भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?

चेतनकुलकर्णी_85's picture
चेतनकुलकर्णी_85 in काथ्याकूट
15 Feb 2012 - 10:29 pm
गाभा: 

मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली.
ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे.. पण ह्याच कंपन्या अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?(उदाहरणार्थ "MATLAB",ANSYS,PSpice).
कि या कंपन्या फक्त "support" देण्याचे काम करीत आहेत...मला माहित आहे कि बँकिंग क्ष्रेतात काही भारतीय कंपनी अग्रेसर आहेत मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत???
मिपा वर बरेच "IT" मधील बरीच तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत असे माहित आहे म्हणून योग्य उत्तराच्या अपेक्षेत.... :)
ह्या लेखाने मला IT and non IT हा वाद मला बिलकुल काढायचा नाहीये.... ;)

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

15 Feb 2012 - 10:33 pm | आनंदी गोपाळ

इथे माझा नं. पहिला ;)
सोळा दुणी आठ असे म्हणून पॉपकॉर्न खात बसलो आहे

चेतनकुलकर्णी_85's picture

15 Feb 2012 - 10:38 pm | चेतनकुलकर्णी_85

आयला ,,मंजे आता माझे काय चुकले बुवा...??? कि प्रश्न पण विचारायचे नाहीत प्रामाणिक पणाने??? :( कि मिपाची कोणती आचारसंहिता आहे जिचे मी उल्लंघन केले आहे राव?

आनंदी गोपाळ's picture

15 Feb 2012 - 10:45 pm | आनंदी गोपाळ

तुंचं काहीच चुक्लं नै.
धागा जोरदार आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य चाल करून येणारे. मी आधीच विंगेतली सीट पकडून बस्लो आहे. इतकंच.

ता.क.
माझं फॉर्मल ट्रेनिंग आय्टी मधे नाही.
पण मला या विषयाबद्दल फार प्रश्न आहेत. मी 'कॉम्प्युटर' नावाची वस्तू २८६ होती, तेव्हापासून वापरतो आहे. भारतीय १२वी पास 'कॉम्प्युटर तज्ञाने' 'वर्डस्टार' वापरून लिहिलेला 'प्रोग्राम' वाचून आवाक होण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. प्रस्तुत लेखातील विचारांशी मी सहमत आहे असे इथे नोंदवून पुढील चर्चा वाचण्याच्या उत्सुकतेत पॉपकॉर्न खात बसलो आहे.

चिरोटा's picture

15 Feb 2012 - 11:11 pm | चिरोटा

मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत???

माझा पूर्वी autocad पुरताच संबंध आला होता. माझ्यामते अभियांत्रिकी सॉफ्टवेयर business software पेक्षा बनवणे अधिक क्लिष्ट असते. सध्याचे autocad बघितलेत ,आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे सॉफ्टवेयर बनवायचे ठरवलेत तर कदाचित माझ्या अंदाजानुसार कमीत कमी ३०० माणसांना(programmers) ४/५ वर्षे लागतील. एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर किती प्रमाणात खपेल,मार्जिन किती मिळेल हाही मुद्दा आहे. अभियांत्रिकीतील संकल्पना आणि graphics,programming वगैरे ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीं अवगत असलेली माणसे भारतात कमी आहेत. हे ही एक कारण आहे.
Geometric software वगैरे काही कंपन्या ह्यात काम करतात. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर मध्ये business software पेक्षा (गुंतवणुकीच्या प्रमाणात)मार्जिन,गिर्‍हाईक कमी असते असा माझा अंदाज आहे.

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

याबद्दल आम्हालाही काही मूलभूत प्रश्न विचारायचे आहेत, पण ते नंतर.

चेतनकुलकर्णी_85's picture

15 Feb 2012 - 11:22 pm | चेतनकुलकर्णी_85

एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर किती प्रमाणात खपेल,मार्जिन किती मिळेल हाही मुद्दा आहे.

हो..हि वर उल्लेख केलेली "softwares" वापरताना मनातून खरोखरच त्या लोकानन दाद द्यावी लागते...पण तरीही ह्या softwares च्या किमती अव्वाच्या सव्वा असतात त्यामुळे उपभोक्ते जरी कमी असले तरी आमदनी चांगली व्यायला काही हरकत नाही...शिवाय ह्या "softwares नुसते तयार करून उपयोग नाही त्याच्या प्रशिक्षणा साठी पण ह्या कंपनी मजबूत फी आकारतात .. :) ह्याचाच अर्थ असा आहे कि profit margin कमी असण्याचे काही एक कारण नाही..फक्त संबंधित कंपनी ला कुशल व तरबेज अभियान्तांची टीम तयार करावी लागेल व काही काल द्यावा लागेल...हे सहज शक्य आहे...

चिरोटा's picture

15 Feb 2012 - 11:39 pm | चिरोटा

आम्दनी चांगली असलीच पाहिजे.पण गुंतवणूकीच्या प्रमाणात मार्जिन किती हे ही महत्वाचे आहे.उ.दा. autocad चे मार्जिन अर्थातच बरेच असेल पण ही कंपनी १९८२ पासून त्यात आहे.असल्या सॉफ्टवेयरच्या किंमती अवाच्या सव्वा असतात हे मान्य आहे.३०० माणसांचा ४ वर्षाचा पगार आणि ईतर खर्च किती(कोटी) येईल? कंपनीत ज्यांनी गुंतवणू केली असेल ते (venture capitalists!) एवढा वेळ थांबतील?

चेतनकुलकर्णी_85's picture

15 Feb 2012 - 11:45 pm | चेतनकुलकर्णी_85

प्रत्येक IT कंपनीत कायम ठराविक माणसे बेंच वर असतात असे अनेक मित्रान कडून ऐकून आहे.. ३०० लोकांच्या आकडा ह्या बेंच वरील लोकां पेक्ष नक्कीच नगण्य असेल...
जर प्रस्तापित कंपनी ला टक्कर देणे जर काह्रेच एवढे कठीण असेल तर एवढ्या शेकडो कंपन्या उदायासच आल्या नसत्या ....सर्वच क्ष्रेत्रात...

चिरोटा's picture

16 Feb 2012 - 12:10 am | चिरोटा

सॉफ्ट्वेयरमध्येही प्रत्येक क्षेत्र निराळे आहे. social networking/search engine साईट काढून करोडपती १/२ वर्षात होणे एकवेळ सोपे आहे पण अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवून ते विकून करोडपती होईपर्यंत निवृत्तीची वेळ येईल.! माझ्याकडे आकडा नाही पण (भारतात वा एतरत्रही)अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवणार्‍या कंपन्या business software बनवणार्‍या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्या पाहिजेत.कदाचित १:५० ?
वर म्हंटले आहे तसे दोन्ही गोष्टींवर कमांड असणारे मनुष्यबळ आपल्याकडे कमी आहे. नुसते प्रोग्रॅमर्स संख्येने अधिक असून उपयोग नाही. business सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी (बर्‍याच वेळा) संगणक विज्ञान्,तर्क आणि संगणक प्रणाली पुरते. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवताना ह्यात अभियांत्रिकीच्या संकल्पनांची भर पडेल. उ.दा. differential equation सोडवणारे सॉफ्ट्वेयर बनवायचे तर आधी differential equation संगणक न वापरता कसे सोडवायचे ह्याची माहिती हवी.

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 3:13 pm | वपाडाव

मला चिरोटा यांच्या भाष्यात काही भर घालायची आहे...
मुद्दे क्रमवार येणार नाहीत, कारण जसे आठवले तसे लिहित आहे...

* सर्वप्रथम - कंप्युटर जिथे विकसित झाला अन गणिती अल्गोरिदम्स ज्या देशांनी लिहिले, (हे बर्‍यापैकी युरोपात झाले आहे). त्यांनी ही सॉफ्टवेअर तयार करण्याची शक्कल लढवली. कारण हाताने ड्रॉइंग्स काढुन त्यांचे आकलन करण्यात खुप वेळ जात असे.

*मग द्विमितीय नंतर त्रिमितीय (2D-3D) सॉफ्टवेअर तयार केले. ह्या मंडळींनी अश्या प्रकारच्या कोडिंगची बेसिक प्रोसिजर तयार केली. ते त्यात प्रविण झाले.

*भारतात हे सर्व कालांतराने आले. आपण ह्या काळात (वैज्ञानिक शोध आणि गणितीय सुत्रे जेव्हा ऑन हाय-एकोणिसावे शतक- होती) पारतंत्र्यात होतो. त्यामुळे आप्लयाकडे R&D थोडेसे उशिरा सुरु झाले.

*जर ती मंडळी, आपल्या २०-२५ वर्षे आधी(१९७०-७५) कंप्युटिंगच्या मागे लागली तर निश्चितच ती ह्यात अग्रेसर असणार. म्हणजे आपण कोणती गोष्ट शुन्यापासुन पुर्णत्वाकडे नेण्याचा विचार करत असताना ती मंडळी त्याच गोष्टीत अजुन विविधता आणि 'ईज ऑफ युज' कशी आणता येइल हे बघत असणार.

*अन साहजिकच आपण ज्या सेवा देणार त्यात आपण जास्त खर्च केला असल्या कारणाने त्यांचे बाजारी मुल्य जास्त असणार. पण या उलट ते सुधारलेली सेवा आपल्यापेक्षा कमी पैशात उपलब्ध करुन देउ शकत असल्याने बाजारात त्यांचे नाणे चलनी असणार.

*सर्वात महत्वाचं म्हणजे, हे सॉफ्टवेअर बणवण्यासाठी त्यांच्याकडे डेडिकेटेड स्टाफ असणार. म्हणजेच मॅनपॉवर, जे की आपल्या देशात (अर्थात आयटीत) कमी आहे.

* पण तरीही Ansys, Geometric, Siemens या कंपन्यामध्ये बर्‍याच प्रमाणावर भारतीय ह्या सॉ. डेव्हलपमेंटच्या कामात गुंग असलेले आढळुन येतात.

चिरोटा's picture

16 Feb 2012 - 5:16 pm | चिरोटा

जर ती मंडळी, आपल्या २०-२५ वर्षे आधी(१९७०-७५) कंप्युटिंगच्या मागे लागली तर निश्चितच ती ह्यात अग्रेसर असणार

हे एक महत्वाचे कारण आहे. हे सगळे करण्यासाठी जी ईको सिस्टिम लागते ते आपल्याकडे नाही. विद्यापीठे,संशोधन्,मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवू पाहणारे गुंतवणूकदार ही साखळी लागते. एका प्रतिसादात भारताकडे एकही जगभर मान्य असलेली operating system/language नाही असे लिहिले आहे. ईतिहास पाहिलात तर Berkley,MIT,Stanford,Waterloo वगैरे विद्यापीठांनी ५०/६०च्या दशकातच ह्यात काम करायला चालु केले होते.BSD(लिनक्स),Watcom compiler ही काही उदाहरणे आहेत. LISP भाषा जी AI मध्ये वापरली जाते ती १९५८ साली Stanford जॉन मॅकार्ती ह्यांनी बनवली होती. ही अशी पार्श्वभूमी असताना भारतिय आय टी कंपन्यांनी/लोकांनी काही तरी भव्य्-दिव्य करावे म्हणजे KFC/McDवाले पुरणपोळी,मसालेभात का बनवत नाहीत असे विचारण्यासारखे आहे.

विजुभाऊ's picture

17 Feb 2012 - 11:57 am | विजुभाऊ

ईतिहास पाहिलात तर Berkley,MIT,Stanford,Waterloo वगैरे विद्यापीठांनी ५०/६०च्या दशकातच ह्यात काम करायला चालु केले होते
हे अगदी योग्य बोललात. आपली विद्यापीठे आनि त्यातील विद्यार्थ्यांकडून जे संशोधन होते ते किती जणाना उपलब्ध होते हो?
विद्यापीठात असलेले प्रबंध रद्दीच्या गठ्ठ्यात पडून असतात. त्यांचा उपयोगच कोणाला होत नाही.
दुसरे म्हणजे बहुतेकदा संशोधन म्हणजे त्यात नवे काहीच नसते कोणी काय म्हंटले आहे त्यावर कोणाचे काय म्हणणे आहेह याचीच जास्त चर्चा असते. तुम्ही नवे काही मांडले तर त्याचा काहीच उहापोह करणे मान्यच नसते

अन्या दातार's picture

17 Feb 2012 - 12:40 pm | अन्या दातार

फ्रेम ऑफ रेफरन्सचा प्रश्न आला.

आपली विद्यापीठे आनि त्यातील विद्यार्थ्यांकडून जे संशोधन होते ते किती जणाना उपलब्ध होते हो?

यापेक्षा, इंडस्ट्रीतील किती लोक यातले कुठले संशोधन आपण आपल्या कामात वापरु शकू याचा विचार करतात? किती कंपन्या विद्यापीठांशी संपर्क साधून तेथील संशोधन कार्याचा वापर करतात?

दुसरे म्हणजे बहुतेकदा संशोधन म्हणजे त्यात नवे काहीच नसते कोणी काय म्हंटले आहे त्यावर कोणाचे काय म्हणणे आहेह याचीच जास्त चर्चा असते. तुम्ही नवे काही मांडले तर त्याचा काहीच उहापोह करणे मान्यच नसते

तुम्ही जर ठरावीकच भाग वाचला (लिटरेचर रिव्यु) तर हे दिसेल. संपूर्ण वाचल्यास नवे काय ते पुढे येईल. :)
काही पेपर्स हे फक्त लिटरेचर रिव्यु असतात जे इतर संशोधकांसाठी उपयुक्त असतात. सगळेच रिसर्च पेपर्स असे नसतात.

कुंदन's picture

15 Feb 2012 - 11:27 pm | कुंदन

सपोर्ट मध्येच इतका पैसा मिळत असताना उगाच जास्त त्रास का करुन घ्यावा डोक्याला ?

--(प्रॉडक्शन सपोर्ट कम फंक्शनल कम टेक्निकल कंसल्टंट) कुंदन

Nile's picture

16 Feb 2012 - 12:07 am | Nile

पैशाच्या मागे पळण्याची अनिवाशी आयटी-वृत्ती पाहून ड्वाळे पाणावले. देशप्रेम वगैरे काही आहे की नाही, आँ?

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Feb 2012 - 12:17 am | चेतनकुलकर्णी_85

आता विषय काढला आहे म्हणून सांगतो... देश प्रेम खूप दूरची गोष्ट झाली...अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा...

कुंदन's picture

16 Feb 2012 - 12:31 am | कुंदन

कीव का म्हणे यायची? जरा इस्कटुन सांगा की?
वर्षाच्या ३६५ दिव्सांमध्ये मला वाट्ट ९० + ९० म्हण्जे एकुण १८० दिवसच अभियान्त्रीकी कॉलेज मध्ये शिकवणे होते.
आता कीव कोणाची करायची? विद्यार्थ्यांची की अभ्यासक्रम ठरवणार्‍यांची?
बाकी ...चालु द्या.

क्लिंटन's picture

16 Feb 2012 - 9:45 am | क्लिंटन

अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा

मग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?

अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा

मग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?

शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.

क्लिंटन's picture

16 Feb 2012 - 10:29 am | क्लिंटन

शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.

ज्याचा त्याचा चॉईस दुसरे काय? काही मंडळी दिवसरात्र अभ्यास करतात तर काही आपला वेळ खेळ/चित्रपटे किंवा इतर गोष्टींमध्ये घालवतात.इतर कोणी काही केले त्याबद्दल किव वगैरे करणे फारसे समजले नाही. असो.

Nile's picture

16 Feb 2012 - 10:51 am | Nile

शकुंतला देवींची पझल्स वगैरेची पुस्तकं पाहिली आहेत, पण ९५% लोक हे का सोडवायची? आपण तर साला एकाला पण नाय बघितला सोडवताना.

आम्हाला तर इंजिनीअरींगला जाण्यार्‍यांचीच कीव यायची आणि येते... आता बोला. ;-)

काय कीव कीव आपलं चीव चीव चालवली आहे रे बाळांनो?

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Feb 2012 - 12:19 am | लॉरी टांगटूंगकर

आपली मेकेनिकल इंडस्ट्री मुख्यतः प्रोसेस इंडस्ट्री आहे,नवीन प्रोडक्ट बनवण्यापेक्षा रिव्हर्स इंगीनीरिंग वर बऱ्याचदा भर दिसतो.आपल्या कडे मनुष्यबळ स्वस्त आहे तर ते वापरून bulk manufacturing हेच ध्येय दिसते.डिझाईन बहुतांश वेळा outsourse करतात(किंवा कोपी पेस्त करतात ) कारण आपला मुख्य फायदा mass manufacturing वर आहे.
सोफ्टवेरचा वापर कमी आहे अशातला भाग नाही पण आहे तर कश्याला नवीन करा??मुख्य फायद्याचा सोर्स वेगळा आहे .

जोशी 'ले''s picture

16 Feb 2012 - 9:54 pm | जोशी 'ले'

मॅकॅनिकल इंडस्ट्री बद्दल तुमच्या मतां बद्दल प्रचंड असहमत आपल्या इथे हि खुप नविन डेव्हलपमेंट ची कामे व व्हेल्यु इंजी. ची कामे होतात. आणि महत्वाचे असे कि ते स्वस्ता मधे होतात....

"सर्व्हिस" देणारे स्वतःच्या कामाला कमी का लेखतात अजूनही कळलेले नाही. फक्त काही "बिल्ड" करणे म्हणजे हुच्च असा काही नियम आहे का?

हुप्प्या's picture

16 Feb 2012 - 2:22 am | हुप्प्या

सेवा देणारे हे कमी समजले जातात कारण त्या कामाला वलय नाही.
सिनेमात काम करणारे नट वा दिग्दर्शक आणि सिनेमा दाखवणारे थेटरचे कर्मचारी आणि मालक ह्यांना मिळणार्या मानात फरक आहे की नाही?
फार काय, सिनेमा नटाइतके सिनेमाचा कॅमेरामन, वेगवेगळी दृश्ये संपादित करुन विकण्याजोगा, सलग सिनेमा बनवणारे तंत्रज्ञ ह्यांचा उदोउदो होत नाही.
गाणे गाणारे, संगीत देणारे ह्यांना लोक डोक्यावर घेतात पण त्यांना उत्तम साथ देणारे वादक, रेकॉर्ड तंत्रज्ञ, गीतकार ह्यांच्याकडे तसे दुर्लक्षच होते.
मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, टाटा हे कार बनवणारे आणि त्या दुरुस्त करणारे ह्यांना मिळणारा मान सारखा असतो का? अर्थातच नाही.
काही तरी नवे निर्माण करणार्‍याला जास्त प्रसिद्धी, नाव मिळतेच मिळते. हाच जगाचा न्याय आहे.

आर्थिक फायदा असा आहे की नवे उत्पादन पैसे मिळवून देत रहाते. उत्तम सिनेमा, उत्तम गाणे, उत्तम सॉफ्टवेअर अनेक वर्षे विकले जाते आणि मालकाला पैसे मिळवून देत रहाते. उदा. मायकेल जॅक्सनची गाणी आज २०-२५ वर्षांनंतरही विकली जात आहेत. मायक्रोसॉफ्टचे विंडोज एक्स पी अजून विकले जाते आहे.
सर्विस देणार्‍या लोकांना तसा पैसा फार काळ मिळत नाही. जितना काम उतनाही दाम.

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 3:17 pm | वपाडाव

आवडला

मराठी_माणूस's picture

17 Feb 2012 - 8:28 pm | मराठी_माणूस

गाणे गाणारे, संगीत देणारे ह्यांना लोक डोक्यावर घेतात पण त्यांना उत्तम साथ देणारे वादक, रेकॉर्ड तंत्रज्ञ, गीतकार ह्यांच्याकडे तसे दुर्लक्षच होते.

ही analogy "सेवा देणारे" च्या संदर्भात चुकीची वाटते. वादकांकडे होणारे दुर्लक्ष हे लोकांचे वाद्या संबंधी , त्याच्या तंत्रा संबंधी असणार्‍या अज्ञानामुळे असते. कित्येक वेळा लोकांना वाद्यांची नावे पण व्यवस्थित माहीत नसतात. अन्यथा वाद्य वाजवणे ही एक अफलातुन कला आहे.
IT मधील सेवा क्षेत्रात मात्र फारसे उल्लेखनिय असे काही नाही.

दादा कोंडके's picture

17 Feb 2012 - 8:37 pm | दादा कोंडके

सहमत.

मागे कुणीतरी, आपण घरकाम करणं शक्य असतानाही ते काम मोलकरीण/नोकर ठेउन आउटसोअर्स करतो आणि वाचलेला वेळ आणी शक्ती "चांगल्या" कामासाठी वापरतो. अशी काहीतरी अ‍ॅनॅलोजी वापरली होती. तो धागा आठवत नाहिये.

खेडूत's picture

16 Feb 2012 - 1:44 am | खेडूत

हा एक मोठाच विषय आहे.
अभि. सोफ्ट्वेअर बाबत सगळ्यात महत्वाचे म्हणजे खर्चिक, अर्थातच जास्त माणसे लागणारा प्रकार आहे.
आपलेच लोक तिकडे जाऊन या कंपन्यात काम करतात म्हणून वाईट वाटून घेणे किंवा खूष होणे, दोन्हीही निरर्थक आहे असे वाटते. सारा क्लियर व्यवहार आहे.
आपल्याकडे आय आय टी मध्ये या प्रकारच्या सोफ्ट्वेअर निर्मितीचे शास्त्र शिकवणारे विषय आताही आहेत. पण ते फक्त शिकण्या पुरतेच .
मुळात याला एकदम फंडू गणित वाले शेकडो लोक कंपनी कडे पायजेत.आणि ते १०-१२ वर्षे एका जागी टिकले पाहिजेत. एकदा छोट्या छोट्या खूप अल्गोरीदम्स चा संग्रह निर्माण करणे आणि मग त्यांचे उपयोजन. हे सुरु असताना नव्या संकल्पनांवर लक्ष असणे. मुख्य म्हणजे दिलेल्या माहितीवरून बराच अचूक अंदाज करू शकणारी अल्गोरीदम्स. मग त्रुटी आपोआप कमी करणारी, स्वतः शिकून पुढच्या वेळी सुधारणा करणारी अशी (भयानक ) अल्गोरीदम्स. वगैरे वगैरे ...(पी जी ला असले काहीतरी शिकवलं होतं पण ते तिथच राहिलं )

या सगळ्यात सोफ्ट्वेअर बरेच नंतर येते. त्यामुळे खूप सोफ्ट्वेअर तज्ञ पदरी असले म्हणून काही अभियांत्रिकी सोफ्ट्वेअर करता येत नाहीत. या शिवाय बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क वगैरे बाबतीत आपल्याकडे जागरूकता नाही. कारण एकदा बाजारात आणल्यावर त्याच्या नकला झाल्या तर कंपनीचे दिवाळे वाजणार. याशिवाय दर वर्षी होणारे अपडेट्स घेऊन जगभर सपोर्ट द्यावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे किंमत जास्त असणारच. सोफ्ट्वेअर ची किंमत असते हेच आपल्याला मान्य नसते तिथे असे काही तयार होणे कठीण. आणि जास्त आहे म्हणाल तर ते रुपया मधे महागच वाटणार. त्यातून येणारी उत्पादकता/ उपयुक्तता त्याच्या किमतीपेक्षा मोठीच आहे.तसे नसेल तर तुम्ही ते योग्य प्रकारे वापरत नाही आहात. उदा: MATLAB घेताना तुम्ही सगळे toolboxes न घेता हवे तेवढेच घेऊ शकता. परवाने घेण्याचे पण बरेच लवचिक पर्याय आहेत.मग किंमत जास्त कशी?

मधे भारतावर अमेरिकेने निर्बंध लादले त्या काळी कंपनी तर्फे काही संरक्षण आस्थापना बरोबर अशा प्रकारचे अगदी बेसिक काम करायची संधी मिळाली. त्या क्षेत्रात बराच वाव आहे पण सुरुवात कशी होणार हाच प्रश्न आहे! टाटा या पण क्षेत्रात येणार असं ऐकलंय, तेवढीच आशा!

बाकी आपल्या आयटी इंडस्ट्री ची तुलना यापूर्वीच दांडेकर पुलावरील कामगारांशी झाली आहे. त्याबद्दल कुणाला वाईट वाटायचं कारण नाही.

हुप्प्या's picture

16 Feb 2012 - 2:29 am | हुप्प्या

एखाद्या विषयात सॉफ्टवेअर बनवायचे असेल तर ते विकलेच पाहिजे असे नाही. ओपन सोर्स सॉफ्टवेअर नावाचा प्रकार जो अफाट लोकप्रिय आहे त्या क्षेत्रात भारताला काहीतरी करणे सहज शक्य आहे. अनेक क्षेत्रातील सॉफ्टवेअर फुकट असते अगदी सोर्स कोडसहित. पोटापाण्याचे काम संभाळून अशा कामात मदत करणारे अनेक आहेत. लिनक्ससारखे प्रोग्रॅम मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या धेंडाला जबरदस्त उत्तर देत आहेत. त्यांचे उत्पन्न कमी करत आहेत.
मॅटलॅबला उत्तर म्हणून ऑक्टेव्ह नामक उत्पादन आहे. फोटोशॉपसारखे गिम्प आहे.
ह्या कामात पैसा उत्पादनात नसून ते इन्स्टॉल करणे, त्यात नव्या गोष्टी घालणे, लोकांना ते वापरायला शिकवणे ह्यात असतो. शिवाय अशा कामात घसघशीत सहभाग असणार्‍या लोकांची कीर्ती दिगंत होते. लिनस टोरर्व्हॅल्ड्स हे नाव आपण ऐकले असेलच.

पायथन देखील मॅटलॅबला अगदी तोडीस तोड आहे

हि Linux ची निर्मितीगाथा

ह्या विषयाशी डायरेक्ट नसला तरी थोडासा संबंधीत असा माझा एक वेगळा प्रश्न आहे.
भारतीयांना (प्रामुख्याने विद्यार्थ्यांना) कोणत्या कामाविषयी 'पॅशन' वाटते? एक शेअरबाजार सोडला तर मी तरी कोणाला कोणत्यातरी वेडानं झपाटून काम करताना फारसं पाहिलेलं नाही. नाहीतर एवढी लोकसंख्या असलेल्या देशात कितीतरी बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग निर्माण व्हायला हवेत. नाही म्हणायला तशी पॅशन पारतंत्र्यात असताना कित्येक तरूणांमधे देशासाठी दिसून येत होती. क्वचित एखादा कलेचं किंवा क्रिकेटचं वेड जोपासतानाही दिसतो म्हणजे इथे पॅशनेट लोकं नाहीत असं नाही. पण ही वेडं फक्त यापुरतीच मर्यादीत आहेत. शाळा कॉलेजमधे उत्तमोत्तम सोफ्टवेअर आवडीने लिहीणारे पुढे ते वेड न जोपासता ओझ्याचे बैलच होणं जास्त पसंत का करतात?

sagarpdy's picture

16 Feb 2012 - 9:40 am | sagarpdy

कारण अगदीच सरळ आहे, संस्कार!
पिढ्यानपिढ्या आपण तेच करत आलोय
[काही सन्माननीय अपवाद वगळता]

त्याला कारण आहे...उद्या एखादा झपाटुन कामाला लागेलही पण त्याचे नातेवाईक, आई वडील वगैरे त्याला करुच द्यायचे नाहीत. नोकरी केल्याशिवाय त्यांच्या जिवाला चैन पडणार नाही..

पाश्चिमात्य देशात मुलं फार लवकर स्वतंत्र होतात अन हव्या त्या क्षेत्रात प्रयत्न करतात. नोकरीच केली पाहीजे वगैरे फंडा नसतो. लवकरात लवकर लग्न करुन सेटल होणे, पोरं काढणे हे ध्येय नसतं.

sagarpdy's picture

16 Feb 2012 - 9:53 am | sagarpdy

+1

क्लिंटन's picture

16 Feb 2012 - 10:49 am | क्लिंटन

त्याला कारण आहे...उद्या एखादा झपाटुन कामाला लागेलही पण त्याचे नातेवाईक, आई वडील वगैरे त्याला करुच द्यायचे नाहीत.

याला +अगणित. आपण ज्या पध्दतीचे आयुष्य जगलो आहोत तसेच आपल्या मुलांनीही जगावे आणि त्यापेक्षा वेगळा विचार मुलांनी करणे हे अगदी महापाप असल्याप्रमाणे पालकमंडळी आणि इतर नातेवाईक त्याला विरोध करतात-- "चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि आलाय मोठा हुषारी करणारा" अशा स्वरूपाची वाक्ये सुनावली जातात हे मी स्वतः अनेकवेळा अगदी जवळून बघितलेले आहे.

इनोव्हेशनसाठी स्वातंत्र्य लागते आणि तेच जर मिळत नसेल तर पुढचे काहीच होत नाही. मुळात कुठल्याही समाजात इनोव्हेशन करावेसे वाटणारे लोक थोडे असतात. ते करायची पात्रता असलेले लोक त्याहूनही कमी असतात. आणि जे आहेत त्यांनाही असा विरोध झाला तर त्या विरोधाला न जुमानता पाहिजे ते करणे सगळ्यांना शक्य होतेच असे नाही. आणि मग परिणाम समोरच असतो.

अमेरिकेतील लोक आपल्यापेक्षा काही फार जास्त प्रतिभाशाली आहेत असे मानायचे काही कारण नाही.पण वेगळा विचार करायची मोकळीक असणे, अमुक एक गोष्टच कर, ती अशाच पध्दतीने कर अशा स्वरूपाची सक्ती तिथे आपल्याकडे आहे त्यापेक्षा बरीच कमी असते हे वेगळे सांगायलाच नको. गेल्या शतकात अनेकविध इनोव्हेटिव्ह गोष्टी (अगदी लाइटच्या बल्बपासून गुगल, फेसबुकापर्यंत) अमेरिकेत झाल्या त्यामागे हे कारण मोठे आहे असे मला वाटते.

कुंदन's picture

16 Feb 2012 - 11:59 am | कुंदन

लग्नाशिवायच तिकडे पोरं काढणे सहज शक्य असल्याचे कानावर आले आहे , ते खरे का हो ?

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Feb 2012 - 10:34 pm | चेतनकुलकर्णी_85

लवकरात लवकर लग्न करुन सेटल होणे, पोरं काढणे हे ध्येय नसतं.

हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते कोणी सांगितले??

कळत नाही माणूस "तिकडे"" गेला कि "इकडच्या" सर्वच गोष्टीना का नाके मुरडतो...

सोत्रि's picture

16 Feb 2012 - 12:06 pm | सोत्रि

मराठे,

आपली सामाजिक उतरंड आणि जडणघडण ह्याला कारणीभूत आहे. आपल्याला आपल्या आवडीचे काम करण्याची मोकळीक असते? काल पर्यंत कोणती करीयर आपण पहात होते इंजीनीयर आणि डॉक्टर शिवाय? आज किती पालक खूष होतील त्यांच्या मुलगा जर येऊन म्हणाला की त्याला 'बार टेंडर' व्हायचे आहे किंवा 'शेफ' व्ह्यायचे आहे? 'भिकेचे डोहाळे' असे म्हणून त्याची संभावना केली जाइल.

आपण सर्वजण एका घाण्याला जुंपले गेलो आहोत. 'बक्कळ पैसा आणि स्थैर्यता'. हे झाले की आपण आयुष्यात 'सेटल' होउन जातो.

तसेच मुलांना वाढवताना आपण त्यांना किती विचार स्वातंत्र्य देतो? त्यांना आयुष्यभर आपल्या प्रेमाच्या बेगडी छायेत आपल्यासारखेच 'नोकरशहा' बनवून टकतो. पाश्चात्य जगात मुले १६ वर्षांची झाली की त्यांना आपापले पोटापाण्याचे स्वतःचे स्वतः बघावे लागेत. ती मुले पालकांच्यावर अबलंबून नसतात. त्यामुळे त्यांचे 'रिस्क अ‍ॅपेटाइट' फार जास्त असते. कुठेलेही महत्वाचे निर्णय घ्यायला ते १६ वर्षांपासूनच तयार होतात, म्हणून त्यांच्याकडे बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग तयार होतात.

पण आपली संकुचित विचारधारा पण बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग हेच तयार व्हावेत अशी आशा करते.
सर्जी बुबका, मायकल जॉर्ड्न(खेळाडू), जॉन मरे (स्कॉच तज्ञ), Steve Irwin (वन्यप्राणी तज्ञ), वीणा पाटील (केसरी ट्राव्हल्स) अश्यापैकी कुणी व्हावे असे वाटू देत नाही.

