाठी राइट बंधूंनी विमान बनवण्याचा ठरवलं आणि तीच लढाई ज्यासाठी चार्ल्स लिंडबर्गने न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवास केला! सिकंदर आणि सम्राट अशोक बर्‍याच लढाया लढाया लढले खरे पण त्या त्यांचा लढाया नव्हत्याच मुळी, कदाचित सम्राट अशोकाची खरी लढाई "बुद्धाच्या शांतीच्या संदेशाचा राज्यात आणि दूर परराज्यात प्रचार करणं" ही असावी.

मला तरी असं वाटतं की, बर्‍याचवेळा अशी लढाई लढून आपलंच नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते त्यामुळेच, ती लढावी, का लढू नये अशी द्विधा मनस्थिती होते. इथेच नेमकं, भगवद्-गीते मधलं तत्त्वज्ञान "निर्णय क्षमतेसाठी" मदत करतं पण एकदा का निर्णय झाला की, "कर्मण्ये वा..." ह्या हिंदू तत्त्वज्ञानाला मिपाकरांच्या भाषेत फाट्यावर मारून (तात्पुरता), पाश्चिमात्यांच्या "जिंकण्याची कला"(विनींग थिअरीज) वा "स्फुर्थी मिळवण्याची कला" (मोटिव्हेशनल थिअरीज) (किंवा शिव खेरांच्या "You can win" सारख्या थिअरीज) आत्मसात करून ती लढाई जिंकण्यासाठीच लढता येते.

तुम्ही म्हणता त्यात काहीसं तथ्य असावंही, कारण "युगांतर" मध्ये इरावती कर्वे असंच काहीसं म्हणतात, "माणसाचा प्रवास हा त्याच्या स्वभाव धर्म आणि आचरणाला अनुसरून एका विशिष्ट दिशेने होत असतो, महाभारताची लढाई जिंकूनपण पांडवांना राज्य उपभोगण्याच सुख काही मिळालं नाही". मग ही सगळी "झंजट" का बरं करावी? माहीत नाही. सुख म्हणजे मग नक्की काय? मग भाऊ खांडेकरांच्या सुखाच्या शोधाचं तत्त्वज्ञान मन शांत करतं. ह्या झंजटीमधूनच निरस जीवनाला अर्थ येणार असेल तर ही झंजट व्यर्थ नसावी. बघू आज असं वाटतय खरं, जग सोडायची वेळ येईल तेव्हाच कदाचित कळेल काय खरं आणि काय खोटं! smiley

दुर्दैवाने 'प्राइसलेस' म्हटल्यावर जे वजन येतं ते अनमोल म्हटल्यावर येत नाही. पण सुधीर, तुमची प्रतिक्रीया पहिल्याच वेळी मी याच व्यापक अर्थाने घेतली होती. म्हणून तर तीनही वाक्यं आशयगर्भ असं लिहून पाठवलं. पण उलगडून दाखवल्याबद्दल आभार. एका पेशल धाग्याचा विषय आहे हा -
चरैवेति.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

गवि - तुमच्या पहिल्या प्रतिसादात काय समजायचं ते समजलो.
प.रा. - तुमची फूट पाडण्याची कल्पना एकदम भारी [आता १० जनपथाचा संशय आणखी बळावतोय बरं ...]
तुम्हां दोघांचा वाद हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असला तरी संदर्भयोग्य नसल्याने नजरेआड करणे प्राप्त आहे.
५० फक्त - फ्लेक्स जबराट! खरोखर -
सर्वसाक्षी - बिल्डरच्या योजनांपैकी तयार बंगला न घेण्यामागे काही भूमिका होती. त्यातला काही भाग वर दिलाही आहे. बिल्डरांना खुषाल जाहीरात करू द्या. तसंही आजकाल जाहीरात न करताच हे बंगल्यांचे प्रकल्प हातोहात विकले जात आहेत म्हणे. माझ्याप्रमाणे स्वतः खटपटी करून बांधलेले बंगले बिल्डरच्या तयार योजनांपेक्षा दीडेक पटीने महाग पडतात हा स्वानुभव बांधकाम व्हायच्या आधीच आला आहे + डोक्याचा ताप!

अजूनही माझा निर्णय चुकला म्हणायचं नाही मला. या भ्रष्टाचार / लाचखोरीच्या सामान्यीकरणाकडे कसं बघायचं या बाबतीत तुमचं मार्गदर्शन घेतोय हे खरं.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

कौंतेय,

गेल्या ५ वर्षातला अनिष्ट प्रकार. पूर्व द्रुत महामार्गावर हल्ली संध्याकाळी ७-७.३० नंतर गोदरेज हॉस्पिटलच्या सिग्नलला लोक सर्रास फाट्यावर मारतात. मला हे आवडत नाही आणि पटतही नाही. मात्र एक गोष्ट लक्षात आली की दिवा लाल असूनही सगळी वाहने भरधाव जात असताना जर मी तत्वाखातर तिथेच उभा राहीलो तर मागुन येणारे वाहन मला धडक देईल. जगलो वाचलो तर पोलिस उपदेश करतील "काय राव तुम्ही? जीव मोठा की सिग्नल? असे कसे उभे राहता? जायचे होते सिगनल तोडुन तुम्हीही, जर पकडलच असत समजा तरी ५०-१०० रुपयांचा प्रश्न!"

हल्ली मीही सगळ्या वाहनांबरोबर नाईलाजाने का होईना पण जातो. दिवा लाल असो की हिरवा.

