नमस्कार मंडळी,
पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत.
सानिका आणि गणपा यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. :)
तर मग घ्या साहित्य.
२ टे.स्पून पेरी पेरी सॉस ( मी तयार आणला होता, घरी करावयाचा झाल्यास कृती ही इथे )
२ मोठे चमचे लिंबाचा रस
१ चमचा आलं पेस्ट
२ चमचे लसूण पेस्ट
१/२ कप लोणी
मीठ चवीनुसार
१/२ किलो चिकन . खाली दिलेल्या फोटोनुसार चिकन हे स्किन असलेलंच हव आणि शक्यतो ब्रेस्ट पिसच हवेत. (बोनलेस ब्रेस्ट फिलेट्स असतील तर उत्तम)
कृती
१. चिकन स्वच्छ धुवून घ्या.
२. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
३. चिकन गॅसवर १५ मिनिटे भाजा घ्या, साधारण अर्धवट शिजेल इतकं. (फ्लेम ग्रिल असल्यास उत्तम.)
४. एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, मीठ, वितळलेलं लोणी, पेरी पेरी सॉस, आणि चिली फ्लेक्स (तडका मिरची मिक्सर मधून काढली की तयार चिली फ्लेक्स.) हे सर्व एकत्र करून घ्या.
५. आता भाजलेल्या चिकनला सुरीने चरे करून घ्या, आणि वरील मिश्रणात चांगलं घोळवा.
६. २-३ तास मुरत ठेवा.
७. ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करा.
८. ओव्हन ट्रे वर अल्युमिनिअम फॉइल वर चिकनचे तुकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
९. साधारण ४० मिनिटे २२० डिग्रीवर हीट करा.
ही झाली तुमची खमंग, खरपूस, जिभेला चटका लावणारी पेरी पेरी चिकन डिश तयार. :)
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
4 Jan 2012 - 5:29 pm | गणपा
चेपुवर विचारणारच होतो कसं केलस. तेवढ्यात ईथे पाकृ दिसली.
शेवटचा फटू फारच घायाळ करणारा आहे.
5 Jan 2012 - 11:32 am | पियुशा
व्वा व्वा मस्त मस्त !
4 Jan 2012 - 5:29 pm | सानिकास्वप्निल
तोंपासू
एकदम नॅन्डोज च्या पेरी-पेरी चिकनची आठवण झाली
पाकृ एकदम भन्नाट आहे :)
4 Jan 2012 - 5:33 pm | जाई.
चिकन डिश आवडली. :)
4 Jan 2012 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार
भारतात लोक महागाईने त्रस्त असताना आणि लहान मुले कुपोषीत होत असताना, स्वतः मात्र आरामात असले जीभेचे चोचले पुरवणारे आणि त्याची जाहिरात करणारे अनिवासी पाहून शरम वाटली.
4 Jan 2012 - 5:42 pm | रेवती
अग्ग्ग्गग! खरच का रे परा?
तिकडे सोत्रिंच्या वाईन फेस्टच्या धाग्यावरच्या फोटूत म्हणूनच तू काही खाण्याऐवजी..........
5 Jan 2012 - 4:29 am | मराठमोळा
>>>भारतात लोक महागाईने त्रस्त असताना आणि लहान मुले कुपोषीत होत असताना, स्वतः मात्र आरामात असले जीभेचे चोचले पुरवणारे आणि त्याची जाहिरात करणारे अनिवासी पाहून शरम वाटली.
+१ सहमत आहे. काय करायचं अशा लोकांच रे परा? ;)
5 Jan 2012 - 11:42 am | प्रभाकर पेठकर
भारतात लोक महागाईने त्रस्त असताना आणि लहान मुले कुपोषीत होत असताना, स्वतः मात्र आरामात असले जीभेचे चोचले पुरवणारे आणि त्याची जाहिरात करणारे अनिवासी पाहून शरम वाटली.
निवासी भारतिय स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवीत नाहीत, असे म्हणायचे आहे का? भारतिय दूरदर्शन वाहिन्यांवर, अनेक भारतियांचे पाककलेचे कार्यक्रम पाहण्यात येतात. तसेच, वेगवेगळ्या मौसमात उपहारगृहांमधून, मैदानांवर भारतभर चाललेले वेगवेगळे 'फुड फेस्टीव्हल्स' पाहण्यात येतात. मिठायांची दुकाने, आईस्क्रिम पार्लर्स, भव्य-दिव्य मॉल्स मधील उधळपट्टी बघता, जीभेचे चोचले पुरविण्यात आणि त्याची जाहिरात करण्यात, निवासी भारतिय मागे नाहित उलट चार पाऊले पुढेच आहेत असे दिसून येते. मग हा अनिवासी भारतियांबाबत सावत्रपणा कशासाठी??
