खारी बिस्किट
खारी बिस्किट हे सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. आता त्यात ही आपल्या भारतात बेकर्यांमध्ये सहज उपल्बध असते मग कशाला कोणी हे बनवण्याच्या भानगडीत पडेल ;)
हल्ली परदेशातही बर्याच ठिकाणी एशियनशॉपमध्ये ही खारी, टोस्ट, नानकटाई अगदी सहज मिळून जाते , पण आमच्यासारखे खारीप्रेमी ज्यांना इग्लंडात (शेफिल्ड) राहूनही मिळत नाही त्यांना तर फक्त आठवणीनेच पोट आणी मन भरुन घ्यावं लागतं.
असं नाही की मिळत नाही , ६-७ मैलावर आहेत आशीयाई दुकाने तिकडे अगदी क्वचीतच चांगल्या क्वालिटीची मिळते मग कधी खावसं वाटलं तर ती लगेच आणून खाऊ असे ही करता येत नाही :( , म्हणून मग घरी झटपट खारी कशी बनवता येईल त्याची पाकृ देत आहे :)
साहित्यः
फ्रोझन पफ पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक
जीरे (ऐच्छिक)
पाकृ:
प्रथम पेस्ट्री शीट्स किंवा पेस्ट्री ब्लॉक थॉ (रुम टेम्परेचरला) करुन घ्या.
स्वयंपाकघराचा ओटा स्वछ पुसून घ्या व त्यावर थोडा मैदा भुरभूरुन घ्या.
त्यावर पेस्ट्री शीट्स ठेवा व जीरे भुरभूरुन हलकेच लाटण्याने लाटून घ्या. (मी पेस्ट्री ब्लॉकचा वापर केला आहे )
आता सुरीने आयताकृती खारी तयार करा व बेकिंग ट्रेमध्ये अंतर ठेऊन लावा.
ओव्हन २०० डीग्रीवर प्री-हीट करुन घेणे. तयार केलेल्या पफ पेस्ट्रीच्या तुकड्यांना ओव्हनमध्ये ठेऊन १५ मिनिटे बेक करुन घेणे.
१५ मिनिटांनी ट्रे बाहेर काढून खारी बिस्किटे उलटे करून ठेवणे आणी पुन्हा ओव्हन १८० डिग्रीवर सेट करुन १०-१५ मिनिटे बेक करणे. (१०-१५ मिनिटानंतर देखील खारी जर थोडी मऊ वाटत असेल तर १५० डिग्रीवर ५ मिनिटे बेक करणे)
खारी तयार झाल्यावर कुलिंग रॅकवर काढून ठेवाव्यात. पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्यात.
मी काही प्लेन खारी बिस्किटे ही बनवली . बघा किती छान पदर पडले आहेत ते :)
कुरकुरीत खारी चहासोबत खायला तयार आहे :)
नोटः
तुम्ही जीर्या ऐवजी ओवा घालू शकता.
कसुरीमेथी घालून मेथी-खारी ही तयार करता येते.
साखर ही भुरभुरुन बनवता येते.
साध्या जीर्याऐवजी शाहीजीरे ही वापरु शकता.
वाचन
13915
प्रतिक्रिया
35
उत्कृष्ट. माझ्या आवडीचा
एकदम मस्त आहे. आताच्या सकाळी
In reply to एकदम मस्त आहे. आताच्या सकाळी by पाषाणभेद
@पाभे, पूजा पवार
In reply to @पाभे, पूजा पवार by सानिकास्वप्निल
वाव ..हे तर आनखिन सोप्प
मी केला हा प्रकार एकदा. मी
पाकृ मस्त एकदम. आजच आणतो आता
In reply to पाकृ मस्त एकदम. आजच आणतो आता by प्रचेतस
+१००० टू वल्ली पण शीर्षक
मस्तच ..मीहि ट्राय करुन बघते
उत्तम पाकृ. आम्ही या एका तरी
In reply to उत्तम पाकृ. आम्ही या एका तरी by गवि
ई ई करण्यापूर्वी खाऊन पहा हे
In reply to उत्तम पाकृ. आम्ही या एका तरी by गवि
मी ई ई ई करणार नाही
In reply to मी ई ई ई करणार नाही by सानिकास्वप्निल
हे हे हे
In reply to हे हे हे by स्मिता.
+ १
In reply to + १ by मेघवेडा
लई भारी मी तर खारी हा प्रकार
In reply to लई भारी मी तर खारी हा प्रकार by ५० फक्त
अहो चहा - खारी चांगलीच
झकास!!
भारी, भारी, त्रिवार
मस्तं....
In reply to मस्तं.... by प्रभाकर पेठकर
@ पेठकर काका
In reply to मस्तं.... by प्रभाकर पेठकर
उष्मांकांकडे डोळेझाक झाऽऽलं,
In reply to उष्मांकांकडे डोळेझाक झाऽऽलं, by रेवती
जड..
बाकी, खारीचे खूप फ्लेवर्ड
In reply to बाकी, खारीचे खूप फ्लेवर्ड by गवि
१००% सहमत...
मस्त
!!!!!!!!
सही !!
मस्त!!
खारी खावीत तर डोक्यावर ट्रंक
In reply to खारी खावीत तर डोक्यावर ट्रंक by नितिन थत्ते
@डोक्यावर ट्रंक घेऊन
एकदम झकास ह..... आता फ्रोझन
एक गोष्ट नोंदवावीशी वाटते.
In reply to एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. by गवि
@याही पद्धतीत "चूक" असं काहीच
In reply to एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. by गवि
सहमत!
आमच्या इकडे कोल्हापुरात
काय बोलणार... मला हा प्रकार