मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम् २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
- अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
- पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
- मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
- आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
वाचने
27765
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
पण मी काय म्हणतो,
In reply to अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर by विश्वनाथ मेहेंदळे
परीकथेतील कशाला
In reply to पण मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
प्रचंड अनुभव आहे या
निषेध !
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
सही?
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
अपेक्षित प्रतिसाद.. आले
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
एक सुचवण
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
काय ब्रं क्रावं.. बूच लावून
In reply to एक सुचवण by मूकवाचक
बाकीची व्यथा काही तुम्हाला
In reply to अपेक्षित प्रतिसाद.. आले by गवि
पराषेट, मूळ विषयाला धरुन
In reply to बाकीची व्यथा काही तुम्हाला by परिकथेतील राजकुमार
मी फाटे फोडतोय ?
In reply to पराषेट, मूळ विषयाला धरुन by गवि
उद्या सकाळी १०.०० वाजता
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
बरोबर !
In reply to उद्या सकाळी १०.०० वाजता by गवि
>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
तुला रे मेल्या कोणी शाप
In reply to >>>>१०.०० वाजता क्रांती चौकात by यकु
इथे केलेली पापकर्मे भोवली
In reply to तुला रे मेल्या कोणी शाप by गवि
दहन करायला नेलेला पुतळ्याचे
In reply to मी फाटे फोडतोय ? by परिकथेतील राजकुमार
ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे.
In reply to प्रचंड अनुभव आहे या by गवि
गावकरी जबरदस्तीने जमीन
In reply to मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे. by निश
गवी साहेब, खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत
In reply to गावकरी जबरदस्तीने जमीन by गवि
विमे आणि पराची हि सौजन्यदाहक
तुमच्या डोळ्यांना
In reply to विमे आणि पराची हि सौजन्यदाहक by स्पा
फडके रोड वर फिरत जा जरा,
In reply to तुमच्या डोळ्यांना by विश्वनाथ मेहेंदळे
@ते दातात सिमेंट भरायला जातात
In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या
शेवटचा हात मारुन झालाय म्हणे
In reply to फडके रोड वर फिरत जा जरा, by धन्या
.
गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय
हा हा हा
In reply to गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय by यकु
द्या द्या पैसे,
चला..
In reply to द्या द्या पैसे, by ५० फक्त
सावधान!
कर्मयोग
३ वाक्यं
In reply to कर्मयोग by सुधीर
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी
In reply to कर्मयोग by सुधीर
गगदी तसंच नाही पण...
In reply to सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी by ५० फक्त
अनमोल -
In reply to गगदी तसंच नाही पण... by सुधीर
काम की चीजें
गोदरेजचा सिग्नल
In reply to काम की चीजें by कौन्तेय
तुम्ही विचार करा
हंऽ.. हेही खरंच
In reply to तुम्ही विचार करा by पैसा
म्हणून वर्षातून किमान एकदातरी
रत्नागिरीकर /
In reply to म्हणून वर्षातून किमान एकदातरी by स्वातीविशु
+१
In reply to रत्नागिरीकर / by गवि
पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ
In reply to +१ by पैसा
अगदी हेच!
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
+१ / सुरस चमत्कारिक कथांना तोटा नाही
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
बारा गाव बारा भानगडी.
In reply to पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ by गवि
कळीचा मुद्दा -
In reply to रत्नागिरीकर / by गवि
गाव म्हणजे ग्रामपंचायत,
तुमचा मुद्दा ढोबळमानाने
In reply to गाव म्हणजे ग्रामपंचायत, by स्वातीविशु
स्वागत
In reply to तुमचा मुद्दा ढोबळमानाने by गवि
बारा पंधरा वर्षे याचा उपयोग
In reply to स्वागत by कौन्तेय
+1, गावगाडा लै बेक्कार!
In reply to बारा पंधरा वर्षे याचा उपयोग by गवि
अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं,
अहो म्याडम, कोकणातलं माहीत
In reply to अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, by स्वातीविशु
+१
In reply to अहो म्याडम, कोकणातलं माहीत by शिल्पा ब
सगळं येऊ द्या -
सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन
काहि उप्योग नाहि ह्य्याचा
सध्या तरी मी हेच शस्त्र
In reply to काहि उप्योग नाहि ह्य्याचा by स्वछन्दि
आपले रुपये जातात त्याच काय?
लेखकाचा तसेच काही
रेवतीआजै मी वर हेच लिहिलं
In reply to लेखकाचा तसेच काही by रेवती
रेवतीताई सगळ इथेच चुकत आप्ल.
काही मार्ग
मस्त चर्चा..
गावी घर बांधताना