'सचिन'चे महाशतक : आमचाही धागा

आज भारताची क्रिकेटमधे श्री लंकेबरोबर गाठ पडली.
भारतीय क्रिकेट टीमची सध्याची स्थिती आणि गती पाहता कुठल्याही आशा नव्हत्याच.

अपेक्षा नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:खही नाही.
असा सुज्ञ विचार भारतीय क्रिकेटरसिक करू लागलाय.

सचिन सेहवाग आउट झाल्यावर तर होत्या नव्हत्या त्या सार्‍या आशा संपुष्टात आल्या.

"तरी सांगत होतो आधी बॅटींग घ्या, चेस करताना आपली फॅ फॅ उडते , पण ऐकलं नाही
आता भोगा आपल्या कर्माची फळं"

"३२० आणि चेस करून केवळ अशक्य"

"मी सांगतो आजची मॅच फिक्स झालीय आधीच"

"आज कितीने १०० ने की २०० शे ने हरायच ठरवलय"

"आपण तर बुवा क्रिकेट पहायचच सोडून दिलय, ती हॉकी टीम पहा चालली लंडन टीमला
आपण आता फक्त हॉकी पाहतो"

"हा सचिन महाशतकाच्या निमित्ताने किती दिवस जागा अडवून ठेवणार आहे कुणास ठाऊक"

असे काही काही उद्गार ऐकू येत होते.

----
एक सेहवाग आणि दुसरा तो महाशतकाच्या प्रतिक्षेत असलेला 'सचिन तेंडूलकर'

एवढे दोनच फलंदाज आमच्याकडे आहेत. बाकी कुणाला बॅटदेखील हातात धरता येत नाही.
असा एक सोयीस्कर आणि गोड गैरसमज काहीजणांनी करून घेतलाय.

असो...

पण टीम धोनीने पुन्हा आशा जिवंत केल्या आणि
लोकांची भाषाच बदलून गेली.

तात्पुरता क्रिकेटपासून दूर गेलेला रसिक
संध्याकाळपासून पुन्हा टीव्हीकडे वळला.

पुन्हा त्यांना प्रतिक्षा आहे त्या महान फलंदाजाच्या
महाशतकाची !

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

हो खरय आपण म्हणता ते...पण ही आंधळी ब्याटिंग आपण कशाला करताय ?

हे असं आजच घडलं आहे का ? पुण्यात विंडीज हरले. १९८३ मधे विंडीज १४३ धावात जमीनदोस्त ! ४४० ची ऑस्ट्तेलियाची धावसंख्या द आफिकेने मारली त्याच द आफिकेची आवसानघातकी कामगिरी जागतिक कपाच्या वेळी झाली एकदा ३ बाद २७ वरून विंडीजने ६ बाद ६२६ असा स्कोअर भारताविरूद्ध केला ( विक्स की क्लाएड वॉलकॉट खेळले) .याचे सारे श्रेय क्रिकेट या खेळाच्या अजब फॉर्मॅटला आहे. खेळात खेळाडू हा साधन आहे. त्याचे शतक त्याची टीम हरल्यास कुचकामीच असते. व जिकल्यास एखादा कानिटकर ( ज्युनि) अजरामर होऊन जातो.

सचिनचे महाशतक लवकरात लवकर बघायला मिळो ही मनापासूनची इच्छा

भारत फायनलला गेला तर फायनलच्या २ सामन्यांतच सचिनचे शतक बघायला मिळावे.

गेल्या २-३ सामन्यांत सचिनने मोठ्या खेळ्या केल्या नसल्या तरी त्याने त्याच्या खेळात बदल करुन आधीची आक्रमकता आणलेली आहे. त्यामुळे या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातच कदाचित सचिनचे महाशतक बघायला मिळेल असे माझी मनोदेवता सांगते आहे.. (किती हा भाबडा विश्वास) ;) त्यासाठी श्रीलंकेचे पुढच्या सामन्यात पानिपत व्हावे अशी प्रार्थना

लवकरात लवकर आपला सचिन अशा मुद्रेत दिसावा

आम्हालाही आशु जोग, कॉमन मॅन, लीनातै,शुचि मामी ह्यांच्या धाग्यांच्या महाशतकाची प्रतिक्षा आहे.

स. प. रा. जी;

_/\_ कबूल करो

तात्पुरता क्रिकेटपासून दूर गेलेला रसिक
संध्याकाळपासून पुन्हा टीव्हीकडे वळला.

तो तसा वळावा म्हणूनच कालचा अशक्य सामना भारताला जिंकायला दिला. हे सर्व सट्टेबाजांचे अर्थकारण असते.

दाखवलाच (नसलेला) कॉमन सेन्स...

सदर व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादाकडे आम्ही मिपा संपादक मंडळाचं लक्ष वेधू इच्छितो..

आभारी आहे..

व्यक्तिगत रित्या दोषारोप करण्याचा हेतू नाही.. तसे झाले असल्यास क्षमस्व..

अहो तसं नाही, तसं नाही...
दाखवण्यापुरताही नसताना तुम्ही असं म्हणूच कसं शकता असं त्यांना म्हणायचं असावं.
संपादक मंडळानं लक्ष घातलं च पाहिजे.

:)

(लाईक बटणाची सोय करण्यात यावी...)

हे कंसात invisible text कसे देतात??

"हे सर्व सट्टेबाजांचे अर्थकारण असते."
करेक्ट!