खारी बिस्किट

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
24 Feb 2012 - 5:34 am

खारी बिस्किट हे सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. आता त्यात ही आपल्या भारतात बेकर्‍यांमध्ये सहज उपल्बध असते मग कशाला कोणी हे बनवण्याच्या भानगडीत पडेल ;)
हल्ली परदेशातही बर्‍याच ठिकाणी एशियनशॉपमध्ये ही खारी, टोस्ट, नानकटाई अगदी सहज मिळून जाते , पण आमच्यासारखे खारीप्रेमी ज्यांना इग्लंडात (शेफिल्ड) राहूनही मिळत नाही त्यांना तर फक्त आठवणीनेच पोट आणी मन भरुन घ्यावं लागतं.
असं नाही की मिळत नाही , ६-७ मैलावर आहेत आशीयाई दुकाने तिकडे अगदी क्वचीतच चांगल्या क्वालिटीची मिळते मग कधी खावसं वाटलं तर ती लगेच आणून खाऊ असे ही करता येत नाही :( , म्हणून मग घरी झटपट खारी कशी बनवता येईल त्याची पाकृ देत आहे :)

साहित्यः
फ्रोझन पफ पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक
जीरे (ऐच्छिक)

.

पाकृ:

प्रथम पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक थॉ (रुम टेम्परेचरला) करुन घ्या.
स्वयंपाकघराचा ओटा स्वछ पुसून घ्या व त्यावर थोडा मैदा भुरभूरुन घ्या.
त्यावर पेस्ट्री शीट्स ठेवा व जीरे भुरभूरुन हलकेच लाटण्याने लाटून घ्या. (मी पेस्ट्री ब्लॉकचा वापर केला आहे )

.

आता सुरीने आयताकृती खारी तयार करा व बेकिंग ट्रेमध्ये अंतर ठेऊन लावा.

.

ओव्हन २०० डीग्रीवर प्री-हीट करुन घेणे. तयार केलेल्या पफ पेस्ट्रीच्या तुकड्यांना ओव्हनमध्ये ठेऊन १५ मिनिटे बेक करुन घेणे.

.

१५ मिनिटांनी ट्रे बाहेर काढून खारी बिस्किटे उलटे करून ठेवणे आणी पुन्हा ओव्हन १८० डिग्रीवर सेट करुन १०-१५ मिनिटे बेक करणे. (१०-१५ मिनिटानंतर देखील खारी जर थोडी मऊ वाटत असेल तर १५० डिग्रीवर ५ मिनिटे बेक करणे)

.

खारी तयार झाल्यावर कुलिंग रॅकवर काढून ठेवाव्यात. पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्यात.

.

मी काही प्लेन खारी बिस्किटे ही बनवली . बघा किती छान पदर पडले आहेत ते :)

.

कुरकुरीत खारी चहासोबत खायला तयार आहे :)

.

नोटः
तुम्ही जीर्‍या ऐवजी ओवा घालू शकता.
कसुरीमेथी घालून मेथी-खारी ही तयार करता येते.
साखर ही भुरभुरुन बनवता येते.
साध्या जीर्‍याऐवजी शाहीजीरे ही वापरु शकता.

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

24 Feb 2012 - 6:26 am | इन्दुसुता

उत्कृष्ट. माझ्या आवडीचा पदार्थ. नक्की करणार ( मग तुम्हाला कळवेन रिपोर्ट )

पाषाणभेद's picture

24 Feb 2012 - 6:41 am | पाषाणभेद

एकदम मस्त आहे. आताच्या सकाळी मला त्याची फार फार आवश्यकता आहे.

पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक याचे भारतीय पदार्थात कोणते स्वरूप आहे? मैदा? रवा? कणीक?
पेस्ट्री शीट्स हे एकावर एक थर ठेवून लाटायचे काय?

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2012 - 9:21 am | सानिकास्वप्निल

पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक हे मैदा+बटर पासून बनवलं जातं.

http://www.youtube.com/watch?v=x9sE0cisM58

ह्या व्हिडियोमध्ये पफ पेस्ट्री कशी बनवतात ते दिले आहे :)

पेस्ट्री शीट्स हे तयार थर असतात , आपल्याला हवे तेव्हा डायरेक्ट शीट्स घेऊन खारी बनवता येते.पूजा तुला जर सेन्सबरीचा पफ पेस्ट्री ब्लॉक मिळत असेल तर तू त्याचे दोन भाग करुन सरळ जाड पोळी लाटू शकतेस आणी बेक करु शकतेस.

जेनी...'s picture

24 Feb 2012 - 9:24 am | जेनी...

वाव ..हे तर आनखिन सोप्प ....:)

ह्या रविवारि ..
बिस्किट आणि खारी ;)

प्राजु's picture

24 Feb 2012 - 6:52 am | प्राजु

मी केला हा प्रकार एकदा.
मी त्याला मध्ये पीळ दिला होता.. पण ते काही नीट झाले नाही. पण नुसतेच सुट्टे सुट्टे स्ट्रीप्स ठेवले होते.. ते छान फुलले.
पण मऊ पडले.. अजून थोडा वेळ बेक करायला हवे होते.
मस्त गं

प्रचेतस's picture

24 Feb 2012 - 8:35 am | प्रचेतस

पाकृ मस्त एकदम. आजच आणतो आता मार्केटातून.
पण शीर्षक वाचून मॉनेको वैग्रे खार्‍या बिस्किटांची पाकृ डोळ्यांसमोर आली
इथे त्याला फक्त 'खारी'च म्हणतात.

