नमस्कार मंडळी,
पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत.
सानिका आणि गणपा यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. :)
तर मग घ्या साहित्य.
२ टे.स्पून पेरी पेरी सॉस ( मी तयार आणला होता, घरी करावयाचा झाल्यास कृती ही इथे )
२ मोठे चमचे लिंबाचा रस
१ चमचा आलं पेस्ट
२ चमचे लसूण पेस्ट
१/२ कप लोणी
मीठ चवीनुसार
१/२ किलो चिकन . खाली दिलेल्या फोटोनुसार चिकन हे स्किन असलेलंच हव आणि शक्यतो ब्रेस्ट पिसच हवेत. (बोनलेस ब्रेस्ट फिलेट्स असतील तर उत्तम)
कृती
१. चिकन स्वच्छ धुवून घ्या.
२. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
३. चिकन गॅसवर १५ मिनिटे भाजा घ्या, साधारण अर्धवट शिजेल इतकं. (फ्लेम ग्रिल असल्यास उत्तम.)
४. एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, मीठ, वितळलेलं लोणी, पेरी पेरी सॉस, आणि चिली फ्लेक्स (तडका मिरची मिक्सर मधून काढली की तयार चिली फ्लेक्स.) हे सर्व एकत्र करून घ्या.
५. आता भाजलेल्या चिकनला सुरीने चरे करून घ्या, आणि वरील मिश्रणात चांगलं घोळवा.
६. २-३ तास मुरत ठेवा.
७. ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करा.
८. ओव्हन ट्रे वर अल्युमिनिअम फॉइल वर चिकनचे तुकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
९. साधारण ४० मिनिटे २२० डिग्रीवर हीट करा.
ही झाली तुमची खमंग, खरपूस, जिभेला चटका लावणारी पेरी पेरी चिकन डिश तयार. :)
आपला,
मराठमोळा

वाचने
10885
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
चेपुवर विचारणारच होतो कसं
व्वा व्वा मस्त मस्त !
In reply to चेपुवर विचारणारच होतो कसं by गणपा
अहाहा!
मस्त
भारतात लोक महागाईने त्रस्त
अग्ग्ग्गग! खरच का रे
In reply to भारतात लोक महागाईने त्रस्त by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to भारतात लोक महागाईने त्रस्त by परिकथेतील राजकुमार
निवासी - अनिवासी.
In reply to भारतात लोक महागाईने त्रस्त by परिकथेतील राजकुमार
निवासी भारतिय स्वतःच्या
In reply to निवासी - अनिवासी. by प्रभाकर पेठकर
भ्रष्टाचार नामक व्याधीने
In reply to निवासी - अनिवासी. by प्रभाकर पेठकर
निवडणूक प्रक्रिया...
In reply to भ्रष्टाचार नामक व्याधीने by मराठी_माणूस
काका तुमचा प्रतिसाद पटला.पण
In reply to निवडणूक प्रक्रिया... by प्रभाकर पेठकर
पण माझ्या मते पराने 'तो'
In reply to काका तुमचा प्रतिसाद पटला.पण by गणपा
सहमत...
In reply to काका तुमचा प्रतिसाद पटला.पण by गणपा
पेरी पेरी.. यम्म यम्म
पेरी पेरी.. यम्म यम्म
कातिल फोटो!
फुल टु झकास मस्त, करुन बघणार आजच
वा.... अप्रतिम.. बघुन लगेच
झकास ..
चमचमीत कोंबडी.....
खत्तरनाक!! इतकं सॉल्लिड
>>एक शंका.. गॅसवर आधी का
In reply to खत्तरनाक!! इतकं सॉल्लिड by प्राजु
मस्त
एक नंबर रे , ममोशेफ !!
खल्लास..... !!!
जबरा... आता पेरी पेरी सॉस
लवकरच मासाहारी बनवनार राव