लाच न दिल्याने येणारं टेन्शन, वेळ देणं परवडणारं असेल तर ठीक. पण आधीच तुम्हाला पुरेसा त्रास झालेला दिसतो आहे. तो वाढवाल तर घरावर त्या सगळ्याचा किती परिणाम होईल, सगळे प्लस मायनस समोरासमोर ठेवून बघा आणि निर्णय घ्या. एक पक्कं लक्षात ठेवायचं. लढा बिढा ठीक आहे पण आपल्याला हुतात्मा नक्कीच व्हायचं नाही!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

तणाव नि वेळ दोन्ही खरेतर परवडण्यासारखे नाहीतच.
जटायूची क्षमा मागतो पण "अडविता खलासी पडलो" तरीही "पळविली रावणे सीता" हेही नकोय.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

म्हणून वर्षातून किमान एकदातरी गावाला जाऊन मी तुमचा, तुम्ही माझे असे एकत्र राहावे/वागावे. पैसा, नोकरी, शहरी राहणीमान या गोष्टी तर आपल्याजवळ आहेतच, पण थोडे आम्ही रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. अभिमानाने म्हणवून घ्यावे. smiley

मग अशा जमिनजुमला/वाडवडिलांकडून आलेली मिळकत किंवा नविन जागा खरेदी/बांधकाम अश्या प्रकरणात तुमच्या बाजूने नक्कीच कोणीतरी मदतीला धावून येतील. गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल. smiley

(गावी नेहमी आवडीने जाणारी)
स्वाती

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर /

धाग्यावर प्रतिक्रिया थांबवूनही हे वाचल्यावर राहावलं नाही..

"गाव" म्हणजे वरील उल्लेख केलेल्यांपैकी किंवा तत्सम मुळीच नव्हे.. तालुक्याच्या ठिकाणालाही मी शहरच म्हणेन..

गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ..

गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

आणि प्रेमाने जिंकणे वगैरे काही तिथे चालत नाही हे मी गेल्या २ वर्षातल्या विकतच्या मनस्तापावरून सांगू शकते.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ गाव आहे..

बाकी कोंकण ही माझं आणखी आवडीचं असण्यामागे कारण असं की तुलनेत (तुलनेतच) कोंकणातल्या गावगाड्याच्या पीडा खूपच कमी असतात.. त्यामानाने देशावर विचारु नका.. हातीपायी धड राहिलो तरी बरं म्हणायचं..

कोकणात नुसते उच्चारवात वाद चालतात पण अन्यत्र प्रत्यक्ष हातघाईवर प्रकरणं येतात..

उदा. कोंकणातल्या गावी मी तीनचार वर्षांत एकदा जातो तेव्हा आजुबाजूचे लोक घरी चहाला बोलावतात. तुम्ही आता इकडेच राहायला या वगैरे म्हणतात ... मग हळूच तुमच्या आंबीची खांदी आमच्या हद्दीत येऊन कौलावर आंबे कसे पडताहेत अशा स्वरुपाची कुरकुर करतात..

पण

खानदेशातल्या गावी गेल्यावर लांबूनच शिवीगाळ, जमिनीच्या मोजणीच्या वेळी मोजणीच्या खुणा बुजवणे, जमीनीवर हातभट्ट्या लावलेल्या दिसणे, येताजाता धमक्या देणे, आपण तिथे असेपर्यंत पाळत असे प्रकार होतात. हे आजचे नाही, माझे आजोबा आणि बाबा प्रत्यक्ष शेती करत होते तेव्हाही औतास आडवे येणे, बांध तोडणे, हद्दी हलवणे, मारामार्‍या करणे हे चालायचं.. दरवर्षी जाण्याने त्यात काडीचा फरक पडणार नाही याची खात्री आहे.. सुट्टीत चार दिवस मजा म्हणून पाहुणा म्हणून गावाकडे जाणं आणि तिथल्या समस्यांशी थेट सामना होणं यात खूप फरक आहे हे नम्रपणे सांगावंसं वाटतं.

अन्य एका गावात मी पूर्वी एक लहान घर घेतलं, तिथे घराची ग्रिल बसवण्यासाठी मी जवळच्या गावातूनच (ही दोन गावे वेगळी होती हेही मला माहीत नव्हतं त्यावेळी) एका माणसाला घेऊन गेलो.. स्थानिक लोक हेरगिरी करत पाळतीवर असतात याची पहिली प्रचिती आली.. आणलेला मनुष्य मापे घेत असतानाच गावच्या सरपंचाचा फोन माझ्या मोबाईलवर वाजला.. (मी त्याला ओळखतही नव्हतो.. राखणदाराकडून नंबर घेऊन वगैरे तो गावभर गेला होता).. आमच्या गावात येऊन बाहेरच्याला आणता, आमची शेजारच्या गावांशी भांडणं लावता.. नंतर काही भानगड झाली, इजा झाली तर मग तक्रार करु नका.. इथे तुम्ही नसता, घराची सेफ्टी आमचेच लोक बघतात.... वगैरे सुरु झालं. मग भानगड नको म्हणून तो आलेला मनुष्य एस्टिमेट बनवलेलं असूनही घाबरुन निघून गेला..

त्यानंतर त्याच कामाच्या तिप्पट एस्टिमेट करुन लोकल माणसाने दिलं.. घरासमोर गाडी भरुन गुंड आले.. नाइलाजाने काम पुढे ढकललं..