पियुशा's picture

24 Feb 2012 - 10:14 am | पियुशा

+१००० टू वल्ली
पण शीर्षक वाचून मॉनेको वैग्रे खार्‍या बिस्किटांची पाकृ डोळ्यांसमोर आली
इथे त्याला फक्त 'खारी'च म्हणतात.

सॉल्लिड ,आपला आवड्ता प्रकार आहे चहाबरोबरचा :)

मस्तच ..मीहि ट्राय करुन बघते .

पन ते एकावर एक असे थर देवुन लाटायचे का?

ते तेवढ क्लिअर कर .

सन्बरिचेच पेस्ट्री ब्लॉक माझ्या इथेहि मिळ्तात
:)

उत्तम पाकृ.

आम्ही या एका तरी बाबतीत नशीबवान. घराच्या जवळ
बेकरी आहे.
बेकरी म्हणजे दुकान नव्हे .
जिथे खारी बेक करतात ते.

तस्मात गरमागरम खारी मिळते योग्यवेळ
साधून गेल्यास.

मी ही खारी गरम आमटीत भिजवून खायचो.. लहानपणी.

ई ई करण्यापूर्वी खाऊन पहा हे कोम्बो.

ई ई करण्यापूर्वी खाऊन पहा हे कोम्बो.

हे वाक्य वाचन्यापूर्विच तोन्डातुन ईईईईईईईईईईईई आलं ..त्यात आमचा काय दोष :(

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2012 - 9:22 am | सानिकास्वप्निल

मी ई ई ई करणार नाही कारण मला ही चहामध्ये खारी कुस्करून त्याचा लगदा करुन खायची सवय होती / आहे ;)

स्मिता.'s picture

24 Feb 2012 - 2:02 pm | स्मिता.

मी पण ईईईऽऽऽऽ नाही केलं. मलाही खारी/बिस्किटं चहात पार भिजवून लगदा झालेली आवडतात. लहानपणी चुकून होणार्‍या गोष्टिची नंतर आवडच जडली ;)
पाकृ नेहमीप्रमाणेच छान आणि सोप्पी आहे.

मेघवेडा's picture

24 Feb 2012 - 2:53 pm | मेघवेडा

चहातली लगदा खारीच बेष्ट लागते!
आमटीत घालूनही सुपर लागते!

पाकृ मस्त! बेक करताना दोन शीट्सच्या मध्ये भाजी घालून पॅटिसही झकास होतात!

लई भारी मी तर खारी हा प्रकार चहात घालुन लगदा करुनच खातो, आणि जिरा बटर आमटीत घालुन उकळायचे ते सुद्धा जाम भारी लागतात, खारी आणि आमटी हा प्रकार पण मस्तच लागतो.

अजुन एक प्रकार आहे, शेव पुरी करतात तसं पुरीच्या ऐवजी खारी टाकुन खायचं, हा सुद्धा प्रकार जाम भारी लागतो.

प्राजु's picture

24 Feb 2012 - 10:21 pm | प्राजु

अहो चहा - खारी चांगलीच लागते... जाम आवडते.
पण आमटी म्हणजे....!! उद्या कढीतसुद्धा भिजवून खाईल पब्लिक .. नहीतर... सूप, तांबडा-पांढरा रस्सा... अगदीच गेला बाजार सॉफ्ट ड्रिंक्स....काही सांगता नाही येत.

प्रभो's picture

24 Feb 2012 - 8:56 am | प्रभो

झकास!!

रेवती's picture

24 Feb 2012 - 9:09 am | रेवती

भारी, भारी, त्रिवार भारी.
किती वर्षं झाली खारी खाऊन.
इथे मिळते पण आणली नाही कधी.
आता करून पाहीन.

प्रभाकर पेठकर's picture

24 Feb 2012 - 10:42 am | प्रभाकर पेठकर

उष्मांकांकडे डोळेझाक करायची झाल्यास खारी म्हणजे अगदी 'लय भारी'.
पाककृती साधी सोपी आणि आकर्षक आहे. करून पाहीन म्हणतो.
छायाचित्र क्रमांक पाच पर्यंत खारीचा रंग अगदी छान सोनेरी आहे पण क्रमांक ६,७,८ मधली खारी, नववधूसारखी, हळद लावलेली का दिसते आहे?

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2012 - 7:05 pm | सानिकास्वप्निल

पेठकर काका , खारी बनवून पूर्ण तयार होईपर्यंत संध्याकाळ झाली होती (दिवस लहान असल्याने बाहेर अंधार पडला होता) म्हणून घरातील लाईटमुळे शेवटचे काही फोटो पिवळसर दिसत आहेत :)

धन्यवाद.

