(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
8 Jan 2012 - 9:32 am

आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या

मित्र हो,
चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे.

दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते. व मिठाई, बाकरवड्या खरेदी करत होते.त्यावेळी मोजक्या गिर्‍हाईक्कांना चितळे बंधूनी आजकालच्या घाईगर्दीच्या जमान्यात आपल्या बाकरवड्या कशा बनवल्या जातात याच्या अनेक युक्त्या दाखवल्या. विशेषतः हाताने बनवल्या लागू नयेत म्हणून तर त्यांनी कसे एक मशिनच बनवले आहे याचे एक व्हीडिओ प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे. त्या दिवशी बंधूंच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.

ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात भिलवडीतून दूध विकून त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचा दरारा एक दमदार दूधवाले म्हणून होता.

मिपाकरांना त्यांच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर वरील लिंक वरून अवलोकन करावे. आणि उद्योगाची प्रेरणा घ्यावी किंवा प्रत्यक्षच त्यांच्या दुकानाला भेट द्यावी.
ही विनंती .

टीपः या कडे निव्वळ विडंबन आणि आम्ही टाकलेली आणखी एक जिलबी म्हणूनच पाहावे. चितळे बंधूंची भलामण करण्याचा यात कसलाही हेतू नाही.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 9:36 am | अन्या दातार

फुटलो!!!!!

एक सूचना: कुठल्यातरी ब्लॉगवर हा व्हिडिओ टाकून त्याची लिंक द्यायला हवी होती. तरच १००/१०० गुण दिले असते ;)

शशिकांत ओक's picture

9 Jan 2012 - 12:06 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2012 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा...केवळ धिंगाणा विडंबन झालय... आज कट्ट्याला येइपर्यंत मेंदू पार करंटमधे येणार यामुळे... ;-)

अवांतर- या धाग्याची पट्टी पाहता आंम्ही असे भविष्य वर्तवितो,की सायंकाळी कट्ट्स्थळी जाईपर्यंत सर्वकट्टर मंडळी या धाग्याला शतकसंजिवनी देणार ;-)

मी-सौरभ's picture

8 Jan 2012 - 11:54 pm | मी-सौरभ

वार (रविवार) चुकला नैतर आत्तापर्यंत हा धागा शतक महोत्सवी नक्कि झाला असता :)
मस्त विडंबन

चितळ्यांना मारलेल्या बाकरवड्या.... आपलं ते हे...कोपरखळ्या आवडल्या.
अवांतर: जिलब्या खुश्शाल पाडाव्या, पण त्या अशा दर्जेदार असल्या कीच लोक वाहवा करणार !!

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 10:19 am | चिंतामणी

पुन्हा एकदा संपादक मंडळ आणि सरपंचाना विनंती

मेनुबारमधे "विडंबन" हा पर्याय द्यावा.

(मेनुबार म्हणल्यावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी तो काय हे खाली देत आहे.) :~ :-~ :puzzled:

स्वगृह साहित्य चर्चा काव्य पाककृती कलादालन भटकंती घोषणा नवे लेखन मदत पान विडंबन

मन१'s picture

8 Jan 2012 - 11:45 am | मन१

जिलब्ब्या नव्हे तर बाकवड्या पादाल्या जाताहेत ह्या. :)

पैसा's picture

8 Jan 2012 - 11:47 am | पैसा

काय रे!!

मन१'s picture

8 Jan 2012 - 1:17 pm | मन१

जिलब्ब्या नव्हे तर बाकवड्या पादाल्या जाताहेत ह्या.
हा प्रतिसाद
जिलब्ब्या नव्हे तर बाकवड्या पाडल्या जाताहेत ह्या.
असा लिहायचा होता. शिंचे शिफ्ट बटन डाबायचे राहून गेले.

वपाडाव's picture

9 Jan 2012 - 5:55 pm | वपाडाव

जिलब्ब्या नव्हे तर बाकवड्या पादाल्या जाताहेत ह्या. हा प्रतिसाद जिलब्ब्या नव्हे तर बाकवड्या पाडल्या जाताहेत ह्या. असा लिहायचा होता. शिंचे शिफ्ट बटन डाबायचे राहून गेले.

नको ते, नको तिथे, नको त्यावेळी दाबत राहणे हाच का आपला मिपाकरी सुसंस्कृतपणा.... (ह्याला पुणेरी माज या धर्तीवर वाचावे.)

पैसा's picture

8 Jan 2012 - 11:49 am | पैसा

वल्लीची बल्ले बल्ले!! ही जिलबी मस्त निघाली. एकदम खुसखुशीत, गरमागरम अणि केशरी पाकाने भरलेली. व्हिडो पण लै आवाडला.