- (पॅशनेट) सोकाजी

चिंतामणी's picture

16 Feb 2012 - 12:31 pm | चिंतामणी

>>>आज किती पालक खूष होतील त्यांच्या मुलगा जर येऊन म्हणाला की त्याला 'बार टेंडर' व्हायचे आहे किंवा 'शेफ' व्ह्यायचे आहे? 'भिकेचे डोहाळे' असे म्हणून त्याची संभावना केली जाइल.

१०० % सहमत आहे. सध्याचे सांगता येत नाही. कारण आज जे पालक आहेत ते यातुन गेले असल्याने ते आपल्या पाल्यासाठी वेगळा विचार करू शकतात. परन्तु याप्रकारे काहीकाळापुर्वी नक्कीच संभावना केली जायची.

(अनुभवी) चिंतामणी

सरळ शब्दांत सांगायचे झाले तर सॉफ्टवेअर प्रॉडक्शन बाहेर आणि सपोर्ट इथून. कारण सपोर्टसाठी इथले मनुष्यबळ स्वस्तात उपलब्ध होते.

- (आयटी सपोर्टवाला) पिंगू

sagarpdy's picture

16 Feb 2012 - 9:34 am | sagarpdy

हाच तो .

चिंतामणी's picture

16 Feb 2012 - 10:47 am | चिंतामणी

ध.मु., सोत्री, विजूभौ

आणि चोता दोन सुद्धा.Skype Emoticons

विजुभाऊ's picture

16 Feb 2012 - 2:07 pm | विजुभाऊ

आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीवर आहोत वगैरे म्हणणे म्हणजे बांधकामावरच्या मजुरानी आपण दहा बिल्डिंगा बांधल्याची फुशारकी मारावी..
आपण भारतीयानी एखादी मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स सारखी ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे तयार केली असती तर गोष्ट वेगळी होती. निदान एम एस ऑफिस किंवा एखादे ई आर पी सॉफ्टवेअर किमान एखादी स्वतन्त्र लँगेव्ज वगैरे डेव्हलप केले असते ते जगाने वापरले असते तर गोष्ट वेगळी होती.
कॉल सेंटर वगैरे सर्विसेस मधून पैसा मिळतो पण सर्विसेस या प्रॉडक्ट्स होउ शकत नाहीत.
आपल्या बहुतेक गमजा अमेरीकेतील/युरोपातील ग्राहकांच्या मागणी वर चालतात. ज्या दिवशी अमेरीकन ग्राहकाला त्याच्या उधळेपणाची जाणीव होईल त्या दिवशी कोणाचेच काही खरे असणार नाही.
तिरफळाने माशाचा आब राखून झणझणावे.

दिपोटी's picture

16 Feb 2012 - 3:01 pm | दिपोटी

विजुभौ,

तिरफळाने माशाचा आब राखून झणझणावे.

क्या बात है!

- दिपोटी

आत्मशून्य's picture

16 Feb 2012 - 5:45 pm | आत्मशून्य

ज्यांकडुन मिलियन डॉलर(त्याकाळचे ४०० कोटी रुपये ) वेब बेस्ड इमेल चे इनोवेशन सुरुवातीलाच घडलं तिथे ऑर्कुट फेसबुक अथवा युट्युब संकल्पनांचा उगम सोडा तगडा स्पर्धकही निर्माण होउ शकला नाही हि वस्तुस्थीती दुर्दवाने मजेशीर आहे.

दादा कोंडके's picture

16 Feb 2012 - 7:28 pm | दादा कोंडके

आपल्या बहुतेक गमजा अमेरीकेतील/युरोपातील ग्राहकांच्या मागणी वर चालतात. ज्या दिवशी अमेरीकन ग्राहकाला त्याच्या उधळेपणाची जाणीव होईल त्या दिवशी कोणाचेच काही खरे असणार नाही.

खत्रा सहमत. सुरुवातीला जसं आयटी नवीन होतं तसे ग्राहकही नवखे होते. आता ग्राहकही हुशार होउ लागलेत. पुर्वी थोडसं टेलरींग करून एकच सॉफ्टवेअर दोन ग्राहकांना विकता येत असे. पण आता कोड रियुजेबिलीटी वगैरे फंडे अगदी बँकींग वगैरे सेक्टर्स मधल्या लोकांनापण कळत आहेत. त्यामुळे ते सुद्धा वेरियंट च्या नावाखाली खूप फिचर्स असलेलं एकच सोफ्टवेअर करून मागत आहेत.

पण तरीही भारतात आयटीला अजून १५-२० वर्षे तरी मरण नाही. :(

विषयांतर होतय पण अगदी रहावत नाही म्हणून सांगतो, जो आयटी हब की काय म्हणतात तो येत्या चार पाच वर्षात पुणे नसणार आहे. कारण ह्या सात-आठ वर्षात घरांच्या किमती वाढण्या व्यतिरीक्त काहिही बदल झाला नाही. शहरात पायाभुत सुविधा वगैरे तर दूरच, च्यायला हिंजेवडी आयटी पार्कात रस्ता देखील नीट नाही हो. एक बस वेळेवर जात नाही तीथ पर्यंत. स्वारगेट वरून हायवे, वारजे असं करत जावं लागतं.

नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्‍यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते.

असो, कुणीतरी "तुझा पगार किती, तू बोलतोस किती" असं म्हणायच्या आत गप्प बसतो. :)

मला वाटतं भारतामधे पायाभूत सुविधा नसल्यामुळे 'मॅन्युफॅक्चरींग' इंडस्ट्री फारशी यशस्वी ठरू शकत नाही (याच कारणाने चीन मधे 'मॅन्युफॅक्चरींग' इंडस्ट्री चांगलीच फोफावली आहे). वाहतूकीच्या सोयी नसल्या तरी सर्विस इंडस्ट्री थोडीफार तग धरू शकते. पण फार काळ नाही.
रस्ता, पाणी, वीज आणि दूरसंचार (कम्युनिकेशन) ह्या चार महत्वाच्या पायभूत सुविधा पुरवण्यामधे जर भारत असाच कमी पडत राहिला तर इतर देश सहज बाजी मारतील. भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे 'इंग्रजी' जाणणारी इंजिनियरांची फौज. पण आताच चीन मेक्सिको वगैरे देश त्यांची धोरणं बदलून आपला बिजनेस खेचून नेत आहेत.

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Feb 2012 - 8:33 pm | चेतनकुलकर्णी_85

भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे 'इंग्रजी' जाणणारी इंजिनियरांची फौज

अहो आपल्या कडील महाविद्यालायान्चिया एकूणच दर्जा पाहता ही बिन कामाची फौज काय कामाची??
माझ्या मते कोणत्याही देशाचा विकास ह्या तेथील आद्योगिक कंपन्याच्या कामाच्या दर्जा वर अवलंबून असतो...आपण चंद्रावर यान पाठवू शकतो ..उपग्रह तयार करू शकतो पण त्याच उपग्रहांना लागणारे विशिष्ट्य "srews" आपल्याला जपान कडून आयात करावे लागतात अमेरिका आणि जर्मनी चे उदगी उलटे आहे.. तिकडच्या सरकारी संस्थाना बाकीच्या देशान पुढे हात पसरावे नाही लागत...
तरीही अनेक भारतीय "IT" कंपन्या ह्या प्रचंड वेगाने नफा कमवीत आहेत त्या पैकी एकानेही अश्या गोष्टींच्या विकास कामात ध्यान घालू नये ही नक्कीच खेदाची गोष्ट आहे...अश्याने भारतात सेर्वानन रोजगार नक्की मिळेल पण तांत्रिक दृष्ट्या आपण कायमच मागास राहू...१५० वर्षे मागे.....

शिल्पा ब's picture

16 Feb 2012 - 11:42 pm | शिल्पा ब

अगंबै!!! तुम्ही कधी "इकडे" आलात?

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Feb 2012 - 11:48 pm | चेतनकुलकर्णी_85

अहो ताई, मी इथलाच आहे हो.... :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2012 - 8:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्‍यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते.

