अचप्पम / अच्चप्पम

सानिकास्वप्निल पाककृती
साहित्यः ३०० ग्राम तांदळाचे पीठ २ अंडी दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे ) १ टेस्पून काळे तीळ १/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात) १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता) अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा . पा़कृ: एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स करुन घ्यावे. गुठळ्या अजिबात राहता कामा नये. . दुसर्‍या भांड्यात अंडी हलकीच फेटून घ्यावी. . फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात काळे तीळ, साखर व व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा नीट सगळे फेटणे. . तांदळाच्या मिश्रणात अंड्याचे मिश्रण घालून नीट एकजीव करावे. हे मिश्रण झाकून २०-२५ मिनिटे ठेवावे. . कढईत तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. त्यात अचप्पम / अच्चप्पम चा साचा बुडवून ठेवावा ५-७ मिनिटे. (साचा चांगला गरम करुन घ्यावा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम नीट पडतील व साच्याला पीठ चिकटणार नाही. ) . तयार मिश्रणात अचप्पम / अच्चप्पम साचा अर्धवट बुडवावा व तेलात साचा धरावा. (पूर्ण बुडवायचा नाही) . . साचा हलकाच हलवत ठेवायचा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम आपोआप सुटू लागतील. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळावे. (प्रत्येक अचप्पम / अच्चप्पम बनवताना साचा आधी तेलात बुडवून मगचं मिश्रणात घालायचा) . अचप्पम / अच्चप्पम पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मधल्या वेळचे खाणे, चहाबरोबर खाता येतात. लहान मुलांना डब्यातही देता येतात. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात :) .

37 टिप्पण्या 12,942 दृश्ये

Comments

प्राजु नवीन

बाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! हा काय प्रकार! मी पहिल्यांदाच पाहिला!! हा साचा कुठे मिळाला? आणि नेमका कोणत्या भागातला हा पदार्थ आहे? नावावरून साऊथ इंडीयन वाटतो आहे.. ! हो का? तुला नेमकं काय म्हणू तेच समजत नाहीये. ____________/\_____________ हा दांडगा दंडवत तुला! :)

पियुशा नवीन

In reply to by सानिकास्वप्निल

च्यायला खल्लास एकदम !!!!!!!!! खपले खपले खपले ___/\___ काय निगुतीने केलेयस सगळ !!! हा काय प्रकार आहे ग पहिल्यादाच एकलाय मी तरी अप्पम / अप्पे एकले होते भयानक आवड्ला हा प्रकार :) चला आता इकडे " साचा " शोधण आले ;)

५० फक्त नवीन

जबरा आहे हा प्रकार, हॉट चिप्स वाल्यांकडे सर्रास मिळतो, अच्चप्पम तेलात टाकल्याक्षणाचा फोटो जाम भारी आलाय, कसलं टायमिंग साधलंय.

अमृत नवीन

बापरे लोकं काय काय बनवतात खाण्यासाठी :-) इकडे साऊथ मधे असुन(आंध्रा) सुद्धा कधी बघायाला मिळाला नाही हा प्रकार. तुमचे कौतुक करावे तेव्हडे कमीच. नविन प्रकाराशी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अमृत

अत्रुप्त आत्मा नवीन

काय हे...? सगळे फोटू एवढे अपटुडेट टाकता...नेहमी नेहमी...आंम्हाला प्रत्येक फोटू एकएक पा.कृ.असल्याचा भास होतो ना...! यावेळी तिसरा (पिंक भांडं) फोटु मला एग स्मायली म्हणुन अवडला आहे आणी मी तो सेव्ह केला आहे... (आणी स्मायली म्हणुन वापरणार आहे ;-) ) अता मुळ प्रतिक्रीया :-) ---- हा कधिही न पाहिलेला एक वेगळ्याच धाटणीचा पदार्थ आहे... तो झारा/साचा बघुन भारी गंमत वाटली...शेवटी केरळी पदार्थ ना..वेगळे पण असायचच... ;-) नेहमी प्रमाणी पहाता क्षणीच इच्छा झालेली आहे...

चिंतामणी नवीन

नविन प्रतिक्रीया शोधत आहे. हा प्रकार आपल्याकडील "कमळफुले" या प्रकाराशी साधर्म्य दाखवत आहे. आमच्याकडे हा साचा कमळफुले बनवण्यासाठी आणलेला आहे. आता हा प्रकार करून बघायला पाहीज.