बरेच दिवस मनस्ताप झाल्यावर काम तर केलंच पाहिजे म्हणून ते त्याच माणसाला द्यावं लागलं.. त्याने कितीही सांगूनसुद्धा अतिशय ढोबळ आणि वाईट दर्जाचं काम केलं.. पण ऑप्शन नव्हता..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

पूर्वी कधीतरी आमच्या लांज्याजवळच्या देवधे गावातल्या जमिनीवर एक गावगुंड कूळ लावून घ्यायचा प्रयत्न करतोय हे सांगितलं होतं. ती केस तारखा पडत चालूच होती. त्या गुंडाने पोलीसपाटला कडून खोटंच पत्र मिळवलं आपण जमीन कसतो आहे म्हणून. वकिलाने सांगितलं तुम्ही आतापर्यंत तिथे गवत काढत होता, तर या वर्षी भात घाला. माझे सासरे एका गड्याला घेऊन गेले तर हा राक्षस माझ्या ८८ वर्षाच्या सासर्‍यांच्या अंगावर काठी घेऊन धावून आला. "म्हातार्‍या, आताच तुला संपवतो" म्हणत. त्या गड्याने सासर्‍याना कसं तरी तिथून वाचवून पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली, पोलिसांनी लगेच त्या गुंडाला लॉक अपमधे घातला. पण सुटून आल्यावर त्याला काही पश्चात्तप वगैरे नाहीच. आता कूळाच्या केसबरोबर ही पोलीस केसही सुरू आहे. माझ्या नवर्‍याला महिन्यातून निदान ४ फेर्‍या एकूण ३ केसेससाठी माराव्या लागतात. कारण महिन्यातून ६ ते ८ दिवस तारखाना हजर रहावं लागतं. घरातलं मांजर आपल्या घरात आलं म्हणून एका शेजार्‍याने मारून टाकल. दुसर्‍याने कुत्रा मारला. इथे प्रेमाने जिंकणे वगैरेला कुठे स्कोप आहे?

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

नेमका हाच विचार करून श्रम+सामग्री असंच एकरकमी कंत्राट त्या गावाच्या उपसरपंचपतीला दिलं. मालक म्हणून आमची भूमिका केवळ फ़रशा, नळ, विविध डिझाइन्स नि रंगछटा निवडण्याची राहील; बाकी पूर्ण प्रकल्प फ़क्त चावी-फ़िरवा करारावर पूर्ण करायचा ठरले. त्याने जवळच्याच एका घरातून वीज घेतली. त्याच्या नेहमीच्या पुरवठा करणाऱ्यापेक्षा दुसऱ्या एका रेती / सीमेंट सप्लायरसोबत त्यांचा काही अंतर्गत बेबनाव झाला. कदाचित त्याला पुरवठा करू द्यावा असं त्याचं म्हणणं असावं. तेवढा डूख धरून त्याने एम.एस.इ.बी.ला तक्रार केली की वीज बेकायदा घेतलीए. एमेसीबीने २०हजार रु. दंड ठोकला तो शांतपणे या कंत्राटदाराने माझ्या डोक्यावर टाकला. "ओ साहेब, आमच्या खिशातून जाणार आता हे पैशे" म्हटल्यावर मी फ़ार ताणलं नाही. पण शेवटच्या हिशेबात हा मुद्दा लावून धरू या समजुतीत मी सध्या आहे ... !

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

माताय तुमच्या गाववाल्यांत बरीच एकी दिसते.
मध्यंतरी आमच्या गावाचा युपी, बिहार होऊ घातला होता. सगळे कंत्राटदार एकजात भय्ये. (गाववाल्यांचा आळशीपणा कारणिभुत होता म्हणा.) पण सध्या भय्या हटाव आंदोलन चालु आहे.
पण गवि पैसाताय म्हणतात तसे लोकांना नाडण्याचे प्रकार ऐकिवात नाहीत बॉ.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

गवि भाऊ, गोळाबेरीज बघावी या मताचा मी आहे. स्वातीताईंच्या कथनातला "गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल." हा कळीचा मुद्दा आहे, जो मौल्यवान आहे.
पण ते प्रत्यक्षात यायला घरपट्टी तर भेटली पायजेल! हां का नाय?
बाकी गाव - तालुका - शहर संकल्पना हे मुद्दे आत्ता लावून धरले तर आणखी एक उपचर्चा फाटेचर्चा इथे सुरू होईल ...

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ..

गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..

मी तर फक्त एक उदाहरणादाखल मिपाकरांसाठी रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. असे लिहिले आहे. smiley

गावगाडा किंवा ग्रामपंचायत हा प्रकार थोडा कमी माहीत असला तरी निदान माझ्या गावच्या छोट्या खेड्यापाड्यात ("___वाडी" म्हणजे कमी लोकसंख्या असलेल्या गावात) बरेचदा जाऊन राहीले आहे /राहते. smiley

"गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल" हे माझे अनुभवाचे बोल मी व्यक्त केले आहे, हे महत्वाचे. smiley

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

तुमचा मुद्दा ढोबळमानाने मान्यच आहे..

मलाही सरसकट मत बनवणं आवडत नाही, पण तसं झालंय खरं.. smiley

अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात. सुटीत नऊ दिवस नवलाई टिकणारा "पाहुणा" म्हणून जायला मात्र गावासारखं ठिकाण नाही... smiley

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

म्हणता ते बरोबरच. आमच्या आजच्या योजनेनुसार हे घर आत्ता थोडी आवाक्याबाहेरची उडी मारून बांधावं; मुलं मोठी होईस्तोवर बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे. यामधे तुम्ही म्हणता तसे गावात अधून मधून जात राहिल्याने परिचय, संपर्क, संबंध वाढत राहतील नि स्थायिक व्हायला अडचण येणार नाही असं वाटतं. आपण योजत जावं ... बाकी त्याची इच्छा!

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे.

मी उपरोधाने किंवा छद्मीपणाने म्हणत नाही याची खात्री आधीच देऊन म्हणतो :

वर उल्लेखलेल्या प्रत्येक इच्छेमधली / प्लॅनमधली कोणती गोष्ट किती जमली हे अजून कितीही वर्षांनी सांगा, पण जरुर सांगा. सिरियसली इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात..

१. वीकेंडसना जाणं जमलं का? जमल्यास महिन्यातून / वर्षातून किती वेळा.
२. राहणे कमी अन मेंटेनन्स-सफाई आदि कामातच जास्त वेळ या कारणाने जाणं कमीकमी होत गेलं नाही ना?
३. पूर्णवेळ वास्तव्याला शहर सोडून गावात जाणं खरंच घडलं का?

