म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम् २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
- अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
- पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
- मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
- आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
वाचने
27727
वाचनखूण
प्रतिक्रिया
112
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर
In reply to अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर by विश्वनाथ मेहेंदळे
पण मी काय म्हणतो,
In reply to पण मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
परीकथेतील कशाला
प्रचंड अनुभव आहे या
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
निषेध !
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
सही?
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
अपेक्षित प्रतिसाद.. आले
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
एक सुचवण
In reply to एक सुचवण by मूकवाचक
काय ब्रं क्रावं.. बूच लावून
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
बाकीची व्यथा काही तुम्हाला
In reply to बाकीची व्यथा काही तुम्हाला by परिकथेतील राजकुमार
पराषेट, मूळ विषयाला धरुन
In reply to पराषेट, मूळ विषयाला धरुन by गवि
मी फाटे फोडतोय ?
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
उद्या सकाळी १०.०० वाजता
In reply to उद्या सकाळी १०.०० वाजता by गवि
बरोबर !
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात
In reply to >>>>१०.०० वाजता क्रांती चौकात by यकु
तुला रे मेल्या कोणी शाप
In reply to तुला रे मेल्या कोणी शाप by गवि
इथे केलेली पापकर्मे भोवली
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
दहन करायला नेलेला पुतळ्याचे
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे.
In reply to मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे. by निश
गावकरी जबरदस्तीने जमीन
In reply to गावकरी जबरदस्तीने जमीन by गवि
गवी साहेब, खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत
विमे आणि पराची हि सौजन्यदाहक
In reply to विमे आणि पराची हि सौजन्यदाहक by स्पा
तुमच्या डोळ्यांना
In reply to तुमच्या डोळ्यांना by विश्वनाथ मेहेंदळे
फडके रोड वर फिरत जा जरा,
In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या
@ते दातात सिमेंट भरायला जातात
In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या
शेवटचा हात मारुन झालाय म्हणे
.
गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय
In reply to गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय by यकु
हा हा हा
द्या द्या पैसे,
In reply to द्या द्या पैसे, by ५० फक्त
चला..
सावधान!
कर्मयोग
In reply to कर्मयोग by सुधीर
३ वाक्यं
In reply to कर्मयोग by सुधीर
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी
In reply to सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी by ५० फक्त
गगदी तसंच नाही पण...
In reply to गगदी तसंच नाही पण... by सुधीर
अनमोल -
काम की चीजें
In reply to काम की चीजें by कौन्तेय
गोदरेजचा सिग्नल
तुम्ही विचार करा
In reply to तुम्ही विचार करा by पैसा
हंऽ.. हेही खरंच
म्हणून वर्षातून किमान एकदातरी
In reply to म्हणून वर्षातून किमान एकदातरी by स्वातीविशु
रत्नागिरीकर /
In reply to रत्नागिरीकर / by गवि
+१
In reply to +१ by पैसा
पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
अगदी हेच!
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
+१ / सुरस चमत्कारिक कथांना तोटा नाही
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
बारा गाव बारा भानगडी.
In reply to रत्नागिरीकर / by गवि
कळीचा मुद्दा -
गाव म्हणजे ग्रामपंचायत,
In reply to गाव म्हणजे ग्रामपंचायत, by स्वातीविशु
तुमचा मुद्दा ढोबळमानाने
In reply to तुमचा मुद्दा ढोबळमानाने by गवि
स्वागत
In reply to स्वागत by कौन्तेय
बारा पंधरा वर्षे याचा उपयोग
In reply to बारा पंधरा वर्षे याचा उपयोग by गवि
+1, गावगाडा लै बेक्कार!
अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं,
In reply to अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, by स्वातीविशु
अहो म्याडम, कोकणातलं माहीत
In reply to अहो म्याडम, कोकणातलं माहीत by शिल्पा ब
+१
सगळं येऊ द्या -
सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन
काहि उप्योग नाहि ह्य्याचा
In reply to काहि उप्योग नाहि ह्य्याचा by स्वछन्दि
सध्या तरी मी हेच शस्त्र
आपले रुपये जातात त्याच काय?
लेखकाचा तसेच काही
In reply to लेखकाचा तसेच काही by रेवती
रेवतीआजै मी वर हेच लिहिलं
रेवतीताई सगळ इथेच चुकत आप्ल.
काही मार्ग
मस्त चर्चा..
गावी घर बांधताना
In reply to गावी घर बांधताना by नेत्रेश
अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही
थोडं वेगळं वळण -
शहरातले लोक तरी खेड्यातून
In reply to शहरातले लोक तरी खेड्यातून by JAGOMOHANPYARE
+1
मेरे प्यारे -
In reply to मेरे प्यारे - by कौन्तेय
तुम्हाला कुठे जाणवलाच तर
In reply to तुम्हाला कुठे जाणवलाच तर by गणपा
खर्रंच मा. गणपाभौ, मी तर
यंत्रणा...