माझ्या पण जाते, स्वतः त्या क्षेत्रात असूनही (किंवा कदाचित असल्यामुळे)

ताजे प्रेत's picture

3 Sep 2020 - 8:21 pm | ताजे प्रेत

जो आयटी हब की काय म्हणतात तो येत्या चार पाच वर्षात पुणे नसणार आहे. - 16 Feb 2012 चे विधान

4 नाही 8 वर्षे झाली - ये टी हब म्हणून पुणे संपले का ? केंव्हा ? कसे ?

मराठी_माणूस's picture

16 Feb 2012 - 9:21 pm | मराठी_माणूस

आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीवर आहोत वगैरे म्हणणे म्हणजे बांधकामावरच्या मजुरानी आपण दहा बिल्डिंगा बांधल्याची फुशारकी मारावी..

सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2012 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

सरकारी संधोधन म्हणजे काय ?

सोत्रि's picture

16 Feb 2012 - 11:48 am | सोत्रि

अतिशय चांगल्या विषयाला तोंड फोडले आहे.

भारत आयटी मध्ये प्रगत आहे काय ह्याचे उत्तर शोधण्यासाठी थोडे भूतकाळात जावे लागेल.

Y2K चे भूत जेव्हा सर्व जगाच्या मानगूटीवर बसले होते तेव्हा प्रचंड मनुष्यबळाची गरज निर्माण झाली होती. एकंदरीतच भारतीय माणूस हुषार (गणिती बेस पक्का असल्यामुळे) . त्यात पुन्हा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ह्या गोष्टींमुळे त्या काळात अमेरिकेत लोकं जायला लागली. त्यातुन सुरू झाले 'बॉडी शॉपिंगचे' पर्व. १९९० ते २००१ पर्यंत बहुतेक कंपन्यांनी अक्षरशः खोर्‍याने पैसा ओढला. तेही फक्त मनुष्यबळ पुरवून.

मग प्रॉपर 'बनियागीरी' सुरू झाली आणि भारतीय आयटी इंडस्ट्रीचे हेच मॉडेल बनले. कमीत कमी कष्टात आणि फार डोकॅलिटीचे काम न करता बक्कळ पैसा कमविणे. १९९५ ला विंडोज ९५ च्या उदयानंतर भयंकर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आणि पैसा मिळवणे आणखिणच सोपे झाले.

२००१ च्या .COM बर्स्ट नंतर पाश्चात्य जग जरा शहाणे झाले आणि Outsourcing कडे वळले. कामे Offshore वरून करून घेण्यातला फायदा त्यांना बरोबर कळला. आपल्याकडील काही हुषार कंपन्यांनी त्याचा फायदा करून घेत आणखीण बक्कळ पैसा कमविण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढले, जसे की BPO, ITO, KPO. पण ह्याच्या सगळ्याच्या मागे हेतू एकच, चीप लेबर पुरवणे आणि बक्कळ पैसा कमविणे.

ह्यात झाले काय कि 'Core' कामं करण्यात आपण जास्त इंटरेस्ट दाखविलच नाही. खरंतर तसा इंटरेस्ट नव्हताही, 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' हेच सूत्र बनले होते. त्यात अमेरिकन आणि युरोपियन त्यांचे 'Core' कामं देण्यास उत्सुक नसतातही. मग मेंटेनन्सची कामे ती देत रहातात. भारतीय कंपन्याही त्यातच खुश असतात. सगळ्या मोठ्या कंपन्यांचा मेजर रेव्हेन्यु हा अश्या कामातूनच येत असतो. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, 'संगणक वि़ज्ञान' ह्या शाखेशी काहीही संबंध नसलेली अभियांत्रिकी फौज आयटी मध्ये ह्या असल्या मेंटेनन्सच्या कामामुळेच आली. भरपूर पैसा हे त्यामगचे कारण.

पण ही झाली एक आणि मुख्य बाजू. भारतीयांच्या हुषारीवर आणि कर्तृत्वावर अपार विश्वास असल्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या 'Core' कामं करनार्‍या कंपन्यांची "संशोधन आणि विकास" अशी कामेही इथे भारतात चालतात. जसे की मायक्रोसोफ्ट, गूगल, अ‍ॅमेझॉन इ. पण ह्याचे प्रमाण फार किरकोळ आहे. तिथे फक्त IIT सारख्या तत्सम नावाजलेल्या शिक्षण संस्थेतील अभियंत्यांना प्रवेश असतो. मग बाकीची जनता काय करणार? त्यांच्या कुवतीचे 'मेंटेनन्स' काम!

त्यामुळे भारत आयटीमध्ये प्रगत आहेच. कुठलेही कामं असो, आपण पुढे आहोतच.
आता कसे ते ज्याच्या त्याच्या पहाण्याच्या चश्म्याच्या रंगावर अबलंबून असेल :)

- (आयटीग्रस्त) सोकाजी

पाषाणभेद's picture

16 Feb 2012 - 8:12 pm | पाषाणभेद

>>>मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, 'संगणक वि़ज्ञान' ह्या शाखेशी काहीही संबंध नसलेली अभियांत्रिकी फौज आयटी मध्ये ह्या असल्या मेंटेनन्सच्या कामामुळेच आली.
खरं आहे. इंटरव्ह्यु मध्ये उगाचच टेक्नीकल प्रश्न विचारतात.

आनंदी गोपाळ's picture

17 Feb 2012 - 12:36 am | आनंदी गोपाळ

ह्यात झाले काय कि 'Core' कामं करण्यात आपण जास्त इंटरेस्ट दाखविलच नाही. खरंतर तसा इंटरेस्ट नव्हताही, 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' हेच सूत्र बनले होते.

हे बोल्ड केलेले 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' सूत्र बनले 'होते' नाही. हेच आपले सूत्र आहे, होते अन राहील. इथेच ग्यानबाची मेख आहे. We dont 'make' money like americans do. we 'earn' money.. पहा विचार करून.

चिरोटा's picture

16 Feb 2012 - 2:00 pm | चिरोटा

मूळ प्रश्न- भारतात अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर्स विकसित का होत नाहीत हा आहे. ह्याचा भारतिय संस्कृतीशी संबंध आहे असे वाटत नाही. ८०च्या दशकात अशा कंपन्या भारतात होत्या कारण त्यावेळी अशा प्रणालींना भारतातही डिमांड होता. गूगल्,फेस्बूक वगैरे autocad सारखे बनवू शकतील का? उत्तर- नाही. प्रचंड पैसा असला तरी ह्या कंपन्या ही जोखीम घेणार नाहीत. अशा गोष्टी बनवताना फक्त आवड असून चालत नाही. आर्थिकदृष्ट्या ते परवडायला हवे. ते आणि मनुष्यबळ असेल तर जमू शकते. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवणे आणि फेस्बूक,ऑर्कुट सारखी 'cute' साईट बनवणे ह्यात मूलभूत फरक आहे.
खालील कंपन्या पहा-
http://www.ittiam.com (The world's most preferred DSP IP supplier)
www.tejasnetworks.com/ ( ही कंपनी टेलिकॉम प्रॉड्क्ट्स बनवते.)
www.onmobile.com/ ( मोबाईल सॉफ्ट्वेयर- ५३ देशांमध्ये अनेक ISPs ना caller tunes etc सॉफ्ट्वेयर
पुरवतात).

आत्मशून्य's picture

16 Feb 2012 - 3:12 pm | आत्मशून्य

पुरेसा पैसा दिला की सर्व काही जुळुन येते हो. माहीत नसलेली तंत्रज्ञान ही शिकली शिकवली जातात, अगदी पल्याड पाठवुनही ट्रेनींग होऊ शकते पण.... पण सरकारी रुपयाचा आब डॉलर माजपुढे तोकडा पडतो. कोणी सांगीतलय युरो/डॉलर सोडुन इतर करन्सीमधे कामं घ्यायला ? हा सोपा हिशेब आहे.

रमताराम's picture

16 Feb 2012 - 4:47 pm | रमताराम

की भारत IT मधे प्रगत आहे म्हणून? उद्या आमच्या पुण्यातील दांडेकर पूल झोपडपट्टी वा वारजे नाका कन्स्ट्रक्शन बिजनेस मधे प्रगत आहे म्हणाल.

(आयटी बिगारी) रमताराम

छोटा डॉन's picture

16 Feb 2012 - 5:51 pm | छोटा डॉन

चर्चा उत्तम प्रकारे चालली आहे असे दिसते आहे.
वाचतो आहे.

- छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2012 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

16 Feb 2012 - 11:28 pm | कुंदन

प्रा डॉ तुम्ही पण येता का IT मध्ये ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2012 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' असं आयटीत आहे म्हणे. पण, फूट्कळ काम करण्यापेक्षा भारत प्रगती करेल, प्रगती करतोच आहे. पण, चिरोट्याचे प्रतिसाद वाचून कळले की आपण ऑपरेटींग सिष्टीम, लँग्वेज सारखे आपल्याकडून काही मोठे काम होत नाही. केवळ प्रॉग्रामर म्हणून काम करतात .म्हणजे केवळ मजूरासारखे राबराब राबणारे आपले आयटीतल्या तज्ञाकडून मोठी अपेक्षा आहे. तेव्हा कुंदनशेठ, आयटीवाल्यांनी आम्हा भारतीयांना अभिमान वाटेल असं काम करुन दाखवावं ना.......!

कुंदनशेठ, आम्ही बरे आहोत आमच्या क्षेत्रात. ओढाताण करुन कोणतीही शिल्लक न राखता दोन वेळच्या जेवणाची उत्तम व्यवस्था होते. आणि शांत झोपही येते. बाय द वे, आमच्या पगारावर सरकारनं संक्रात आणली आहे. दि.२१ ला महाराष्ट्रभर विद्यापीठांवर मोर्चा आहे, कुंदनशेठ येता काय ?

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

17 Feb 2012 - 11:11 am | कुंदन

मोर्चा कशाबद्दल हो ? ६वा वेतन आयोग तर कधीच लागु झालाय ना?
बाकी , जर पगारवाढीसाठी असेल तर मोर्चाला नैतिक पाठिंबा आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2012 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाढीव पगारासाठी नै भो. जो आहे तो वेळेवर मिळू दे यासाठी मोर्चा आहे.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

17 Feb 2012 - 10:18 pm | कुंदन

मोर्चासाठी वेळ चुकीची निवडलीत की हो.
राज्यात बर्‍याच ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर , आता सगळे राजकारणी सत्तासमीकरणे जुळवण्यात व्य्ग्र असणार.

चौकटराजा's picture

17 Feb 2012 - 9:56 am | चौकटराजा

एका चित्रपटातील मतिमंद पात्राचे हे नाव आहे.
आयटी च्या शी मी २८६ च्या प्रोसेसर व ८ एम बी च्या " हार्ड डिस्क च्या जमान्यापासून जोडला गेलेलो ( हा भूतकाळाचा नवीन प्रकार १९८० नंतर
जन्मलेल्या मुलानी जन्माला घातलेला .बापरे ! मला पण ही सवय लागली की ! )
तर सांगायचे काय की विविध कोनांमधून ही आय टी ची माहिती मिळाली त्यावरून मी आपल्यामधे मिपावर कसा चौकट राजा आहे हे कळले.
ए मुन्नी मुन्नी ... ते सगळे बघ कसे आय टी आय टी करताहेत.....ते आईला चटका द्यायला निघालेत की टी ( चहा ?) ...... ए मुन्नी बोल ना गं

वपाडाव's picture

17 Feb 2012 - 2:07 pm | वपाडाव

ए मुन्नी मुन्नी ...

हे वाचुन कांती शाहच्या गुंडा चित्रपटाची आठवण झाली...

इरसाल's picture

17 Feb 2012 - 11:03 am | इरसाल

सगळ्या गाड्या व्यवस्थित रूळावरून धावत आहेत. क्या बात ?

रेवती's picture

17 Feb 2012 - 8:43 pm | रेवती

चर्चा वाचतिये.

निशदे's picture

17 Feb 2012 - 11:36 pm | निशदे

काही काळापूर्वी Los Angeles मधील श्री. पुराणिक यांच्याशी भेट झाली. सदर गृहस्थ IBM मधे Cosumer Marketing/IT Development विभागाचे प्रमुख आहेत. ते IBM च्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी outsourcing चे काम बघतात.
त्यांच्याशी बोलताना वरील विषयातील त्यांची कळकळ अक्षरशः जाणवत होती. त्यांच्या मते भारतीय आयटी कंपन्यांची उदासीन वृत्ती हे यामागचे एकमेव कारण आहे. Development साठी पूरक शिक्षणपद्धती तयार करणे आणि संशोधनासाठी पैसा ओतणे या दोन मार्गांनीच सुरुवात होऊ शकते. याबाबतीत त्यांनी अझीम प्रेमजी, एन्.एस राघवन(Infosys), रवी पंडित (KPIT) अशा दिग्गजांशी चर्चा केल्याचे सांगितले पण त्यातून त्यांचे एकच मत बनले की Service Industry मधून मिळणारा अफाट पैसा अशा मार्गाने गुंतवायला कोणतीही कंपनी तयार नाही त्यामुळे परदेशातून पाठवल्या जाणार्‍या maintainence project वर काम करणे याल पर्याय नाही........
:(

५० फक्त's picture

18 Feb 2012 - 11:42 am | ५० फक्त

अतिशय सुदृढ व निकोप चर्चा वाचुन ब-याच गोष्टी कळाल्या, माझा आयटि क्षेत्रावर राग आहे कारण आम्ही शाळा कॉलेजातुन बाहेत पडलो १९९६-९९ च्या काळाअत, या आयटि क्षेत्रानं माझे खुप चांगले मित्र मैत्रिणी तोडुन नेले. आणि आज ही ते सगळे पैशानी श्रीमंत आहेत हा राग नाही पण या पैशानं आमची मैत्री तोडली याचं वाईट वाटतंय.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Feb 2012 - 8:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नीटसे कळले नाही पन्नास राव. जी मैत्री पैशाने तुटते ती चांगली होती हे फारसे पटले नाही. मुद्दा तुम्ही नीट मांडला नाहीत कदाचित.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Feb 2012 - 10:27 pm | अविनाशकुलकर्णी

अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?
...........................................................................
मुळात अभियंत्रीकी कारखान्याची सरकारने का वाट लावली हा प्रष्ण महत्वाचा आहे..
त्या मुळे "निर्माण करण्याचे "कौशल्य असलेले कुशल कामगार निर्माण होत नाहित..
सा~या वस्तुसाठी आज आपण व जग चिन वर अवलंबुन आहोत..
खर तर भारतात ति क्षमता होति..
पण आता बस चुकली....
शोप फ्लोअर वर -१० तास उभा राहुन काम करणा~या इंजीनिअरला किंमत नाहि..
पण त्याच ईजीनिअरने एखादा सोफ्ट वेअर चा कोर्स केला कि ए.सी त बसुन महिन्याला ६ आकडी पगार..
हा खरा प्रष्ण आहे..
तरुणांची कष्टाची सवय मोडली "softwares" वाल्यांनी...

'पृथ्वी ही भगवान विष्णुच्या शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे',

अण्णाभाऊ साठे

कुंदन's picture

18 Feb 2012 - 10:36 pm | कुंदन

प्रोग्रॅमिंग साठी कष्ट अन कौशल्य लागत नाही काय?
की प्रोग्रॅमिंगचा कोड एसी च्या व्हेंट मधुन टपा टपा खाली पडतो ?

क्लिंटन's picture

19 Feb 2012 - 11:15 pm | क्लिंटन

अभियांत्रिकी उद्योगाची भारतात वाट लागली आहे असे तुम्हाला का वाटते? भारतातील जी.एम.आर /जी.व्ही.के या सारख्या EPC कंपन्या कोणत्या गोष्टीत कमी आहेत? आज जी.एम.आर ग्रुपने बांधलेले दिल्ली/हैद्राबाद विमानतळावरील टर्मिनल किंवा जी.व्ही.के ग्रुपने बांधलेले बंगलोर विमानतळावरील टर्मिनल आंतरराष्ट्रीय निकषांवर कुठे कमी पडेल असे वाटत नाही. इस्तंबूलमधील विमानतळाच्या modernization चे काम जी.एम्.आर ग्रुपने आधीच पूर्ण केले आहे. तसेच ब्राझील्/स्पेनमधील विमानतळांसाठी पण तो ग्रुप मध्यंतरी आपल्या निविदा सादर करत होता. १९८० च्या सुमारास मारूती उद्योगबरोबर collaboration करावे यासाठी सुझुकी उद्योगाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. पण आज भारतीय वाहन उद्योगातील टाटा कंपनी जाग्वारसारखी युरोपीयन कंपनी विकत घेऊ शकते. महिन्द्राचे ट्रॅक्टर्स अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात. अडानी, जी.व्ही.के सारख्या कंपन्या इतर देशांमध्ये खाणी विकत घेण्याची पात्रता ठेवतात. अशी इतर अनेक उदाहरणे देता येतील.