या तिन्हीची उत्तरं कितीही वर्षांनी दिलीत तरी वाट पाहीन.

असंख्य (जवळजवळ सर्व) वीकेंड होम्स भग्नावस्थेत मालकांची वाट पाहात पडलेली राहतात किंवा मग सधन मालक माळी, वॉचमन ठेवून ती धूळ झटकती ठेवतात असा अनुभव आहे.. ऐकण्यातले तीनचार अपवाद (प्रत्यक्ष पाहण्यात एकही नाही) वगळता शहरी लाईफमधला मनुष्य गावात कधीही दीर्घकाळ (आठवड्याच्या वर) रहायला किंवा वीकेंड वगैरेला त्याच गावी त्याच घरात पुन्हापुन्हा जायला प्लेन कंटाळतो असा अनुभव आहे. तुमचा वेगळा निघो अशी सदिच्छा..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

पूर्ण आयुष्‍य शहरात गेलेल्या 'मूळच्या' गावातील लोकांना निवृत्तीच्या काळात गावाकडे परतण्याची ओढ निर्माण होणे समजू शकते, पण बर्‍याचवेळा त्यात ताप होतो.. मी तरी माझ्या घरातच एक फार वाईट अनुभव घेतलाय..
माझे आजोबा आयुष्‍यभर नोकरीच्या निमित्तानं या शहरात, त्या शहरात रहात आले. निवृत्त झाल्यावर 'आता गावचे निवांत आयुष्‍य जगू' म्हणून गावात गेले. पण कसचे काय! आजारपणं, थोडंसं काही झालं की डॉक्टरकडे पळण्याची शहरातली सवय.. 'चांगल्या' दवाखान्यात दाखवण्‍यासाठी नेहमी शहराकडे चकरा माराव्या लागणं.. गावातल्या खमक्या लोकांशी खेटण्याची तयारी नसणं, मग मनस्ताप, गावातले असले तरी त्या लोकांशी जुळवून घेता न येणे.. अहो, आजोबांनी काम करायला येणार्‍या मजूरांना नुसते पाच रुपये वाढवून दिले तर लोक च्यावच्याव करायला लागले घरी येऊन रात्री.. कशाला मजूरांचे नखरे करताय म्हणून..
अशाच मनस्तापात ते आठ दहा वर्षे गावात राहिले आणि जायचं वय नसतानाही एक दिवस फटकन गेले.. काही आजार न होता. हे खेड्यातले रोजचे मनस्ताप पुरेसे ठरले. ! smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात.

मान्य आहे. स्वार्थ कुठे नसतो.... तरीही आपण मार्ग काढतोच ना. काही वाईट अनुभव आले असले तरी थोडेतरी चांगले अनुभव येतीलच ना? शेवटी गाव सुद्धा नव्याच्या नऊ दिवसांत वसत नसते ना..त्यासाठी तुम्हाला किती वेळ, महिने, वर्षे द्यावी लागतील ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

थोडा वेगळा विचार करून पाहायला तर हरकत नाही. "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" असे म्हटलेलेच आहे. (बहुतेक तुकारामांनी?)

कित्येक लोक आम्हाला गावच नाही असे म्हणतात, तेव्हा वाईट वाटते, म्हणून हा लेखनप्रपंच. smiley

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

अहो म्याडम, कोकणातलं माहीत नाही पण देशावर शेतावरुन मारामार्‍या होतात...माझ्या काका अन काकुवर सुद्धा शेतावर असताना हल्ला झाला होता. हास्पिटलात होते दोघेही. आम्ही तिन पिढ्या गावातच आहोत तरी असं. आता तो काका अन त्याचं कुटुंब सोडलं तर बाकी सगळे शहरात विखुरलेत त्यामुळे समजा आम्ही कोणी मुलं तिथे गेलो तरी वाडवडलांच्या पुण्याईने त्रास कमी झाला तर होईल तेवढंच.

दोन दिवस भेट देणं अन कायमचं राहणं वेगळं. गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात.

असो, लेखकाला शुभेच्छा. गावातला कोणीतरी पावरबाज माणुस बघुन त्याच्याशी "मैत्री" चं धोरण ठेवलतं तर उपयोगी पडेल.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

>>>गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात

एका अत्यंत छोट्या खेड्यात अलिकडेच आलेला अनुभव...

कळसूबाई ट्रेक ला ९ मित्र २ गाड्या घेवून गेलो होतो.. शाळेच्या आवारात (१५ X ३०... यावरून गावाचे आकारमान कळेलच smiley गाड्या लावल्या तर एक बाई लगेच आली पार्कींग चे पैसे मागयला, किती मागावेत..? ५० रू.

आम्ही चालू केले, शाळेची जागा आहे.. सार्वजनीक आहे... असले काही पैसे तुम्ही घेवू शकत नाही.. वगैरे वगैरे..

आम्ही सगळेच जण जास्त हुज्जत घालू लागलो तर म्हणाली, "इथे आमची मुले खेळतात.. आरसे / काचा फोडतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते."

आम्ही सगळे दोन मिनिटे सुन्न.. असले कांही अपेक्षीतच नव्हते. smiley

प्रत्येकाच्या इथल्या लिखाणाचा फ़ायदाच होणार आहे.
गवि, तुमच्या ३ प्रश्नांना मोल आहे. आभार. तुमचा विपत्ता कळवा. अजून पाच वर्षांनी कळवतो ...

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन नाही. पण जमिनीच्या प्रश्नावरुन गेली १५ वर्षे भांडतोय. पण अजून तरी हाती काही लागलेलं नाही आणि म्हणाल तर प्रेमाची भाषा वापरुन काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आडमुठेपणा आणि खमकेपणा हीच शस्त्रे इथे उपयोगात येतात. त्यांचाच वापर केला तर योग्य..

