साहित्यः
३०० ग्राम तांदळाचे पीठ
२ अंडी
दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे )
१ टेस्पून काळे तीळ
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता)
अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा
पा़कृ:
एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स करुन घ्यावे. गुठळ्या अजिबात राहता कामा नये.
दुसर्या भांड्यात अंडी हलकीच फेटून घ्यावी.
फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात काळे तीळ, साखर व व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा नीट सगळे फेटणे.
तांदळाच्या मिश्रणात अंड्याचे मिश्रण घालून नीट एकजीव करावे. हे मिश्रण झाकून २०-२५ मिनिटे ठेवावे.
कढईत तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. त्यात अचप्पम / अच्चप्पम चा साचा बुडवून ठेवावा ५-७ मिनिटे. (साचा चांगला गरम करुन घ्यावा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम नीट पडतील व साच्याला पीठ चिकटणार नाही. )
तयार मिश्रणात अचप्पम / अच्चप्पम साचा अर्धवट बुडवावा व तेलात साचा धरावा. (पूर्ण बुडवायचा नाही)
साचा हलकाच हलवत ठेवायचा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम आपोआप सुटू लागतील. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळावे. (प्रत्येक अचप्पम / अच्चप्पम बनवताना साचा आधी तेलात बुडवून मगचं मिश्रणात घालायचा)
अचप्पम / अच्चप्पम पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मधल्या वेळचे खाणे, चहाबरोबर खाता येतात. लहान मुलांना डब्यातही देता येतात. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात :)
वाचने
12942
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा केरळचा पदार्थ
In reply to बाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by प्राजु
च्यायला खल्लास एकदम
In reply to हा केरळचा पदार्थ by सानिकास्वप्निल
जबरा आहे हा प्रकार, हॉट चिप्स
फॅन्टास्टिक.
+१
In reply to फॅन्टास्टिक. by प्रचेतस
झकास ..
नविनच प्रकार दिसतोय
रोज फ्लॉवर
In reply to नविनच प्रकार दिसतोय by अमृत
अपलम् चपलम् माहीत होतं पण हे
काय हे...? सगळे फोटू एवढे
मस्त !!
नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणयाचे?
अगदी अगदी.. "रुचिरा"च्या
In reply to नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणयाचे? by चिंतामणी
कमळ फुलाची पा.कृ.येऊ द्या ना
In reply to नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणयाचे? by चिंतामणी
सॉलिड्ड हा मॅडम... मस्तच.....
मस्तच !! छान दिसतोय ......
अरे द्येवा..... लै भारी !!!
वाह !!!बरेच दिवसांनी आठवण
तुम्हाला शाबासकी द्यावी तेवढी
मस्त पाकृ
आईईई ग्ग्गं!
भन्नाट!
झकास.. मी हाच पदार्थ एका
केवळ अप्रतिम.
अतिशय सुंदर - पहिल्यांदाच
अगं कॅन म्हणजे.. टिन! टिन
In reply to अतिशय सुंदर - पहिल्यांदाच by निवेदिता-ताई
खूपच वेगळा पदार्थ
मस्तच !!
लई भारी..
पहिल्यांदाच पाहिला हा प्रकार.
बाब्बो..
बुंबास्टिक मस्त दिसते आहे पाक क्रुती.
वेगळाच
आई गं.........!! हा प्रकार
सॅल्युट !
छान .....