साहित्यः
३०० ग्राम तांदळाचे पीठ
२ अंडी
दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे )
१ टेस्पून काळे तीळ
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता)
अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा
पा़कृ:
एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स करुन घ्यावे. गुठळ्या अजिबात राहता कामा नये.
दुसर्या भांड्यात अंडी हलकीच फेटून घ्यावी.
फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात काळे तीळ, साखर व व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा नीट सगळे फेटणे.
तांदळाच्या मिश्रणात अंड्याचे मिश्रण घालून नीट एकजीव करावे. हे मिश्रण झाकून २०-२५ मिनिटे ठेवावे.
कढईत तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. त्यात अचप्पम / अच्चप्पम चा साचा बुडवून ठेवावा ५-७ मिनिटे. (साचा चांगला गरम करुन घ्यावा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम नीट पडतील व साच्याला पीठ चिकटणार नाही. )
तयार मिश्रणात अचप्पम / अच्चप्पम साचा अर्धवट बुडवावा व तेलात साचा धरावा. (पूर्ण बुडवायचा नाही)
साचा हलकाच हलवत ठेवायचा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम आपोआप सुटू लागतील. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळावे. (प्रत्येक अचप्पम / अच्चप्पम बनवताना साचा आधी तेलात बुडवून मगचं मिश्रणात घालायचा)
अचप्पम / अच्चप्पम पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मधल्या वेळचे खाणे, चहाबरोबर खाता येतात. लहान मुलांना डब्यातही देता येतात. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात :)
प्रतिक्रिया
12 Mar 2012 - 7:35 am | प्राजु
बाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा काय प्रकार! मी पहिल्यांदाच पाहिला!!
हा साचा कुठे मिळाला?
आणि नेमका कोणत्या भागातला हा पदार्थ आहे? नावावरून साऊथ इंडीयन वाटतो आहे.. ! हो का?
तुला नेमकं काय म्हणू तेच समजत नाहीये.
____________/\_____________
हा दांडगा दंडवत तुला! :)
12 Mar 2012 - 8:13 am | सानिकास्वप्निल
हा केरळचा पदार्थ आहे :)
ह्याचा साचा कुठल्याही भांड्यांच्या दुकनात मिळून जाईल
धन्यवाद गं :)
12 Mar 2012 - 10:46 am | पियुशा
च्यायला खल्लास एकदम !!!!!!!!!
खपले खपले खपले ___/\___ काय निगुतीने केलेयस सगळ !!!
हा काय प्रकार आहे ग पहिल्यादाच एकलाय मी तरी अप्पम / अप्पे एकले होते
भयानक आवड्ला हा प्रकार :)
चला आता इकडे " साचा " शोधण आले ;)
12 Mar 2012 - 8:10 am | ५० फक्त
जबरा आहे हा प्रकार, हॉट चिप्स वाल्यांकडे सर्रास मिळतो, अच्चप्पम तेलात टाकल्याक्षणाचा फोटो जाम भारी आलाय, कसलं टायमिंग साधलंय.
12 Mar 2012 - 8:19 am | प्रचेतस
फॅन्टास्टिक.
12 Mar 2012 - 9:06 am | पैसा
+१
12 Mar 2012 - 9:26 am | मोदक
झकास पाककृती....
:-) __/\__ :-)
12 Mar 2012 - 9:45 am | अमृत
बापरे लोकं काय काय बनवतात खाण्यासाठी :-) इकडे साऊथ मधे असुन(आंध्रा) सुद्धा कधी बघायाला मिळाला नाही हा प्रकार.
तुमचे कौतुक करावे तेव्हडे कमीच. नविन प्रकाराशी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
अमृत
12 Mar 2012 - 10:08 pm | मैत्र
आंध्रात या नावाने शोधून पहा.
12 Mar 2012 - 9:59 am | अन्नू
अपलम् चपलम् माहीत होतं पण हे वेगळच आहे.