भारतीय अभियांत्रिकी कंपन्या आपला ठसा जगात उद्योगाची वाट लागलेली असताना कशा उमटवू शकतील?

अविनाशकुलकर्णी's picture

19 Feb 2012 - 12:06 pm | अविनाशकुलकर्णी

आपल्याकडे "श्रमप्रतिष्ठा" हा अस्पृश्य विचार आहे. त्यास कोणीच शिवत नाही. तथाकथित उच्चदर्जाची कामं (व्हाईट / येलोकॉलर) करणारे लोक प्रतिष्ठीत आणि इतर सगळे, "वाले" वाले लोकं शेलक्या दर्जाची कामं करतात

एक विचार वाचलेला

तिमा's picture

19 Feb 2012 - 12:30 pm | तिमा

कोण आय टी वाले आणि कोण इतर ते समजले. चेर्चा उदबोधक होत चालली आहे.

पाय कसा मोडायचा (अक्षराचा) ते कोणी सांगावे.

मराठी_माणूस's picture

19 Feb 2012 - 1:26 pm | मराठी_माणूस

तेच अक्षर दोनदा टंकुन मग backsapce वापरा

अन्या दातार's picture

19 Feb 2012 - 2:01 pm | अन्या दातार

ही चर्चा वाचून एक सुचले तसे इथे मांडत आहे. यातले गुण-दोष वगैरेवर मी फारसा विचार केला नाहीये.

आयटी कंपन्यांमधून कितीतरी मनुष्यबळ बेंचवर (पक्षी फुकट जाणारे मॅन-अवर्स) असतात. मान्य कि काही लोक अनऑफिशिअली काही प्रोजेक्ट्सवर वापरले जातात. पण बाकीच्या लोकांना पगार देऊन बिनकामाचे पोसावे लागते.
नुसते बेंचवर माश्या मारत बसवण्यापेक्षा छोटी छोटी मॉड्युल्स बनवण्यासाठी वापरले तर चालणार नाही का? उदा. एखादे मॅथेमॅटीकल सॉफ्टवेअर डोळ्यापुढे ठेवा. बेंचमार्क सॉफ्टवेअरः मॅटलॅब. आणि करा एक एक मॉड्युल. मॅट्रिक्स अ‍ॅडिशन, मल्टीप्लिकेशन वगैरेचे कोड तर नुकतेच इंजिनीअर झालेले लोक पण बनवू शकतात. त्यात हळूहळू सुधारणा करत गेल्यास ३-४ वर्षातच एखादे चांगले सॉफ्टवेअर डेव्हलप का होणार नाही? घेतलेल्या लोकांचे स्किलसेट वाढेलच, शिवाय कंपनीला काही रेवेन्युपण तयार होऊ शकेल.

कुंदन's picture

19 Feb 2012 - 2:42 pm | कुंदन

चांगली सुचना , विकांताला अमलात आणुन बघतो.

चिरोटा's picture

20 Feb 2012 - 12:13 pm | चिरोटा

ही कल्पना चांगली आहे. मोठ्या भारतिय आय टी कंपन्या अशा प्रकारचे काही बनवतही असतात. प्रॉड्कट्स नव्हे पण पोर्टल्स,साईटस वगैरे व त्याचा उपयोग कस्टमर मिळवण्यासाठीही केला जातो. पण मॅटलॅब म्हणजे पॅकेज सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी फक्त programming skills पुरेशी असतात का? विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.( I T च्या भाषेत domain knowledge असलेला).
अशा प्रकारच्या सॉफ्ट्वेयरवर काम केलेले कुणी आहे का?

वपाडाव's picture

20 Feb 2012 - 2:46 pm | वपाडाव

विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.

हा मुद्दा मी पुर्वीही सांगितला आहे, तो इथे

सोकाजी रावांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे, मी आयटीतील ३ र्‍या पिढीचा,म्हणजे आउट सोर्सिंगचा पिक अनुभवणार्‍या पिढीतील.
माझ्या मते आपण डिजिटल स्लेव्हरी मध्ये आहोत आणि या स्लेव्हरीतुन जर बाहेर पडायचे असेल तर जश्या अमेरिकन कंपन्या इकोसिस्टिम तयार करतात त्याच तोडीचे किंवा त्याहुन सरस इकोस्टिम आपण बनवली पाहिजे होती ! [ उदा. हिंदुस्थानातील स्मार्टफोनची जवळपास ९७% बाजारपेठ ही अँड्रोइड ओएसवर आहे म्हणजेच गुगल ही इकोसिस्टिम पूर्णपणे नियंत्रित करते. ] या ३ पिढ्यांच्या काळात भारतीय आयटी कंपन्यांनी बक्कळ नफा मिळवला आहे परंतु या क्षेत्रात असुन त्यांनी राष्ट्रासाठी तसेच येणार्‍या आयटी जनरेशनसाठी त्यांनी विचार केला नाही.

@ बिरुटेसर
'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' असं आयटीत आहे म्हणे.
आयटी हा महासागर आहे, फक्त प्रोग्रॅमिंग म्हणजे आयटी नाही आणि प्रोग्रॅमिंग करायला देखील डोक लागतच !
आयटीतील सर्वात क्रिटिकल भाग म्हणजे ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क ! ट्रबल शुटिंग म्हणजे माहित नसलेल्या आणि अचानक उप्तन्न झालेल्या समस्येवर / त्रुटी वर कमीत कमी वेळेत अचूक सोल्युशन देणे. या सोल्युशन देण्यावर क्लायंटचा बिझनेस इंपॅक्ट अवलंबुन असतो... सोल्युशन देण्यास जितका उशिर तितका क्लायंटला तोटा अधिक त्यामुळे क्लायंट कडुन ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क वर सर्वात अधिक दबाव निर्माण केला जातो आणि कंपनीच्या टिमकडुन अर्थातच टिमवर.
ट्रबल शुटिंग करणारा कन्सल्टंट हा मल्टिटास्किंग करतो, म्हणजे एकाच वेळी तो, चॅटवर क्यायंटशी, त्याच्या मॅनेजरशी बोलत असतो, फोनवर कॉल घेत असतो, मेल ला रिप्लाय देत असतो आणि मुख्य म्हणजे ज्या सिस्टिम मध्ये इश्यू निर्माण झालेला असतो त्या सिस्टिम चे ट्रबल शुटिंग देखील करत असतो... हे सर्व करताना तो प्रचंड ताणात असतो, हे सर्व करताना तो त्याच्या मेंदूवर प्रचंड ताण देतो ज्याच्या परिणाम स्वरुप इश्यू चे सोल्यूशन मिळवले जाते. [ हे काम २४ x ७ चालते. ] शिफ्ट मध्ये काम करणारे कर्मचारी यात सगळ्यात जास्त भरडले जातात कारण ते शरिराच्या नैसर्गिक वेळेच्या विरुद्ध काम करतात. याचे परिणाम हे पुढे आयुष्यभर सहन देखील करावे लागतात / लागू शकतात.
साधारण ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क करणारा व्यक्ती मल्टिटास्किंग मध्ये चँपियन झालेला असतो... मल्टिटास्किंग म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देउन काम करणे याचा दुसरा अर्थ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करणे ! थोडक्यात तुम्ही डिस्ट्रॅक्शन प्रॅक्टिस करता, रोज, अनेक महिने , अनेक वर्ष !
जी गोष्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करता त्यात तुम्ही तरबेज बनता हा गुणधर्म आहे, त्यामुळे साधारण १०+ वर्ष मध्ये या प्रोफाइल मध्ये घालवलेली लोक त्यांची लक्ष केंद्रीत करायची क्षमताच गमावून बसतात आणि नविन तंत्रज्ञान शिकण्यास ते असमर्थ ठरतात.अश्या अनेक गोष्टी आयटीच्या महासागरात आहेत, प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात.
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video