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

आडमुठेपणा आणि खमकेपणा हि शस्त्रे चुकुनहि वापरलि गेलि कि जगण मुश्किल करतात लोक.

कारण पावर त्यान्चा हातात आहे.

आपल गप गुमान सेफ साईड पकडा. smiley

सध्या तरी मी हेच शस्त्र वापरतोय. पण नुसत्या आडमुठेपणाने काही होत नाही हो. थोड्याफार गुंडपुंड आणि पुढार्‍यांच्या ओळखीपण लागतात.

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

ओळखीपायि त्यान्च्या गरजा पुरवायला आपले रुपये जातात त्याच काय?

लेखकाचा तसेच काही प्रतिसादकर्त्यांचा अनुभव आजकालच्या काळातला आहे (गेल्या काही वर्षांतला).
माझ्या आजोबांनी चाळीस खोल्यांचा वाडा (कुठे ते विचारू नका) केवळ ब्राह्मण्/अब्राह्मण या वादामुळे जिवाला वाचवण्यासाठी (अंदाजे ६० - ६५ वर्षांपूर्वी किंवा जास्तही) सोडून दिला तोही सगळ्या वस्तू, सोन्यानाण्यासकट, गाईगुरांसकट. शेती गेली. रात्रीत रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला वर यायला अनेक वर्षं लागली पण अपार कष्टामुळे ते झालं. आपापली घरं बांधताना पैशापेक्षा जुन्या जखमांच्या आठवणींनी बाबा काकांनाच नाही तर आमच्या पिढीलाही जाळून काढलं. सगळ्यांची दोन चार घरं झालीत. रहायला तिथे कोणीच जात नाही. वास्तूशांतीही एकाच दिवशी केल्या सगळ्यांनी. रात्री सगळी भावंडं एकत्र येऊन रडली. मी तिथे नंतर कधीही गेले नाही.
भ्रष्टाचाराचा भाग आपण बनू नये म्हणून बाबा, काकांनी सरळमार्गाने काम करून घेण्यासाठी जीव झिजवला आणि मला त्याची तिडीक बसली. आपल्या मन:शांतीसाठी जिथे कुठे द्यावे लागतील ते द्या आणि चार दिवस सुखाने घरात रहायची सोय करून घ्या.
तीन महिन्यांपूर्वी माझ्या सासासूसासर्‍यांनी नातवाला (माझ्या मुलाला) कोकणात असलेलं जुनं घर दाखवायला नेलं. आता पडलय. आत जाण्याचीही इच्छा झाली नाही. फोटो काढला फक्त.

रेवतीआजै मी वर हेच लिहिलं आहे,

तुमचा पगार किती
तुम्ही बोलता किती
याच चालीवर
आपलं आयुष्य किती
आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे,

एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

भ्रष्टाचाराला थारा न देणारे असेच कष्ट उपसतात.

आनि भ्रष्टाचार करनारे मजेत राहतात ..

काहीसं अवांतर, जग किती विचित्र आहे, एकीकडे काही माणसांना गावं नाही, म्हणून कुठल्याशा एका खेड्यात एक कोपरा जमीन घेऊन त्यावर हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करताना इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर काहींना हक्काच्या जमिनीवर नाईलाजास्तव पाणी सोडावं लागतं आणि काही जण तर अशीही असतात की, जी वडिलोपार्जित जमीन-घरदार-परंपरा-भाषा-संस्कृती वार्‍यावर सोडून, परदेशात वा इतरत्र स्थायिक झालेली असतात. काही वर्षांपूर्वी मी पण त्यातलाच होतो, गावं आवडत नव्हतं अशातला भाग नाही, पण सगळं आयतं मिळालं की जी बेफिकिरी वाढते ना त्यातलीच गत होती! अशा गोष्टींमधली अमूर्त (इंन्टँजिबल) किंमत जाणवली ती पणजोबांनी स्वमेहनतीने घातलेला गडगा (कुंपण), लावलेली झाडं पाहिल्यावर!

आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तुमचा हा सगळा तिढा, "लाच देऊन काम करवून न घेणे" ह्या तत्त्वामुळे निर्माण झाला आहे. माणसाने नेहमी तत्त्वनिष्ठच असलं पाहिजे. पण ही तत्त्वं आपलीच परीक्षा घेतात.
१. जर तुम्ही (वा तुमच्या वतीने तुमची बाजू मांडेल असा) वाक्-चातुर्याने गावातल्या संबंधित मंडळींना लाच न देता, काम करवून घेतलंत तर फारच उत्तम! माणसं चांगलीच असतात, पण त्यांचे विचार चुकीचे असतात आणि ते बदलता येतात. हे सत्य आहे, असं मानून.
२. पण जर का त्या माणसांचं मतपरिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नसेल, तर असा मार्ग ज्यात तत्त्वही मोडणार नाहीत आणि कामही होईल. जसं परा ने सांगितल्याप्रमाणे (वा त्यात काहिसा बदल करून) कुठलेही तत्त्व न मोडता आणि प्रकरणही अंगलट न येता, "काट्याने काटा काढता येतो का ते बघा". जर कुठलीही तत्त्वे मोडणार नसतील, तर काय हरकत आहे? पण काम झाल्यावर "गरज सरो वैद्द मरो" अमलात आणावे लागेल पण त्याला इलाज नाही आणि त्यात चूकही नाही. तो एक रणनितीचा भाग आहे.
३. चौकटीच्या बाहेरचा मार्ग (लाच मागताना छुपं छायाचित्रण करून मग मिडिया पुढे भिंग फोडण्याची धमकी देणं इ.... मला आपलं बोलायला काय जातंय, तुमच्यावर गुजरलय, पण असाच काहीसा मार्ग...)
४. अगदीच नाईलाज होत असेल तर, तुमचा तत्त्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जसं "कुठलंही काम होण्याच्या आधी अधिकार्‍याला जर का तुम्ही पैसे दिलेत तर ती होते "लाच", पण तेच पैसे तुम्ही काम झाल्यावर दिलेत तर ते होते "बक्षीस"!" अगदी तशीच वेळ आली तर काम झाल्यावर द्या.

सगळ्यांचे प्रतिसाद पाहिले..मस्त चर्चा..
मी प्रत्येकी वीस वर्षे खेड्यात आणि शहरात काढलीयत. आजही तिथे घर आणि शेत आहे. पण आईवडील तिथेच रहातात. त्यामुळे लोकांना आपलेपणा राहतो.
खेड्यात (मंजे तालुका पण खेडेच) सुखाने राहायचे असेल तर:
तुमचे वर्गमित्र किंवा स्नेही, नातलग तिथे रहात असले पाहिजेत.
तुमच्या कुटुंबाचे गावात काही योगदान असेल.. शिक्षक, सरकारी नोकर, डॉक्टर वगैरे..
स्थानिक पुढार्याच्या तुम्ही जवळचे असाल.
अनेक वर्षे तिथेच नोकरी केली असेल वगैरे..तर त्रास होत नाही.

मुळात वाकडे पणा हा स्थायी भाव असतो. वेळ तर मोप असतो. माणसातला तिरकस पणा कळावा लागतो
आणि काही चांगले लोक पण असतात बरं का!..

याशिवाय रात्री वीज बहुधा नसतेच, टी व्ही, फ्रीज वगैरे वापरता येत नाही. अन्न उरले तर मुंग्या/ झुरळे, कुत्री, मांजर, माकडे शेअर करायला येतात. फोन कधीही बंद पडू शकतो. वैद्यकीय सेवा मिळेलच असे नाही. पाणी नळाला येत नाही, मग विहीर शोधत फिरायचे. ( पण रहाट वापरता येतो का?)
कामाला कोणी मिळत नाही त्यामुळे गावात साठी नंतर वगैरे राहणे अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यामुळे मी तर माझ्याच गावी एक दिवसाच्या वर नाही राहू शकत.

बाकी आपलेपणा असल्याने जात थोडी दुय्यम होते असा अनुभव आहे. भ्रष्टाचार मात्र फारच आहे. तो शहरापेक्षा कमी किंवा जास्त नाही.
एक चांगला उपाय म्हणजे लागतील ते पैसे टाकून सुट्टीत कोकणात किंवा इतरत्र मजेत जाऊन राहावे.
किंवा ज्यांचे खेड्यात घर आहे असे (माझ्यासारखे) खेडूत मित्र वाढवावेत..!

जर आपलेच गाव असेल किंवा गावातला तालेवार / पावरफुल माणुस आपल्याबरोबर असेल तर काहीच प्रश्ण येत नाही.

अन्यथा सुद्धा गावी घर बांधताना शक्यतो परवानग्या वगैरे घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही.

सगळी कामे माहीतीतल्या चांगल्या माणसांकडुन (किंवा काँट्रॅक्टर कडुन) झटपट करुन घ्यायची.

सर्व काम पुर्ण झाले की बांधकामाला दंड भरुन मान्यता मीळवण्यासाठी अर्ज करायचा. आपण लाच अम्हणुन दिलेल्या रक्कमेच्या तुलनेत सरकारी दंड नगण्य असतो. तुमचे अनधीकृत बांधकाम कोणतीही ग्रामपंचायत पाडणार नाही याची खात्री बाळगा. येवढे होई पर्यंत वीज आणी पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याचे कसब आपोआप अंगी येते.

या फॉर्म्युल्याचे जनक कोकणातलाच एक अत्यंत यशस्वी कंत्राटदार आहे. तसेच हा फॉर्म्युला आम्ही व आमच्या अनेक आप्तेष्टांनी अनेकदा व अनेक ठीकाणी यशस्वीपणे वापरुन सिद्ध केलेला आहे.

अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही दणकुन घर बांधयचं.. नंतर वर्षाला ५००-७०० रुपये दंड होतो.. तो भरायचा..

___________________________________________________

|| भारतीय नववर्ष ५११४ सर्वांना सुखा समाधानाचे नि आनंदाचे जावो ||

आभार. शिल्पा, पिंगू, शापित, स्वच्छंदी, रेवती, सुधीर, खेडूत, नेत्रेश आदींच्या म्हणण्यातूनही भरपूर तथ्यांश सापडत आहे. सगळे प्रतिसाद पाहता प्रथमदर्शनी वाटत आहे की गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नव्यानेच प्लॉट खरेदी केलेला माणूस - स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. कदाचित ब्राह्मण हाही पैलू माझ्या इच्छेविरुद्ध तिथे जोडला जाऊ शकतो. गावातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गावकऱ्यांपैकीच जर कुणी निशाण घेऊन बाहेर आला तर त्याला कुमक पुरवण्याचं काम आपण करू शकतो, पण लढा सुरू करण्याचं नाही हे सत्य कटू आहे.
मला आता असं विचारवंसं वाटेल की शहरी वा ग्रामीण कुठल्याही प्रकारच्या घट्टपणे रुळलेल्या लाचखोरीला व्यक्तीगत विरोध केल्याचं कुणाचं स्वतःचं, बघण्यातलं उदाहरण कुणी देऊ शकेल का? मध्यंतरीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे लाच देणारे व घेणारे यां दोघांतही काही सकारात्मक बदल झालेले दिसतात का? मी सन २००१पासून भारताच्या नि पर्यायाने राजकीय / सामाजिक चळवळींच्या बाहेरच आहे. त्यामुळे तळाच्या वास्तविकतांचा फ़ार अंदाज नाही.
येऊ देन्याची कृपाया ...

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

शहरातले लोक तरी खेड्यातून नव्याने येणार्‍या लोकाना आजकाल शहरात कुठे सुखाने जगू देतात? .. मग खेड्यातल्या लोकानी तुम्हाला तुमचे नबाबी शौक पुरे करायला कशाला मदत करायची? जिथे आहात तिथेच सुखाने रहा....

परदेशात होता म्हणताय, मग पास्पोर्ट कुठून काढलात? पार्ल्यातूनच ना? तेंव्हा पार्ल्याच्या पोलिसानी, पास पोर्ट ऑफिसने फुकट कामे करुन दिली होती का? ( माझाही पास्पोर्ट ठाण्याचाच होता, तो तरी फुकट झाला नव्हता.) आता खेड्यातही तोच अनुभव येतोय तर खेड्यातले लोक बघा कसे माजलेत म्हणून मात्र लगेच धागा उघडलात !

आजकाल खेड्यातही भाड्याने जागा मिळणं मुश्किल होत चाललय.. तिथं खेड्यातले घर म्हणजे नबाबी शौक पुरे करण्याची सोय , अशी मेंटॅलिटी असलेल्या लोकाना असे अनुभव येणं यात अगदी काही अनपेक्षित नाही.

आणि पैसा खेड्यातल्या सरपंचानं खाल्ला काय आणि मुंबईच्या पोलिसानं खाल्ला काय शेवटी तो मुंबई बसलेला एखादा मंत्री, पक्ष श्रेष्ठी यांच्याच डोंबलावर जाऊन पडणार असतो... तुमच्या पार्ला शिवाजी पार्कातच हे बसलेले असतात.. तुमचेच गाववाले हो! कशाला उगाच त्या खेड्यातल्या लोकांच्या नावानं बोंब मारायची?

********************

फर्मासऽ!
ही पण बाजू खरी आहे.

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

ओ येस. शापित, अशा बऱ्याच फ़र्मास, खऱ्या बाजूंच्या नव्या वास्तवांशी जुळवून घेतानाचं चाचपडणं सुकर व्हावं म्हणून तर हा धागा काढला.
जगमोहनप्यारे, 'जास्तीचे पैसे लाचस्वरूपात भरावे लागले तर कांगावा करू नये; कारण कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी ते भरलेलेच आहेत' हा तुमचा मुद्दा समजला. बाकीच्या बहुमूल्य निंदेसाठीही आभार. तुमच्या डोक्यात फ़ुटलेले बार संभवतः त्या पैसे मागणार्‍यांच्याही डोक्यात असू शकतील इतका अर्थबोध तीमुळे झाला.
धागा काढला तो कुणी माजलंय बिजलंय अशी रडारड करण्यासाठी नाही. तसा माझा हेतू वा मजकूराचा अर्थ नव्हता, नाही नि नसेल. तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.

बाबौ शॉल्लीड फुटलो या वाक्यावर. smiley

मनीच्या बाता: गण्या लेका ही नव वर्षाच्या स्वागताच्या आतषबाजीची सुरवात तर नव्हे ना?

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

खर्रंच मा. गणपाभौ,

मी तर पडलो खुर्चीतुन खाली, खरोखर एक नविन युगारंभ करणारं वाक्य आहे हे.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

भ्रष्टाचाराचे समर्थन नाही परंतु, यंत्रातील मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावेच लागते अन्यथा मोडून, तुटून पडावे लागते.

तेच तर मी लिहिले आहे... मोठी चाकं पार्ला आणि शिवाजी पार्कातच यांच्याच अंगावरनं फिरतात, तेंव्हा हे काही बोलत नाहीत आणि आता खेड्यातली दोन चार चाकं फिरली तर याना लगेच सच्चाई, देशप्रेम्,समाज शुद्धीकरण, भगवद्गीता ... काय काय 'मोहन भार्गवी ' काव्यमय सुचायला लागलंय! पार्ल्यातला फ्लॅट कुणाला पैसे न देताच यांच्या नावावर झाला की काय!! smiley

********************

धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे मी साध्या सभ्य शब्दांत लिहिलं होतं तेच तुम्ही उघड उघड लिहिलं,

जेंव्हा आपलं जळतं तेंव्हा ती आग आणि उब मिळते तेंव्हा शेकोटी असा उद्योग करणारे लोक ना कायद्याचं राज्य येउ देतात ना दोन नंबरचं, आणि जेंव्हा जशी वेळ येईल तेंव्हा त्या त्या राज्याच्या नावानं किंवा विरोधात मेणबत्या लावत फिरतात,

मला तर या बाबतच्या एका धागाकर्त्याने बरेच वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न विचारले, त्याबद्दल खरड केली, पण मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देउन एक प्रतिप्रश्न केला की मग त्याला उत्तर अपरिहार्य कारणानं मिळालं नाही.
(संदर्भ -http://misalpav.com/node/20887#comment-378272)

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

तो धागा बघितला.. शहरातल्या भ्रष्टाचाराच्या मानाने हा खेड्यातला भ्रष्टाचार नगण्यच आहे.
http://misalpav.com/node/20887

-----------------------------------------------------
शहरास्ते पंथान:

( एकदा शहराचा रस्ता धरला की षौक फर्मावायला परत खेड्यात येऊ नये.. smiley आलच, तर त्याची किंमत मोजावी.) )
---------------------------------------------------------

********************

मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.