उष्मांकांकडे डोळेझाक
झाऽऽलं, केलीत आठवण उष्मांकांची, आता किती जड जाईल खाताना.;)

प्रभाकर पेठकर's picture

5 Mar 2012 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

खाल्ल्यावर 'जड' होण्यापेक्षा, खायलाच 'जड' गेलेले सर्वार्थाने चांगले नं?

बाकी, खारीचे खूप फ्लेवर्ड प्रकार आले आहेत.. (जिरे, मसाला, मेथी आणि अन्य ..) पण सर्व एकेकदाच ट्राय करुन मत झालंय की प्लेन मस्का खारीतच खरी मजा आहे..

प्रभाकर पेठकर's picture

24 Feb 2012 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर

१००% सहमत. मुळ मस्का खारीची चव दुसर्‍या कश्श्शा कश्श्शात नाही.
वेफर्स मध्येही मला मुळ सॉल्टी चवच आवडते. इतर चिझ, बार्बिक्यू, चिली, टोमॅटो इ.इ.चवीत मजा नाही.

जाई.'s picture

24 Feb 2012 - 10:53 am | जाई.

मस्त

विसोबा खेचर's picture

24 Feb 2012 - 11:02 am | विसोबा खेचर

!!!!!!!!

जयवी's picture

24 Feb 2012 - 1:46 pm | जयवी

अहा........ काय मस्त लेअर्स आल्या आहेत गं......... .............................
एकदम खुसखुशीत दिसताहेत आणि करायला पण किती सोप्या आहेत........... आवडल्याच :)

मोहनराव's picture

24 Feb 2012 - 2:51 pm | मोहनराव

खारी खुप आवडता प्रकार आहे आपला! जाम मजा येते बुवा चहाबरोबर हाणायला! गवि म्हणाले त्याप्रमाणे आमटीबरोबर कधी खाउन पाहीले नाही, पण ट्राय करावे म्हणतो. बाकी फोटो आणी पाककृती लाजवाबच!

नितिन थत्ते's picture

24 Feb 2012 - 3:34 pm | नितिन थत्ते

खारी खावीत तर डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या खारीवाल्याकडची (बेकरीतली)

असो. ही पण खारी छानच दिसत आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2012 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

@डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या खारीवाल्याकडची>>> नुसती खारीच नाही...नाsssनकेट आणी टोsssच सुद्धा :-)

खारी छान झालीये..पण-घरात बनू शकते,हे पाहुन मौज वाटली

निवेदिता-ताई's picture

24 Feb 2012 - 4:49 pm | निवेदिता-ताई

एकदम झकास ह.....

आता फ्रोझन पफ पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक शोधणे आले....:D

एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. तयार पेस्ट्री शीट्सपासून खारी बनवण्याची आयडिया चांगली आहे..

पण त्याहूनही मुळात मैदा, बटर आणि मूळ पदार्थांपासून खारी बनवण्याची कृतीही खास वाटेल.

आत्ताची कृती साधारणपणे कमर्शियल चॉकलेटच्या स्लॅब आणून, वितळवून, साच्यात ओतून परत सेट करणे आणि ही चॉकलेटची कृती समजणे अश्या प्रकारची आहे..

याही पद्धतीत "चूक" असं काहीच नाही पण सगळी टेस्ट ही त्या पेस्ट्री शीट बनवणार्‍या उत्पादकावर (थर्ड पार्टी) अवलंबून आहे.. आपल्या हाताची खास चव येण्यास वाव नाही..

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2012 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा

@याही पद्धतीत "चूक" असं काहीच नाही पण सगळी टेस्ट ही त्या पेस्ट्री शीट बनवणार्‍या उत्पादकावर (थर्ड पार्टी) अवलंबून आहे.. आपल्या हाताची खास चव येण्यास वाव नाही..>>> येस येस...यहीच बोल्ता है हम भी

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2012 - 7:10 pm | सानिकास्वप्निल

पण त्याहूनही मुळात मैदा, बटर आणि मूळ पदार्थांपासून खारी बनवण्याची कृतीही खास वाटेल.

अगदी सहमत पण मी ह्या आधी कधी खारी बनवली नाही आणी वरील कृती वेळखाऊ व मेहनतीची आहे. एवढी मेहनत घेऊन जर का कुठे "चूक" झाली तर केलेली मेहनत वाया जाईल :(

तरीही एकदा करून बघायचा विचार आहे ..

तुमचे म्हणणे पटते आपल्या हाताची खास चव येण्यास वाव नाही.. पण काय करणार दुधाची तहान ताकावर भागवली इतकचं :)

धन्यवाद.

बेकरी मधुन चांगल्या खारी मिळतात. चहात बुडवुन नंतर त्या चमच्याने खायला मला आवडतात.

सुहास झेले's picture

5 Mar 2012 - 2:52 pm | सुहास झेले

काय बोलणार... मला हा प्रकार घरी करता येतो यावर विश्वास बसत नाही आहे... ;)

एकदम भन्नाट पाककृती :) :)