सुहास..'s picture

8 Jan 2012 - 12:06 pm | सुहास..

_/\_

चला आणखी एक गद्य विडंबक भेटला ब्वा

(कोणे एके काळचा )

स्पा's picture

9 Jan 2012 - 8:52 am | स्पा

ख्यॅ ख्यॅ =))

इस वल्ली को आवरो कोई

मदनबाण's picture

8 Jan 2012 - 12:13 pm | मदनबाण

हा.हा.हा... ;)

(बाबा मिया प्रेमी) ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2012 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! दाण्ण! असलं काही येईल असं वाटलंच होतं!

सोत्रि's picture

8 Jan 2012 - 12:53 pm | सोत्रि

धमाल विडंबन!

- (झेंडूचं फूल) सोकाजी

सुहास झेले's picture

8 Jan 2012 - 12:57 pm | सुहास झेले

हा हा हा .... सहीच जिलेबी :) :)

वेताळ's picture

8 Jan 2012 - 1:09 pm | वेताळ

सही माहिती.......
चितळे बंधु जितके अध्यात्मात पुढे आहेत तितके मिठाईत देखिल आहेत हे बघुन उर भरुन आला.

प्यारे१'s picture

8 Jan 2012 - 1:14 pm | प्यारे१

कल्ला रे वल्ली....
खूपच खुसखुशीत विडंबन.

पिंगू's picture

8 Jan 2012 - 1:28 pm | पिंगू

झक्क विडंबन आणि मस्त विडीयो..

- पिंगू

पियुशा's picture

8 Jan 2012 - 4:02 pm | पियुशा

अच्छा म्हणजे तुम्ही पण ,
जिलब्या पाडु लागलात ? ओह आय मीन बाकरवड्या ;)

प्रचेतस's picture

8 Jan 2012 - 4:06 pm | प्रचेतस

आम्ही फक्त जिलब्या पाडतो. बाकरवड्यांच काँट्रेक्ट चितळ्यांना दिलं आहे. ;)

सुधांशुनूलकर's picture

8 Jan 2012 - 9:47 pm | सुधांशुनूलकर

वल्लीशेट, जिलब्या छानच पाडता हो !
फक्त एक विनंती .... तुमचं जिलब्यांचं दुकान १ ते ४ बंद ठेवू नका, कायम चालू राहू द्या.

पाषाणभेद's picture

9 Jan 2012 - 1:10 am | पाषाणभेद

त्या व्हिडो मध्ये ०.३४ च्या फ्रेममध्ये 'येथे थुंकू नये' पाहून आश्चर्य वाटले.

मोदक's picture

9 Jan 2012 - 12:19 am | मोदक

ज ब रा विडंबन :-D

मोदक.

विसोबा खेचर's picture

9 Jan 2012 - 10:41 am | विसोबा खेचर

मस्त.. :)

डिजेबॉय's picture

9 Jan 2012 - 11:41 am | डिजेबॉय

एक नम्बर!!

५० फक्त's picture

9 Jan 2012 - 12:02 pm | ५० फक्त

टेम्पोत बसवले गेल्या आहे...... यापुढे चितळे बाकरवडी, त्यातलं सारण पण करायच्या भानगडीत पडणार नाहीत...

अवांतर - मिपावरच्या चितळेंच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

रणजित चितळे's picture

23 Feb 2012 - 4:17 pm | रणजित चितळे

चालूद्या

शशिकांत ओक's picture

9 Jan 2012 - 12:08 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
चितळे लोक मिपा वर फारप्रिय झालेले पाहून ऊर भरून आला.
बाकरवडी करता करता ऐकू येणारी मागील स्वरमंडले फार कर्णकटू लागतात बाकी बाकरवडी चवीला कशी लागते ते सांगा ना.... फार चांगली ?
वामकुक्षी प्रेमी चितळे बंधू.

पक पक पक's picture

9 Jan 2012 - 5:10 pm | पक पक पक

कल्लाकार वल्लिंचा ह जिलबी ,बाकरवडी चा कल्लाकंद लइ भारी......

पक पक पक's picture

9 Jan 2012 - 5:13 pm | पक पक पक

१ ते ४ य वेळेत दुकानात बाकरवडी मागीतली आणी चितळे पुढुन आंगावर आले तर काय कराय्चे...?

५० फक्त's picture

10 Jan 2012 - 10:12 am | ५० फक्त

कूणाच्या पुढुन ?
१. तुमच्या
२. त्यांच्या
३. दुकानाच्या
४. इतर

पक पक पक's picture

10 Jan 2012 - 5:29 pm | पक पक पक

१ आम्च्या पुढुन आले तर...?

२.त्यांच्य पुढुन आले तर..?

३.दुकानाच्या पुढुन आले तर..?

४.आणी इतरही कुठुन आले तर..?

सर्व शक्यता पड्ताळ्ता कुठे, कस सामोरे जावे याबद्द्ल मार्ग्दर्शन करा. कार्ण आम्हाला दुपारीच भटकायची सव्य आहे....े,

Nile's picture

10 Jan 2012 - 9:00 pm | Nile

ते पुढुन आले तर त्यांना तुमचं मागलं दर्शन द्या...