पास्ता विथ 'रस्टिक' बेसील सॉस
साहित्यः
पास्ता - १ कप
बेसील - १ वाटी पाने
ऑलिव्ह ऑईल - ७-८ मोठे चमचे
काळी मिरी पावडर - २ चमचे
लसुण - २ पाकळ्या
मिठ चवीनुसार
चीज सजावटीसाठी
कृती:
१. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्या साठी ठेवावे. त्यात थोडे मिठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे.
२. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. ३-४ मिनिटे हा पास्ता शिजु द्यावा. पास्ता शिजल्यावर, त्यातील सर्व पाणी गाळुन घ्यावे. ह्या पास्ताला वरतुन थोडे तेल लावावे. त्यामुळे ते चिटकत नाहीत.
३. आता खलबत्त्यामधे बेसीलची पाने वाटुन घ्यावी. हि पाने वाटताना त्यात थोडे थोडे ऑलिव्ह ऑईल टाकावे. ह्या मधेच चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर टाकावी. ह्याची एकदम बारीक पेस्ट न करता थोडी खडबडीतच ठेवावी.
४. कढईत १ चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण टाकावा. त्यात हा शिजलेला पास्ता व बेसिलचा सॉस टाकावा.
५. हे सर्व निट मिक्स करावे. चवीनुसार मिठ व काळी मिरी पावडर adjust करावे.
६. पास्ता प्लेट मधे काढुन, वरतुन चिज टाकुन गरम serve करावा.

वाचने
4987
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
ह्म्म
In reply to ह्म्म by सुनील
याचा सॉस बेसीलची पाने +ऑलिव्ह
द्रविड ऑस्ट्रेलियात खेळतोय
फोटू आवडला.
फोटो छान आलाय
तोंपासू
In reply to तोंपासू by प्रचेतस
सहमत..
In reply to सहमत.. by प्रभाकर पेठकर
असं काय करता काका डागदरानी
In reply to सहमत.. by प्रभाकर पेठकर
मला चीज टाकायच नव्हत.... पण
In reply to मला चीज टाकायच नव्हत.... पण by Mrunalini
गोट चीज आहे काय?
In reply to गोट चीज आहे काय? by रेवती
नाहि गं... असच घरात चिज क्युब
वॉमामुळे फटूची मजा गेलीये
In reply to वॉमामुळे फटूची मजा गेलीये by मेघवेडा
आहो, आधी मी watermark खालीच
छान आहे पाकृ
आवडली..
चान चान.
अतिशय सुंदर!