In reply to यंत्रणा... by प्रभाकर पेठकर
तेच तर मी लिहिले आहे... मोठी
In reply to तेच तर मी लिहिले आहे... मोठी by JAGOMOHANPYARE
धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे
In reply to धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे by ५० फक्त
तो धागा बघितला.. शहरातल्या
मी आता जे लिहिणार आहे ते
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by जयंत कुलकर्णी
मी आता जे लिहिणार आहे ते
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by गणपा
गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल
In reply to गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा
In reply to मी आता जे लिहिणार आहे ते by जयंत कुलकर्णी
चित्रमय नि लालभडक
हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर
In reply to हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर by नगरीनिरंजन
क्या बात है!
In reply to क्या बात है! by कौन्तेय
टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल
खेडूत, जयंत कुलकर्णी
In reply to खेडूत, जयंत कुलकर्णी by भीमाईचा पिपळ्या.
हा आणि इतर प्रतिसाद वाचून
In reply to खेडूत, जयंत कुलकर्णी by भीमाईचा पिपळ्या.
हौन् जाऊ द्या ...
In reply to हौन् जाऊ द्या ... by कौन्तेय
शुभ पंथावर आस्ते जावा !!! :p
हम्म... दुसर्या बाजूशीही
एकंदरीत काय, मा. श्री.
हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक
In reply to हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक by अर्धवट
उत्तम सुचना, एक विनंती अशाच
लैच जब्री -
कौन्तेय एकतर तुम्ही ५०
नाही, अजून नाही
गोळाबेरीज
- प्रत्येकाचा बाप असतो.
- कायदा-सुव्यवस्थेच्या व मालकी हक्काच्या भिन्न ग्रामीण व शहरी कल्पना नि त्यांची कार्यवाही (काहींनी मांडलेले वाईट अनुभव)
- पैसे टाका, मोकळे व्हा, ’पुढाऱ्याच्या नावाचं एखादं फ़्लेक्स लावा’
- आमदाराला वास्तुशांतीला बोलवा; पैसे मागणाऱ्यांत फ़ूट पाडा.
- काही ठिकाणी माघारही श्रेयस्कर. पण तत्त्वपूर्ती हाच एकमेव निकष असेल तर अटीतटीची लढाई खेळावी.
- आपलं आयुष्य किती - आपण लढतोय किती
- मानसिक ताण तणाव झेपणार असतील तरच लाच न देता टक्कर देण्याच्या फ़ंदात पडा.
- गावच्या लोकांना जिंका - प्रेमाने, पैशाने (वा इतर कशानेही) [प्रेमाने जिंकायला वावच नाही. अख्खं गाव विकत घेण्याइतके पैसे असल्याविना या वाटेला जाऊ नये].
- गावगुंड व झोटिंगांना प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याची तयारी हवी.
- वीकेंड होम ही नापास संकल्पना आहे.
- प्रसंगी आडमुठेपणा, खमकेपणा दाखवून देण्यासाठी गुंडपुंड पुढाऱ्यांच्या ओळखी लागतात.
- खेडूत मित्र वाढवावेत.
- अनधिकृतच बांधकाम करून मग ते नाममात्र दंड भरून अधिकृत करून घेतले तर खर्च कमी येतो.
- जगात सगळीकडे असलेल्या लाचखोरीच्या समांतर व्यवस्थेला आपणही कधी कळत कधी नकळत शरण गेलेलो असताना नेमका याच बाबतीत कांगावा का?
- जोशी ... छळ ... नेपाळ ... दारू ... कट्टा ... सुरळित
- धागाकेसरी पिपळ्या पैलवानाचा पराक्रम
- हितसंबंधांचं महत्त्व. गावाचे व तुमचे एकमेकांच्यात रुजलेले असावेत.
- व्यवहार, संवादकौशल्य वा इतर साधने पुरेपुर वापरल्याशिवाय चुना लागू देऊ नये.
सगळ्याची गोळाबेरीज म्हणून मधे म्हटल्यानुसार गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नवखा, उपरा माणूस - केवळ स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. या कारणामुळे आत्तातरी विकतची मनःशांती आपलीशी करावी लागेलसं दिसतंय. पण सरते शेवटी जर त्या मार्गाने गेलोच तर- - आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं?
- - आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय?
- - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?
ही शल्यं मनात राहणार आहेत. असो. बाकी या सूत्राच्या अनुषंगाने इथे सुरू झालेली चर्चा सुफ़ळ संपूर्ण झाली असं मी माझ्याकडून जाहीर करतो. शुभम् भवतु।- आपण इतके पैसे दिल्याने
गरीबानं काय करायचं?
प्यारे मोहन,
धागा उशीरा पाहीला ... तरीही ...
आभारप्रदर्शन!
In reply to आभारप्रदर्शन! by कौन्तेय
अगदी अगदी. भिमाईचे पिपळ्याराव
कौंतेय साहेब
In reply to कौंतेय साहेब by तिमा
ये हुई ना बात -
अवघड आहे...
काय नाय ओ, बिन्धास् -
गावात हा त्रास पण शहरात हा