आगावू अवांतरः- हा अपलम् चपलम् चा भाऊ आहे का?
12 Mar 2012 - 10:33 am | अत्रुप्त आत्मा
काय हे...? सगळे फोटू एवढे अपटुडेट टाकता...नेहमी नेहमी...आंम्हाला प्रत्येक फोटू एकएक पा.कृ.असल्याचा भास होतो ना...! यावेळी तिसरा (पिंक भांडं) फोटु मला एग स्मायली म्हणुन अवडला आहे आणी मी तो सेव्ह केला आहे... (आणी स्मायली म्हणुन वापरणार आहे ;-) )
अता मुळ प्रतिक्रीया :-) ---- हा कधिही न पाहिलेला एक वेगळ्याच धाटणीचा पदार्थ आहे... तो झारा/साचा बघुन भारी गंमत वाटली...शेवटी केरळी पदार्थ ना..वेगळे पण असायचच... ;-)
नेहमी प्रमाणी पहाता क्षणीच
इच्छा झालेली आहे...
12 Mar 2012 - 10:36 am | खादाड
मस्त !! :)
12 Mar 2012 - 10:51 am | चिंतामणी
नविन प्रतिक्रीया शोधत आहे.
हा प्रकार आपल्याकडील "कमळफुले" या प्रकाराशी साधर्म्य दाखवत आहे.
आमच्याकडे हा साचा कमळफुले बनवण्यासाठी आणलेला आहे. आता हा प्रकार करून बघायला पाहीज.
12 Mar 2012 - 1:19 pm | गवि
अगदी अगदी..
"रुचिरा"च्या जीर्ण झालेल्या पण जपून ठेवलेल्या आवृत्तीत जुने फोटो आहेत त्यात या साच्याचा फोटो आहे.. कमळफुलांचा साचा..
पाकृ उत्तम..
12 Mar 2012 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा
कमळ फुलाची पा.कृ.येऊ द्या ना मग,,,आंम्हाला ती पण माहित नाहिये.
12 Mar 2012 - 11:59 am | Mrunalini
सॉलिड्ड हा मॅडम... मस्तच..... हा साचा तुला UK मधे मिळाला ???? सही आहे यार....
12 Mar 2012 - 12:03 pm | अरुणा
मस्तच !! छान दिसतोय ...... खल्लास ..... :)
12 Mar 2012 - 12:41 pm | सुहास झेले
अरे द्येवा..... लै भारी !!! :) :) :)
12 Mar 2012 - 1:16 pm | गणपा
वाह !!!
बरेच दिवसांनी आठवण झाली या पदार्थाची. विमृतीतच गेला होता.
हा पदार्थ मँगलोरच्या एका ख्रिस्ताव मित्राकडुन दर नाताळाच्या फराळातून यायचा.
तो ईतका आवडायचा की मग आईने खास त्यांच्या गावाहून तो साचा आणि रेशीपी मागवली होती.
12 Mar 2012 - 1:25 pm | हसरी
तुम्हाला शाबासकी द्यावी तेवढी थोडीच आहे. इतकी क्लिष्ट पाककृती करायची, शिवाय इतके सुरेख फोटोही द्यायचे, इतका उरक खरंच स्तुत्य आहे.
कमलाबाई ओगले यांच्या रुचिरामधे हाच साचा वापरून करायचा 'कमळफुले' हा पदार्थ आहे. त्यात अंडे वापरलेले नाही, आणि आवडीप्रमाणे गोड वा तिखट कमळफुले करता येतात.
12 Mar 2012 - 1:47 pm | जाई.
मस्त पाकृ
12 Mar 2012 - 2:40 pm | स्मिता.
कधी या प्रकाराची पाककृती इथे येईल असं वाटलं नव्हतं. ही सानिका काय काय बनवून बघेल आणि त्याकरता काय भांडी आणेल याचा काही नेम नाही.