गवि नवीन

In reply to by चिंतामणी

अगदी अगदी.. "रुचिरा"च्या जीर्ण झालेल्या पण जपून ठेवलेल्या आवृत्तीत जुने फोटो आहेत त्यात या साच्याचा फोटो आहे.. कमळफुलांचा साचा.. पाकृ उत्तम..

गणपा नवीन

वाह !!! बरेच दिवसांनी आठवण झाली या पदार्थाची. विमृतीतच गेला होता. हा पदार्थ मँगलोरच्या एका ख्रिस्ताव मित्राकडुन दर नाताळाच्या फराळातून यायचा. तो ईतका आवडायचा की मग आईने खास त्यांच्या गावाहून तो साचा आणि रेशीपी मागवली होती.

हसरी नवीन

तुम्हाला शाबासकी द्यावी तेवढी थोडीच आहे. इतकी क्लिष्ट पाककृती करायची, शिवाय इतके सुरेख फोटोही द्यायचे, इतका उरक खरंच स्तुत्य आहे. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरामधे हाच साचा वापरून करायचा 'कमळफुले' हा पदार्थ आहे. त्यात अंडे वापरलेले नाही, आणि आवडीप्रमाणे गोड वा तिखट कमळफुले करता येतात.

स्मिता. नवीन

कधी या प्रकाराची पाककृती इथे येईल असं वाटलं नव्हतं. ही सानिका काय काय बनवून बघेल आणि त्याकरता काय भांडी आणेल याचा काही नेम नाही. हा पदार्थ मी बंगलोरला एका केरळी मित्राकडे 'रोझ(ज) बिस्कीट' म्हणून खाल्ला होता.

पिंगू नवीन

झकास.. मी हाच पदार्थ एका केरळी मित्राकडे खाल्ला होता. त्यानंतर त्याचं आज दर्शन होतयं.. बादवे.. पाय कुठे आहेत? __/\__ - पिंगू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

अचप्पम खायला मिळो न मिळो पण जबरा फोटो काय, पाककृती काय आणि त्याचे इन्ष्ट्रूमेंट काय. च्यायला, मला सर्व पाकृतीचा पसारा नवलाईचाच आहे. :) येऊ द्या अजून. -दिलीप बिरुटे

निवेदिता-ताई नवीन

अतिशय सुंदर - पहिल्यांदाच पहाते आहे..... काय काय करत असतेस ग तू..आणी तेही निगुतीने.....व्हेरी गुड. आवडले आपल्याला. आणी नारळ - दुध कॅनमध्ये मिळते हे ही पहिल्यांदाच कळले. अडाणी (निवू)

प्राजु नवीन

In reply to by निवेदिता-ताई

अगं कॅन म्हणजे.. टिन! टिन मध्ये कोकोनट मिल्क मिळते. ताज्या नारळाच्या दुधाची चव नसते पण बरे असते. :) त्याची सोल कढीही चांगली होते. आणि थाई रेसिपीज मध्येही वापरता येते.

रेवती नवीन

खूपच वेगळा पदार्थ आहे. पहिल्यांदाच पाहिला. हे असं साचा पिठात बुडवून करत रहायचं म्हणजे वेळखाऊ काम असणार असा अंदाज. पण पदार्थ छानच.

प्रभाकर पेठकर नवीन

अजून खाल्ला नसला तरी नक्कीच पाहिला आहे. पाककृती मस्तच आहे. अभिनंदन.

नि३सोलपुरकर नवीन

सानिकातै, मस्त, कौतुक करावे तेवढे कमीच आहे..

sneharani नवीन

वेगळाच प्रकार पहायला मिळाला!पहिल्यांदाच पाहिला! नमस्कार ग तुला! :)

जयवी नवीन

आई गं.........!! हा प्रकार मला प्रचंड आवडतो. तो कसा करायचा हे किती कल्पना लढवून बघितलं होतं.........पण सगळं पीठ फेकून द्यावं लागलं प्रत्येक वेळी. आता तुझ्या पद्धतीने करुन बघेन. पण इथे कुवेतला साचा शोधण्यापासून तयारी करावी लागेल. पण नक्की शोधेन आता. ए ...... ह्यात मोहन नाही का घालत ?? फोटो कसले जबरी आलेत. अगदी उचलून घ्यावंसं वाटतंय ;) तुला ह्या रेसिपीसाठी एक "जादूची झप्पी" :)

वेताळ नवीन

जरी साचा मिळाला नाहीतरी जिलेबीचा साचा वापरुन इच्छुकानी अप्प्मचप्पम बनवुन बघावे. बाकी पदार्थ मस्तच झालाय,