आमच्या गावात एक जोशी नावाचे कुटूंब टिकून होते. मुलगा टेल्कोत कामाला. बाकी सर्व गावी शेती. बागायती ५ एकर आणि जिरायत २० एक असेल. गावात त्रास सुरू झाला. पण शेवती हद्दच बदलायला लागली तेव्हा जोशी आजोबांनी नातवाला साद घातली. ही जमीन वाचावायची असेल तर नोकरी सोड गावाकडे ये. नातवाने नोकरी सोडली आणि गावी गेला. गेल्या गेल्या धक्काबुक्की होऊन खाली पडला. मग बरेच छळ झाले.... नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला. दुसर्‍या दिवशी दारू पिऊन शेजार्‍याच्या छाताडावर रोखला आणि.... सगळं सुरळीत झाले... आज ५ एकरावर उस आणि २० एकरला पाणी यायची शक्यता आहे....

गावाकडे असेच रहावे लागते. ब्राह्मणांनाच नाही तर सगळ्यांनाच....

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.

प्रयत्न केला पण

नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला.

हे वाचुन रहावलं नाही. एक बाळ बोध प्रश्न आलाच मनी.
कट्टा/कुकरी कितीला पडला/पडली?
येण्याजाण्याचा खर्च पहाता तेवढ्याच किमतीला पुण्या/मुंबईतुन एखादी तलवार नक्कीच आली असती. नाही का? smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल ना ? रोखायला ते बरे कि लांब लचक तलवार ?

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

हा हा हा
कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा माझा. आमच्या त्येला भाषेत 'घोडा' म्हंत्यात नव्हं. smiley
तरीबी मुंबई/पुण्यात ते स्वस्त नसतं का मिळाल? smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

जयंतराव,
रक्तविहीन क्रांती हे दिवास्वप्नच म्हणायचं तर ...
आभार.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर वेधक चर्चा चालू आहे.
सगळं कसं पैशापाशी सुरु होऊन पैशापाशी येऊन थांबतं, नाही? एक गाव असतं, एक अंगणही असतं पण पैशाची (शब्द पिशाच्चाशी संबंधित वाटतो ना?) भूक ते सगळं सोडायला लावते. जेव्हा पैसा येतो आणि जे सोडलं ते पुन्हा मिळवावं वाटतं तेव्हा ते सगळं नासलेलं असतं.
स्वतःची किंवा दुसर्‍याची पैशाची भूक त्यानंतर कधीच शांत बसू देत नाही.

ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

नगरीनिरंजन गुरूजी,
साधारणत: धागाबाह्य प्रतिसाद, बादरायणसंबंधयोजित खिजवाखिजवी वा इतर जावईशोध इ.कडे दुर्लक्ष करण्याचा माझा नेम आहे. पण तुमच्या या टिप्पणीची नजाकत अलग आहे. सुंदर आहे आणि ती १००% ससंदर्भ नसली तरी चर्चाविघटकही नाही म्हणून सहर्ष स्वागत.

----------------------------------------------------
शुभास्ते पंथानः (शुभ पंथावर आस्ते जावा)
----------------------------------------------------

टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद आणि ती कोणा एकावर रोखून केलेली नाही हे ही तुमच्या लक्षात आले असेल अशी आशा करतो. स्वतः पैसे कमावण्याच्या चक्रात अडकल्याने स्वत:ला पडलेले हे प्रश्न आहेत बाकी काही नाही.
स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपली स्वप्नं प्रत्यक्षात मालकीहक्क आणि भौतिक गोष्टींमध्येच का रुततात? एवढं करून आपण जे मिळवायला बघतो ते मिळेल याची खात्री काय?
असो.

खेडूत, जयंत कुलकर्णी यांच्याशी सहमत. एकतर तुम्ही आंधीत जागा/जमीन घेतली. त्यात तुम्ही तसे उपरेच त्यामुळे सबुरीनेच घ्यावे लागेल. कट्टा, बॅनर, पुढार्‍यांच्या ओळखी कामाला येतील असे वाटत नाही.
मीही दुसर्‍या गावात जमीन घेतली आहे. मी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याचा शेजारी (त्यांचे एकमेकाशी वाद होते तरी)त्या जमीनीवर डोळा ठेवून होता. त्याने जमीन त्या शेजर्‍याला न विकता मला विकली. हे मला सर्व नंतर कळले.
झाले. मी जमीन घेतली. एकाला वाट्याने जमीन कसायला दिली. तर हा पठ्ठ्या शेजारी त्रास द्यायला लागला. रस्ता बंद करणे, औत अडवणे, पंप बंद करणे. शेती अवजारांची चोरी करणे, बैलांवर विषप्रयोग करणे, वाटेकर्‍याला दमदाटी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे. असे करुन २ वाटेकरी त्याने पळवून लावले. शेवटी मी सलग १५ दिवस त्या गावाला राहून नवीन वाटेकरी लावला. त्या त्रासदायक शेतकर्‍याचा सगळा ७/१२ काढला तर तो गावातही तसाच उर्मटपणे वागत असल्याचे कळले. त्याने पोर्वीचेच प्रकार चालू केल्यावर त्याला पहिल्यांदा समज दिली. तो बधला नाही मग त्याला एक दिवस अक्षरशः बडवून काढला. तर त्याने माझ्यावर अ‍ॅट्रासिटी टाकली. मीतर त्यात माहीर. मी त्याच्यावर जालीम क्रॉस टाकली. दरम्यान त्याला माझा कोर्टाचा 'अनूभव' कळला नि केस मिटवून घेवू म्हणून मागे लागला. त्याला चांगला ६ महीने तंगवून मगच केस मिटवली.
आता एकदम सुरळीत चालू आहे. वाटेकर्‍याकडे कधी खत आणण्यास पैसे नसतील तर तोच शेजारी खते देतो. २-३ महिन्यात मी कधी गेलो तर मी त्याला त्याचे पैसे देतो, तर 'नंतर दिले तरी चालतील' असे म्हणून पैसे घेतो.

पिपळ्या.

मु-पो- कवठे बुद्रुक.

$$$$$$$$$$$$$$$$$

मनुवादी संपादकांनो कात्र्यांना धार लावा...

Pages