हा पदार्थ मी बंगलोरला एका केरळी मित्राकडे 'रोझ(ज) बिस्कीट' म्हणून खाल्ला होता.
12 Mar 2012 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते
भन्नाट!
12 Mar 2012 - 5:07 pm | पिंगू
झकास.. मी हाच पदार्थ एका केरळी मित्राकडे खाल्ला होता. त्यानंतर त्याचं आज दर्शन होतयं..
बादवे.. पाय कुठे आहेत? __/\__
- पिंगू
12 Mar 2012 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अचप्पम खायला मिळो न मिळो पण जबरा फोटो काय, पाककृती काय आणि त्याचे इन्ष्ट्रूमेंट काय.
च्यायला, मला सर्व पाकृतीचा पसारा नवलाईचाच आहे. :)
येऊ द्या अजून.
-दिलीप बिरुटे
12 Mar 2012 - 6:24 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर - पहिल्यांदाच पहाते आहे.....
काय काय करत असतेस ग तू..आणी तेही निगुतीने.....व्हेरी गुड.
आवडले आपल्याला.
आणी नारळ - दुध कॅनमध्ये मिळते हे ही पहिल्यांदाच कळले.
अडाणी (निवू)
12 Mar 2012 - 7:02 pm | प्राजु
अगं कॅन म्हणजे.. टिन!
टिन मध्ये कोकोनट मिल्क मिळते. ताज्या नारळाच्या दुधाची चव नसते पण बरे असते. :) त्याची सोल कढीही चांगली होते.
आणि थाई रेसिपीज मध्येही वापरता येते.
12 Mar 2012 - 7:43 pm | रेवती
खूपच वेगळा पदार्थ आहे.
पहिल्यांदाच पाहिला.
हे असं साचा पिठात बुडवून करत रहायचं म्हणजे वेळखाऊ काम असणार असा अंदाज.
पण पदार्थ छानच.
12 Mar 2012 - 9:30 pm | कौशी
प्रथमच बघितला हा पदार्थ.
13 Mar 2012 - 10:25 pm | प्रभाकर पेठकर
अजून खाल्ला नसला तरी नक्कीच पाहिला आहे. पाककृती मस्तच आहे. अभिनंदन.
14 Mar 2012 - 2:13 pm | सांजसंध्या
पहिल्यांदाच पाहिला हा प्रकार. एकदा करून पहायला हरकत नाही
14 Mar 2012 - 3:41 pm | नि३सोलपुरकर
सानिकातै,
मस्त,
कौतुक करावे तेवढे कमीच आहे..
15 Mar 2012 - 4:28 pm | निश
बुंबास्टिक मस्त दिसते आहे पाक क्रुती.
15 Mar 2012 - 4:41 pm | sneharani
वेगळाच प्रकार पहायला मिळाला!पहिल्यांदाच पाहिला! नमस्कार ग तुला! :)
16 Mar 2012 - 12:39 pm | जयवी
आई गं.........!! हा प्रकार मला प्रचंड आवडतो. तो कसा करायचा हे किती कल्पना लढवून बघितलं होतं.........पण सगळं पीठ फेकून द्यावं लागलं प्रत्येक वेळी. आता तुझ्या पद्धतीने करुन बघेन. पण इथे कुवेतला साचा शोधण्यापासून तयारी करावी लागेल. पण नक्की शोधेन आता.
ए ...... ह्यात मोहन नाही का घालत ??
फोटो कसले जबरी आलेत. अगदी उचलून घ्यावंसं वाटतंय ;)
तुला ह्या रेसिपीसाठी एक "जादूची झप्पी" :)
16 Mar 2012 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
22 Mar 2012 - 7:43 pm | वेताळ
जरी साचा मिळाला नाहीतरी जिलेबीचा साचा वापरुन इच्छुकानी अप्प्मचप्पम बनवुन बघावे.
बाकी पदार्थ मस्तच झालाय,