भ्रष्टाचार नामक व्याधीने ग्रस्त राजकारण्यांची शरम वाटावी. अशा नेत्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणार्या निवासी भारतियांची शरम वाटावी. भारनियमनाच्या बडग्याने पुढची पिढी नीट अभ्यास करू शकत नसताना शहरातून मोठमोठ्या जाहिरात फलकांना, चित्रपटगृहांना, मल्टीप्लेक्सना, मॉल्सना होणार्या विजपुरवठ्याची शरम वाटावी. घरातील अनावश्यक वीज वापराची शरम वाटावी. कुपोषणाच्या मुद्यावर, देवादिकांच्या माथी लाखो लिटर्स दुधाची नासाडी करणार्या भक्तगणाची (?) शरम वाटावी.
प्रसादाच्या नांवावर, सण साजरे करताना जी मिठाई खरेदी केली जाते त्यात वापरलेले दुध कुपोषितांच्या पोटी जायला हवे होते तरीपण त्याबद्दल खंत न बाळगता देवादिकांच्या चरणी प्रसाद चढविणार्या भाविकांची, सण साजरे करणार्या सामान्य जनतेची, दारू - विडी-सिगरेट सारख्या व्यसनांची निर्मिती करण्यार्यांची, ह्या धंद्यांना हातभार लावणार्या गिर्हाईकांची, ह्या धंद्यांना परवानगी देणार्या सत्ताधार्यांची, ह्या सर्व निवासी भारतियांची शरम वाटली पाहिजे.
नीट डोळे उघडे ठेवून पाहिल्यास आपल्या भारतातच 'शरम' वाटण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत. एक भारतिय म्हणून आपल्या सर्वांनाच ह्या गोष्टींची शरम वाटली पाहिजे मग तो निवासी असो वा अनिवासी. ह्यातून जे जे आपल्या हाती आहे ते ते आपण निग्रहपुर्वक टाळले पाहीजे. (जसे भक्तीच्या/श्रद्धेच्या नांवाखाली होणारी नासाडी), मॉल्स मधील खरेदी, मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपट पाहणे, घरातील अनावश्यक वीज वापर (लिफ्टने जाणे टाळाता येईल तेवढे टाळावे), जो पर्यंत कुपोषणाचा मुद्दा ज्वलंत आहे तोवर तरी दारू, सिगरेट आदी व्यसनांवर पैसा खर्च न करणे, जमल्यास मतदानाच्या मार्गाने स्वच्छ नेता निवडणे ह्या गोष्टीं करुया. नाहीतर सर्वात आधी आपल्याला स्वतःची शरम वाटली पाहिजे, मग इतरांची.
5 Jan 2012 - 11:45 am | सुहास..
निवासी भारतिय स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवीत नाहीत................नाहीतर सर्वात आधी आपल्याला स्वतःची शरम वाटली पाहिजे, मग इतरांची.
_/\_
धन्य आहात पेठकर काका !
5 Jan 2012 - 12:04 pm | मराठी_माणूस
भ्रष्टाचार नामक व्याधीने ग्रस्त राजकारण्यांची शरम वाटावी. अशा नेत्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणार्या निवासी भारतियांची शरम वाटावी
हा मुद्दा समजला नाही. म्हणजे अनिवासी भारतीय , भारतात असते तर त्यांनी योग्य लोकांना निवडुन दीले असते असे म्हाणायचे आहे का? तसे असेल तर सर्व अनिवासी भारतीयाना एक जाहीर विनंती की त्यांनी निवड्णुकीच्या वेळी , वेळातवेळ काढुन , भारताला भेट देउन , योग्य उमेदवार निवडुन आणावेत आणि सर्व निवासी भरतीयांना उपकृत करावे.
5 Jan 2012 - 1:11 pm | प्रभाकर पेठकर
आपली निवडणूक प्रक्रिया काय आहे हे आपल्याला माहीत आहेच. निवडणूकीत मतदानाचा अधिकार फक्त निवासी भारतियच बजाऊ शकतात. भ्रष्टाचारी नेत्यांच्या हाती सत्ता जाण्यात कळत नकळत निवासी भारतियांचाच सहभाग असतो हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. ह्यात निवासी भारतियांना हीन लेखण्याचा उद्देश नसून प्रत्येक भारतियाने (निवासी - अनिवासी) अंतर्मुख व्हावे हा उद्देश आहे. अनिवासींनी सुद्धा, कारण कधीतरी तेही निवासी होणार आहेतच.
मुळ प्रतिसादाचा रोख थेट अनिवासींवर आहे म्हणून निवासी भारतियांच्या चुका अधोरेखित केल्या आहेत. अन्यथा, मी तरी निवासी-अनिवासी असा भेदभाव करू इच्छित नाही.
संपूर्ण प्रतिसादात आपल्या सर्वांच्याच असंवेदनशील वृत्तीवर बोट ठेवले आहे. कुणा एका समुदायावर (इथे अनिवासी) दोषारोप करण्यात काय हशील आहे?
5 Jan 2012 - 1:54 pm | गणपा
काका तुमचा प्रतिसाद पटला.
पण माझ्या मते पराने 'तो' प्रतिसाद खेळीमेळीत दिला आहे.
असे बरेच प्रतिसाद पहाण्यात येतात मिपावर, त्या थोडी चेष्टा मस्करी असा प्रकार असतो.
दिल पे नै लेनेका. :)
5 Jan 2012 - 2:01 pm | गवि
मलाही अशीच खात्री झाली होती कारण शब्दन शब्द हे दाखवतो आहे की तो प्रतिसाद मजेचा आहे. त्यावर नंतर एकदम सीरियस चर्चा झाल्याचे पाहून परतपरत ते वाक्य वाचून पाहतोय..
5 Jan 2012 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर
हा: हा: हा: मीही फार गंभीरतेने तो घेतला नाही.
पण, ज्या समुदयाबद्दल 'शरम वाटली' अशा शब्दात चेष्टा करण्यात आली, तेंव्हा अकारण चेष्टेचा विषय झालेल्या, त्या समुदायाच्यावतीने मी माझे विचार मांडले.
मी उद्घृत केलेल्या सर्वच मुद्यांवर गमतीने नाही तर गांभीर्याने आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं.
4 Jan 2012 - 5:42 pm | विशाखा राऊत
पेरी पेरी.. यम्म यम्म
4 Jan 2012 - 5:42 pm | विशाखा राऊत
पेरी पेरी.. यम्म यम्म
4 Jan 2012 - 5:46 pm | स्वाती२
कातिल फोटो!
4 Jan 2012 - 6:25 pm | निश
मराठ मोळा साहेब
फुल टु झकास मस्त, करुन बघणार आजच
4 Jan 2012 - 8:45 pm | Mrunalini
वा.... अप्रतिम.. बघुन लगेच खावसं वाटतय... :)
4 Jan 2012 - 9:09 pm | कौशी
शेवटचा फोटो तर फारच अप्रतिम ..
करून बघणार.
5 Jan 2012 - 2:22 am | प्रभाकर पेठकर
शेवटच्या छायाचित्रातून चमचमीतपणा ओथंबून वाहतो आहे. त्यामुळे नाही म्हणणे शक्यच नाही. पाकृ करुन पाहावी लागणारच.
अभिनंदन.
5 Jan 2012 - 2:36 am | प्राजु
खत्तरनाक!!
इतकं सॉल्लिड दिसतंय फोटूमध्ये... लाजवाब!
एक शंका.. गॅसवर आधी का भाजून घ्यायच?
5 Jan 2012 - 4:34 am | मराठमोळा
>>एक शंका.. गॅसवर आधी का भाजून घ्यायच?
हे चिकन क्रिस्पी आणि चमचमीत असलं तरच खायला मजा येते. गॅसवर (फ्लेम ग्रिल्/बार्बेक्यु ग्रिल असेल तर छानच) भाजल्याने, पाण्याचा आणि मेदाचा बराचसा अंश निघून जातो, आणि भाजून, चरे पाडून मरिनेट केल्यास पेरी पेरी सॉस, बटर आणि इतर जिन्नस खुप चांगले मुरतात चिकनमधे. एक्दम ज्युसी आणि टेंडर होतं मग चिकन. :)
5 Jan 2012 - 10:17 am | sneharani
शेवटचा फोटो जबरदस्त!
खायची इच्छा होतेय शेवटचा फोटो बघुन!!
:)
5 Jan 2012 - 11:40 am | सुहास..
एक नंबर रे , ममोशेफ !!
फायनली आपण आयटी वाला नवरा असल्याचे साबित केलेत तर ;)
5 Jan 2012 - 12:38 pm | सुहास झेले
खल्लास..... !!!
5 Jan 2012 - 1:35 pm | गवि
जबरा...
आता पेरी पेरी सॉस आयते कुठून मिळवावे बरे?? :(
6 Jan 2012 - 5:01 pm | उगा काहितरीच
लवकरच मासाहारी बनवनार राव तुम्ही...