मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पास्ता विथ 'रस्टिक' बेसील सॉस

Mrunalini · · पाककृती
साहित्यः पास्ता - १ कप बेसील - १ वाटी पाने ऑलिव्ह ऑईल - ७-८ मोठे चमचे काळी मिरी पावडर - २ चमचे लसुण - २ पाकळ्या मिठ चवीनुसार चीज सजावटीसाठी कृती: १. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्या साठी ठेवावे. त्यात थोडे मिठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे. २. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. ३-४ मिनिटे हा पास्ता शिजु द्यावा. पास्ता शिजल्यावर, त्यातील सर्व पाणी गाळुन घ्यावे. ह्या पास्ताला वरतुन थोडे तेल लावावे. त्यामुळे ते चिटकत नाहीत. ३. आता खलबत्त्यामधे बेसीलची पाने वाटुन घ्यावी. हि पाने वाटताना त्यात थोडे थोडे ऑलिव्ह ऑईल टाकावे. ह्या मधेच चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर टाकावी. ह्याची एकदम बारीक पेस्ट न करता थोडी खडबडीतच ठेवावी. ४. कढईत १ चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण टाकावा. त्यात हा शिजलेला पास्ता व बेसिलचा सॉस टाकावा. ५. हे सर्व निट मिक्स करावे. चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर adjust करावे. ६. पास्ता प्लेट मधे काढुन, वरतुन चिज टाकुन गरम serve करावा. Image removed.

वाचन 4987 प्रतिक्रिया 0