अचप्पम / अच्चप्पम
साहित्यः
३०० ग्राम तांदळाचे पीठ
२ अंडी
दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे )
१ टेस्पून काळे तीळ
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता)
अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा
पा़कृ:
एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स करुन घ्यावे. गुठळ्या अजिबात राहता कामा नये.
दुसर्या भांड्यात अंडी हलकीच फेटून घ्यावी.
फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात काळे तीळ, साखर व व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा नीट सगळे फेटणे.
तांदळाच्या मिश्रणात अंड्याचे मिश्रण घालून नीट एकजीव करावे. हे मिश्रण झाकून २०-२५ मिनिटे ठेवावे.
कढईत तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. त्यात अचप्पम / अच्चप्पम चा साचा बुडवून ठेवावा ५-७ मिनिटे. (साचा चांगला गरम करुन घ्यावा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम नीट पडतील व साच्याला पीठ चिकटणार नाही. )
तयार मिश्रणात अचप्पम / अच्चप्पम साचा अर्धवट बुडवावा व तेलात साचा धरावा. (पूर्ण बुडवायचा नाही)
साचा हलकाच हलवत ठेवायचा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम आपोआप सुटू लागतील. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळावे. (प्रत्येक अचप्पम / अच्चप्पम बनवताना साचा आधी तेलात बुडवून मगचं मिश्रणात घालायचा)
अचप्पम / अच्चप्पम पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मधल्या वेळचे खाणे, चहाबरोबर खाता येतात. लहान मुलांना डब्यातही देता येतात. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात :)

वाचन
12941
प्रतिक्रिया
0