पास्ता विथ 'रस्टिक' बेसील सॉस

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
27 Jan 2012 - 3:27 am

साहित्यः

पास्ता - १ कप
बेसील - १ वाटी पाने
ऑलिव्ह ऑईल - ७-८ मोठे चमचे
काळी मिरी पावडर - २ चमचे
लसुण - २ पाकळ्या
मिठ चवीनुसार
चीज सजावटीसाठी

कृती:

१. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्या साठी ठेवावे. त्यात थोडे मिठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे.
२. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. ३-४ मिनिटे हा पास्ता शिजु द्यावा. पास्ता शिजल्यावर, त्यातील सर्व पाणी गाळुन घ्यावे. ह्या पास्ताला वरतुन थोडे तेल लावावे. त्यामुळे ते चिटकत नाहीत.
३. आता खलबत्त्यामधे बेसीलची पाने वाटुन घ्यावी. हि पाने वाटताना त्यात थोडे थोडे ऑलिव्ह ऑईल टाकावे. ह्या मधेच चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर टाकावी. ह्याची एकदम बारीक पेस्ट न करता थोडी खडबडीतच ठेवावी.
४. कढईत १ चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण टाकावा. त्यात हा शिजलेला पास्ता व बेसिलचा सॉस टाकावा.
५. हे सर्व निट मिक्स करावे. चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर adjust करावे.
६. पास्ता प्लेट मधे काढुन, वरतुन चिज टाकुन गरम serve करावा.

pasta

प्रतिक्रिया

सुनील's picture

27 Jan 2012 - 6:44 am | सुनील

बेसिल म्हणजे तुळस ना?

पाकृत सॉस कुठे दिसत नाही! तरीही बरी दिसतेय आणि सोपीही.

याचा सॉस बेसीलची पाने +ऑलिव्ह ऑईल टाकावे+मिठ+काळी मिरी पावडर एवढेच असल्यामुळे तो पास्ताला coat करण्या पुरताच असेल असे दिसत आहे.बाकी पाकृ छान आहे...नक्की करून बघीन.

द्रविड ऑस्ट्रेलियात खेळतोय तसं झालंय, आला आला म्हणुन भिंतीला विटा लावेपर्यंट भगदाड पडलेलं असतं तसं.

असो, काउंट डाउन चालु झालं की होतं असं...

रेवती's picture

27 Jan 2012 - 7:59 am | रेवती

फोटू आवडला.

जाई.'s picture

27 Jan 2012 - 8:24 am | जाई.

फोटो छान आलाय

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 8:37 am | प्रचेतस

पण चीज टाकण्यात फारच कंजूषी केल्यामुळे पाकृचे चीज झाले नाही बघा.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jan 2012 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

अगदी सहमत. चीझ जरा अजून (आणि किसून) पाहिजे होते. बाकी पाककृती चांगली आहे.
(ह्या पास्त्याला 'पेने पास्ता' म्हणतात असे वाटते.)

असं काय करता काका डागदरानी चीजचा वापर कमी करायला सांगीटलाय ना?

मला चीज टाकायच नव्हत.... पण फक्त सजावटीसाठी चीज वापरलय....

रेवती's picture

27 Jan 2012 - 9:42 pm | रेवती

गोट चीज आहे काय?

नाहि गं... असच घरात चिज क्युब होता... तेच चीज टाकल..

मेघवेडा's picture

27 Jan 2012 - 2:49 pm | मेघवेडा

वॉमामुळे फटूची मजा गेलीये सगळी. मेज्जर रसभंग. :(

Mrunalini's picture

27 Jan 2012 - 5:08 pm | Mrunalini

आहो, आधी मी watermark खालीच टाकायचे. पण मधे एकदा माझा मटण चॉप्सचा फोटो आणि पाकृ दोन्हिही एका मुलाने स्वतःच्या नावावर टाकली होती. त्यानी माझा फोटो खालचा watermark काढला होता. म्हणुन मी आता तो फोटोच्या मधे टाकला.

सानिकास्वप्निल's picture

27 Jan 2012 - 5:29 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पाकृ
हो हल्ली Plagiarism खुप वाढले आहे म्हणून watermark फोटोच्या मधे टाकलेस ते बरे केले
मला ही आता तसेच करावे लागेल :(

कौशी's picture

27 Jan 2012 - 11:05 pm | कौशी

करून बघेल.

चिंतामणी's picture

28 Jan 2012 - 6:29 pm | चिंतामणी

पण थोडे फटु अजून टाकले असते तर जर जास्त छान वाटले असते.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2012 - 6:55 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर!